Addiction - 2 - 13 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 13

अजिंक्य सकाळी - सकाळी बाहेर फिरायला निघाला होता ..मृणालनेही बाहेर जाण्यासाठी हट्ट केला होता पण तिची तब्येत पूर्णपणे बरी झाली नसल्याने अजिंक्यने तीच काहीच एकल नाही आणि एकटाच फ़िरायला बाहेर निघाला ....फिरायला गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी तो मित्रांशी भेटला होता त्यामुळे कितीतरी वेळ तो तिथेच मित्रांशी बोलत बसला.. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ कसा निघून गेला त्यालाच कळले नाही ..अजिंक्य घरी परतला तेव्हा सूर्य बऱ्यापैकी वर आला होता ..घरी येताच तो सोफ्यावर निवांत बसत टिव्ही पाहू लागला ..तर मृणाल त्याच्या हातात चहा देत म्हणाली , " काय साहेब आज ऑफिसला जायचं नाही का ? " आणि अजिंक्य तिच्या हातातला कप घेत म्हणाला , " आज ऑफिसला जायची इच्छा नाही .." आणि मृणाल त्याच्याकडे पाहत म्हणाली , " मग कसली इच्छा आहे साहेबांची ? " ..आता अजिंक्य इकडे - तिकडे बघू लागला .आजूबाजूला कुणीच दिसत नव्हते आणि अजिंक्य तिचा हात हातात घेत म्हणाला , " बायकोच्या कुशीत झोपायचा मूड आहे .." मृणाल त्याचा हात झटकत म्हणाली , " चल हट काहीही असत तुझं ..आधी चहा घे नाही तर गार होईल .." ..तो तिच्या अशा लाजण्याकडे बघतच होता आणि मृणाल किचनमध्ये परतली तर अजिंक्य टीव्ही पाहण्यात व्यस्त झाला ...हेद्राबादवरून परत आल्यामुळे त्याला नौकरी सोडावी लागली अस मृणालला माहिती झालं असत तर तिने ते सर्व स्वतःवर ओढून घेतलं असत म्हणून त्याने तिला काहीच सांगितलं नाही ..याउलट त्याला जमेल तेवढं शांत नॉर्मल राहू लागला ..अगदी घाईत- घाई करणारा अजिंक्य आज अगदी निवांत वावरतोय हे बघून मृणालला आश्चर्य वाटत होतं तरीही ती काहीच म्हणाली नव्हती ..अजिंक्य दुपारचं जेवण करून कुठेतरी बाहेर निघाला होता ..मृणाल हळूहळू घरातल आवरत बसली ..त्याच वेळी मृणालचा मोबाइल रिंग करत असल्याचा आवाज तिला आला आणि ती लगेच बेडरूमला पोहोचली ..मोबाइलवर रियाचा नंबर फ्लॅश करत होता आणि तिने फोन रिसिव्ह केला ..तर रिया समोरून बोलू लागली , " हाय मृणाल . अजिंक्यचा सेल बंद असल्याने तुला कॉल करावा लागला ..मी खूप वेळ लावला त्याला कॉल पण काहीच फायदा नाही ..बाय द वे आहे कुठे तो ? " आणि मृणाल शांत होत म्हणाली , " अग तो मोबाइल इथेच ठेवून बाहेर गेला आहे ..म्हणून असेल कदाचित .." रिया अजिंक्यच्या राजीनाम्याबद्दल सर्व सांगणार होती तेव्हाच तिच्या लक्षात आलं की अजिंक्यने तिला याबद्दल काहीच सांगितलं नाही त्यामुळे स्वताला आवरत ती म्हणाली , " ओ आय सी ..ठीक आहे परत आला की कॉल करायला सांग .." काही वेळ गप्पा मारत तिनेही फोन ठेवून दिला .मृणालची तब्येत पूर्णपणे बरी नसल्याने तिने हळूहळू आपले काम पूर्ण केले ..प्रज्ञा आजीसोबत खरेदी करायला गेली असल्याने मृणालला तिची काळजी नव्हती ..दुपारचं काम आटोपून ती शांत झोपी गेली ..

सायंकाळी मृणाल उठली तेव्हा अजिंक्य किचनमध्ये चहा बनवीत होता ..ती त्याला स्माईल देत वॉशरूममध्ये पोहोचली आणि फ्रेश होत पुन्हा हॉलला पोहोचली ..तर अजिंक्य तिच्यासाठी चहा घेऊन आला ..मृणाल त्याच्या हातून चहा घेत म्हणाली , " धन्यवाद नवरोबा .." तर अजिंक्य तिच्या कपाळावर हात लावू लागला ..तीच शरीर थंड असल्याने तो निवांत होऊन स्वतःचा चहा घेऊ लागला ...मृणालचा चहा घेऊन झाला आणि ती अजिंक्यच्या जवळ जात म्हणाली , " कधीकधी तुझी माझ्याप्रति असलेली काळजी बघून ईर्षा वाटते ..किती प्रेम करतोस रे माझ्यावर !! ए पण अजिंक्य ते काहीही असलं तरी माझंच तुझ्यावर जास्त प्रेम आहे .." आणि अजिंक्य तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला , " बर बाई तुझंच खूप जास्त प्रेम आहे माझ्यावर .." ती हे ऐकून फारच खुश झाली होती ..ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवणार तेवढयात आई बाहेरून येताना दिसल्या आणि मृणाल त्याच्या दूर झाली ..आई सोफ्यावर येऊन बसली आणि मृणाल आईसाठी पाणी घेऊन आली ..आईने सर्वांसाठी शॉपिंग केली होती ..आईने आणलेल्या साडीला पाहून ती फारच खुश झाली होती ..तर अजिंक्य रियाचा कॉल येत असल्याने थोडा नाराज झाला ...पण त्याने कॉल रिसिव्ह केला नाही ..तो मोबाइल घेऊन पुन्हा बाहेर पडला तर मृणाल स्वयंपाक करण्यात व्यस्त झाली ...काहीच वेळात मृणालचा स्वयंपाक बनवून झाला ..अजिंक्य बाहेरून येताच सर्वं जेवायला बसले .काहीच क्षणात त्यांचं जेवणही आटोपलं ..मृणाल किचनमधील सर्व काम आटोपून बेडरूमला पोहोचली ..

अजिंक्य त्यावेळी मोबाइल बघत बसला होता ..मृणाल त्याच्या कुशीत जात म्हणाली , " अजिंक्य मी तुला सांगायचं विसरले ..रियाचा दुपारी फोन आला होता ..ती सांगत होती तुझा मोबाइल बंद होता पण तू तर अस करत नाहीस ना ? असो पण तिने तुला कॉल करायला सांगितला आहे सो तिला आठवणीने कॉल कर .." अजिंक्य आपल्या हातातील मोबाइल बाजूला ठेवत म्हणाला , " सोड ग तिला काम नसतात काहीच ..तिने टाईमपास करण्यासाठी कॉल असेल ..आणि आता वाजले बघ किती सो उद्या कॉल करेन .." अजिंक्यने कशीतरी वेळ मारून नेली ..मृणालला त्याच बोल पटलं नसलं तरीही ती त्याला काहीच म्हणाली नव्हती . ती काही विचार करणार तेवढ्यात अजिंक्यच म्हणाला , " बर ते सोड ..मी तुला काही दिवसापासून पाहतोय की तू कुठेतरी हरवली असतेस ..काही टेंशन आहे का ? ..असेल तर तस सांग ..मिळून सर्व सोडवू .." अजिंक्यचे शब्द एकूण मृणालच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव जाणवू लागले तरीही अजिंक्यला काहीच कळू नये म्हणून ती म्हणाली , " टेंशन नाही पण थोडी भीती होती .काही दिवसात सर्व ठीक होईल विश्वास ठेव माझ्यावर .." आणि अजिंक्य उत्तरला , " मॅडम विश्वास तुझ्यावर आहेच ..आशा आहे माझ्या मनाला जे वाटतंय तस काहीच नसेल आणि असलं तरीही तू नक्कीच सांगशील .."
आज बऱ्याच दिवसांनी दोघांत संवाद झाला होता ..मृणालने खरी गोष्ट लपवली असली तरीही त्याच्यासोबत मनमोकळं बोलण्याने तीच थोडं टेंशन कमी झालं होतं ...

दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण अगदी तशीच झाली ..मृणालने अजिंक्यला ऑफिस न जाण्याच कारण विचारलं आणि त्याने वेळ मारून नेली ..साधारणता दुपारची वेळ असेल ..दारावर बेल वाजली आणि मृणाल दार खोलायला बाहेर आली ..अजिंक्य बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसला होता ..मृणालने दार उघडलं तेव्हा समोर रिया आणि अजिंक्यचे सर होते ..तिने त्या दोघानाही आत घेतलं आणि दोघानाही हॉलमध्ये बसवून अजिंक्यला बोलवायला गेली ..सरांच्या अशा अचानक येण्याने अजिंक्य गोंधळून गेला आणि पुस्तक बाजूला ठेवत तो बाहेर आला ..मृणाल त्या दोघानाही चहाच बघायला गेली ..काही क्षण रूममध्ये शांतता पसरली ..सर आणि अजिंक्य दोघेही शांत आहेत हे पाहून रियानेच बोलायला सुरुवात केली ...रिया तिथे एकटीच होती जी वातावरण सावरत होती आणि अजिंक्य व सर एकमेकांकडे पाहत होते ..काहीच क्षणात मृणाल चहा घेऊन हॉलला पोहोचली ..ती चहा देऊन परत जाणार तेवढयात रियाने तिला तिथेच बसायला सांगितले ..दोघाणीही चहा घेतला आणि अजिंक्यचे सर म्हणाले , " मृणाल मला नाही माहीत अजिंक्य तुला काही बोलला की नाही तर पण मला तुला आता सांगावं लागेलच ..पहिल्यांदा तर सॉरी ..तुझी तब्येत बरी असताना अजिंक्य ऑफिसच काम सोडून परत इकडे आला ..त्यादिवशी मी त्याला खूप कॉल केले पण त्याने एकही कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून खूप रागावलो शिवाय हातून प्रोजेक्ट जाण्याची भीती वाटत होती म्हणून नकळत रागात बरंच काही बोललो ..त्याला खडे बोल सूनवताना हे विसरूनच गेलो की तो आपलं काम अपूर्ण सोडत नाही ..तस हे माझ्यासाठी नवीन नाही ..अजिंक्यच्या जागी दुसरा असता तर शिव्या खाऊन शांत बसला असता पण त्याने लगेच नौकरीचा राजीनामा दिला ..मीही त्यावेळी रागात होतो म्हणून त्याला थांबवलं नाही पण तो गेल्यानंतर लगेच आम्हाला प्रोजेक्ट मिळालं असल्याची बातमी मिळाली आणि मी काय केलं त्याची जाणीव झाली ..मागील दोन दिवस त्याचा फोन ट्राय करतोय पण काहीच शक्य नाही म्हणून इथे यावं लागलं ..वन्स अगेन सॉरी .." मृणाल अजिंक्यकडे पाहू लागली ..कुणाला काय बोलाव तेच कळत नव्हतं ..मृणालला अजिंक्यबद्दल एकूण वाईट वाटत होतं आणि पुन्हा एकदा सर म्हणाले , " हो अजिंक्य तू म्हणतोस ते खरं आहे ..पैसे , ध्येय हे कमवत असताना लोक कमावनही तेवढच महत्त्वाचं आहे ..जर तेच लोक आपल्या आयुष्यात नसतील तर ते सर्व कुणासाठी कमवायच ? .
तू गेल्यावर तुझ्या बोलण्याचा विचार केला आणि घरी जाताना बायकोसाठी एक गुलाबाचं फुल घेऊन गेलं ..कधी नव्हे जवळ न येणारी ती स्वतःहूनच जवळ आली आणि तिला फक्त पैशाने समाधान मिळत हा विचार साफ चुकीचा ठरला .तिच्यासाठी पैसा सर्व काही नसतंच ..तिला आपला वेळ हवा असतो आणि आपण तेच द्यायचं विसरतो ..त्यारात्री फक्त आम्ही दोघेच बऱ्याच वेळ एकत्र होतो.तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या निरागस हास्याने मला सांगितलं की मीही इतर पुरुषांप्रमाणे चुकतोय...जर बायको नवऱ्याला थोडासा त्रास होतो तेव्हा रात्रभर जागते तर मग बायकोला त्रास झाल्यावर नवऱ्याने तिची साथ देणं यापेक्षा मोठं धन काहीच असणार नाही ..तुझं हेद्राबाद सोडून लगेच परत येन कधीच चुकीच नव्हतं उलट ती तुझी जबाबदारी होती हे जाणवतंय मला म्हणून स्वतः इथे आलोय तुझी माफी मागण्यासाठी ....माझ्या सर्वात जवळच्या मित्राला , कलीगला मला अस गमवायच नाही ..सॉरी अजिंक्य प्लिज परत ये एकदा ..प्लिज परत ये .."

सर सर्व एकाच दमात बोलून गेले होते आणि विशेष म्हणजे कधी नव्हे ते आज भावूक झाले होते ..त्याच वेळी मृणाल हसत म्हणाली , " मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल की मला अजिंक्यची साथ मिळाली ..आज त्याच्याकडे बघून खरा पुरुष आणि पुरुषार्थ काय असतो ते कळाल ..सॉरी नका म्हणू सर उलट धन्यवाद की तुम्ही इथे आलात यासाठी .." तीच बोलणं पूर्ण झालं नाही तेव्हाच अजिंक्य म्हणाला , " प्लिज सॉरी नका म्हणू सर ...मी नेहमीच ऐकत आलो होतो की पुरुष डोक्याने विचार करतो त्यातही बीजनेसमॅन तर खुपच जास्त .त्याला कुठेही फायदाच दिसतो पण आज तुम्हाला जबाबदारी या शब्दाचा अर्थ कळला हे ऐकून बर वाटल ..आणि सर मी तुमच्यावर रागावलो नव्हतो फक्त सेल्फ रिस्पेक्ट मधात आली आणि मी नौकरी सोडली काय करणार टिपिकल मिडल कलास पुरुष आहे तेव्हा हे सहन झालं नाही आणि माझ्यासाठी तुम्ही घरी आलात तेच खूप आहे ..मला माझी किती किंमत आहे हे कळाल सो मी येईल सर उद्यापासून ऑफिसला .."

अजिंक्यच उत्तर एकूण तिथला प्रत्येक व्यक्ती खुश झाला ..सर पहिल्यांदाच घरी आल्याने मृणालने त्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ दिल नाही ..सरही मृणालच्या जेवणाची बरीच स्तुती करीत होते .सर्विकडे हसू गमतीच वातावरण होत आणि थोड्यावेळापूर्वीच निराशेच वातावरण कुठेतरी दूर पडाल ..सरही समाधान घेऊन ऑफिसला परत गेले होते ..

पुन्हा एक रात्र ..आणि मृणाल अजिंक्यच्या खांद्यावर हात मारत म्हणाली , " अजिंक्य तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली ..मला न तुझा खूप राग आलाय ..का केलंस अस ? " आणि अजिंक्य स्वताला वाचवत म्हणाला , " झाशीची राणी आधी मारण थांबवाल तेव्हा सांगेल न सर्व..तुम्ही आधीच माझ्यामुळे रागावलात आणि तब्येत खराब केली तेव्हा हे सांगितलं असत तर ते तू सर्व स्वतःवर घेतलं असत आणि पुन्हा तब्येत खराब झाली असती आणि मला नको होतं ते आणि तुला काही झालं तर ..? " मृणालने त्याला मारण थांबविल आणि म्हणाली , " पण काही असो याच बहाण्याने मला कळाल की माझा नवरा फक्त घरात ग्रेट नाही तर बाहेरही तसाच आहे ..मी तर पुन्हा प्रेमात पडते आहे तुझ्या ..आणि ना ! मला एक गोष्ट कळली ..जीवन जगत असताना स्त्री पुरुष दोघेऊ आपला संसार सुरळीत चालावा म्हणून सतत प्रयत्न करीत असतात फक्त ते एकमेकाना त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करीत नाही ..लग्नाआधी शोण्या , पिल्लू म्हणणारे ते दोघे लग्नानंतर साधं आय लव्ह यु सुद्धा म्हणत नाही आणि दोघांत दुरावा वाढत जातो ..जर दोघाणीही एकमेकांना समजून घेतलं आणि काळजीचे दोन शब्द बोलले तर जास्तीत जास्त प्रश्न सुटू शकतात ..आणि डोक्यावर ओझं वाटणारा तो संसार आनंदाने फुलू लागतो ..बरोबर ना नवरोबा ? आय लव्ह यु अजिंक्य ." आणि अजिंक्य तिला जवळ करत म्हणाला , " बरोबर राणीसरकार ..लव्ह यू सो मच ..आणि बर का दररोज नवर्याला तिखट शब्द सूनवणारी बायको जर हे तीन शब्द रोज बोलू लागली तर नवरा दूरच जाणार नाही .." आणि ती मधातच म्हणाली , " हो का ? " आणि अजिंक्य तिच्या डोक्यावर मारत म्हणला , " काय हो का ? मी तुला म्हणालो ..किती छडतेस तू नवऱ्याला ? "

अजिंक्य तिची खिचाई करताना पाहून ती पुन्हा त्याला मारू लागली ..मारता - मारता दोघेही आपल्या बोलण्यावर हसू लागले ..ते हलके फुलके वाद , हसू आपोआप प्रेमात परिवर्तित झालं ..दोघेही एकमेकांकडे आकर्षिल्या गेले ..डोळ्यात डोळे हरवले आणि ओठांनीही साथ द्यायला सुरुवात केली ..शरीराचा प्रत्येक भाग एकमेकांसाठी आतुर झाला आणि ते क्षणात एकरूप झाले ..आज कितीतरी दिवसानी ते शरीरानं एकत्र झाले ..त्या शरीर संबंधात बंधन नव्हतं की नव्हती बळजबरी ..होत ते प्रेम आणि एकमकेकांप्रति समर्पण...


क्रमशः ...