Addiction - 2 - 4 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 4

मूवी पाहून झाली होती आणि आता दोघांच्याही पोटात कावळे ओरडू लागले ..अजिंक्यने सर्व प्लॅंनिंग केली होती त्यामुळे त्याने जेवायला जाण्यासाठी लगेच गाडी काढली ..गाडी हळूहळू शहर ओलांडून गावाकडे जाऊ लागली ..अजिंक्य मृणालला भरपूर वेळा मोठं - मोठ्या हॉटेल्समध्ये जेवायला घेऊन गेला होता पण त्या स्थळाबद्दल मृणालला काहीच माहिती नव्हतं त्यामुळे ती अजिंक्यला त्याबद्दल विचारू लागली.. अजिंक्यला तिला सरप्राइज द्यायचं असल्याने आज तो काहीच बोलत नव्हता आणि ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली ..अजिंक्यने देखील काही पाहिलंच नाही असद दाखवून गाडी चालविण्याकडे लक्ष केंद्रित केलं ..हळूहळू एक - एक गाव ओलांडत ते त्या स्थळापर्यंत पोहोचले ..अजिंक्य गाडी पार्क करायला गेला तर मृणाल अगदी तिथेच उभी होती ..काहीच क्षणात गाडी पार्क करून तोही मृणालजवळ आला आणि दोघेही आत जाऊ लागले ..हॉटेलच्या गेटवर फॅमिली प्लाझा नावाचा बोर्ड झडकत होता ..दोघाणीही आतमध्ये प्रवेश केला आणि बाजूचा नजारा बघून ती थक्क झाली ..दोन्ही बाजूनी हिरवळ असलेली बाग आणि सोबतच मंद प्रकाश देणारे पांढरे लॅम्प मृणालला अधिकच भुरळ घालत होते आणि ती त्यात हरवू लागली .बाजूला एका शुभ्र टॅन्कमध्ये छोटे - छोटे मासे खेळत होते ..तर त्या बाजूलाच हलके पाण्याचे फवारे उडू लागले ..ते सर्व मृणालच्या काळजाचा ठोका चुकवू लागलं ..काहीच वेळात अजिंक्य मॅनेजर जवळ पोहोचला आणि त्याने टेबल बुक असल्याची खात्री करून घेतली ..वेटरने त्यांना टेबलपर्यंत नेऊन पोहोचवले आणि तो परत कामात व्यस्त झाला ..अजिंक्य चेअरवरती बसला पण मृणाल अजूनही बसायला तयार नव्हती ..तीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं हे पाहून अजिंक्य म्हणाला , " काय राणीसरकार आज जेवण करायचा मूड नाही का की हे सर्व फक्त पाहतच बसणार आहात ? " ..त्याच्या आवाजाने ती भानावर आली आणि हलकेच स्मित करून चेअरवर बसली .." अजिंक्य तुला या जागेबद्दल कुणी सांगितलं ? किती सुंदर जागा आहे न ही !! शहरापासून दूर ..ना प्रदूषण , ना कसला आवाज ..निरव शांतता त्यातही आकाशात ते टिमटीम करणारे चांदणे मनाला अगदीच घायाळ करून जातात ..खरच खूप सुंदर जागा आहे ही ", मृणाल म्हणाली आणि त्यावर अजिंक्य उत्तरला , " काही नाही ग तू घरच्या , माझ्या , पिल्लूच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना थकून जातेस ..त्यातही तुझी कुठलीच अपेक्षा नसते म्हणून खूप दिवसापासून तुला बाहेर घेऊन जाण्याची तयारी करत होतो आणि मित्रांनी या स्थळाबद्दल सांगितलं ..मलाही आवडलं म्हणून घेऊन आलो .."

त्यांचं बोलणं सुरूच होत की वेटर ऑर्डर मागविण्यासाठी आला ..दोघाणीही आप - आपले ऑर्डर मागवले ..पिल्लू तर केव्हाचीच झोपली होती ..पुन्हा त्या प्लाझाची एक खासियत म्हणजे प्रत्येकाचे टेबल हे काही अंतरावर होते त्यामुळे कुणीच कुणाच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करण शक्य नव्हतं ..वेटर ऑर्डर घेऊन आला आणि वाढून लगेच परतला ..प्लेट वाढून असतानाही अजिंक्य काहीच खात नव्हता उलट तो सतत तिच्याकडे पाहून लागला आणि हे बघून ती म्हणाली , " काय नवरोबा !! ..पोटात कावळे ओरडत असतानाही आज जेवण्यात रस नाही ...अस कधी होत नाही तुमच्याबाबतीत..बोला बोला विचार काय सुरू आहे तुमचा ? " आणि अजिंक्य हळूच हसत म्हणाला , " आपण पहिला घास भरवावा याची आतुरतेने वाट पाहतोय मी राणीसरकार .इतकी छोटी अपेक्षा पूर्ण करणार का आपण ? " अजिंक्यचे हे शब्द एकूण मृणालच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव स्पष्ट दिसू लागले ..ती एका हाताने तोंडावर हात ठेवून हसू आवरायचा प्रयत्न करीत होती तरीही तिला ते जमत नव्हतं आणि त्याच अवघडल्या स्थितीत ती म्हणाली , " अस आहे तर नवरोबा !! हल्ली ना तुम्ही कुठे काय बोलालं , काय वागणार याचा नेमच नाही ..इथे कस शक्य आहे ते ..आजूबाजूला काही अंतरावरच लोक बसून आहेत , ते काय म्हणतील ..? " आणि अजिंक्य तिच्यावर थोडा रुसत म्हणाला , " माणूस असा एक व्यक्ती आहे जो राग असला की सर्व जगाला ओरडून सांगतो पण प्रेम सांगायची वेळ आली की मग मात्र शांत बसतो ..कधी कधी ते प्रेम व्यक्त करणही खूप गरजेचं असत ..आणि नवऱ्याला भरवण्यात कसली लज्जा !! ..आपण काही चुकीच वागतोय का ? .." मृणालला त्याचा प्रत्येक शब्द पटला आणि तिने कुणाची पर्वा न करताच त्याला पहिला घास भरविला ..अजिंक्यही आता तिला भरवु लागला ..

करी है मोहब्बत हमने
सारे जमाणे से लढकर
अब तो जमाना भी आप हो
फिर क्यू जिया जाये औरो को देखकर ...

दोंघेही फार आनंदाने जेवण करीत होते ..काहीच क्षणात त्यांचं जेवण झालं आणि वेटर दोन आइस - क्रीम घेऊन आला ..मृणालने एक आइस- क्रीम परत करून एकच ठेवून घेतली मुळात तिला आइस - क्रीम फारच आवडत असल्याने ती अशी का वागली याचा तो विचार करीत होता आणि न राहवता त्याने तिला विचारले , " काय मॅडम आज चक्क आइस - क्रीम ला नकार ..आपके अंदाज तो बदले बदल नजर आ रहे है आणि बर का तू परत केलीस ना तर आता मी नाही देणार माझी आइस - क्रीम .." तो आइस क्रीम लपवायला हात मागे घेणार तेवढयात मृणाल त्याच्या बाजूने सरकू लागली आणि आइस - क्रीमचा थोडासा भाग तिने बोटाने त्याच्या नाकाला लावला आणि ती मंदपणे स्मित करू लागली ..तिला बघून अजिंक्यलाही हसू येत होतं ..पुन्हा एकदा तिने त्याच्याकडे हात समोर केला आणि त्याला आइस क्रीम भरवु लागली ..तो पूर्ण आइस क्रीम खाणारच तेवढ्यात तिने त्याच्या हातातून ती घेऊन खायला सुरुवात केली ..आइस क्रीम खाताना ती अगदी लहान बाळासारखं वागत होती ...अजिंक्यच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते ....जी मुलगी काही क्षणपूर्वी जग काय म्हणेल याचा विचार करीत होती तीच मुलगी जगाचा विचार न करता एकमेकांची उष्टी आइस - क्रीम खात होती आणि तिला अस बेधुंद होऊन जगताना तो खूप दिवसाने पाहत होता आणि ते अल्लड असे भाव तो आपल्या नजरेने टिपू लागला .. तरीही तो तिला काहीच म्हणाला नाही ..त्यांचं संपूर्ण जेवण होईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते आणि थंडी आणखीच वाढल्याने ते बिल पे करून घराकडे निघाले ..

आज संपूर्ण दिवस अजिंक्य फक्त मृणालच्या चेहऱ्याकडे पाहत होता ...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला अधिकच समाधान देऊन जात होता ..रात्रीच्या वेळी रस्ता खालीच असल्याने अजिंक्य वेगाने गाडी चालवू लागला आणि मृणाल आपले डोळे मिटून खिडकीला टेकली ..आज तिच्या चेहऱ्यावर कुठलेच दुःख नव्हते की नव्हती चिंता ..तिचा शांत चेहरा अजिंक्यला सुखावत होता आणि तो अधिकच तिच्या प्रेमात बुडत होता ..गाडी घरी पोहीचली तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते ...दिवसभर फार थकल्याने दोघेही कपडे चेंज करून बेडवर पडले ..पाळण्यात पिल्लू ( प्रज्ञा ) झोपून होती ..मृणाल त्याच्या हातावर झोपून होती आणि म्हणाली , " थँक्स डिअर इतके सुंदर क्षण देण्यासाठी ..मी खूप नशीबवान आहे रे की तुझ्यासारखा जीवनसाथी मिळाला आहे ..जो न मागताही सर्व काही देतो ..तुला माहिती आहे , मला वाटल होत की आता आयुष्यात काहीच उरलं नाही म्हणून स्वप्नसुद्धा पाहणं बंद केलं होतं पण तू आयुष्यात आलास आणि सर्व काही बदललं ..आता स्वप्न पाहण्याची गरज देखील मला वाटत नाही कारण स्वप्न पडण्याअधिच ते तू पूर्ण करतोस ..आज नव्याने जीवन जगावस वाटत आहे ..तुझ्या सहवासात आता प्रत्येक क्षण हवाहवासा झाला आहे ..खरच लग्न किती सुंदर नात असत ना ..जिथे दोन व्यक्ती फक्त शरीरानेच नाही तर मनानेसुद्धा एकत्र होतंय.पुन्हा एकदा मला अभिमानाने सांगावस वाटत की मी फारच नशीबवान आहे की तुझी साथ मला आयुष्यभर लाभते आहे ..थँक्स पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला माझं जीवन देण्यासाठी ..प्रेम देण्यासाठी.." ..हे ऐकताच त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि म्हणाला , " फक्त तू नाही आपण खूप नशीबवान आहोत कारण प्रेम दोघाणीही केलं आहे आणि दोघेही प्रामाणिकपणे निभावत आहोत ..मृणाल तुला माहिती आहे या जगात लोक प्रेम तर करून घेतात पण निभावण्याची वेळ आली की तू कशी चुकीची आहेस अस सांगू लागतात त्यामुळे मग तेच अतूट प्रेम क्षणात तुटत ..लोकांनाही संधी मिळते ती प्रेमाला गालबोट लावण्याची ..मला एक कळत नाही की लग्नाआधी शोण्या , पिल्लू , जाण म्हणणारे एकमेकांची काळजी घेणारे ते दोघ लग्नानंतर एकमेकांना का समजून घेत नाहीत ..हाच विचार सदैव माझ्या डोक्यात असतो ..तुझी या घरासाठी , माझ्यासाठी चाललेली तळमळ मला दिसते म्हणून म्हटलं आज घराच्या लक्ष्मीला या उंबरठ्याबाहेरच जग दाखवाव आणि खर सांगू आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप खूप समाधान मिळालं ..तेव्हा थँक्स की तू माझ्या आयुष्यात आलीस आणि त्यामुळे मला जबाबदारीची जाणीव झाली आणि मृणाल तुझ्याविना मीदेखील अपूर्ण आहे ..मलाही तू आयुष्यभर हवी आहेस ..जेव्हा पुरुषांना आपल्या पत्नीच्या भावनांबद्दल थोडी फार जाणीव होईल तेव्हाच प्रेम या शब्दाचा अर्थ त्यांनाही कळेल नाही तर ते त्यांना सदैव गृहीत धरतील .. .." मृणाल आताही त्याच्याकडे मनभरून पाहत होती.. तिने आपली मिठी घट्ट करून घेतली आणि ते दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपी गेले...
रात्री झोपायला बराच उशीर झाल्याने अजिंक्यला सकाळी उठायला 8 वाजले ..मृणाल सकाळीच उठून किचनच्या कामाला लागली होती ..अजिंक्य उठला आणि मोबाइल चेक करू लागला..त्यावर सरांचे दहा मिस कॉल येऊन होते ..मोबाइल सायलेंटवर असल्याने त्याला त्याबद्दल काहीच कळाल नव्हतं त्याने सरांना लगेच कॉल लावला आणि सरानी अजिंक्यला नऊ वाजता बाहेर साइटवर बोलावलं होतं ..त्याच्याकडे फक्त एकच तास असल्याने तो बेडवरून उठून पटापट तयारी करु लागला .त्याची इकडे - तिकडे धावपळ सुरू होती आणि मृणाल त्याच्या अशा अवताराकडे पाहून हसू लागली ..अर्ध्या तासातच त्याने सर्व तयारी आटोपली ..त्याला आधीच उशीर झाला असल्याने त्याने नाश्ता देखील केला नव्हता.. सर्व तयारी करून तो दाराबाहेर गेला..तो गाडीची चावी घेऊन बाहेर पडला आणि काहीच सेकंदातच आत आला ..मृणाल त्याच्याकडे आताही बघून हसत होती आणि म्हणाली , " काय साहेब आता काय उरलं आहे ? " ..तो हळूच टेबलकडे गेला आणि तीच लक्ष नसताना त्याने तिच्या गालावर किस्सी केली आणि म्हणाला , " हेच बाकी होत ..आता बघ दिवस कसा जाईल माझा .." ती समोर काही बोलणारच तेवढ्यात तो बाय करत - करत गाडीजवळ पोहोचला ..त्याने गाडी सुरू केली आणि भर वेगाने पसार झाला ..मृणाल आताही त्याच्याकडे बघत होती आणि क्षणात तिच्या डोक्यात विचार आला , " किती फरक आहे न आधीच्या आणि आताच्या अजिंक्यमध्ये ? ..मला वाटलं होतं लग्नानंतर त्याला माझी फार काळजी राहणार नाही पण उलट आताच तो माझी जास्त काळजी घेतो ..मला नेमकं काय हवं असत त्याला कस कळत काय माहीत ..पण मला हाच अजिंक्य जास्त आवडतो ..थोडासा नटखट आणि जिद्दी ..हवं तिथे हक्क गाजवणारा आणि न बोलताही तिचे स्वातंत्र्य जपणारा ..खरच प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा मुलगा आला तर ? " ..ती विचारात गुंतली होती आणि मागून कुकरच्या शिट्टीचा आवाज आला आणि तिला कळून चुकलं की आज पण याच्या विचारात भाजी करपली ..तिने स्वतःच्या डोक्यावर एक टपली मारली आणि पुन्हा एकदा किचनमध्ये पोहोचली ..

इकडे अजिंक्य आणि सर साइट्सवर पोहोचले होते ..काम उत्तम गतीने सुरू होत त्यामुळे सर अजिंक्यवर खुश झाले होते ..सरांकडे वेळ असल्याने त्यांनी पुन्हा दोन साइट्स पाहण्याच ठरवलं आणि अजिंक्यही सोबतच निघाला ..कामाची गती उत्तम होती पण सरानी अजिंक्यला काही बदल करायला सांगितले आणि सर घराकडे निघून गेले ..तर अजिंक्य सरळ ऑफिसकडे निघाला ..ऑफिसला येईपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती ..अजिंक्यला भूक लागली होती तरीही त्याने टिफिन न आणल्याने तो सरळ केबिनला पोहोचला ..त्याने कॉफी मागवून घेतली आणि आपलं काम करू लागला ..आज सर ऑफिसला आले नसल्याने रिया केबिनच्या बाहेरच खुर्चीवर बसली होती ..अजिंक्यच अधून - मधून तिच्याकडे लक्ष जात होतं पण काम खूप जास्त असल्याने तो तिच्याकडे जाऊ शकला नव्हता ..पण तिच्या चेहऱ्यावरून तिला काहीतरी टेंशन असल्याचं त्याला जाणवत होतं ..नंतर त्याला मृणालचा फोन आला आणि तो तिच्याशी बोलण्यात व्यस्त झाला ..मृणालचा फोन कट झाला तेव्हा अजिंक्यने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं पण ती तिथे नव्हतीच त्यामुळे त्याने पून्हा एकदा आपले लक्ष लॅपटॉपमध्ये घातले ..अजिंक्य आपलं काम भराभर आटोपु लागला ..काम करीत असताना त्याला कधीच वेळेचं भान नसायचं ..वॉचमन ऑफिस बंद करण्यासाठी केबिनमध्ये आला तेव्हा सर्व कलीग आधीच गेल्याच त्याच्या लक्षात आलं ..त्याने वॉचमनला लाइट्स बंद करून घ्यायला सांगितले आणि पुन्हा काम करू लागला ..साधारणतः अर्ध्या तासाने त्याच काम आटोपलं आणि ते केबिन लॉक करून बाहेर जाऊ लागला ..बाहेरचे लाइट्स ऑफ झाले होते त्यामुळे तो सावकाश समोर जाऊ लागला ..तेवढ्यात त्याच लक्ष रियाकडे गेलं ..ती त्या गडद अंधारात एकटीच बसली होती पण बहुदा तीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं ..अजिंक्यच्या हातात कॉफी बघून ती भानावर आली ..अजिंक्यने लाईट ऑन करत विचारले , " रिया काय झालं आज तुला ? ..माझं दुपारपासूनच तुझ्याकडे लक्ष आहे ..तुझा मूड काही ठीक नाही ..घरी काही प्रॉब्लेम झालाय का ? .." आतापर्यंत शांत असलेली ती रडू लागली ..अजिंक्यने तिला शांत करण्यासाठी तिच्या डोळ्यावरून हात घेतले आणि ती तिने त्याला घट्ट मिठी मारली ..तोही तिला शांत करण्यासाठी तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला ..ती तरीही शांत होण्याचं नाव घेईना आणि अजिंक्य म्हणाला , " रिया सांग ना काय झालं ? " आणि ती डोळे पुसत म्हणाली , " अजिंक्य घरच्यांनी मला मूल बघायला सुरुवात केली आहे ..मी आजपर्यंत फक्त तुझ्याशी फ्लर्ट करत नव्हते तर खरच माझ तुझ्यावरं प्रेम आहे ..फक्त तुला कधी जाणवत नाही ..तुझ्याविना मी माझ्या आयुष्याचा विचारसुद्धा करू शकत नाही ...नाही सहन होत रे हा दुरावा ..मला माहिती आहे की तुझी बायको आहे तरीही मला काहीच हरकत नाही ..तू फक्त मला माझ्या हक्काचे काही क्षण दे ..मी त्यातच सदैव खुश राहील ..मी ठामपणे सांगू शकते की माझ्यायेवढं प्रेम कुणीच करू शकत नाही तुला ..तू जर मिळाला नाहीस ना तर मी जीवाच बर वाईट करून घेईल ..प्लिज कर ना माझ्याशी लग्न ? ..

अजिंक्य तिच्याकडे बघून किंचित हसू लागला ..त्याला तिला काय उत्तर द्याव हेच कळत नव्हतं तर रिया आताही त्याच्या उत्तराची वाट पाहत होती...

क्रमशः ...