Typewriter - Ek shapit kholi books and stories free download online pdf in Marathi

टाईपराईटर- एक शापित खोली

दि. 24-04-09,

गावाकडचे तीन विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास कोलकत्ताला आलेत. तिघेही जिव्हाळ्याचे मित्र, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारे. तिघांनाही एकमेकांच्या आवडी, सीक्रेट, कमजोरी लहानपणापासूनच ठाऊक! एकमेकांत लपवण्यासारखे काही राहिले नाही. खरंतर ह्यांच्यात भांडण होणं म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखेच. खूप कमी आशंका. पण आता शहरात मात्र ह्यांच्यासोबात एक वेगळीच घटना घडणार होती, जे तिघांनीही कधी स्वप्नातही बघितले नसावे.
                              एकाच महाविद्यालयात तिघांनीही ऍडमिशन घेतले. आता फक्त राहायसाठी एक खोली बघायची होती. ह्यांना  इथे यायला जरा उशीर झाल्याने रूम शोधता मिळत न्हवती. रूम शोधून शोधून संध्याकाळ झाली पण तिघे राहण्यासारखी सिंगल खोली मिळत न्हवती. एक आखरी चान्स म्हणून एका घरी चौकशी करायला शिरलेत. एक म्हातारं जोडपं ह्या छोट्याश्या घरात खूप कालावधीपासून राहत होते. तिघांनी त्यांना एक राहायसाठी खोली आहे काय विचारलं, तर त्या म्हातारीने "नाही" असे उत्तर दिले. त्यातील एक म्हणाला, "आम्ही खूप दुरून आलोत हो! जरा असेल तर बघाना. खूप आशा घेऊन अलोत हो.प्लीज!"
                              म्हातारा म्हणाला, "एक खोली आहे पण त्या खोलीत पंधरा वर्ष झालेत, कुणीही राहत नाही. एवढेच काय?, आम्हीही कधी तिथे एका घटनेनंतर कधी गेलेलो नाहीत. ती रूम पाहिजे असेल तर सांगा. आणि त्या खोलीत राहायचे पैसे नाही दिलेत तरी चालेल. बघा आता."
                              त्यातील दुसरा मुलगा म्हणाला, "फुकट कशाला राहु हो आम्ही, पैसे देऊच की, तुम्ही कुठल्या घटनेबद्दल बोलत होत्या, ज्यानंतर तुम्ही कधीही गेले नाहीत."
                              म्हातारा म्हणाला, "तिथे पंधरा वर्षाआधी चार लोक मरण पावले होते. सर्वात आधी एक लेखक मरण पावला होता. पण त्याचा मृत्यूचे नेमके कारण कळले नाही, पण त्यानंतर जे चार लोक मेलेत ना ते ह्या लेखकामुळेच मेले असावेत असे आम्हालाच नाही तर सर्व लोकांनाही वाटते."
                              त्यातील तिसरा मुलगा म्हणाला, काय हो, नवीन युगात भूत प्रेत सारख्या गोष्टी करता. तो विसावा शतक होता. आता हा आमचा मॉडर्न काळ आहे, आम्ही ह्या असल्या गोष्टीवर विश्वस नाही ठेवत. तुम्ही फक्त ह्याच भाडे सांगा आम्ही आताच शिफ्ट होऊ."
                              म्हाताऱ्याने त्या रूमचे भाडे फक्त आठशे रूपये सांगितले. ते तिघेही एवढ्या मोठ्या शहरात एवढ्या कमी किंमतीचे मकान मिळाल्याने खुश होते. म्हातारीने त्या खोलीची चावी आणली. एवढे वर्ष झाल्याने दरवाजा खुलता खुलत न्हवता. पण एकावेळेस तिघांनीही जोरदार धक्का देऊन दार कसाबसा खोललाच. दार खुलताच, सर्वत्र धूळ, वाना-वानाचे किडे, सोबतच काहीतरी मेलेले असल्यासारखी खूप विचित्र वास येऊ लागली. रुम एवढी घाण होऊन होती की, त्याला साफ करून चांगली बनवण्यासाठी अक्खा एक दिवस लागणार होता. म्हणून त्या रात्री तिघांनीही म्हाताऱ्यांचा घरी मुक्काम केला.
                              दिवस उगवताच तिघेही खोली साफ करायसाठी आलेत. सर्व धूळ झाळून काढला, फरशी वगैरे पूसून ती खोली राहण्याजोगी तयार केली. त्या खोलीत कसल्याच वस्तूची कमी न्हवती. टेबल, जुनी खुर्ची, आरशा सर्वच वस्तू होत्या ज्या दैनंदिन वापरात कामी येईल. सोबत एक जुना टाईपरायटर चांगल्या अवस्थेत होता. हे जरा विचित्र होते. आपापल्या परीने सर्व सेट करून, स्वतःजवळचे वस्तू ठेऊन तिघांनाही आराम फर्मावला. रात्री  त्या खोलीत कसलाही त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी तिघेही कॉलेजला गेलेत.
                              कॉलेज वरून रूमला येताच त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी आपापल्या वस्तू जिथे ठेवल्या होत्या त्या दुसऱ्याच ठिकाणी हललेल्या होत्या. पूर्ण पसारा सावरून सजवून ठेवलेला होता. सोबतच त्यांनी रात्रभर केलेला कचरा पूर्ण साफ झाला होता. ती खोली त्यांनी सजवलेल्या खोलीपेक्षा आता चांगली दिसत होती. त्यांना वाटलं, त्या घरमालकिन म्हणारीने हे केलेलं असावं, म्हणून तो विषय दूर ठेऊन जेवण करायला खानावळ(मेस) ला गेले.
                              जेवण करून रूमवर येताच त्यांना, ती सजलेली रूम पुन्हा तशीच बिघडलेली दिसली, जशी कॉलेजला जाण्याआधी होती. तसाच कचरा, तसाच पसारा, जणू त्यांनी कॉलेज वरून स्वप्नच बघितलेलं असावं असच वाटलं. त्यांना हे जरा विचित्रच वाटलं. म्हणून त्यांनी ही बाब त्या म्हातारीला कळविली. म्हातारी हे ऐकून जरा घाबरलीच, पण नवे किरायदार एव्हढ्या लवकर सोडून जाऊन नयेत म्हणून तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनाही वाटलं की हे सर्व 'आँखोका धोखा' असावं.
                          रात्री एकाने आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी लॅपटॉपवर काम करू लागला. मध्येच प्रिंटरची शाई संपली. आता एवढ्या रात्री शाई कुठून आणायची त्याला प्रश्न पडला. तो आपल्या परेने एक-एक जुगाड करू लागला पण त्याचे काही काम झाले नाही. त्याला दुसऱ्याच दिवशी प्रोजेक्ट सबमिट करायची होती. मग त्याचे लक्ष्य त्या पुरण्या टाईपरायटरवर गेले. त्यानेही कधी एवढ्या जुन्या टाईपरायटरवर कांम केलेले न्हवते. त्याला उत्सुकता होतीच. दुसऱ्या सोबतीने दुसऱ्याच वस्तूला हात न लावण्याचा व त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो पुढचा एकही विचार न करता टाइपिंग करू लागला. त्याला जरा आश्चर्यच झाले, एवढा जुना टाईपरायटर एवढ्या चांगल्या पद्धतीने कसे काय काम करू शकतो? पण त्याला काय करायचे होते? आपले काम होत होते, ह्यातचाच तो संतुस्ट होता. टाइपिंग करत असताना त्याला मध्येच काहितरी विचित्र अनुभव येऊ लागले. त्याला मध्येच बटनातून करंट येत असल्यासारखे भासले, तर कधी चक्कर आल्यासारखे, डोके जड-जड झाल्यासारखे वाटू लागले. त्याने मध्येच आपले काम बंद केले, आणि जरा फेरफटका मारन्यासाठी बाहेर पडला. काही वेळाने घरी येताच त्याने आपले अधुरे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने आधीचे काम बघितले असता त्याला काहीतरी वेगळेच लिहिलेले भासले. त्याने ते वाचण्याचा प्रयत्न केला. पण त्याला माहीत न्हवते की, जे वाचत आहे ते एक कसलातरी मंत्र म्हणत आहे. जसा पूर्ण मंत्र वाचून झाला, त्याला चक्करच आली व तो खाली कोसळला.
                          त्याचा सोबत्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला पण त्याला होश येताच न्हवता, म्हणून त्यांनी डॉक्टरांना बोलाविले. त्याला रूमवरच एक सलाईन लावून त्याला आराम करण्याचा सल्ला देत आणि काही गोळ्या देऊन डॉक्टर निघून गेले. ते दोघेही विचारात पडले की एकाएकी ह्याला चक्कर कशी काय आली? त्यातील एकाने त्या टाईपरायटरची चौकशी घेतली, त्याने बेहोष होण्याआधी काय लिहिले व काय तो जोरात वाचत होता ते बघू लागला. त्याला तिथल्या एकाही कागदावर काहीही लिहिलेले दिसले नाही. त्यांना जरा आश्चर्य झाले. पण ह्याचे उत्तर त्याला होश आल्यावरच कळू शकणार होते.
                          अखेर दुसऱ्या दिवशी त्याला होश आलाच, शरीर खूप जड असल्यासारखे त्याला भासले. त्याने सलाईन का लावल्याचा जाब विचारला, तर त्या दोघांनी त्याला चक्कर आल्याचे सांगितले. सोबतच रात्री काय वाचत होता ते विचारले. त्याने आठवत नसल्याचे उत्तर दिले.
                          कॉलेज करून येऊन आणि जेवण झाल्यावर तिघांनाही जरा थकल्यासारखे वाटत होते म्हणून लवकरच झोपी गेले. रात्री दीडच्या सुमारास त्याचा डोळा उघडला. ते दोघेही बाजूला असूनही त्याला एकटेपण भासू लागत होते. त्याने तिथेच शिकत असलेल्या आपल्या गावाकडच्या मैत्रिणीला फोन लावला. तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते. ती पण जवळच राहत होती. थोडा वेळ बोलून झाल्यावर त्याला टाईपरायटरचा खट-खट आवाज येऊ लागला. टाईपरायटरकडे बघताच आवाज बंद व्हायचे, दुसरीकडे बघताच पुन्हा चालू होत होते. काही वेळ समाजण्यातच गेला की इथे काय होत आहे? तिथे काहीतरी लिहिल्याचे दिसत होते. ते बघण्यासाठी तो टाईपरायटरकडे हळू-हळू जाऊ लागला. तसेच टाइपिंगही होऊ लागले होते. तो जसा-जसा जवळ येऊ लागला टाइपिंगची स्पीड वाढू लागली. आता तो फक्त काही अंतरावर होता, तसाच टाईप होणं बंद झालं. त्याने तो कागद वाचण्यासाठी घेतला. तिथे लिहिलेले होते, "माझ्या आयुष्यात आपले मणकपूर्वक स्वागत! मी आशा करतो की, तुम्ही मला सदैव आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल, धन्यवाद!"
                          त्याला यामागचा उद्देश काही कळाला नाही, तशीच त्याचा चेहऱ्यावर खूप जळ-जळ होऊ लागली. त्याने तो कागद सोडून आपला चेहरा बघण्यासाठी त्या जुन्या आरशाकडे गेला. जसा तो आरशा पुढे आला, त्याला आपला चेहराच दिसत न्हवता. तो खूप घाबरला, स्वतःला चिमटाही घेतला, आपण झोपेत तर नाही म्हणून. पण तरीही तो काही आरशात दिसत न्हवता. तो आरशातून आजू बाजूला बघू लागला. आरशातून झोपलेले दोघेही दिसत होते पण तो स्वतः दिसत न्हवता. एवढ्यातच त्याचे लक्ष त्या आरशातून टाईपरायटर कडे गेले. तिथे एक सडलेल्या कवठित एक माणूस टाईपरायटरला हाताळताना दिसत होता, तसाच तो माणुस थांबला आणि त्याच्याकडे हळूच मान हलवू लागला. त्याने भीतीपोटी पटकन मागे बघितले, तर तिथे कोणीच न्हवते. पुन्हा आरशात बघता, तेव्हाही तो आरशा पुढे दिसत न्हवता, आणि टाईपरायटर कडे बघता तिथे स्वतःच काहीतरी टाईप करताना त्याला दिसले. स्वतःला आरशापुढे न दिसता त्या  कवठी असलेल्या माणसाच्या जागी बघताच तो जोरात किंचाळला.  त्याच्या आवाजाने ते झोपलेले दोघेही उठले. त्याला काय झाले विचारता, तो काहीही सांगायच्या तैयारीत न्हवता. जरा शांत झाल्यावर त्याने घडलेला प्रकार सांगितला. दोघेही आरशात बघू लागले तेव्हा त्या दोघंव्यतिरिक्त तिघेही दिसत होते, नॉर्मल आरशाप्रमाणे! पण ह्या घटनेमूळे तो आरशाला घाबरू लागला होता. तो पुन्हा घाबरू नये म्हणून दुसर्याने तो आरशाच बाहेर नेऊन फोळून टाकला. तेव्हा कुठे तो शांत झाला. पण त्यानंतर कुणालाही त्या रात्री झोप आली नाही.
                          दोन-चार दिवस चांगलेच गेले, पण एका रात्री, तिघेही झोपले असता, त्या टाईपरायटरला छेडलेल्या मुलाला झोपेतच कुणीतरी पायाकडून ओढल्यासारखे वाटले, आधी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही त्याने पण नंतर जास्तच खाली खिचल्यासारखे वाटू लागले. त्याने डोळे उघडले तर त्याला रुम आडवी दिसू लागली. त्याने डोळे हाताने पुसून पुन्हा बघितल्यावर त्याला समजले की तो सध्या भिंतीवर झोपलेला होता, डोकं वर आणि पाय खाली, ग्रेव्हीटीमूळ त्याला खाली खेचल्यासारखे वाटत असावे, पण भिंतीवर कुणी कासकाय झोपू शकतो? त्याने पाय खाली आणले तर तो सरळ जमिनीवर उभ्या असलेल्या स्थितीत आला. त्याला वाटले झोपेत चालत जाऊन इथे उभ्याने झोप लागली असावी असे वाटले पण फक्त तो मनाची शांती म्हणून हा विषय टाळत होता.
                          काही दिवसानंतर मांजरीचाही अनुभव आला ज्यात रात्री मांजर रडू लागत होती, आणि मांजरीचा चेहरा हुबेहूब त्याच्यासारखा दिसत होता, नंतर ती मांजर जणू आत्महत्याच करावी तशीच पंख्याला लटकून मेलेली होती. स्वप्नात फक्त टाईपरायटरचा आवाज आणि तो फुटलेला आरशा तो विचित्र माणूसच दिसत होता. असे विचित्र अनुभव काही दिवस चालू होते. ह्याची फक्त ह्यालाच भनक होती, त्या दोघांना ह्यातलं काही माहीत न्हवत.
                          एक रात्री तो एकटक टाईपरायटरकडे बघू लागला. काही वेळ बघता बघता टाईप रायटर आपोआप चालू झाला आणि कागदावर काहीतरी टाईप होऊ लागले. आधी तो घाबरलाच पण त्याने सैयम ठेवत टाईपराईटरकडे बघू लागला. थोडं टाईप करून मशीन बंद झाली. त्यावर लिहिलेलं होत, "तुम्ही माझे सर्व इच्छा, आकांशा पूर्ण करणार आहात याबद्दल मी तुमचे खूप-खूप आभार मानतो"
                          त्याला पुन्हा याबद्दल काही कळत न्हवत. त्याने प्यारेग्राफ बदलून त्याच पेजवर टाईप केले, "आपण कोण आहात, आणि मी तुमच्या कुठल्या कामी येणार आहो जरा सांगाल काय?"
                          पुन्हा उत्तरात मशीन आपोआप टाईप होऊ लागली त्यावर लिहिल्या गेलं, "मी तुम्हाला जन्नतपेक्षा भारी जागेवर घेऊन जायला आलो आहो. फक्त तिथे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला घेऊन यावं लागेल. आणि मी आश्वासन देतो तुम्हाला काही होणार, नाही!, फक्त उद्या रात्री तिला बाल्कनीत घेऊन जा."
                             त्याला वाटू लागले जो कोणी आहे तो आपल्या भल्यासाठीच आलेला असावा आणि आपल्या मैत्रिणीला एक गिफ्ट म्हणून ही नवीन काहीतरी देऊ जे मलाही माहीत नसेल. त्याने तिला रात्री यायला कसेतरी मनवले. ती यायच्या तैयारीत न्हवतीच पण सरप्राईझ च्या नावाखाली तिने होकार दिला. दोघेही त्या रात्री गच्चीवर गेलेत. सोबत वर तो टाईपरायटरही आणला. त्यावर आपोआप लिहून आले, "आर यु रेडी?" त्याने "यस" टाईप केले. खुल्या आकाशातील तारे आपोआप इकडे-तिकडे सरकू लागले. चंद्राला जणू लपविण्यासाठी ढग येऊ लागले.  टाईपरायटर वर "स्टार्ट" लिहून आले. तो आपोआप मंत्र म्हणू लागला जो टाईपरायटरवर काही दिवसा आधी लिहिल्या गेले होते.
                             काही क्षणातच दोघेही एका बंगल्यात आलेत. त्या बंगल्यात आधीच्या जमान्याप्रमाणे वस्तू होत्या. जास्त वस्तू सोन्याने बनलेले होते. त्याची मैत्रीण त्या वस्तू आणि जेवर बघून खूप खुश झाली. तिने ह्यांच्याकडे काही बांगळ्या आणि हिऱ्याची नेकलेस सोबत घेऊन जाण्याची इच्छा प्रकट केली. एवढ्यात पुढून एक जवान मुलगा, दिसायला जणू राजकुमारच त्याला बघून ती फिदाच झाली. त्या राजकुमाराने म्हटले तू फक्त हे घेऊनच नाही तर ह्या पूर्ण बंगल्यावर राज करू शकतेस. मला तुझे आधीचे जीवन चांगल्या प्रकारे माहीत आहे, कश्या प्रकारे जगत आहेस ते! जर तू माझ्यासोबत लग्न करशील तर तुझे जीवन तुझ्या विचारांच्या खूप दूर, खूप साफल्य आणि महाराणीची जिंदगी लाभेल.
                             हे एकूण ती म्हणाली, "मला नको हे जीवन, करण मी ह्याच्यावर प्रेम करते, ह्याला सोडून तुमच्याकडे कशी येऊ शकते?
                             तीच अस म्हणणं एकूण त्यालाही वाटलं ही माला सोडून जाणार नाही. पण तेवढ्यात त्या राजकुमाराने आपला डाव पालटवला, "जशी तुझी इच्छा पण आताच विचार करून घे मी तुमचे भविष्य बघितलेले आहे दोघे भविष्यात एकत्र थोडेफार आनंदी राहाल पण तू माझ्यासोबत जेवढी आनंदी राहशील तेवढी जगातील कुठलीही स्त्री आजपर्यंत राहिलेली नाही."सोबतच काही शेरो शायऱ्या करून तिला राजकुमार आपल्या जाळ्यात ओढत आणतो. त्यावर तो काहीही करू शकत नाही.
                             नंतर तीच म्हणते, "मी तुमच्यासोबत लग्न करायला तैयार आहे, मी तुम्हाला आधीच होकार दिला असता, पण ह्याच्यावर पाहिलं प्रेम असल्याने, मी जरा दबावात होते. पण एका मुलीला मुलाकडून ह्या राजकुमारसारख्याच अपेक्षा असतात, जर आता ह्याला हो नाही म्हटले तर जीवनभर पचात्ताप करत फिरेल. आणि तुझे धन्यवाद, मला स्वप्नातल्या राजकुमार भेटून दिल्याबद्दल."
                             तो तिला सोडून न जाण्याची विनंती करतो, आणि सोबतच एकत्र घालवलेले क्षणही आठवून देतो पण ती राजकुमाराच्या प्रेमानं एवढी बुडालेली असते जणू ती त्यांच्यासाठीच बनलेली आहे. हे बघून त्याला खूप राग येतो, आपला राग तिला मारण्यात काढतो तो तिला इम्याजीनेशनच्या दुनियेत गळा आवळण्याचा प्रयत्न करतो पण तो खऱ्या आयुष्यातही तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो.
                             दोघे सोबती खाली झोपले असता, एकाला जाग येते ज्याने काही दिवसा आधी आरशा फोडलेला होता. तो वर येतो तिथे तो त्याला तिचा गळा दाबत अवस्थेत बघतो.त्याचे डोळे पूर्ण लाल झालेले, नाक लांबलेलं, नख वाढलेले, एक विचित्र रुपात त्याला बघितल्यावर तो काहीही न बघता त्याचा गाळा हा दाबू लागतो. ह्यातच त्याचे प्राण जाते.
                             तो हादरलेल्या अवस्थेत खाली येतो. त्याने अजून तिसऱ्याला काही खबर दिलेली नाही. तो  खाली येऊन त्यानेच फोडलेल्या आरशात बघतो. प्रत्येक फुटलेल्या तुकड्यात त्याने केलेल्या चूका दिसत असतात. त्यातच काही वेळा आधी झालेल्या खुणाचीही प्रतिमा दिसते. त्याला घोळ पश्चात्ताप होतो. आपल्या जवळच्या मित्राचा आपणच खून केला, हे त्याला सहन होत नाही. तो त्यातील एक काचेचा तुकडा घेतो आणि स्वतःचाच गळा चिरतो काही वेळातच त्याला मरण येते.
                             दुसऱ्या दिवशी पोलीस इन्वेस्टीगेशन करतात. पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये पहिल्याचा खून त्याचाच दुसरा सोबती करतो, दुसरा डिप्रेशनमध्येच स्वतःला संपवतो, पण त्या मुलीचा खुनाची काही रिपोर्ट येत नाही. तिच्या गळ्यावर कसलेही निशाण नाही, फूड पॉइझनिंग नाही,  तर मग तिचा खुन झाला कसा अजून कुणाला माहीत नाही...

ह्याचे उत्तर फक्त मला माहीत आहे. उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट बघावी लागेल.
तसा माझा आधीपासूनच मुलींवर विश्वास न्हवताच..
ही कथा पूर्णपणे घडलेल्या घटनांवर आधारित आहे. येथील एकही गोष्ट खोटी नाही!
आणि मला माफ करा, कारण मी पूर्ण कथेत त्यांचं नाव घेतलेलं नाही, त्यात फक्त पहिला, दुसरा,तिसरा, तो, ती , त्यांचे , असेच शब्द वापरलो. जर काही अडचण झाली असल्यास कथा पुन्हा वाचा.
काय आहे ना माझे वय खूप झाले आहे. आता त्यांची खरी नाव काही आठवत नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे, हा टाईपरायटरही खूप जुना झालेला आहे.
आता मी माझी कथा घेऊन येतो तुमच्या पुढच्या भेटीला. तोपर्यंत जगत राहा!

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. येथील जागेशी, वस्तूशी कुठलाही संबंध नाही आणि मला ह्या कथेतून कुठलाही अंधविश्वासाला खतपाणी द्यायचा नाही.)


उत्कर्ष दुर्योधन लिखीत...