Bandini - 11 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 11

बंदिनी.. - 11

.... आता फक्त चार दिवस.. मग मी अनय च्या आयुष्यातून दूर निघून जाणार होते.....

पुढे..

आई पप्पा यायच्या आधीच मी ऋतू च्या आग्रहाखातर थोडसं खाऊन घेतलं.. आणि झोपायला गेले.. तिला सांगितलं की, 'प्लीज त्यांना सांग मी दमले होते म्हणुन लवकर झोपले' ....' सॉरी देवा!... मी ऋतू ला खोटं बोलायला सांगतेय.. ते ही आई पप्पांसोबत... 😔 पण मी असा चेहरा घेऊन त्यांना सामोरी कशी जाणार.. 😒' .. मनोमन देवाची आणि आई पप्पांची माफी मागितली🙏.. आणि क्षणातच निद्रादेवीच्या अधीन झाले....

- - - - - - - - XOX - - - - - - -

सकाळी ऑफिस ला जाण्यासाठी उठले... खरं तर इच्छाच नव्हती.. पण जाणं भाग होतं.. चार दिवसांत हातातलं सर्व काम पूर्ण करून handover द्यायचा होता... मी जरा नाखूषीनेच आवरलं आणि ऑफिस ला आले.. आज मी ठरवलं होतं.. की main room मध्ये नाही जायचं.. जे काही काम असेल ते माझ्याच केबिन मध्ये बसून करायचं.. नाश्त्याला जातानाही मी तन्वी ला कॉल करूनच बोलावलं.. परत आल्यावरही माझ्याच केबिन मध्ये बसले.. कितीही ठरवलं तरी मनच ते.. राहून राहून अनय ची आठवण काढत होतं.. तन्वी च्या बोलण्यातून समजलं होतं की तो डे शिफ्ट ला आलाय.. एक क्षण मनात विचार आला.. एकदा बघून येऊ का त्याला.. पण दुसर्‍या क्षणीच मी स्वतःला आवरलं.. आणि स्क्रीन कडे वळले... हे चार दिवस मी फक्त आणि फक्त कामातच concentrate करायचं ठरवलं होतं..

इतक्यात टेबल वरचा इंटरकॉम वाजला.. सरांनी main room मधून कॉल केला होता..

"इकडे येतेयस का.. काही पॉईंट्स discuss करायचे होते.."

"हो सर.. आलेच" मी म्हणाले... सरांना नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता..

दरवाजा उघडून आत आले.. अनय च्या टेबल कडे बघायचं कटाक्षाने टाळलं.. आणि सरांच्या टेबल कडे गेले.. सरांनी बसायला सांगितलं.. मी मुद्दामच अनय कडे पाठ करून बसले... सरांसोबतचं discussion झाल्यावर मी जाण्यासाठी उठले.. अनय ला बघण्याची इच्छा तीव्र झाली.. मला दगा देऊन नजर त्याच्या दिशेने वळलीच!... बरोब्बर त्याच क्षणी अनय ने ही वळून माझ्याकडे बघितलं.. मी लगेच खाली बघितलं आणि तिथून निघून आले... माझ्या केबिन मध्ये येऊन बसले.. परत मनात उचंबळून आलं.. कसंबसं स्वतःला शांत केलं... आणि स्वतःला कामामध्ये गुंतवून घेतलं.. लंच ब्रेक कधी झाला समजलंच नाही... घड्याळाकडे बघितलं तर पावणे दोन वाजले होते.. तन्वी कशी आली नाही अजून बोलवायला 🤔.. म्हणून मी तिला कॉल केला.. तर फोन ही लागेना.. नेटवर्क नसेल बहुतेक.. इंटरकॉम वर कॉल करायचं म्हटलं तर टीम च्या फोन वर कॉल करायला लागेल.. त्यांना सर्वांना मिळून दोन कॉमन फोन दिले होते.. कारण त्यांचे PC ही कॉमन होते.. ते सर्व मिळून तीन PC आणि एक लॅपटॉप वर काम करायचे as a team..
आणि तिथे तर अनय बसला होता मघाशी.. त्याने फोन रिसीव्ह केला तर.....?

त्यापेक्षा मी उठले आणि main room मध्ये गेले.. बघते तर अनय आणि तन्वी समोरासमोर बसून बोलत बसले होते.. अनय ची माझ्याकडे पाठ होती.. समोर बसलेल्या तन्वी ला मी हातानेच जेवायला चल म्हणून इशारा केला.. आणि तीचं उत्तर ऐकायच्या आतच निघून आले... कदाचित अनय ने ही मागे वळून बघीतलं असेल.. पण मी तोपर्यंत तिथे थांबलेच नाही...

पुढचे चार दिवस मी हेच बघत होते.. अनय आणि तन्वी नेहमी एकत्र असायचे.. जास्तीत जास्त वेळ ते एकमेकांसोबत असायचे.. पण मी लक्ष दिलं नाही.. आत कुठेतरी खोलवर वेदना व्हायच्या.. पण आता त्याचीही सवय करून घ्यायला हवी होती...😑

- - - - - - - - - - XOX - - - - - - - -

आजूबाजूच्या लोकांच्या आवाजाने माझं मन भूतकाळातून परत वर्तमानकाळात आलं... सर्वजण आपापल्या ऑर्डर चे meal बॉक्स घेत होते.. त्या फूड सर्व्हर ला जो तो हाका मारून आपापल्या orders घेण्याच्या घाईत होता.. मलाही भुकेची जाणीव झाली.. तितक्यात विक्रांत आला...

"कुठे गेला होतास?".. मी

"अगं तुला झोप लागली होती बहुतेक.. म्हणून मी त्या मागच्या सीट वरच्या माणसासोबत बोलत बसलो होतो.. मुंबईचाच आहे तो... मस्त गप्पा रंगल्या होत्या आमच्या.. ☺️" - विक्रांत म्हणाला..

" अच्छा... मला ना खूप भूक लागलीये..😯".. तोंड एवढंसं करत मी म्हणाले...

"हो मॅडम... आपली ऑर्डर पण येईलच इतक्यात.. तोपर्यंत तोंड तरी धुवून घ्या "

" हो.. आलेच " म्हणत मी उठले आणि फ्रेश होऊन आले..

काही क्षणातच तो फूड सर्व्हर आमचे meal बॉक्स घेऊन आला..

खूप भूक लागली होती.. मस्तपैकी ताव मारला जेवणावर...

जेवून झाल्यावर मी आणि विक्रांत थोडा वेळ गप्पा मारत बसलो... आता हळूहळू ट्रेन मधली गर्दी आणखीनच कमी कमी होत होती.. तसतसं वातावरण शांत होत चाललं होतं.. ट्रेन च्या धावण्याचा आणि एखादं स्टेशन जवळ आल्यावर हॉर्न चा.. एवढाच काय तो आवाज येत होता.. मध्येच कोणीतरी जागं असेल तर त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज त्यात भर घालत होता... अकरा वाजायला आले होते.. विक्रांत ने आमच्याही बॅग्स बाहेर सीट वर काढून घेतल्या.. सर्व घेतलंय की नाही याची खात्री करून घेतली.. आणि थोड्या वेळातच हॉर्न चा आवाज झाला आणि ट्रेन थांबली.....

'करमाळी' - स्टेशन वर पाटी झळकत होती.. आम्ही आमचं सामान घेऊन उतरलो..
तिथून cab करून पणजी ला आलो..विक्रांत च्या ऑफिस मधून झालेल्या बदली मुळे आम्ही इथे आलो होतो.. कंपनी त्यांच्या एम्प्लॉईजना राहण्यासाठी क्वार्टर्स alott करत होती.. आमच्या क्वार्टर समोर cab थांबली.. आणि आम्ही उतरलो.. Cab ड्रायवर पैसे घेऊन निघून गेला.. कंपनी ने alott केलेले बरेचसे क्वार्टरस् होते तिथे.. आम्ही आमच्या रुम मध्ये गेलो.. सामान ठेवलं... आंघोळ केली.. गरजेच्या सर्व वस्तू already तिथे होत्या.. गॅस शेगडी पासून बेड.. सोफा.. कपाट वगैरे सर्वाची सोय कंपनी कडून केलेली होती..

विक्रांत तर झोपाळूच आहे नुसता.. बेड वर पडल्या पडल्या घोरायलाच लागला..😅 मी बेडरूम मधले lights ऑफ़ केले आणि टेबल lamp अॉन केला.. पडल्या पडल्याच माझी तंद्री लागली....

.... Saturday, Sunday ऑफ़ असायचे आम्हाला.. पण थोडं काम pending होतं म्हणून मी Saturday ला ऑफिस ला यायचं ठरवलं होतं.. बाकी सर्व formalities मी Friday पर्यंत पूर्ण करून घेतल्या होत्या...काही mails करायचे बाकी होते आणि फायनल रिपोर्ट सरांना द्यायचा होता.. म्हणून मी ऑफिस ला आले.. तन्वी ही आली होती.. म्हणाली होती की 'माझं पण थोडं काम होऊन जाईल तुझ्यासोबत.. मी पण येते ऑफिस ला..' तिला अडवणारी मी तरी कोण होते.. 😐

आज तिने जीन्स घातली होती ऑफिस मध्ये... Saturday ला ऑफिस मध्ये जीन्स allowed होती.. मी माझ्या केबिन मध्ये काम करत असताना ती तिथे आली आणि बोलता बोलता म्हणाली.." हा बघ.. हाच t-shirt मला अनय ने दिला होता.."

T-shirt खरच खूप छान होता.. तिलाही छान वाटत होता तो... पण असं बोलून तन्वी ने माझ्या दुखऱ्या जखमेवरची खपली उकरून काढली होती.. तिने हे जाणूनबुजून केलंय असं वाटलं मला.. जणू मला ती बोलत होती 'अनय तुला like करतो असं वाटत होतं ना तुला.. आता बघ.. तो फक्त माझा आहे'.. पण तरीही मी शक्य तितकं नॉर्मल राहत तिला बोलले...

" अरे वा.. मस्तच आहे.. छान वाटतोय तुला.."

ती स्वतः ची तारीफ ऐकून हसत हसत तिथून निघून गेली..
एक क्षण वाटलं, अनय मलाही ती t-shirt ऑफर करू शकला असता.. किंवा तिच्यासारखंच मलाही त्याची आठवण म्हणून काहीतरी देऊ शकला असता....
मी हसले😅.. किती वेडी आहे मी.. आता या गोष्टींचा विचार करून काय उपयोग.. आता सर्वच संपलंय...!

तरीही एकदा वाटलंच.. अनय असता आता तर शेवटचं बघून घेतलं असतं त्याला.. 😒 पण तो नाईट शिफ्ट ला होता.. आज माझा शेवटचा दिवस आहे हे आमच्या मॅनेजर, डायरेक्टर सरांव्यतिरिक्त इतर कोणालाही माहीत नव्हतं.. मी कोणाला कळूनही दिलं नव्हतं.. तन्वी ला सुद्धा..!

काम पूर्ण केलं आणि सरांच्या केबिन मध्ये जाऊन सरांना भेटले.. सरांनाही थोडं वाईट वाटत होतं... सरांनी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मला निरोप दिला.. आणि छोटीशी भेटवस्तू ही!! आणि मग आम्ही दोघीही ऑफिस मधून निघालो.. आणि घरी आलो..

मला अनय ची खूप आठवण येत होती... जरी मी त्याला कधीही विसरू शकत नव्हते तरी तो आता मला कधीच दिसणार नव्हता.. माझ्या life मधला 'अनय' नावाचा chapter क्लोज झाला होता.....!!! 😑
To be continued..
🙏

Rate & Review

Sunita Tambe

Sunita Tambe 9 months ago

SWATI MOTGHARE

SWATI MOTGHARE 3 years ago

Yogita Borude

Yogita Borude 3 years ago

s s

s s 3 years ago

Jadhav Jadhav

Jadhav Jadhav 3 years ago