Bandini - 10 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 10

बंदिनी.. - 10

..... तशाही स्थितीत मी स्वतःशीच हसले... आणि म्हणाले.. नाही येणार तो परत! त्याला त्याचं प्रेम मिळालंय..!!

मी आणि तन्वी आमच्या स्टॉप वर उतरलो.. चालता चालता बोलायचं म्हणून बोलत होते मी तिच्याशी.. मी नॉर्मल असल्याचंच तिला दाखवत होते..माझ्या आयुष्यात काय उलथापालथ झाली होती याची ना तिला खबर होती.. ना अनय ला...! आज पाऊस एवढा होता की छत्री असूनही आम्ही अर्धेअधिक भिजलो होतो.. छत्री फक्त नावालाच उरली होती हातात...

घरी पोहोचले तर दाराला कुलूप... मग लक्षात आलं की आई पप्पा मुख्य मार्केट मध्ये जाणार होते काही खरेदीसाठी.. आई पप्पा पण ना.. आजचाच दिवस भेटला का ह्यांना जायला..🙄 पाऊस किती लागलाय.. ऋतू ही बहुदा तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली असावी.. मी शेजारच्या काकुंकडून चावी घेतली आणि दरवाजा उघडून चावी परत नेऊन दिली.. घरात आले... दरवाजा लॉक केला..आज घरात कुणीही नव्हतं.. निदान देवाने एवढी तरी दया दाखवली होती की माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून मी माझं मन काही प्रमाणात का होईना हलकं करू शकत होते... बॅग अक्षरशः फेकून दिली एका कोपर्‍यात...बाथरूम मध्ये गेले आणि दिवसभर जो खोटा मुखवटा घालून मी ऑफिस मध्ये फिरत होते, तो काढून फेकून दिला आणि उचंबळून आलेल्या माझ्या मनाने आक्रोश केला.... डोळ्यांतून अविरत अश्रू वाहतच होते... खूप खूssप रडले... 😭😭 यावेळी त्या बाहेरच्या पावसाची तुलना माझ्या अश्रुंसोबत कोणीच करू शकलं नसतं... बर्‍याच वेळाने शांत झाले... अंघोळ केली अन्‌ चेंज करून बाहेर आले... आतल्या रूम मध्ये आले आणि झोकून दिलं स्वतःला बेड वर... उशी मध्ये मान खुपसून परत रडायला लागले.. डोळ्यांसमोर फक्त अनय दिसत होता....रडता रडता कधी डोळा लागला कळालंच नाही... कितीतरी वेळ मी अशी निपचित पडल्यासारखी झोपले होते..

ऋतू च्या आवाजाने जाग आली... बाहेर आणि घरातही काळाकुट्ट अंधार पसरला होता... ती मला शोधत शोधत आत आली.. "तायडे काय करतेयस तू? कुठे आहेस?"
तिने आधी हॉल चा दिवा लावला.. मग किचन चा... आणि मग ती आतल्या रूम मध्ये आली.. तिथला ही दिवा लावला.. आणि माझ्या अवताराकडे बघून घाबरली... धावत माझ्याजवळ आली...

"तायडा.. काय हे.. काय झालंय तुला? अशी का बसलीयेस अंधारात..? आणि कधीची दरवाजा वाजवतेय मी... शेजारच्या काकू म्हणाल्या तू आलीयेस घरी म्हणून.. मग दार का नाही उघडलंस??नशीब दरवाजा उघडून चावी परत द्यायचं तरी सुचलं.. नाहीतर आई पप्पा येईपर्यंत माझं काही खरं नव्हतं.. 😏😒"

माझ्यावर तुटून पडल्यासारखी ती बोलतच होती..

"अगं मी तुला विचारतेय.. बोल ना काहीतरी.."

मी शांतपणे म्हणाले," सॉरी.. कधी झोप लागली कळलच नाही.. "

" OK.. पण काय झालंय ते तरी सांगशील का? ".. ती माझा हात हातात घेऊन म्हणाली

मला परत रडू आलं.. मी तिला घट्ट मिठी मारली... तिनेही मला थोडा वेळ रडू दिलं.. मग म्हणाली.. " ह्म्म्म आता सांग.."

मी आज जे काही झालं होतं ते तिला सांगितलं... तिलाही खूप वाईट वाटलं.. ती चिडून म्हणाली.." तरी मी तुला सांगत होते त्या तन्वी पासून जरा लांबच रहा... पण तुलाच तिचा पुळका.. बघितलंस ना आता.."

"हे बघ ऋतू.. व्हायचं होतं ते झालं.. आता कोणाला दोष देऊन काही उपयोग आहे का.. मला आता या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये.." - मी

"ह्म्म्म.. डोळे बघा किती सुजलेत ते... आणि सकाळपासून काही खाण्याची तसदी ही घेतली नसाल आपण.. हो ना? "

मी गप्प च होते.. ती उठली.. गुलाबपाणी आणि कापसाचे दोन बोळे घेऊन आली.. बोळे गुलाबपाण्यात भिजवून माझ्याकडे देत म्हणाली.." हे घे आणि डोळ्यांवर ठेऊन पड दहा मिनिटे.. मी आपल्या दोघींसाठी कॉफी घेऊन येते.. "आणि ती किचन मध्ये निघून गेली... मी डोळ्यांवर ते बोळे ठेवले आणि पडून राहिले..

आज ती माझी मोठी बहीण झाली होती.. मला खूप अभिमान वाटला तिचा.. किती शांतपणे हॅन्डल केलं तिने सर्व...!

ऋतू कॉफी घेऊन आली तशी मी उठून बसले .. मला कॉफी देता देता म्हणाली.." घ्या बाईसाहेब!.. आमचा तर कोणी विचारच नाही करत.. एवढ्याशा लहान मुलीला कामं करायला लावतात.. बाल मजूर करून ठेवलंय अगदी.."

तीचं ते बोलणं ऐकून मला खूप हसू आलं.. ती ही हसली.. म्हणाली "now that's like my good girl..!!" हसत हसत आम्ही कॉफी घेतली... कप खाली ठेवला आणि मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर किस केलं..
"थँक्स dear.. For always being there!!"

तशी ती उठत म्हणाली.. "पुरे आता.. दे तो कप इकडे.. आणि जेवण करून गेलीय आई त्यामुळे टेन्शन नाही... तू आराम कर.. आई पप्पाना यायला थोडा लेट होईल.. तसं सांगून गेलेत... तोपर्यंत तू पड.."

आणि मी बेड वर आडवी झाले..

आता फक्त चार दिवस... मग मी अनय च्या आयुष्यातून दूर निघून जाणार होते...! 😔😔


to be continued..

🙏