Bandini - 16 books and stories free download online pdf in Marathi

बंदिनी.. - 16

............सर्वांना भेटायला मिळणार म्हणून मी खूप खुश झाले 😄..

Mumbai..

आम्ही मुंबई ला आलो.. घरचे सर्व खुश झाले आम्हाला बघून.. एवढ्या दिवसांनी भेटलो होतो आम्ही😄..आईंनी तर आल्या आल्या मीठ मोहोरीने दोघांची दृष्ट काढली.. जणू काही नवीनच लग्न झालं होतं..!! 😁.. पण खूप बरं वाटलं स्वत:च्या घरी येऊन.. माहेरी जाऊन आई पप्पा आणि ऋतू लाही भेटून आले.. दोन दिवस तिकडे राहिले.. सर्वांनाच काय करू नि काय नाही असं झालं होतं.. 😅 मीही ऋतू ला सुट्टी लागल्यावर सर्वांनी गोव्याला यायचंय असं बजावून सांगितलं.. ऋतू तर आनंदाने नाचायलाच लागली.. 😁😁दोन दिवस राहून परत सासरी आले...

- - - - - - - XOX - - - - - - - -

मुंबईला आल्यानंतर मी जुना सिम मोबाईल मध्ये टाकला होता.. अचानक अनय चा मेसेज बघून मी अवाक् झाले... 😱.. ह्याला कसं कळलं मी इकडे आले..?... तो काही दिवसांसाठी इंडिया मध्ये आला असल्याचं त्याने मेसेज मधून कळवलं होतं.... माझी घालमेल होत होती.. नशिबाने आणखी एक संधी दिली होती.. ही संधी परत मिळणार नव्हती.. आम्ही दोघेही सोबतच मुंबई मध्ये येणे हा योगायोग होता... आणि तो कदाचित परत घडून येणार नव्हता...!

मी रात्री त्याला मेसेज केला.. आणि उद्याच भेटायला येत असल्याचं कळवलं... तो खूप खुश झाला....

मनात विचार आला.. विक्रांत ला सांगू का मी अनय ला भेटायला जातेय ते.. त्याला समजावून सांगते.. फक्त एकदाच permission दे... त्याला भेटल्यावरही माझं तुझ्यावरचं प्रेम तसूभरही कमी होणार नाही म्हणून..

विक्रांत हॉल मध्ये लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत बसला होता.. आई बाबा त्यांच्या रूम मध्ये झोपले होते.. मी हॉल च्या दरवाज्याजवळ गेले पण जाऊ की नको विचार करत होते.. तितक्यात विक्रांतचं लक्ष माझ्याकडे गेलं..

"मीरा.. तिकडे दारात काय करतेयस.. ये ना.. काय झालं"

विक्रांत ने असं विचारताच माझी बोबडी वळली... सांगू का ह्याला.. पण ह्याच्या मनात या गोष्टीवरून कधी संशय निर्माण झाला तर.. आपण कितीही ओरडून सांगितलं की माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे.. तर पटेल ते त्याला??.... नाही नको... मी नाहीच सांगत...

" अगं काय बोल ना!" तो लॅपटॉप मध्ये काहीतरी टाइप करता करता बोलला..

"अम्म्.. काही नाही... ते.... तू जेवला नाहीयेस ना अजून.. म्हणून विचारायला आले होते.. ताट वाढून आणू का?".. मी कशीबशी बोलले..

"अं.. हो.. मला तर जेवणाची आठवणच नव्हती बघ.. कामच एवढं आहे ना!!..दोन दिवसांत complete करायचंय... इच्छा नाहीये तशी.. पण ठीक आहे आण तू वाढून.. जेवतो मी.."

मी किचन मध्ये गेले.. सर्व गरम करून त्याला ताट वाढून आणलं..

" ठेव तिथे टेबल वर.. आणि तू झोप जा.. मी घेतो जेवून..सॉरी.. मला थोडा late होईल.. प्लीज.."

" OK...... विक्रांत.... मी.... उद्या friends सोबत जरा बाहेर जातेय ..यायला late होईल.. चालेल ना.. 😓"

" हो जा ना.. जाऊन ये.. मी पण सध्या कामात बिझी आहे.. तुला वेळ देता येत नाहिये.."

"it's ok विक्रांत.. थँक्स..आणि तूही लवकर आवर जास्त उशीर करू नको.. " म्हणुन मी ताट टेबल वर ठेऊन झोपायला गेले..

योग्य अयोग्य चा विचार करता करता बराच उशीर झाला.. त्यानंतर कधी झोप लागली कळलंच नाही.. 😑

सकाळी उठायला थोडा उशीरच झाला..

" बापरे! आठ वाजायला आले.. आज नेमकं अनय ला भेटायला जायचंय.. " अनयचं नाव ओठांवर येताच अंगावर गोड शहारा आला.. 😄
मी उठून रूम च्या बाहेर आले.. आई किचन मध्ये चहा बनवत होत्या.. मी त्यांच्याजवळ गेले..

"सॉरी आई आज उठायला उशीर झाला.. 😞"

"अगं असू दे.. त्यात काय झालं.. माझी ही आत्ताच आंघोळ झालीये 😅.. जा तूही आंघोळ करून घे.. पळ लवकर.." आई हसत हसत म्हणाल्या..

मी अंघोळीला जायच्या आधी हॉल मध्ये डोकावून बघितलं.. विक्रांत सोफ्यावरच झोपला होता... कित्ती tension घेतो हा कामाचं.. सर्व वेळच्या वेळी झाले पाहिजे.. स्वतःला त्रास झाला तरीही.. 🙄

मी पटापट आवरलं.. चहा घेतला.. आणि जेवणाची तयारी केली.. लक्ष घड्याळाकडे लागलं होतं.. जेवण बनवलं.. किचन मधलं आवरलं आणि आईंना सांगितलं..

"मी बाहेर जातेय.. यायला थोडा उशीर होईल.. विक्रांत ला सांगितलंय.. त्याला झोपू दे थोडा वेळ.. रात्री late झोपलाय.. "

"हो... नाही उठवत.. जा तू.. आम्ही आहोत.. 😊"

मी तयार होण्यासाठी बेडरूम मध्ये गेले.. कोणता ड्रेस घालू?.. बायकांना सतावणारा नेहमीचा प्रश्न 😅.. जास्त options नव्हते कारण बरेचसे ड्रेस गोव्याला होते.. काही मोजकेच इथे होते आणि काही येताना सोबत आणले होते तेच.. मी एक लाईट ब्लू डेनिम चा कुर्ता आणि त्यावर मॅचिंग ब्लॅक legging निवडलं.. हलकासा मेकअप केला.. पटकन तयार झाले.. आणि निघाले.. विक्रांत अजून झोपला होता.. मी एकदा त्याच्याकडे बघितलं.. मनातल्या मनात त्याला सॉरी म्हणाले आणि आईंना सांगून बाहेर पडले..

- - - - - - - XOX - - - - - - -

पाय थरथरत होते.. हृदयाची धडधड वाढली होती.. ऑटो करून बस स्टँड वर गेले.. बस मध्ये बसले.. पाच मिनिटांतच बस चालू झाली... एक अनामिक भीती.. हुरहुर.. वाटत होती.. मी पहिल्यांदा अशी कोणालातरी चोरून भेटणार होते..' मीरा तू काय कॉलेज तरुणी आहेस का असं एखाद्या मुलाला चोरून भेटायला 🤔.. तू विक्रांत ला cheat करतेयस असं नाही वाटत तुला?? तू खोटं बोलून आलीयेस त्याच्याशी.. ' माझी बुद्धी मला म्हणत होती..

'हो.. मी खोटं बोललेय विक्रांत सोबत.. पण माझं त्याच्यावरचं प्रेम खरं आहे 😑.. मी आमचं relation वाचवण्यासाठी खोटं बोललेय त्याच्यासोबत.. मला फक्त एकदाच अनय ला भेटायचंय.. त्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही.. आणि मी विक्रांतलाही त्याच्या वाटणीचं प्रेम देऊ शकणार नाही 😩' माझं मन म्हणत होतं..

आज मी फक्त मनाचं ऐकणार होते.. आजपर्यंत फक्त दुसर्‍यांचा विचार केला... पण आज एक क्षण मी फक्त स्वतःसाठीच जगणार होते.. आज ही मीरा, मीरा नव्हती तर ती कृष्णाची राधा झाली होती... कृष्णाच्या मधुर बासरीने जशा राधासह हजारो गोपिका आपलं घरदार विसरून त्यांच्या प्राणप्रिय कृष्णाकडे ओढल्या जात.. देहभान हरपून कृष्णमय होत.. तशीच ही राधा आज तिच्या कृष्णाकडे ओढली जात होती... आज ती ना कुणाची सून होती ना पत्नी.. ना मुलगी ना बहीण.... आज ती फक्त कृष्णवेडी राधा होती.. अनय ची मीरा होती ...!!!! आज नात्यांची सर्व बंधने तिने झुगारून दिली होती.. कारण तिला उमजलं होतं.. आज नाही तर कधीच नाही!!

मी अनय ला मेसेज करून मी निघाल्याचं कळवलं .. अंतर जवळ येत होतं तशी हुरहुर आणखी वाढत होती...

To be continued..
🙏