Addiction - 2 - 3 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 3

लग्न किती सुंदर शब्द आहे ना ? ..आणि त्यातही प्रेम विवाह झाला असेल की मग आयुष्यातील प्रत्येक क्षणच खास होऊन जातात ..ज्या व्यक्तीचे रात्रंदिवस स्वप्न पाहिले असतात त्यांच्यासोबतच ते क्षण जगताना एक वेगळीच मज्जा जाणवते...अजिंक्यला मृणालच ते लाजन , ईर्षा करण सर्व काही आवडू लागलं ..ती एकदा का त्याचा कुशीत आली की मग घडलेल सर्व काही माफ असे ..

आज रविवार होता शिवाय घरी आई - बाबा नसल्याने अजिंक्यने मृणालला बाहेर फिरविण्याचा प्लॅन केला होता .त्याला मृणालसोबत संपूर्ण दिवस घालविता येणार असल्याने तो आज फारच खुश होता ..रात्री मृणाल देखील कुशीत झोपल्याने तिचा मूड मस्त वाटत होता ..अजिंक्य आपल्या मुलीसोबत बाहेर खेळत बसला होता ..बेडवर अजिंक्यचा मोबाइल पडला असताना अचानक त्यावर एक मॅसेज आला ..मृणालने गम्मत म्हणून मोबाइल बघितला आणि त्यावर रियाचा मॅसेज आल्याचं तिला कळाल ..तिला आता राहवलं नाही आणि तिने मॅसेज बघितला ..काही क्षणांसाठी मॅसेज बघितला आणि मोबाइल बेडवरच आपटून ती बाहेर आली पण अजिंक्य मात्र तिथे नव्हता शेवटी बरेच काम असल्याने ती किचनला पोहोचली ..रियाचा मॅसेज वाचून मृणालचा पारा अधिकच वाढला होता ..अजिंक्य आपल्या पिल्लुला सोबत घेऊन फिरून आला होता ..तो तिच्याजवळ पोहोचला आणि तिच्याशी बोलणार तेवढ्यातच मृणाल त्याच्यापासून बाजूला होऊ लागली ..त्यांला तिच्या अशा वागण्याच कारणच समजत नव्हतं ..तरीही तिच्याशी बोलण्याचा तो प्रयत्न करीत होता आणि शेवटी मृणाल मोठ्या आवाजात अजिंक्यला म्हणाली , " मला वाटलं तुझी काहीच चूक नाही म्हणून काल तुला माफ केल ..पण अजिंक्य तुही तसाच निघालास ..ती भवानी आवडते न तुला ..म्हणून इतकं खुश असतोस तिच्यासोबत ..आता इकडे काय बायको जुनी झालीय ..मुलगी सोबतच आहे ..मग बायको जीवनात असली काय आणि नसली काय ..काय फरक पडणार .." ..अजिंक्य तीच सर्व बोलण शांतपणे ऐकू लागला आणि तीच बोलणं झाल्यावर तो म्हणाला , " राणीसरकार आम्हाला कळेल का नेमकं काय बिनसलय ते ? " आणि मृणाल डोळे मोठे करत म्हणाली , " म्हणजे हेही मीच सांगायचं ..जाऊन बघा त्या भवानीने तुम्हाला काय मॅसेज केलाय .."

अजिंक्यला आता आठवलं की सकाळपासून त्याने आपला मोबाइल एकदाही बघितला नव्हता आणि त्यावर नक्कीच रियाचा मॅसेज आला असेल म्हणूनच ही इतकी रागावलिय ..तो विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला आणि लगेच बेडरूममध्ये पोहोचला ..क्षणाचाही विलंब न करता त्याने मॅसेज वाचायला सुरुवात केली ..त्यात लिहिलं होतं " गुड मॉर्निंग मेरी जानं ..हा रविवार येतोच का?..तुझा चेहरा बघितला नाही की दिवसच खराब जातो ..आय रिअल्ली मिस यु यार .." ..मॅसेज पाहताच अजिंक्यने डोक्यावर हात मारून घेतला ..त्याच्या हातात आताही पिल्लू होती ..त्याने तिच्याकडे लक्ष दिलं तेव्हा जाणवलं की ती त्याच्या हातातच झोपी गेली म्हणून त्याने तिला बेडवर झोपवले आणि लगेचच मृणालकडे पोहोचला ..तिला मनवता यावं म्हणून त्याने मागून तिला मिठी मारली पण मृणाल आज इतकी रागात होती की तिने भाजीचा गरम चमचा त्याच्या हातावर लावला ..त्यालाही जाणवलं की वातावरण अगदीच गरम झालंय म्हणून थोड्यावेळासाठी का होईना त्याने माघार घेतली ..

मृणालचा राग इकडे कमी होईना आणि तिकडे अजिंक्यच संपूर्ण प्लॅंनिंग फिस्कटल होत ..तो मनोमन रियाला शिव्या देऊ लागला होता ..पण त्याला आजचे हे क्षण मिस करायचे नसल्याने त्याने तिला पुन्हा एकदा मनविण्याच ठरवलं ..दुपार झाली होती ..तिला समजाविण्यासाठी आधी स्वताला शांत करणं गरजेचं होतं ..त्यामुळे त्याने शॉवर घेतला आणि सेंट - व्हेंट मारून तयारी करू लागला ..आपलं कुणीच मनावर घेत नाही अस मृणालच्या लक्षात येऊ लागलं आणि ती भांड्याची आदळ - आपट करू लागली ..तरीही अजिंक्य आपली तयारी करण्यात व्यस्त होता ..इकडे भांड्याचा आवाज घराबाहेर जाऊ लागला तरीही मृणाल शांत झाली नव्हती ..शेवटी अजिंक्य तयारी करून किचनला पोहोचला ..तो किचनला पोहोचला आणि प्रेमाने तिच्याकडे पाहू लागला ..अजिंक्य तिच्याकडे असा पाहू लागल्याने तिने भांडे आपटने थांबवले पण तोंडाचा पट्टा आताही थांबला नव्हता ..प्रत्यक्षात अजिंक्यला राग यायला हवा होता पण तस काहीच झालं नाही आणि अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी कल्पना आल्याने तो मनोमन हसू लागला ...ती आता पोळ्या लाटत होती आणि कधीकधी ती अजिंक्यकडे पाहायची आणि यावेळी जशी मृणाल त्याच्याकडे पलटली अगदी त्याच वेळी अजिंक्यने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकविले..मृणाल आता काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हती ..तिने त्याच्यापासून स्वताला दूर करून घेतले ..तिची अवस्था आता मजेशीर झाली होती ..एक तर रागही होता आणि तो शब्दात जाणवत देखील नव्हता ..तरीही आपण त्याच्यासमोर हरलो नाही म्हणून तिने पून्हा एकदा बोलायला सुरुवात केली आणि अजिंक्य पून्हा एकदा तिच्या बाजूने पावले टाकू लागला आणि ती लाजून त्याच्यापासून दूर पळू लागली ..अजिंक्य तिच्या मागे धावू लागला आणि तिने बेडरूमचे आतून दार लावून घेतले ..अजिंक्य दारावर पोहोचत म्हणाला , " धीस इज नॉट फेअर डिअर ..किती मस्त मूड होता माझा आणि बघ तू किती छडतेस मला .." आणि ती त्याच्यावर हसून म्हणाली , " कस आहे ना नवरोबा अलीकडे तुम्ही फारच रोमँटिक झाला आहात ..मागे कोण समोर कोण काहीच बघत नाही त्यामुळे मला अस वागावं लागत .."

अजिंक्य बाहेरूनच म्हणाला , " शेम्बडी !! प्रियकर आहे तर प्रेम नाही करणार ...प्लिज ये ना बाहेर .."

अजिंक्य बाहेरच उभा होता आणि त्याला पोळी करपण्याचा वास येऊ लागला ..तो लगेच किचनला पोहोचला आणि गॅस बंद करून पुन्हा बेडरूमच्या दारावर पोहोचला आणि मृणालला प्रेमाने म्हणाला , " चला राणीसरकार तुमची ही गोष्ट देखील मान्य ..बर ऐका !!! तू रागात होतीस म्हणून सांगितलं नाही ..मी आता बाहेर जातोय मित्रांकडे ..तिकडेच काही खाऊन घेईल आणि सायंकाळी परतेल तेव्हा आपण बाहेर जाणार आहोत सो तयार राहा ..लव्ह यु डिअर .."

आज रविवार ..त्यामुळे अजिंक्य आपल्या सर्व मित्रांशी भेटायला बाहेर जात असे आणि आजही तो त्यांना भेटायला गेला ..सर्व मित्र त्याच्या आधीच तिथे पोहोचले होते आणि त्याला पाहताच म्हणाले , " बघा आले मजनू !! हा काही बायकोला सोडणार नाही .." आणि मागून रवी म्हणाला , " बरोबर आहे ..नवीन - नवीन लग्न असलं की असच असत भावा ..तुला नाही कळणार ..अजिंक्यच मुलांचं प्लांनिंग सुरू असेल .." आणि हे सर्व एकूण सर्वच खळखळून हसू लागले ..अजिंक्यनेही त्यांच्या हसण्यात साथ दिली ..तो आपल्या जागेवर विराजमान झाला आणि मित्रांच्या " बायकोपुराण " या विषयावर गप्पा सुरु झाल्या ..नितीन नाराज होत म्हणाला , " यार बायकोने पण डोक्याला खूप ताप आणलाय ..दिवसभर काम करतो आणि घरी थकून येतो तेव्हा एक छोटीशी अपेक्षा असते शरीर स्पर्शाची पण त्याही क्षणी तिची किरकिर सुरू होते आणि सर्व मज्जाच निघून जाते ..काय हवंय यार तिला ..छान टू बी.एच. के .घर आहे ..सोन्याने नटवलय .सोन्यासारखा एक मुलगा दिलाय ..तरीही तिला समाधान नाही ..तुम्हीच सांगा मित्रानो आणखी हवं तरी काय असत या बायकांना ? "

सर्वच ग्लासमध्ये रम टाकू लागले आणि त्या नशेत प्रत्येकच मित्र नितीन कसा बरोबर आहे हे सांगू लागला ..अजिंक्य मात्र बाजूला असलेली केळी खाण्यात व्यस्त होता आणि अमोल नितीनला म्हणाला .., " भावा याच उत्तर फक्त आपला अजिंक्यच देऊ शकतो शेवटी वहिनी फारच खुश असते आपल्या भावाच फक्त नाव एकूण .." आणि सर्वांची सुई अजिंक्यकडे वळाली ..तो त्यांच्याकडे बघत म्हणाला , " मला तुमच्या एवढा सांसारिक जीवनाचा अनुभव नाही पण तरीही हे नक्कीच सांगू शकतो की स्त्री पैशाची , दागिन्यांची भुकेली नसते ..ती प्रेमाची भुकेली असती ..आणि तुम्ही सर्वच शरीर संबंधाला प्रेम समजता ..एकदा तिच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोला मग बघा कशी तुम्हाला सर्वस्व प्रदान करते ." तो बोलतच होता की सर्वांनी त्याच्याकडे काना डोळा केला आणि त्याला चिडवू लागले ..कुणी त्याला बायकोचा गुलाम म्हणत होता तर कुणी काय आणि अजिंक्य त्यांच्या विचाराकडे बघून हसत होता ..त्या सर्वांच ड्रिंक करून झालं आणि तो घरी परतला ..मित्राच्या बोलण्याचं वाईट वाटून घेण्याऐवजी तो त्यांच्यावर हसू लागला होता कारण त्यांनी आपल्या बायकोला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता ..लग्न म्हणजे फक्त शरीर संबंधच असेल तर कदाचित त्यांनी लग्नाआधीच कित्येक वेळा लग्न केलंय हे ते सर्व विसरून गेले होते ..अजिंक्यच्या डोक्यात हा विचार आला आणि तो मनोमन हसू लागला ..शेवटी मेहफिल संपली आणि तो घरी परतला ...

अजिंक्य घरी परतला तेव्हा मृणालने पिल्लुची तयारी करून दिली होती आणि अजिंक्यचीच वाट पाहू लागली होती ..त्याला घरी यायला उशीर झाल्याने त्याने लगेच जाऊन अगदी काही मिनिटातच आपली तयारी आटोपली आणि पिल्लुची काळजी घेऊ लागला ..मृणाल पिल्लुला सोडून आता स्वतः तयारी करू लागली होती ..ती आतमध्ये गेली आणि आकाशी रंगाचा सलवार परिधान करून बाहेर आली ..लगेच निघायचं असल्याने थोड सजण्यासाठी आरशासमोर बसली ..ती आपले केस बनवू लागली आणि अजिंक्य तिच्याकडे एकटक पाहू लागला ..तिलाही आता थोडी लज्जा येऊ लागली आणि ती त्याला म्हणाली , " अजिंक्य काय पाहतो आहेस अस ! मला खूप लाजायला होत न " आणि अजिंक्यही रोमँटिक होत म्हणाला , " मला ते लाजनच आवडत म्हणून पाहतोय ..तू आपलं काम कर आणि मी माझं काम करतो.. तुला पाहण्याच.." ती त्याच्या अशा बोलण्यावर हसू लागली आणि आपली तयारी पूर्ण करू लागली ..तिचे केस बनवून झाले होते आणि ती आता गळ्यात मंगळसूत्र टाकू लागली आणि तेवढ्यात अजिंक्य म्हणाला , " मृणाल अशीच भारी दिसतेस ग !!..आज आई पण नाही आहे इथे सो माझ्यासमोर हे सर्व करण्याची गरज नाही ..चल अशीच ..अर्धे तर तुला पाहून फ्लॅटच होतील " आणि मृणाल त्याच्या अशा बोलण्यावर हसत म्हणाली , " नवरोबा तुम्ही न अजब कोड आहात !! मला सांगा तुम्ही का म्हणता की मंगळसूत्र लावू नये आणि दुसरी गोष्ट तुमच्या बायकोकडे कुणी पाहतय हे पाहून वाईट नाही वाटत तुम्हाला ?.." ..आता अजिंक्य तिच्याकडे पाहून हसू लागला ..काही क्षण तो तसाच होता आणि मधातच म्हणाला .." लग्नानंतर पुरुषाच जीवन बदलत नाही तर मग स्त्रीच का बदलावं ? ..तस पण लग्न हे मनातून होत असत ..मंगळसूत्र हे फक्त नाममात्र आहे ..आणि तुझं माझ्यावरच असलेलं प्रेम पटवून देण्यासाठी मला या सर्व गोष्टींची गरज नाही ..तू माझीच आहेस हे मला माहिती आहे ..आणि दुसर उत्तर ..कळू द्या हो सम्पूर्ण जगाला माझी बायको किती सुंदर आहे ते !! आणि कस आहे न राणीसाहेब सुंदरता ही लपवून ठेवण्यासाठी नसते ..तीच तर दाखविण्यासाठी असते मग तिला लपवून सुंदरतेचा अपमान नाही होणार का ? ..माझ्यासाठी तर तू माझी आहेस हेच खूप आहे .."

मृणाल त्याच्याकडे वळत म्हणाली , " मे वारी जावा !! नक्कीच आयुष्यात काही पुण्य केले असतील तेव्हाच तू आयुष्यात आला आहेस .." आणि अजिंक्य लाजत म्हणाला , " पुरे हा !! चला आता उशीर होतोय आपल्याला .."

घराला कुलूप लावत ते दोघेही बाहेर पडले ..
ते दोघेही आज खूप दिवसांनी बाहेर निघाले होते ...अजिंक्य या क्षणाची फारच आतुरतेने वाट पाहत होता ..कार निघाली आणि मृणाल खिडकीच्या बाहेर पाहू लागली ..तिचे भुरभुर उडणारे ते केस आणि मृणाल त्या केसांना सावरताना आणखीच सुंदर भासत होती ..न राहवून अजिंक्यचे लक्ष तिच्याकडे जात होते आणि तिच्याही ते लक्षात येत होतं ..ती गालातल्या गालात हसून पुन्हा बाहेर पाहू लागायची ..अजिंक्यचे पुन्हा एकदा तिच्याकडे लक्ष गेले आणि मृणाल म्हणाली , " साहेब आज जरा जास्तच रोमँटिक आहात का ?...असेच जर पाहत राहिलात तर मग पुन्हा एकदा प्रेमात पडेन तुमच्या आणि मग बघा हा आपल्या पिल्लुला भाऊ येऊ शकतो मग पुन्हा माझा वेळ काही तुम्हाला मिळणार नाही " आणि अजिंक्य तिला चिडवत म्हणाला , " मग तुम्हाला थांबवलंय कुणी ..मी आयुष्यभर तुला सोडणार नाही मग मूल दोन असो की अकराचा संघ .. " ...आता ती फारच लाजू लागली आणि स्वताच हसू आवरत म्हणाली , " पुरे हा !! चला नीट गाडी चालवा ..अस गाडी चालवताना दुसरीकडे बघणं बर नव्हे .." मृणालच बोलणं ऐकून तो नीट गाडी चालवू लागला पण तरीही त्याच लक्ष तिच्याकडे जातच होत ..काहीच वेळात ते थेटरला पोहोचले ..

मूवी सुरू व्हायला अगदी काहीच क्षण बाकी होते आणि ते आत पोहोचले..काहीच क्षणात मूवी सुरू झाली..मृणालला सलमानची मूवी फार आवडायची त्यामुळे मुदामहून दबंग पाहायला गेलो होतो ..आणि अजिंक्यच आवडत गाणं सुरू झालं ..

दगाबाज रे ..दगाबाज रे
तोरे नैना बडे दगाबाज रे
कल मिले ..हो कल मिले
कल मिले की हमका भूल गये आज रे
दगाबाज रे ...

गाणं सुरू होताच तिचा हात त्याच्या हातात हात आला ..तरीही तीच लक्ष सलमानकडेच होत ..अजिंक्य तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागला ..मूवी समोर - समोर जाऊ लागली आणि त्याच्या प्रत्येक फायटिंगवर ती भर टॉकीज मध्ये शिट्टी वाजवू लागली ..अजिंक्यला ते सर्व बघून लाजत होता आणि तिला थांबविण्याचा प्रयत्न करू लागला पण ती काही थांबणार नव्हती ..शेवटी त्याने तिला थांबवनच बंद केलं ..शेवटी मूवी संपली तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला ..पण ज्या कारणास्तव त्याने तिला बाहेर आणलं होत..ती गोष्ट साध्य झाली होती..मृणालचा आनंदी चेहराच फक्त त्याला समाधान मिळवून देत होता यापेक्षा प्रेमाचा दुसरा अर्थ खरच सापडला असता ?


क्रमशः ....