प्रार्थना का करावी?

प्रार्थना का करावी?

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रार्थनेच महत्व असतच. काही जण ह्या गोष्टीला नकार देतील पण वैज्ञानिकांनी सुद्धा प्रार्थनेचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो हि गोष्ट मान्य केली आहे. अर्थात प्रार्थना करणे म्हणजे रोज मंदिरात जाऊन देवाची पूजा करणे नक्कीच नाही. मंदिरात जाऊन पूजा करणे हा श्रद्धेचा भाग आहे. आणि श्रद्धा असणे नेहमीच गरजेचे असते. प्रार्थना करणे म्हणजे एका शक्तीची पूजा करणे. काही वेळा त्या शक्तीला निसर्ग म्हणल जात तर काही वेळा देव. देव सुद्धा अनेक आहेत. काही लोकं कृष्णाला पूजतात तर काही गणपतीला अर काही देवींना. शेवटी काय, प्रत्येक जण कोणत्याना कोणत्या प्रकारे प्रार्थना हा करत असतोच. माणूस प्रार्थना करतो तेव्हा तो केवळ त्या विशिष्ट शक्तीची आराधनाच करतो असे नाही तर तिच्या सामर्थ्याला आवाहन करत असतो. काही अडचण आली तर त्यातून मार्ग शोधण्यासाठी त्या शक्तीला आवाहन करत असतो. आणि प्रार्थना केल्यानी एक प्रकारची सकारात्मक उर्जा मिळते ज्यामुळे प्रश्नांना उत्तर सापडतात, आनंद मिळतो आणि आयुष्य सुखी समाधानी होण्यास मदत होते. एखाद्या मंत्राचा तालासुरात आणि एका ठेक्यात वारंवार उच्चार करणे. या उच्चारालाच मंत्र जप असे म्हटले जाते. एखाद्या विशिष्ट वेळी जर प्रार्थना केली तर आयुष्याला एक शिस्त लागते त्याचबरोबर आयुष्य सकारात्मकतेनी जगण्याचा कल वाढीस लागतो. सर्व जाती धर्मात प्रार्थनेच महत्व असतच. आणि हे प्रत्येकानी जपले पाहिजे. काहीतरी मागण्यासाठी नाही तर बऱ्याच वेळा जे काय मिळाल आहे त्याची कृतज्ञता म्हणून सुद्धा प्रार्थना केली जाते आणि धन्यवाद दिले जातात. म्हणजेच काय, आपण नाही म्हणालो तरी प्रार्थना हि आपल्याकडून होत असतेच.

 

* प्रार्थना कधी करावी-

सकाळचा जो वेळ असतो ज्या वेळी आपल्यामध्ये खूप उर्जा असते आणि त्यावेळी जर त्या सकारात्मक उर्जेला प्रार्थनेची जोड मिळाली तर येणारा दिवस सुखकर होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसाची सुरवात प्रार्थनेनी केली तर साहजिकच त्याचा प्रभाव पूर्ण दिवसावर झालेला दिसून येईल. त्याचबरोबर, दिवसाची शेवटी म्हणजेच रात्री झोपतांना सुद्धा प्रार्थना केली आणि सुंदर दिवस दिल्याबद्दल देवाचे आभार मानले तर रात्री शांत झोप मिळण्यास फायदा होतो. पण तस पाहिलं तर प्रार्थनेची काही वेळ नसते. जेव्हा मनाला शांत करायचं असेल तेव्हा प्रार्थना केली तर त्याचा खूप फायदा झालेला दिसून येईल.

 

* प्रार्थना कशी करावी?-

प्रार्थना एकट्यानी करावी करावी कि सामुहिक करावी असा प्रश्न पडण साहजिक आहे. दोन्ही पद्धतीचे वेगवेगळे फायदे आहेत. एकट्यानी केलेली प्रार्थनेच उपयोग तुमच्या साठी झालेला दिसुन येईल आणि सामुहिक प्रार्थनेमुळे आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत हि भावना निर्माण करण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होतांना दिसून येईल. पण सामूहिक प्रार्थनेपेक्षा वैयक्तिक प्रार्थनेचा प्रभाव अधिक असतो असे या प्रयोगांत आढळून आले आहे.

 

*प्रार्थनेच महत्व-

आपल्या मनात असा विचार नक्कीच येऊ शकतो, खरच प्रार्थना इतकी महत्वाची आहे? माझ्या मते ह्या प्रश्नच उत्तर हो आहे. फक्त काहीतरी मागण्यासाठीच नाही, तर धन्यवाद देण्यासाठी सुद्धा प्रार्थना महत्वाची असते. आणि त्याचबरोबर, आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ शक्ती आहे ह्याची नेहमीच आपल्याला जाणीव राहते. त्यानी 'अहं' कमी होण्यास देखील मदत होते. मी सगळ करते / करतो ह्या विचारांना कुठेतरी आळा बसतो. आपल्याला मी मधून बाहेर पडण्यासाठी प्रार्थनेचा उपयोग झालेला दिसतो. आपण प्रयत्न करत राहायचे आणि त्याचे परिणाम नक्कीच झालेली दिसून येतात.

प्रार्थना करून खरच देव पावतो का हि गोष्ट मला माहिती नाही पण प्रार्थना केल्यानी आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम दिसून येतात, मन खंबीर होण्यास फायदा होतो हि गोष्ट मात्र नक्की आहे.

१. प्रार्थनेमुळे आयुष्यात शिस्त लागते-

रोज प्रार्थना करण्याची सवय लागली कि आपोआप आयुष्यात सुद्धा शिस्त लागायला मदत होते. प्रत्येकाच्याच आयुष्यात शिस्तीच महत्व आहेच. आयुष्यात पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल तर शिस्त असण गरजेच असत. आणि हि शिस्त लागण्यासाठी प्रार्थना पहिली पायरी बनू शकते. दिवसातला थोडा वेळ सर्वोच्च शक्ती ची आठवण केल्यानी आयुष्यात अमुलाग्र बदल होतांना तुम्ही पाहू शकाल.

 

२. प्रार्थनेच मानसिक लाभ-

मनाला शांत करण्यासाठी प्रार्थनेचा लाभ झाल्याचा दिसून येतो. प्रार्थना करतांना मन एकाग्र होण्यास मदत होते आणि मनातले असंख्य विचार बाजूला टाकले जातात. आणि साहजिकच मन शांत होते. मन शांत झाले कि त्याचा खूप चांगला परिणाम कार्यक्षमतेवर झालेला दिसून येतो. आणि कार्यक्षमता वाढली कि नाव नवीन ध्येय गाठण्यासाठी तुम्ही तयार होता.

 

३. ताण- तणाव कमी करण्यासाठी प्रार्थना महत्वाची असते-

हल्ली प्रत्येक व्यक्तीच आयुष्य ताणांनी भरलेल असत. कधी कधी ताण इतका वाढतो कि त्याचा नकारात्मक परिणाम आयुष्यावर झालला दिसू शकतो. आणि नैराश्य सुद्धा येऊ शकतो. ह्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रोजच्या आयुष्यात प्रार्थनेचा समावेश! मनाला जाणवणारा तणाव कमी करून डिप्रेशन कमी करण्याची ताकद प्रार्थनेत असते असे या प्रयोगांत दिसून आले आहे. त्यामुळे नैराश्याला दूर ठेवायचं असेल तर आयुष्यात प्रार्थनेचा समावेश आवर्जून करा.

 

४. प्रार्थनेमुळे स्वतःबद्दल ची धारणा बदलण्यास फायदा होतो-

कधी कधी अपयाशनी मनाच खच्चीकरण होऊ शकत आणि स्वतः बद्दलचा आत्मविश्वास कमी होतो. अश्यावेळी प्रार्थनेचा खूप उपयोग झालेला दिसून येतो. प्रार्थना केल्यामुळे आपण ह्या विश्वाचे घटक आहोत, देवाची मुल आहोत हि धारणा पक्की होते आणि साहजिकच हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यास खूप उपयोग होतांना दिसतो. अडचणीतून मार्ग शोधण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे प्रार्थना आयुष्यात अत्यंत महत्वाची असते.

 

***

Rate & Review

Verified icon

Ram Laxman Sawant 5 months ago

Verified icon

Parag 5 months ago

Verified icon

Vinayak Apte 6 months ago

Verified icon

rani 6 months ago

Verified icon

VaV 7 months ago