Addiction - 2 - 10 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 10

अजिंक्य आणि काकू आश्रमाकडे निघाले तेव्हा अंधार पडला होता ..हळूहळू गुलाबी थंडीही वाढू लागली होती ..काकू दिवसभर थकल्या असल्याने त्यांचा कारमध्येच डोळा लागला तर अजिंक्य निवांत गाडी चालवू लागला ..काहीच क्षणात गाडी आश्रमाजळवळ पोहोचली ..अजिंक्यने गाडी पार्क केली आणि काकूंना उठवू लागला ..काकू आपले डोळे चोळत उठल्या आणि समोरच दृश्य बघून थक्क झाल्या .आज संपूर्ण आश्रम लायटिंगने सजवलं होत ..आश्रमाकडे बघून त्यांना स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि त्या एक एक पाऊल समोर टाकू लागल्या ।.काकू समोर जाऊ लागल्या आणि मृणाल व निशा महाराष्ट्रीयन पद्धतीने साडी परिधान करून समोर आल्या ..त्यांच्या हातात फुलांनी सजवलेली आरतीची थाळी होती ..काकू गेटवर येताच त्यांनी काकूंना ओवळायला सुरुवात केली ..तर ओवाळून झाल्यावर त्यांनी तिला आत घेतलं .काकू आताही आश्रमाच्या सजवाटीकडे चौफेर नजर टाकत होत्या ..निशा - मृणालही समोर जाऊ लागल्या आणि अजिंक्यने निशाचा मागून हात पकडून थांबविले ..आणि निशा मागे पलटत म्हणाली , " क्या हुआ यार ..ऐसें हात मत पकड तेरी बीबी मेरी जाण ले लेगी .." आणि अजिंक्य तिच्याकडे बघून म्हणाला , " आज पहिली बार तुम्हे इस रूप मे देखा है और सच बोलू तो देखता ही रेह गया ..इसलीये तारीफ तो बनती है ...और बीबी देखती है तो देखणे दो ..देखो कैसे जल रही है .ऊसे ऐसें सताने मेही तो जादा मजा है .." तो तिचा हात पकडूनच समोर जाऊ लागला आणि निशा म्हणाली , " सच मे तू नही सुधरनेवाला ..और बेटे घर जाकर बहोत मार खाणे वाला है तू .." दोघेही हसत एकमेकांसोबत आत जाऊ लागले आणि मृणाल त्याच्याकडे बघून आणखीच ईर्षा करू लागली ...पहिली प्रेयसी सोबत असताना बायकोला त्रास होत होता हे बघून अजिंक्यही तिची गम्मत घेण्यास मागे हटणार नव्हता ..

एव्हाना मृणाल काकूंना तयारी करायला आत घेऊन गेली ..अजिंक्यही फ्रेश व्हायला आत पोहोचला ..अजिंक्य तयारी करून पुन्हा बाहेर पोहोचला होता त्यामुळे काकू येण्याची आता सर्व वाट पाहत होते ..निशाने अजिंक्यने सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केली होती ..आश्रमाच लायटिंग सर्वांनी मिळून केल होत तर केकही समोर ठेवून होता आणि तिथले छोटे - छोटे पाखरू नवीन कपडे लावून इकडे - तिकडे चकरा मारत होते ..काकूंना आजपर्यंत साथ देणाऱ्या सर्व मित्रांना , सहकार्यांना तिथे बोलवण्यात आले होते ..आज खऱ्या अर्थाने आश्रमाला शोभा आली ..जे आश्रम कधीतरी फक्त रडण्याच्या आवाजात हरवलं जायचं ते आज आनंदाने बहरून आलं ..काकू बाहेर आल्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली ..काहींचे डोळे पाणावले होते तर काहींच्या डोळ्यात आनंद दिसत होता ..काकूने क्षणाचाही वेळ न हरवता केक कापण्यास सुरुवात केली ..केक कापून त्याचे तुकडे सर्वाना भरवून झाले तर इकडे हळूच आवाजात निशाणे गाणे वाजवायला सुरुवात केली ..डान्स करायला कुणीच समोर न येताना पाहून ती मृणालला समोर घेऊन गेली आणि मग दोघांत एक वेगळीच जुगलबंदी रंगू लागली ..त्या दोघीही डान्स करू लागल्या तर त्यांच्या बाजूने छोट्या छोट्या मुलांनी हात हलवायला सुरुवात केली ..अजिंक्य हे सर्व दूरवरून बघत होता ..निशा आधीच खोडकर त्यामुळे एक - एक व्यक्तीचा हात धरून ती सर्वाना डान्स करायला घेऊन जाऊ लागली ...आता प्रत्येक व्यक्ती त्यात सामील झाला ..काय वृद्ध आणि काय लहान सर्वच आपापल्या पद्धतीने डान्सचा आस्वाद घेऊ लागले होते ..काकूंही आज कधी नव्हे ती त्या सर्वात सामील झाली ..सर्वांनी अगदीच धुमाकूळ घातला होता .आश्रमात दिवाळी असण्याचा तो क्षण कुणीच विसरू शकणार नव्हते ..काकूंना तर अगदीच भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ..अजिंक्यच लक्ष आताही काकूंवर होत ..तिच्या डोळ्यातून निघणारे आनंदाश्रू त्याच्या मनाला समाधान देऊन जात होते ..तो काही विचार करणार तेवढ्यात निशा त्याचा हात पकडून नाचायला घेऊन आली ..अजिंक्यही निशासोबत आनंदाने नाचू लागला ..त्याच वेळी मृणाल त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली ..पण आज अजिंक्य काही तीच ऐकणार नव्हता आणि तो तिच्याकडे दुर्लक्ष करून निशासोबत डान्स करू लागला आणि मृणालनेही उंच टाकाची सॅंडल त्याच्या पायावर ठेवून आपला बदला घेतलाच ..फक्त त्याने जास्त लागल असल्याचं दाखवलं नाही ..पण अजिंक्यलाही मृणालच अस रूप आणखीच आवडू लागलं ..त्यात प्रेम होतं , काळजी होती आणि होता तो बायकोचा रुसवा ..जो त्यांच्या नात्याला पुन्हा - पुन्हा घट्ट करीत होता ...

डान्स करून आता प्रत्येक व्यक्ती थकला आणि सरळ जेवणाकडे धावू लागला ..निशाणे जेवणाची व्यवस्था फार उत्तम केली होती ..ज्यांना जे हवं ते सर्व खाऊ लागले ..त्यातही मोठ्या लोकांच्या गप्पा रंगात येऊ लागल्या आणि मेहफिल हास्यानी दरववळून निघाली ..काकू तरुणपणी कशा होत्या त्यांचा स्वभाव प्रत्येक व्यक्ती कथन करीत होता आणि तिथल्या प्रत्येक व्यक्ती ते क्षण नव्याने जगू लागला ...काकूंही ते जुने दिवस आठवून दिलखुलास हसत होती ..काकूंचा एकांतपणा कमी करता यावा शिवाय आजचा सत्कार साजरा करता यावा म्हणून अजिंक्यने हे सर्व अरेंज केलं होतं आणि काकू हे सर्व बघून फारच खुश होऊ लागल्या ..प्रत्येक व्यक्ती काकूबद्दल भरभरून बोलत होता आणि ते क्षण संपूच नये असं वाटत होतं पण वेळ भरपूर झाल्याने सर्वच लोक काकूंना भेटून परत जाऊ लागले होते ..काकूंना त्यांना आज जाऊ द्यावस वाटत नव्हतं पण ती ते त्यांना म्हणू शकली नव्हती ..भरलेलं सर्व आश्रम क्षणात खाली झालं ..काकूंना काही सुखाचे क्षण देता यावे म्हणून अजिंक्यने हा प्लॅन केला होता आणि काकूंच्या चेहऱ्यावरच समाधान पाहून त्यालाही थोडाफार समाधान मिळालं होतं ..

पार्टी संपली होती आणि मृणाल सर्व आवरू लागली ..काकूंही फार थकल्या असल्याने झोपायला आत गेल्या ..लहान मुलेही झोपी गेली होती ..निशाला घरी येण्यासाठी बरेच फोन आले होते त्यामुळे अजिंक्य तिला सोडायला बाहेर पडला ..तिचा मुलगा गाडीतच झोपी गेला होता तर ते दोघे हळू आवाजात बोलत रस्ता सर करू लागले ...बोलता - बोलता अजिंक्यने लगेचच गाडी थांबविली ..गाडी अचानक थांबल्याने निशा त्याला विचारु लागली , " क्या हुआ गाडी क्यो रोक दि तुने ? " अजिंक्य पाणीपुरीकडे बोट दाखवत म्हणाला , " चल पाणीपुरी खाते है ..कुछ पुराणे दिन ताजा करणे का मजा ही अलग है .." निशाणे बरच खाल्लं असल्याने ती नको म्हणत होती पण अजिंक्य तीच काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता आणि तिचा हात धरून तो तिला बाहेर घेऊन गेला ..सुरुवातीला नको - नको म्हणणारी ती अजिंक्य सोबत आवडीने खाऊ लागली ..निशा आताही तशीच होती ..थोडी चेहऱ्यावर तरतरी आणि स्वभावाला मिर्चीसारखी ..अजिंक्य तिच्याकडे पाहत होता आणि तेव्हाच ती म्हणाली , " अब ऐसें क्या देख रहा है ..क्या खा जायेगा मुझे ? " आणि तो हसत म्हणाला , " सोच तो वही रहा हु ..बहोत दिन हुये तुझसे मिले हुये ..आज मिल के जाना तू वैसे ही है ..बहोत याद आती है यार इन पलो की .." आणि ती त्याची खेचत म्हणाली , " चल झुटे ..मस्त बीबी के साथ चिपक गया है और बोलता है याद आ रही है . हा बोल ना बिवी ऐसी हो तो कोई भी उसको अकेले ना छोडे ..पर सच मे बहोत याद आते है वो पल " म्हणत ती पुन्हा ती खाण्यात व्यस्त झाली .अजिंक्यने एकच प्लेट पाणीपुरी संपवली नव्हती तर तिने 2 प्लेट पटापट संपवल्या होत्या ...खाऊन झालं तेव्हाही अजिंक्य तिच्याकडे पाहत होता आणि ती म्हणाली , " ओये हिरो अब नही देणे वाली मे पैसे ..चल जब ढिली कर " आणि त्याच व्हॉलेट काढत तिने पैसे पण दिले ..आज खूप दिवसांनी अजिंक्यने तिचा हा तापट स्वभाव अनुभवला होता आणि तिची प्रत्येक गोष्ट त्याला मुंबईत घालवलेल्या सुंदर क्षणाची आठवण करून देत होती ..पाणीपुरी खाऊन झाली आणि काहीच क्षणात ते तिच्या घरासमोर पोहोचले ..निशाचा नवरा तिची वाट पाहतच होता ..तो त्याला आत येण्यासाठी खूप विनंती करीत होता पण वेळ फार झाल्याने त्याने आत जाण्यास नकार दिला ..दोघानाही हग करत आणि तिच्या मुलाच्या कपाळावर किस्सी करत तो पुन्हा आश्रमाकडे गेला ..अजिंक्य आश्रमात पोहोचला तेव्हा सर्वच थकून पडले होते ..मृणाल देखील त्याची वाट पाहत पाहतच झोपी गेली होती ..आज मृणालने पार्टीसाठी बरीच मेहनत केली होती शिवाय अजिंक्यच्या गमतीमुळे ती नाराज देखील झाली होती तेव्हा तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो बाहेर पडला आणि काकूं झोपली असल्याची खात्री करून त्यांच्या रूमचे दार लावत तोही झोपी गेला...

दुसऱ्या दिवशी अजिंक्य सकाळी - सकाळीच चहाचा कप घेऊन काकूंकडे पोहोचला ..काकू उठल्या उठलीच काही फाइल्स चेक करत होत्या ..अजिंक्यला पाहताच तिने हातातील काम बाजूला ठेवले आणि त्याच्याशी बोलू लागली , " अजिंक्य काल खुप दिवसांनी इतकी निवांत झोपले ..खर तर भरपूर बोलायच होत तुझ्याशी पण झोपले अशी की ते शक्य झालंच नाही ..मागील काही दिवस फारच एकट - एकट वाटत होतं पण तू आलास आणि पुन्हा एकदा जीवन सुंदर झालं ..धन्यवाद बेटा .." काकू अजिंक्यच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलत होत्या तर तो शांतपणे एकत होता ..काकू बऱ्याच वेळ बोलून थांबल्या ..अजिंक्य मात्र काकूंशी बोलण्याची हिम्मत करू शकत नव्हता ..आणि हे ओळखून त्याच म्हणाल्या , " काय रे काय झालं ? " अजिंक्य तिच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाला , " हे काही दिवस मीही मनापासून जगलो पण काकू आता वेळ झाली आहे सो निघायला हवं ..बॉसने उद्यापासून जॉइन व्हायला सांगितलं आहे सो आम्हाला निघायला हवं .." हे ऐकून काकूंचा चेहरा ताडकन पडला ..ती त्याच अवस्थेत म्हणाली , " मी विसरलेच होते की तू फक्त काही दिवसांसाठी आला आहेस ..ठीक आहे जा पण काही वेळ तर थांब ..दुपारला निघ .." आणि अजिंक्य म्हणाला , " काकू घरी जाऊन थोडं काम आहे सो निघावं लागेल ..आता येत राहील ग तुझ्या भेटीला अशी खचून जाऊ नको .." यांच्यात बोलणं सुरू होतच की मृणाल आत येत म्हणाली , " झाल्या का तुमच्या माझ्याबद्दल चुगल्या करून ..तुम्ही फक्त संधीची वाटच पाहत असता .." अस म्हणत तीही काकूंच्या पायाजवळ जाऊन बसली ..काकू तिच्या केसांवरून हात फिरवत होती तर मृणाल म्हणाली , " आई कळतात ग तुझ्या भावना ..पण आम्हाला निघावं लागेल ..काहीच दिवस दुरावा आहे मग तुझ्यासोबतच मिळून तुझा हा संसार चालवायचा आहे ..एकदाच जातोय मग काय तिकडली सर्व काम आवरून पुन्हा येतोय..नेहमीसाठी .. फक्त तुझे आशीर्वाद सोबत असू दे .." काकूंचे आशीर्वाद घेऊन दोघेही आपले कपडे पॅकिंग करायला पुन्हा आपल्या रूममध्ये परतले ..

साधारणतः सकाळचे अकरा वाजले होते ..मृणाल - अजिंक्य दोघेही आपल्या बॅग्स घेऊन हॉलला पोहोचले ..ऐरपोर्टवर जाण्यासाठी अजिंक्यने टॅक्सी बोलावली होती ..आश्रमात काम करणाऱ्या सर्व लोकांची गर्दी तिथे जमली होती आणि त्याच वेळी काकूंही तिथे आल्या ..तिचे डोळे पाण्याने भरले होते तेव्हाच मृणालने प्रज्ञाला तिच्या हातात दिले ..काकूंही आपल्या नातीचे चुंबन घेऊ लागली आणि प्रज्ञा तिच्याकडे पाहून हसू लागली ..काकूंच्या डोळ्यातले अश्रू नाहीसे झाले पाहून मृणाल - अजिंक्य दोघेही तिला मिठी मारून दाराबाहेर निघाले ..अजिंक्यने आपलं सर्व सामान टॉक्सिमध्ये ठेवलं आणि तोही जाऊन बसला ..गाडी क्षणात सुरू होऊन समोर जाऊ लागली पण काकू आताही गेटवरच उभी होती ..बाय बाय करणारा तिचा हात खाली झाला होता पण डोळ्यातून अश्रू आताही नाहीसे झाले नव्हते ..काय होत ना त्यांचं नात ..आजकाल रक्ताच्या नात्यात भांडण असताना मनातून जुळून आलेल्या नात्यांसाठी सर्व अश्रू गाळत होते .नात्यात काळजी , विश्वास असला की कुठलंही नात बहरून येत पण ते नसले की जवळचे नातेही फार दूर होत जातात ..काहीच क्षणात गाडी दिसेनाशी झाली पण काकू आताही तिथेच उभ्या होत्या ..पुन्हा एकदा आपल्या लेकाची वाट पाहत ..

गाडी रस्त्यावर पुन्हा जोराने धावू लागली पण गाडीच्या आतही तितकीच शांतता होती ..काकूंच्या प्रेमाने त्या दोघानाही लळा लावला होता त्यामुळे त्यांच्यापासून दूर होताना तेदेखील ते भावनिक झाले होते ..प्रज्ञा अजिंक्यच्या हातात मस्त्या करत बसली होती आणि मृणाल गाडीच्या काचेतून बाहेर पाहू लागली ..तिला मागील पंधरा वर्षात काढलेले दिवस आठवू लागले ..हा तोच रस्ता होता जिथे तिने आपला सुरुवातीचा काळ घालविला होता ..तर घर खायला उठल की एकटीच पायवाट करायला बाहेर निघायची आणि क्षणात कितीतरी अंतर चालून जायची ..ती विचारात हरवली होती की तिला काहीतरी आठवण आली आणि ती थोड्या जोराने म्हणाली , " ड्रायवर प्लिज गाडी थांबवा ना !! " तिच्या अशा या अचानक वागण्याने अजिंक्य भानावर येत म्हणाला , " काय ग काय झालं ? " आणि मृणाल म्हणाली , " काही नाही रे खाली हो ..आपल्याला कुठेतरी जायचं आहे .." अजिंक्य समोर काही बोलणारच तेवढ्यात मृणाल खाली उतरली ..नाईलाजाने अजिंक्यही खाली उतरत तिच्या मागे जाऊ लागला .मृणाल समोर जाऊ लागली होती तर अजिंक्य तिच्या मागे जाऊ लागला ..अजिंक्य समोर समोर जाऊ लागला आणि त्याच्या लक्षात आलं की समोर वळणावर मृणालच घर आहे ..अजिंक्य हळूहळू करत तिच्या फ्लॅटसमोर पोहोचला तर मृणाल लगबगीने तिथे पोहोचली ..तिने खिडकीत हात टाकला आणि फ्लॅटची चावी तिच्या हाती लागली ..दार उघडत ती आत पोहोचली ..घर आजही तसच होत फक्त कुठेतरी जाळ्यानी घराच्या कोपर्यामध्ये आपला कब्जा निर्माण केला होता तर सर्व सामानावर धुळीच साम्राज्य पसरल होत ..त्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करीत ती आपल्या बेडरूमला पोहोचली ..समोर बेडच्या अगदी वर तिचा गुलाबी साडीतला फोटो लटकवून होता ..तर त्या फोटोकडे बघून ती पाहतच बसली ..अजिंक्यचा पहिला स्पर्श त्या साडीतच झाला असल्याने तो तिच्यासाठी खूप खास होता ..ती त्या फोटोत हरवली असताना मागून अजिंक्य म्हणाला , " राणीसरकार हा माझा इतका जुना फोटो तुमच्या ड्रॉवरमध्ये काय करतो आहे आणि याबद्दल मला कळाल कस नाही ..? " ती तोंडावर हात ठेवत तशीच हसू लागली .आणि अजिंक्य म्हणाला , " सांगा हो !! " ..ती त्याच्यापासून नजर चोरत एक - एक पाऊल मागे टाकू लागली ..अजिंक्यही प्रज्ञाला बाजूला बसवून तिच्याकडे पाऊल टाकू लागला ..ती तशीच मागे धावू लागली आणि अजिंक्य तिच्या मागे धावत असताना कुठेतरी अडकून सरळ तिच्या अंगावर पडला आणि ते दोघेही क्षणात बेडवर पडले ..मृणाल खाली तर अजिंक्य तिच्या शरीरावर..तिच्या केसांना हळुवार बाजूला करत तो म्हणाला , " आता सांगणार आहेस का ? " आणि ती लाजत म्हणाली , " अरे मुलगी बघतेय आपली ..तिला काय वाटेल ? " आणि अजिंक्य थट्टेच्या स्वरात म्हणाला , " वडील खूप जास्त रोमँटिक आहेत अस म्हणतील आणि तिलाही भाऊ हवाच आहे न एक ? " , मृणाल आपल्या चेहऱ्यावर हात घेत म्हणाली , " ईशश ..!! काहीही असत हा तुझं ..मला माहित आहे तू सांगितल्याशिवाय सोडणार नाहीस मग एक ..तुझ्या प्रेमात होते तेव्हा हा फोटो लपूनच तुझ्या रूम मधून चोरला होता ..तुझ्या लक्षात येऊ नये म्हणून त्याला बंदिस्त करून ठेवल आणि मग एक वेळ अशी आली की तू माझा झालास फक्त ह्या फोटोला बाहेर काढण्यासाठी मी परत इकडे येऊ शकले नाही .." आणि अजिंक्य रोमँटिक होत म्हणाला , " अस आहे तर !!..तुही तर फार रोमँटिक आहेस आणि मला कळू पण दिलं नाही ..तीच लक्ष त्याच्याकडे असतानाच त्याने पटकन तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि दूर झाला .." ती लाजेने पाणी झाली होती तर प्रज्ञा त्यांच्याकडे बघून टाळ्या वाजवत होती ..ती त्याला मारणार तर तो प्रज्ञाला समोर करायचा आणि इच्छा असतानाही ती त्याला काहीच करू शकली नाही ..काही क्षण तिथेच थांबून पुन्हा घराकडे एक भावनिक नजर टाकत ते पुन्हा बाहेर आले ..मागील 15 वर्षाच्या आठवणी ती एकाच क्षणात घेऊन पून्हा एकदा प्रवासाला निघाली ..जिथे परत येण्याची कुठेच शाश्वती नव्हती ..काहीच क्षणात एअरपोर्ट आणि ऐरपोर्टवरून घराकडे त्यांनी धाव घेतली ..सोबत होत्या त्या काही सुंदर आठवणी ..मुंबईची भीतीही नाहीशी झाली होती आणि पुन्हा याच शहराने तिला काहीतरी सुंदर क्षण दिले आणि दिल्या काही जुन्या आठवणी ..ज्या तिला कधीही विसरता येणार नव्हत्या ..मृणाल आज अजिंक्यच्या कुशीत फार खुश होती पण वाऱ्यानी दिशा बदलायला सुरुवात केली होती ..त्यांच्या विश्वात जरी सर्व काही शांत असलं तरी एक वादळ येणार होत जे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणार होत ज्याची त्यांना कल्पना नव्हती ..अस वादळ ज्याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती ...


क्रमशः ......