Bandini - 13 books and stories free download online pdf in Marathi

बंदिनी.. - 13

.... पण तो एकदाही कुठे दिसला नाही....! 😑

फक्त एकदाच तो दिसावा.. असं राहून राहून वाटत होतं... हृदयात एक आग पेटली होती.. फक्त त्याच्यासाठी.. तो भेटल्याशिवाय ती शांतही होणार नव्हती.. अशी अचानक सोडून निघून आले होते मी त्याला... खरं तर तन्वी च्या भरवशावर 😞.. पण आता जणू तो माझ्यावर सूड उगवत होता.. माझ्या नजरेतही न येऊन...! खूप वाटायचं की चुकून तरी कुठेतरी तो दिसावा..

कधी टीव्ही वर.. तर कधी कुठे नुसतं 'अनय' असं नाव जरी ऐकलं तरी अख्ख्या जगात तोच एक अनय असल्यासारखी मला त्याची आठवण यायची.. त्याचाच चेहरा डोळ्यांसमोर यायचा.. रस्त्याने चालता चालता ही येणा जाणाऱ्यांच्या चेहर्‍यामध्ये मी त्याचाच चेहरा शोधायचे.... सुरुवातीला fb वर ही त्याचा प्रोफाईल चेक केला.. पण तो fb वर ही active नव्हता... मग माझं ही fb वापरणं कमी होत गेलं.. लग्नानंतर तर मी नवीन account open केलं होतं ... कारण आधीच्या account ला अनय add होता.. आणि माझ्याच्याने त्याचा प्रोफाईल डिलीट करवेना.. 😒😓.. सतत त्याची आठवण नको म्हणून मी नवीन account open केलं होतं...पण असं थोडीच त्याला विसरू शकत होते मी..!!

दिवस वार्‍याच्या वेगाने पुढे जात होते.... मी ही माझ्या संसारात आणि जॉब मध्ये busy झाले होते... बघता बघता आमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलं...! विक्रांत खूप प्रेम करायचा माझ्यावर... त्याच्याकडे बघितलं की वाटायचं किती साधा आहे हा... किती निर्मळ मनाचा.. तो भला आणि त्याचं काम भलं...! कधी कोणाच्या भानगडीत नाही काही नाही .. मला ही माझ्यावरचं त्याचं प्रेम दिसतय.. विक्रांत.. मी तुला cheat करत नाहीये रे... माझ्या नशिबानेच मला cheat केलंय खरं तर... 😑😢.. एक बायको म्हणून मी ही तुझ्यावर तितकंच प्रेम करतेय.. पण..... अनय सोबत झालेली माझी ताटातूट मला सहन होत नाहिये .... त्याचा विरह काटा बनून सलतोय मला ...! 😖

- - - - - - - - XOX - - - - - - -

बरेच दिवस झाले माहेरी गेले नव्हते... आई सारखी फोन करून बोलवायची..त्यादिवशी ही तिने फोन केला..

" ये गं दोन दिवस... तुला पण तेवढाच आराम..."

"इथे तरी कोणी कामाला जुंपलंय मला.. इथेही आरामच करतेय की.. 😅".. मी मुद्दाम आईला चिडवलं...

"अगं हो.. पण आमच्यासोबत पण थोडा वेळ घालवलास तर काही बिघडणार आहे का.." आईने emotional ड्रामा सुरू केला 😂

"हो गं आई.. उद्या ऑफिस ला जाऊन रजेचा अर्ज देऊन येते.. आणि परवा येते तिकडे.. खुश?? 😁"

" हो, हो... लवकर ये.. मी वाट बघतेय.." आई खुश होत म्हणाली..

"हो येईन.. चल बाय "

दुसर्‍या दिवशी ऑफिस ला जाऊन चार दिवसांच्या सुट्टीचा अर्ज दिला.. घरी आल्यावर बॅग वगैरे भरली.. विक्रांत ने त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिस ला जायच्या आधी मला आईकडे सोडलं..

ऋतू ने धावत येऊन मला मिठी मारली.. जणू लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येत होते 😂😂..
आई पप्पांना पण बरं वाटलं मी तिथे गेल्यावर.. आईला तर मी गेल्यावर काय करू नि काय नको असं व्हायचं..😅
मी ही माझे लाड पुरवून घेत होते... आई मला तिथे गेल्यावर काही काम करू द्यायची नाही.. मग काय.. आरामच आराम..!!

त्यादिवशी दुपारी असंच बेड वर पडले होते.. ऋतू कॉलेज ला गेली होती त्यामुळे टाइमपास म्हणून मी fb open केला.. Scroll करता करता मला अनय ची आठवण आली... तशी ती रोजच यायची.. पण आज जास्तच आठवण येत होती.. विचार केला.. बघू fb वर ह्याचे काही updates दिसतायत का.. म्हणून जवळ जवळ वर्ष - दीड वर्षांनी मी माझा जुना fb अकाऊंट open केला.. खूप सारे मेसेजेस आणि फ्रेंड रिक्वेस्टस् ही होत्या.. मी एक एक चेक करत होते.. आणि मेसेज लिस्ट चेक करताना मी उडालेच!! 😱

त्यात 'अनय' चं नाव होतं..मनात आनंद.. अश्रू.. हुरहुर सर्वच एकदम दाटून आलं...!! मी क्षणाचा ही विलंब न करता त्याचा मेसेज open केला...

Hi
Hw r u
Meera .......... परवाचा मेसेज 11:30am

Try out messenger : ....... कालचा मेसेज 01:01 am

त्याचा मेसेज यायला आणि मी तब्बल एक वर्षानंतर fb अकाऊंट open करायला एकच गाठ पडावी.. 🤔😢आज मला त्याची खूप आठवण येण्यामागे हेच तर कारण नसावं??!.......


पीर लिखो तो मीरा जैसी..

मिलन लिखो कुछ राधा सा..

दोनों ही है कुछ पुरे से..

दोनों में ही वो कुछ आधा सा......


तो कधी मला मेसेज करेल असं वाटलच नव्हतं.. त्यामुळे असं अचानक त्याचा मेसेज बघून मी गोंधळून गेले..पण त्याचा मेसेज बघून मनात आनंदाची कितीतरी कारंजी उसळत होती...!!!... 'मन अगदी फुलपाखरू होऊन बागडत होतं..'... काय करू..? रिप्लाय करू की नको..माझ्या मनात द्वंद्व चालू होतं.. पण तो कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी आता हा एकच पर्याय होता माझ्याकडे... आणि मनाने निश्चय केला अनय ला रिप्लाय करण्याचा...! त्याबरोबर माझी बोटे keypad वर झरझर फिरू लागली.. मी माझ्या मनातली excitement त्याला दाखवली नाही.. Normally च रिप्लाय केला...


📱Hii.. After long time hmm..!

Hw r u..

Where r u nowadays?

I m fine...


मी रिप्लाय केला... आणि आता त्याच्या मेसेज ची वाट बघत बसले.. मी fb वरुन मेसेज करत होते...माझ्याकडे messenger app नव्हता.. त्यामुळे मला सतत fb open करून मेसेज चेक करावा लागत होता..


तो संपूर्ण दिवस आणि जवळ जवळ अख्खी रात्र मी मोबाईल चेक करत होते... पण त्याचा रिप्लाय काही आला नाही.. 😒 इकडे माझ्या मनाची बेचैनी वाढत होती... तो बघेल का माझा मेसेज?.. नाही बघितला तर..? मला त्याच्याबद्दल कसं कळणार.. 😑 निदान तो कुठे आहे.. कसा आहे हे तरी कळायला पाहिजे... जिवाची नुसती घालमेल होत होती..


दुसर्‍या दिवशीही सकाळी उठल्यापासून मी मोबाईल चेक करत होते.. पण पदरी निराशाच येत होती... शेवटी वैतागून मोबाईल ठेवून दिला...


"आता मी चेक च नाही करणार पुन्हा.. एवढी वाट बघायला लावतं का कुणी.. 😏😒".. मी स्वतःशीच पुटपुटत जेवायला गेले...


जेवायला बसले तरीही लक्ष मोबाईल कडेच लागून राहिलेलं.. कधी एकदा जेवते आणि fb चेक करते असं झालं.. आणि माझं मलाच हसू आलं.. 'अरेच्या! आत्ताच तर आपण ठरवलं होतं ना की मोबाईल चेक करायचा नाही म्हणून!!' आणि मी परत स्वतःशीच हसले.. ऋतू मॅडम ने बरोबर पकडलं.. तिलाही हे सर्व प्रकरण माहीत होतंच.. त्यामुळे तिनेही भुवया उंचावत 'काय' असा प्रश्‍न केला... मी मान हलवत 'काही नाही' असं म्हटलं.. 😅.. पटापट जेवले.. आणि हात धुवून मोबाईल हातात घेतला... आई मागून ओरडलीच..


"सतत काय गाडलेलं असतं तुमचं त्या मोबाईल मध्ये.. बघावं तेव्हा मोबाईल 🙄 हल्लीच्या पोरांचं काही खरं नाही.."


"आई.. तू पण शिकून घे fb, google वगैरे वापरायला.. मग तूही घेऊन बसशील मोबाईल😂.." - मी हसून म्हणाले..


"काही गरज नाही त्याची.. मला माझी कामंच नाही संपत.. 😏".. म्हणत आई किचन कडे वळली..


मी घाईघाईने fb open केला.. आणि मेसेज चेक केले.. आणि उभ्या उभ्याच टुणकन उडी मारली.. 🤣😉

अनय चा रिप्लाय होता.... 😍


📱 Ohh

U r ther

Wow

Meera

Kashi ahes

Hwz life ......... 12:38pm


ओह्ह!! 🙆... म्हणजे मी मोबाईल बाजूला ठेऊन जेवायला गेले नेमका तेव्हाच साहेबांचा मेसेज आला होता..!! तेव्हाच बघितलं असतं तर ऑनलाईन तरी बोलता आलं असतं.. 😔



- - - - - - - XOX - - - - - - -


अनय ला आठवता आठवता मी माझी आंघोळ अन्‌ नाश्ता उरकून घेतलं होतं.. 😊..बॅग मधील सामान लावत बसले होते तेवढ्यात लॅच की ने दरवाजा उघडून विक्रांत आत आला.. मी उठून हॉल मध्ये आले...


"हे बघ थोडंसं सामान घेऊन आलोय.. उद्या परत जाऊया मार्केट ला.. आणि राहिलेलं सामान घेऊन येऊ.. आणि ही जेवणाची पार्सल.." त्याने एक पिशवी माझ्या हातात देत म्हटलं..


किती करतो हा... मला कसलाच त्रास होऊ देत नाही.. मी जवळ जाऊन त्याला hug केलं... तो आश्चर्याने माझ्याकडे बघत होता ..


" आज भलताच मूड दिसतोय बाईसाहेबांचा.. " तो मिश्किल हसत बोलला..


" विक्रांत..!! 😵 तू पण ना... जा तिकडे!!".. मी खोटं रागावून किचन कडे वळले तसा तोही माझ्या मागे मागे आला... 😅


- - - - - - - XOX - - - - - - -


घरात एकटी असले की अनय ची आठवण काढणे हा माझा नित्यक्रमच झाला होता.. खरं तर त्याची आठवण काढावी लागायची नाही.. ती स्वतःहून माझ्या एकटेपणात मला सोबत करायची... आणि ते दिवस आठवता आठवता मला कसलेच भान रहायचे नाही.. मी स्वतःला ही त्यात हरवून जायची....


- - - - - - - XOX - - - - - - -



📱 Ohh

U r ther

Wow

Meera

Kashi ahes

Hwz life ......... 12:38pm


अनय चा रिप्लाय आला होता....


मी परत त्याला मेसेज केला :


📱 मी ठीक आहे रे..

Life म्हणशील तर.. दिवस पटापट सरतायत..

तू कसा आहेस?

कुठे जॉब करतोस सध्या??


हा मेसेज मात्र त्याने लगेच read केला.. आणि त्याचा लगेच रिप्लाय ही आला.... 😍 म्हणजे तो online आहे...??!!! येस्स!!


To be continued..

🙏

#प्रीत