Bandini - 6 books and stories free download online pdf in Marathi

बंदिनी... - 6

.... आणि एवढा वेळ मी अडवून धरलेल्या माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली....

पुढे..

डोळ्यांतले अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते... कशाचं एवढं वाईट वाटत होतं मला.... परेश वर ओरडल्याचं की अनय ला स्पष्ट सांगू न शकल्याचं....

परेश वर काय.. खरं तर आयुष्यात पहिल्यांदा मी कोणावर तरी एवढं चिडले होते... त्याचं नक्कीच वाईट वाटत होतं... पण मी त्याला सॉरी बोलणार नव्हते... तो चुकीचा वागला होता... एखाद्या मुलीचा फोटो तिच्या PC मधून तिला न सांगता घेणे म्हणजे एक प्रकारे गुन्हाच होता.. शिवाय माझ्याशी काहीही न बोलता त्याने त्याच्या आईलाही माझ्याबद्दल असं सांगावं म्हणजे काय... जाऊ दे.. मला माहीत होतं... जास्त दुःख मला अनय पासून दूर राहण्याचं होतं... कितीही झालं तरी प्रेम करत होते मी त्याच्यावर... ?

ऑफिस सुटायची वेळ झाली होती... मी पटकन वॉशरूम मध्ये गेले आणि तोंड धुतलं... 5 मिनिटे रिलॅक्स झाले.. नॉर्मल ला आले.. आणि मग माझ्या केबिन मध्ये येऊन आवरायला लागले.. PC शट डाऊन केला.. तितक्यात तन्वी आलीच.. मी लाइटस् ऑफ़ केले.. Door लॉक केला आणि निघाले.... जाता जाता तन्वी ने विचारलंच.. काय झालं.. मी म्हणाले "काही नाही गं.. चल तू"... तिने त्यावर परत काहीच विचारलं नाही..

आठ दिवस झाले.. पावसाला सुरुवात झाली होती.. पण म्हणावं तेवढा जोर नव्हता.. रिमझिम बरसत होता नुसता... पण आज आभाळ भरून आलं होतं.. माझ्या मनासारखंच?..... काळेकुट्ट ढग दाटून आले होते.. मधेच हलकासा गडगडाट होत होता... जोरदार पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती.. आज घरी भिजतच जावं लागणार बहुतेक.... तन्वी आणि मी दोघींनीही छत्री आणली नव्हती ?.. चला एक बरंय.. निदान माझे रडवेले डोळे घरी गेल्या गेल्या कुणाच्या नजरेस पडणार नव्हते.. पावसाला तरी माझी दया आली होती...त्याने अखंड बरसायला सुरुवात केली होती.... ?️?️

तन्वी आणि मी आमच्या स्टॉप वर उतरलो.. तीचं घर माझ्या आधी यायचं.. त्यानंतर 10 min अजून पुढे गेल्यावर माझं घर...घरी जाईपर्यंत पूर्ण चिंब झाले होते मी... आई दारातच उभी राहून माझी वाट बघत होती.. मला अशी भिजलेली बघून तीचं सुरू झालं... "छत्री म्हणून नेता येत नाही या पोरीला... काय मोठी हौस भिजायची... काय आजारी पडायचंय का..."

"अगं हो.. मला आत तर येऊ देशील की नाही.. की इथेच कुडकुडत ठेवणार आहेस???" मी हसतच आईला विचारलं..

"ह्म्म्म..जा लवकर अंघोळ करून घे आणि कपडे बदल.. कांदाभजी करतेय गरम गरम.. "- आई

" ओह्ह आई.. यू आर सिम्पली ग्रेट!?.. तोंडाला पाणी सुटलं ऐकूनच.. ?"-मी

" वेडाबाई जा आता.. लवकर आवरा ?"-आई

" हो आलेच ?"- मी

" हे बरंय आई.. ती भिजून येणार म्हणून कांदाभजी.. आणि मला साधं भिजायला सुद्धा जाऊ नाही दिलंस बाहेर.. ?☹️" ऋतू एवढंसं तोंड करून म्हणाली..

" गधडे.. आता लहान आहेस का तू बाहेर जाऊन भिजायला.. जरा अभ्यासाकडे लक्ष दे..? "- आई मान हलवत म्हणाली..

तोंड वाकडं करत.. खोटं रागवून.. ऋतू आतल्या खोलीत निघून गेली.. ?

" ह्या दोघी माय लेकींचं कधी पटेल देव जाणे?? "- पप्पा

चला... मस्त कांदाभजी खाऊन मूड तरी चेंज झाला ?

एव्हाना ऋतू ने माझ्याकडून अनय बद्दल सर्व काढून घेतलंच होतं... आज ही मी झोपताना तिला ऑफिस मध्ये काय काय झालं ते सांगितलं...

ती अंगावरच आली माझ्या.." अगं तायडे, तू वेडी आहेस का.. त्याने एवढं स्वतःहून येऊन विचारलं होतं तर सांगायचं ना तुलाच like करते मी म्हणून.. तू पण ना... ?"

"आलं होतं गं माझ्या ओठांवर.. पण तन्वी चं काय... ती सुद्धा like करते त्याला... तीने काय विचार केला असता माझ्याबद्दल ?.. अनय life मध्ये यायच्या आधीपासून किती छान bonding आहे आमची माहितीये ना तुला " - मी

" हो, हो माहितीये.. तू जुळवून घेतेस म्हणून.. नाहीतर तीचं जास्त वेळ पटतं का कोणासोबत कधी ?..आणि ती तीचं बघून घेईल.. तुला कशाला एवढा पुळका येतो तिचा.. ती अनय सोबत गुलूगुलू बोलत बसते तेव्हा ती करते का तुझा विचार ?.. तू मला नंबर दे अनय चा.. मी सांगते त्याला सर्व.. " - ऋतू

" नाही ऋतू नको.. तू नको पडू ह्यात "-मी

" मग प्रॉमीस कर तू बोलशील अनय जवळ तुझ्या मनातलं"-ऋतू

" आता बोलावंच लागेल असं वाटतंय.. तसंही लवकरच माझा ह्या कंपनी सोबतचा बॉन्ड संपणारच आहे.. मग मी तिथे नसणार आहे.. ?"- मी

" तायडा.. नाही बघवत गं तुला असं?" - ऋतू

मी हसून तिला थोपटलं आणि झोपायला सांगितलं...

- - - - - - - - XOX - - - - - - - - -

दुसर्‍या दिवशी ऑफिस मध्ये जाताना अनय बद्दल च
विचार करत होते.. झाला असेल का शांत?.. की रागावला
असेल माझ्यावर काल उत्तर दिलं नाही म्हणून?..बोलेल का तो माझ्याशी?.. विचार करतच ऑफिस मध्ये पोहोचले... केबिन मध्ये गेले.. PC ऑन केला... Mails चेक केले आणि main room मध्ये अनय ला बघायला गेले.. पण अनय तिथे नव्हता... नाश्ता करायला गेला असेल बहुतेक.. किंवा दुसर्‍या डिपार्टमेंट मध्ये गेला असेल काही कामानिमित्त..
मी आणि तन्वी आम्ही सुद्धा खाली कॅन्टीन मध्ये गेलो... तिथेही तो दिसला नाही... मनात आलं हा आलाय ना आज ऑफिस ला.. ??.. पटापट नाश्ता आवरून वर गेलो.. मुद्दाम त्यांच्या टीम जवळ जाऊन बसले.. बोलता बोलता त्यातल्या एकाला विचारलं अनय बद्दल तर तो म्हणाला विवेक सोबत त्याने नाईट शिफ्ट एक्स्चेंज करून घेतलीय... निदान हा आठवडा तरी तो नाईटलाच असणार आहे.. मी कशी बशी conversation संपवून माझ्या केबिन मध्ये आले... खूप लागलं मनाला त्याचं हे वागणं.. ?.. अनय तू मुद्दाम केलस ना हे.. मला त्रास देण्यासाठी.. मी कशी राहू तुला बघितल्याशिवाय अनय??? माझं मन ओरडत होतं.. ? मी पटकन मोबाईल हातात घेतला.. अनय चा नंबर काढला.. पण परत विचार केला की ठीक आहे.. त्याने ठरवलंच आहे ना.. मग मी पण बघते किती दिवस दूर राहतो ते.. ?

To be continued....
?

#प्रीत ?