Court Marshal books and stories free download online pdf in Marathi

कौर्ट मार्शल

मेजर जयसिंह राणा
सैन्यातले एक मोठे अन रुबाबदार नाव ,
नावसारखे काम पण मोठे , लष्करी कारवायातील नेहमीच महत्त्वाचे योगदान निभावले होते।

देश प्रेम तर त्याच्या रक्तात होते त्याच्या घराण्याची परंपरा
होती प्रत्यक पिढीतील एक जण सैन्यात जाऊन आपले कर्तव्य बजावणार,

जयसिंहाचे आजोबा कर्नल रणविजयसिंह राणा 1965 च्या भारत पाक युद्धातील एक मोठे नाव शौर्यचक्राने सन्मानित असे होते तर
वडील शेरसिंह राणा कारगिल हिरो होते मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवित ।

ह्या सगळ्या गोष्टीमुळे मेजर जयसिंह राणा लहाणपणी पासून प्रभावित होते अन फक्त ते परंपरा म्हणून नाहीतर एक देशभक्त म्हणून ते सैन्यात दाखल झाले होते,

सैन्यात त्याचा खूप आदर होता त्याना फक्त ज्युनियरच नाहीतर सिनिअर अधिकारी सुद्धा मान देत असत,
त्यांना रुबाब तर वेगळाच होता,

सगळ्या सोबतच्या अधिकाऱ्यावर त्याचा आदरयुक्त दबदबा होता,

मेजर जयसिंह राणा हे नाव सैन्यात कुणाला माहित नसेल असे नव्हतेच
शत्रू सुद्धा त्याचा नावाला अन पराक्रमाला घाबरत होता

शत्रू सुद्धा त्यांच्याशी पंगा घेत नव्हता,
मेजर जयसिंह राणा नाव जरी घेतले तरी समोरच्या माणसाला धडकी भरत होती।

युद्धात चार चार गोळ्या लागून सुद्धा मागे न हटणारा असा हा मेजर जयसिंह राणा होता,
आजोबा कर्नल रणविजयसिंह राणा यांना नातवाच्या खूप अभिमान होता,
नातवाच्या शौर्याचे त्यांना खूप कौतुक होते,

मेजर जयसिंह राणा यांची पोस्टिंग बॉर्डर पासून जवळच्या एक चौकीवर होती

अचानक त्यांना फोन आला की अतिरेक्यांनी चौकी पासून जवळ असणाऱ्या गावात शिरून काही गावकऱ्यांना ओलीस ठेवले आहे,

आणी अतिरेक्यांनी त्या गावकऱ्यांच्या बदल्यात काही नगदी पैसे अन काही हत्यारांची मागणी केली होती,

हे ऐकून मेजर जयसिंह राणा यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली,
त्यांनी बाकी लोकांना माहिती देऊन एका लहान शैन्याच्या तुकडी सोबत त्या गावाकडे कूच केली ,

अतिरेक्यांना मेजर जयसिंह राणा आले ह्याची माहिती मिळाली
मेजर जयसिंह राणा नाव ऐकून अतिरेक्यांत घाबरटीचे वातावरण निर्माण झाले होते
पण त्यांना कळून चुकले कि आपले आता काही खरे नाही , त्या परीस्थितीत अतिरेक्यांना कळून चुकले कि आता पळून जात येणार नाही आता लढण्याशिवाय
पर्याय नाही,

मेजर जयसिंह राणा यांनी अतिरेक्यांना शरण येण्याची सूचना केली पण आता अतिरेक्यांना लढण्याशिवाय पर्याय नव्हता,

अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला अन त्याला प्रत्युत्तर म्हणून
मेजर जयसिंह राणानी गोळीबार सुरु केला
संध्याकाळ पर्यंत झालेल्या धुमश्चक्रीत पाच अतिरेक्याना मेजर जयसिंह राणानी यमसदनी पाठवले,
मेजर च्या सैन्यातील काही सैनिक जखमी झाले होते
मेजर साहेबाना स्वतःला दोन गोळ्या लागल्या होत्या तरी ते आघाडीवर होते,

शेवटी बाकी अतिरेक्यांना सुद्धा मारण्यात आले व सगळे ओलीस ठेवलेले गावकरी मुक्त करण्यात आले,
सगळ्या गावात अन सगळ्या सैन्यात आनंदाची लाट पसरली

मेजर जयसिंह राणाला जखमी अवस्तेत दवाखान्यात भरती करण्यात आले
त्याचा वर शस्त्रक्रिया करण्यात आली दुसऱ्या दिवशी
सकाळी त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा त्याच्या सोबतचे अधिकारी खिन्न अवस्तेत उभे होते,

मेजर जयसिंह बोलले कि आपण जिंकलो आहोत तरी तुम्ही सगळे असे का उभे आहात,
`we are won` but why your unhappy.

एक अधिकाऱयाने त्याच्या हातात एक पत्र दिले

त्यात असे होते

मेजर जयसिंह
आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ना सांगता मोहिमेवर गेलात नागरिकांच्या व सैनिकाच्या जीवाला धोका निर्माण होईल कृत्य केले असून तुमच्या वर कारवाई करण्यात येत आहे

तुम्ही दवाखान्यातून आल्यावर तुमच्यावर खटला चालवुन आपले कोर्ट मार्शल करण्यात येत आहे.
तोपर्यंत आपल्याला मेजर पदावरून बरखास्त करण्यात येत आहे,

हे पत्र वाचून मेजर बोलले मला ह्याची कल्पना होतीच मी जर वेळ घालवला असता बाकी बाबीची पूर्तता करण्यात तर कदाचित आज काही गावकरी जिवंत राहिले नसते ,

असो आता गावकऱ्यांच्या जीवाला धोका नाही ह्याचा आनंद आहे,
आपल्या रुबाबदार मिश्याला पीळ देत मेजर म्हणाले की
हे कोर्ट मार्शल काय होतच राहणार
आपण आपल्याला चांगले काय वाटते हे नेहमी करावे,

समाप्त.......