Bandini - 2 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 2

बंदिनी.. - 2

... बोलता बोलता तिच्याचकडून मला कळलं की त्याचं नाव अनय आहे....

पुढे..

एका क्षणाचाच नजरेचा खेळ...पण कायमची मनात घर करून गेली त्याची ती नजर...का कुणास ठाउक, पण त्याला बघितलं की असं वाटायचं की आमची खूप आधीपासूनची ओळख आहे...कुठे भेटलेय बरं मी ह्याला??? खूप आठवायचा प्रयत्न केला..पण छे, आठवेचना...? मग शेवटी तो नाद मी सोडूनच दिला..?. पण त्याला बघितल्यापासून मी मात्र 'सातवे आसमान पर' होते ? ... त्यादिवशी घरी गेल्यानंतरही डोळ्यासमोर तोच दिसत होता.जळी स्थळी काष्ठी पाषाणी.. अनय..अनय...अनय..!!? संध्याकाळी किचन मधे काम करत होते.. आमची ऋतु आलीच...

"ए ताईs... तुझं काहीतरी बिनसलंय का गं.." मी म्हणाले, "का गं..माझं कशाला काही बिनसेल...?"

" मग तू आज नवीन डिश बनवतेयस का एखादी?"- ऋतू..

" तू पण ना.. आता परातीमध्ये पीठ घेऊन कसली डिश बनवणार... कणिक मळतेय गं.. "- मी म्हणाले..

" हो ना...मग पीठावर हळद का घातलीयस गं... ??" - ऋतू.

"अगं बाई.. खरंच की... ऋतू प्लीज आईला ह्यातलं काही सांगू नको.. माझी वाट लागेल " मी केविलवाण्या सुरात म्हणाले..

पण ऐकेल ती ऋतू कसली...म्हणाली -" मग सांग तुझं काय बिनसलंय ते? ".....

"अग बाई.. खरच काही नाहीये.. तू जा बघू इथून उगीच एवढ्याश्या गोष्टीचा मॅटर नको करू ?" मी मुद्दाम जरा रागवूनच म्हणाले...

" मॅटर तो हम पता करके रहेंगे ??"-इति ऋतू...

" तू जातेस की आता......." मी एवढ बोलताच ऋतुजा ने तिथून धूम ठोकली.... आणि जाता जाता ओरडलीच...

" उद्या ऑफिस मधून येताना तू मला मोठी कॅडबरी आणणार आहेस... तोंड बंद ठेवण्यासाठी?"

मी हसतच आपला मोर्चा किचन कडे वळवला?... एक सुटकेचा निःश्वास सोडला... म्हटलं बरं झालं ह्या बयाने कणीक भिजवायच्या आधीच बघितलं.. वरच्यावर हळद काढता तरी आली.. नाहीतर आज काही खरं नव्हतं माझं...??....अनय चा चेहरा डोळ्यांसमोर आला आणि उगीचच वाटलं की माझी फजिती बघून तो हसतोय मला ?. त्यानंतर ऑफिस मधे वावरताना बर्‍याचदा आम्ही एकमेकांसमोर यायचो.. पण - जेव्हा पण तो समोर यायचा, माझी नजर खाली झुकायची...! ??आणि बॅकग्राउंडला गाणं वाजायचं... "आँखों में तेरी अजब सी अजब सी अदायें हैं.. दिल को बना दे जो पतंग साँसें ये तेरी वो हवायें हैं.. !!" आणि मग त्या ओम शांती ओम मधल्या दीपिका सारखी मागच्या मागे पडते की काय, असच वाटायचं.. ??.. पण त्याच्याकडे सरळ सरळ बघण्याची कधी हिम्मतच नाही झाली... बर्‍याचदा तन्वी आणि त्याच्यामधे बोलणं व्हायचं; पण मला मात्र त्याच्याशी बोलण्याचा विचार करूनच अवघडल्यासारखं व्हायचं.. तो समोर जरी आला तरी पोटात गोळा यायचा.. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मी माझ्या केबिन मधे बसून राहायचे.. मनातून खूप वाटायच की त्याच्याजवळ बसून त्याच्यासोबत खूप गप्पा माराव्यात.. त्याच्यासोबत बोलता बोलता त्याला डोळ्यात साठवून घ्यावं.. पण धीरच नाही व्हायचा.. रोज ऑफिस मध्ये आल्यावर तो एकदा तरी दिसावा असं मना पासून वाटायचं.. तो जर दिसला नाही तर खूप बेचैन व्हायची मी.. बर्‍याचदा येता जाताना माझ्या केबिन च्या काचेतून मला तो दिसायचा.. तो दिसला की त्याच्यासोबत बोलण्याची इच्छा आणखी तीव्र व्हायची... पण आपण होऊन त्याच्यासोबत कसं बोलावं तेच कळायचं नाही.. मी स्वतःहून त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतेय हे समजल्यावर तो काय विचार करेल माझ्याबद्दल असं वाटायचं .. मला तर आता तो खडूस वाटायला लागला होता... इतर सर्वांबरोबर बोलायचा; पण माझ्याबरोबर कधीच स्वतःहून बोलायला आला नाही.. ?.. तो हे मुद्दाम करत होता की खरंच त्याला माझ्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता ?..

पण मी त्याचा एवढा विचार का करतेय.. हे मला नेमकं काय होतंय.. का एवढी ओढली जातेय मी त्याच्याकडे.. एक मिनीट... हे प्रेम तर नाही ना... काहीही काय मीरा.. तू पण ना.. लगेच काहीही निष्कर्ष काढून मोकळी होतेस.. तुम्ही तर अजून नीट बोलत सुद्धा नाही आहात?..... काहीच कळत नव्हतं.. पण जे होतं ते खूप हवं हवंसं वाटत होतं.. ?

एकदा माझ्या केबिन च्या काचेतून माझ्याकडे बघताना मी त्याला बघितलं...मला थोडं आश्चर्य वाटलं... अनय... आणि इथे???.. मी फक्त भुवया उंचावूनच त्याला काय म्हणून विचारलं.. तसा तो हसला.. मानेनेच काही नाही म्हणून निघून गेला.... वाटलं.. असा कसा हा वेडा.. नक्की काय चालतं ह्याच्या मनात.. काहीच कळत नाही..?

कसं कुणास ठाऊक.. पण हळूहळू आम्ही बोलायला लागलो.. तो सर्वांसमोर माझ्यासोबत जास्त बोलत नसला तरी कधी कधी वेळ मिळाल्यावर माझ्या केबिन मध्ये येऊन बसायचा.. तेव्हा मात्र तो बरच काही बोलायचा.. कधी आधीच्या जॉब बद्दल.. कधी स्वतः बद्दल... तर कधी त्याच्या स्वप्नांबद्दल... तो बोलायला लागला की मी त्याच्यामधे हरवून जायची.. असं वाटायचं, हे असंच अखंड चालू राहावं...त्याने माझ्यासमोर बसून बोलत रहावं आणि त्याच्या बोलण्याने माझे कान तृप्त तृप्त व्हावेत.... ??


एके दिवशी मी अशीच माझ्या केबिन मध्ये काम करत बसले होते.. तेवढ्यात त्याला माझ्याकडे येताना मी काचेतून पाहिलं..माझं हृदय वेगाने धडधडायला लागलं ❤️

..जेव्हा पण तो समोर यायचा हे असंच व्हायचं माझं..!

तो केबिन मध्ये आला एक खुर्ची जवळ ओढली आणि एकदम माझ्या समोर येऊन बसला... मी तर भान हरवून त्याच्याचकडे बघत राहिले... एरव्ही तो थोडं अंतर राखूनच बसायचा.. पण आज काय झालं होतं कुणास ठाऊक!! त्याने इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली.. बोलता बोलता खुर्ची अजून जवळ सरकवली.. आणि हळूच माझा हात हातात घेतला...! माझ्या अंगावर सssर्रकन काटा उभा राहिला....!! घसा कोरडा पडला.. उगीचच वाटलं की कोणीतरी बघेल.. खरं तर.... आमच्या दोघां शिवाय तिथे कुणीच नव्हतं.. काय बोलावं सुचेचना.. माझी तर जणू बोबडीच वळाली होती... तो आता हळुवार माझा हात कुरवाळायला लागला.. आणि एकीकडे तो बोलतच होता. .. पण त्याचं बोलणं माझ्या कानात शिरंतच कुठे होतं... मी तर केव्हाच एका नवीन भावविश्वात जाऊन पोहोचले होते... ??

काही क्षण असं वाटलं जणू मी स्वप्नातच आहे.. काहीसा आनंद आणि काहीशा आश्चर्यमिश्रित नजरेने मी त्याच्याकडे बघत होते.. वाटलं.. हाच ना तो - जो सर्वांसमोर माझ्यासोबत अनोळखी असल्यासारखं वागतो...!! ??

.. पण आज त्याचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते.. आज त्याच्या त्या तांबूस डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळेच भाव होते.. मी अजूनही त्याच्याकडेच बघत होते.. माझा हात सुद्धा अजूनही त्याच्या हातातच होता.. तो त्यावेळी काय बोलत होता ते आता जरासुद्धा मला आठवत नाही.. पण तो क्षण खूप सुंदर होता... त्याच्या त्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने मी अगदी मोहरून गेले होते.. हृदयात कुणीतरी सतारीच्या तारा छेडल्याचा भास झाला होता... ?

तितक्यात बाहेरून कुणाचातरी बोलण्याचा आवाज आला आणि आम्ही भानावर आलो.. त्याने एवढा वेळ हातात धरलेला माझा हात सोडला.. आणि तो जाण्यासाठी उठून उभा राहिला.. माझं मन त्याला ओरडून सांगत होतं-की 'कुठे निघालास असा? थांब ना थोडा वेळ!.. तुला अजून मन भरून बघितलं सुद्धा नाही.. आत्ता कुठे खेळ सुरू झालाय.. '

तो माझ्याकडे बघून हसला.. जणू माझ्या मनाचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला होता.. पण.. त्याला थांबून जमणार नव्हतं.. आम्ही ऑफिस मध्ये होतो.. त्यामुळे तो तिथून निघून गेला.. इकडे माझं मन पाखरू होऊन उंच उंच आकाशात भरारी मारून आलं होतं... केव्हाच..!!!

अशा सिच्युएशन ला अरिजीत च्या आवाजातल्या ओळी आठवल्या....


तुम ही सोचो ज़रा

क्यूँ ना रोकें तुम्हें

जान जाती है जब उठ के जाते हो तुम..

तुमको अपनी क़सम जानेजां...

बात इतनी मेरी मान लो..

आज जाने की ज़िद ना करो

आज जाने की ज़िद ना करो....

To be continued..

#प्रीत?

Rate & Review

Bhagyashree Akiwate
Sonali Chaudhari

Sonali Chaudhari 3 years ago

s s

s s 3 years ago

Monica Bardeskar

Monica Bardeskar 3 years ago

Sonal More

Sonal More 3 years ago