Addiction - 2 - 18 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 18

अखेर ती सकाळ उगवली ..पियुषला इतका आनंद झाला होता की त्याला काय करावं तेच कळत नव्हतं ..त्याने समीरला फोन लावण्यासाठी मोबाइल हातात धरला पण फोन न करता तसाच ठेवून दिला ..टेबलवर बाईकची चावी त्याला दिसली आणि चावी घेऊन तो सरळ समीरकडे निघाला ..काही क्षणातच तो समीरच्या फ्लॅटवर पोहोचला आणि डोरबेल वाजवू लागला ..समीरला नशा जास्त झाली असल्याने तो बहुतेक आताही झोपूनच होता ..पियुषणे कितीतरी वेळ बेल वाजविल्यावर समीर बाहेर आला ..पियुषला सकाळी - सकाळी त्याच्याकडे बघून तो थोडा हैराण झाला ..तो काही बोलणार तेव्हड्यातच पियुष आत मध्ये येऊन सोफ्यावर बसला ..समीर आताच उठला असल्याने सरळ फ्रेश व्हायला निघाला ..आणि काही क्षणातच कॉफी घेऊन पियुषकडे परतला .." पियुष आज सवेरे - सवेरे इधर कैसे ? " , समीर म्हणाला आणि त्यावर पियुष म्हणाला , " तेरे सवाल का जवाब लेकर आया हु बस तेरी मर्जी जानना चाहता हु .." रात्रीची नशा आताही उतरली नसल्याने समीर डोक्यावर हात ठेवत म्हणाला , " कैसा सवाल ? " , आणि पियुष चिडत म्हणाला , " साले तुझे पिणे के बाद कुछ याद नही रहता ..कल तो बहोत बाते बना रहा था ..आज क्या हुआ तुझे ..मैने तुझे कल दो बाते बतायी थी ..एक तो उसे अपना बनाकर हर रात मजे कर या फिर उसकी जिंदगी बरबाद कर दे ..जीस से की की वो जिंदा तो रहे पर लाश बनकर ..के नशा उतरणे के बाद बदला भूल गया सब कुछ ...."

समीरला त्याच बोलणं खुप खटकलं ..आणि तो रागाने म्हणाला , " नही भुला कुछ पर क्या करू वही समझ मे नही आ रहा है ..अजिंक्य मेरा भाई है ..वो हमेशा से मेरे साथ रहा है ..अजिंक्यने मेरी बहोत मदद की है और वो मुझसे प्यार भी बहोत करता है इसलीये मृणाल को उठाकर मै यहा नही ला सकता और समझ लो मैने ऐसा कर भी दिया तो इससे मेरे हर अजिज लोक मुझसे दूर हो जायेंगे और हर किसीं केस साथ मेरे संबंध खतम हो जायेंगे और ऐसा मै हरगीज नही चाहता ..हा पर उसकी जिंदगी जहाँनुम जरूर बनाना चाहता हु ..ऐसी जिंदगी जीससे की उसकी रुह भी काप उठे .और किसीं समीर को हात लगाना तो छोड दे पर वो उसकी और नजर करणे से भी डर जाये ..पर पियुष कैसे ?..मुझे तो कुछ सुझ नही रहा ..शायद मै पागल हो जाउंगा .. " त्याच्या बोलण्यावर पियुष हसत म्हणाला , " बस यही जवाब साथ लेकर आया हु ..समीर मैने तुझे कभी बताया नही पर मुझे लगता है आज बताना जरुरी बनता है .आज मै जैसा हु पहले वैसे बिलकुल ना था ...मै कॉलेज लाइफमे था ..शौक बडे थे और पैसे की बडी किल्लत थी ..घर वाले भी पैसे नही देते थे ..तब हमारे कुछ दोसतो ने मिलकर एक काम शूरु किया ड्रग्स बेचने का काम ..उसमे बडी कमाई होणे लगी .दोस्त बडते गये और बिजनेस भी बढता गया ..हमारे दोनो हाथ सोने से भरे हुये थे ..स्टुडन्ट होणे के कारण कोई शक भी नही करता था ..ऐसें ही एक दिन एक दोस्त मिला ..उसने कहा के मै तुम्हे बहोत जादा पैसे दे सकता हु अगर तुम सेक्स क्लिप मुझे दे सको ..मैने भी बहोत सोचा ..अपणे दोसतो से ये बात शेअर की ..उन्हे भी ये बात सही लगी और हम एक से एक लोग जोडते गये ..इस धंदे मे पैसे भी बडे मिलते थे इसलीये हम जी जाण लगाकर काम करणे लगे ..हमने हमारे कस्टमरो से पैसे देणे की बात की और वो भी राजी हो गये..और ऐसें ही कस्टमर खुद्द हमे सेक्स क्लिप लाकर देणे लगे ....उसी दौरान एक लडके से बात हुयी ..उसने सामने से आकर हमे सेक्स क्लिप देणे की बात की और हम राजी हो गये ..वो हर महिने एक लडकी को ड्रग्स खिलाकर उसके विडिओ बनाकर भेजने लगा और मै उसे बेचने लग गया ..वो लडकी कोई और नही तेरे भाई की बिवी थी ..कल उसको देखा तो मुझे कुछ अजीब सा लगा और मैने घर जाकर वो विडिओ देखे तो सच मे जाना की वो मृणाल ही थी .." समीर पियुषच्या हातातून मोबाइल घेऊन ते विडिओज पाहू लागला ..त्यात खरच मृणाल होती शिवाय विडिओ कॅमेराने शूट केल्याने विडिओ क्वालिटी पण छान होती त्याने तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता ..त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि पियुषकडे असलेले सर्व विडिओ तो पाहू लागला ..प्रत्येक विडिओमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता ..आणि त्याच वेळी पियुष म्हणाला , " साले तू समझ रहा है नि की तेरी भाभी कोण है ? और घर मे किसीं को भी ये बात पता नही ..अगर ये बात सब को पता चल गयी तो ? " , आणि समीरच्या तोंडून शब्द निघाले , " तो उसकी जिंदगी जहाँनुम बन जायेगी .." आता दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागले ..आणि समीर उत्सुकतेने म्हणाला , " चल अभि ये विडिओ घर वालो को दिखाकर उसकी अकड ठिकाणे लगाते है .." आणि पियुष पुन्हा त्याच्यावर हसत म्हणाला , " साले तू भोंदूही रहेगा ..इस विडिओ को सोसिअल साइट्सपे लिक कर दे फिर देख उसका घरसे बाहर निकलना ही बंद हो जायेगा..फिर घरवालो को क्या किसीं को अपना चेहरा नही दिखा सकती और बता इससे तेरे दिलं को थंडक मिल जायेगी .." समीरच्या चेहऱ्यावर आता तरतरी आली होती ..समीरला विडिओ आताच लिक करायचे होते पण पियुषणे त्याला अडचण असल्याचं सांगत काही दिवसांपुरता नकार दिला ..पियुष समीरला हग करून घराकडे परतला तर समीरचा चेहरा खुशीने बहरला होता ..मृणालला तशा अवस्थेत बघून त्याला फार आनंद होणार होता ..पण तो क्षण अनुभवायला त्याला वेळ असल्याने तो ऑफिसला निघाला ..

जवळपास 3 महिने झाले होते ...समीरच्या स्वप्नात फक्त मृणाल असायची परंतु बरबाद झालेली ..तीच सत्य माहिती झाल्यावर अजिंक्य तिला सोडून देईल आणि ती नाक घासत माझ्याकडे येईल मग मी तिला हवं तसं वापरेन हा विचार त्याच्या मनात येऊ लागला आणि तो दिवसेंदिवस खुश राहू लागला ..इकडे मृणालच आयुष्य पटरीवर आलं होतं ..आपल्या कुटुंबासोबत काही सुंदर क्षण जगत ती होती ..समीर गेल्याने ती बेफिकर झाली होती पण दूर कुठेतरी तिच्याबाबतीत काहीतरी रचल जातंय याबद्दल तिला कुठलीच चाहूल नव्हती ..सर्व काही ठीक चाललं होतं ..या सात वर्षात मृणालने कुटुंबात आपलं स्वताच स्थान निर्माण केलं होतं ..ती नसली की घर उदास वाटायचं एवढंच काय तर घराशेजारील मैत्रिणी तिच्याशी गप्पा मारायला तिच्या घरी येऊन बसायच्या .गावातही तिच्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी बोलल्या जायच्या ...तिला सर्व काही सुरळीत आहे असच वाटत होतं पण समीर नावाचं वादळ मात्र शमल नव्हतं .. बदला घेण्यासाठी तीन महिने त्याला जास्त वाटू लागले होते तरीही पियुषच्या म्हणण्यावरून त्याने वाट पाहायला कुठलीच हरकत घेतली नव्हती ..या सर्व काळात समीरचा प्रत्येक प्लॅन काम करीत होता ..समीरने गावात विडिओ फैलवता यावा म्हणून मित्रांचा एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवला ..कुणालाही शंका येऊ नये म्हणून तो रोज त्यावर बोलत होता ..मित्रही त्याचे मॅसेज बघून फार खुश राहू लागले ..समीरने संधी शोधून पियुषलाही ग्रुपमध्ये घेतले होते ..तोही त्यांच्यात लगेचच मिसळला आणि त्याचा स्वभाव पाहून सर्वच त्याच्यावर खुश झाले .समीर मित्रांना कधीकधी पैशाची गरज लागली तर क्षणात पाठवायचा ..त्याच्यावर कुठलीही शंका येणार नाही याची त्याने काळजी घेतली होती .. अशाप्रकारे त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला ..

आता फक्त वेळ होती ती योग्य खेळी खेळण्याची ..समीर , पियुष दोघेही प्लांनिंग करूनच आज मॅसेज करायला उतरले होते ..गप्पा गावातल्या गोष्टींवरून मुलींकडे वळाल्या ..समीरने आपल्या जवळच्या मित्राला ग्रुपमध्ये विडिओ टाकण्यासाठी पैसे दिले होते ..मुलांचे विषय मुलींच्या अवतीभोवती फिरत होते आणि त्याच वेळी समीरच्या म्हणण्यावरून तो विडिओ टाकण्यात आला ..मुलांनी त्याला चुकीच समजू नये म्हणून काही वेळापूर्वीच तो ऑफलाईन गेला आणि पियुषच्या मोबाइलवरून सर्व चॅट वाचू लागला ..विडिओ ग्रुपमध्ये आल्यापासून काही मिनिटातच सर्वांनी पाहिला आणि सर्वच शॉक होते ..विडिओमधली मृणालच आहे का हे खात्री करून घेण्यासाठी सर्वच एकमेकांना मॅसेज करत होते ..शिवाय पियुषणे विडिओची तारीख आणि वेळ त्यात स्पष्ट दिसेल अशी सोय केली होती ..सर्वांचे डोके बधिर झाले होते ..पण समीरला माहिती झालं तर त्रास होईल म्हणून कुणीच समोरासमोर बोलायला तयार नव्हते आणि सर्वांनी विडिओसहित चॅट देखील डिलीट केल्या ..जरी चॅट डिलीट झाल्या होत्या तरीही समीरला जे हवं होतं त्याने ते साध्य केलं ...आणि मृणालच्या पुढे होणाऱ्या अवस्थेबद्दल हसू लागला ..विडिओ आल्यापासून ते दोघेही फार खुश होते ..त्यांनी दिल्लीतल्या सर्व मित्रांना बोलावून सेलिब्रेशन सुरू केलं आणि आज आनंदाच्या भरात तो बरीच दारू प्यायला होता ..आज त्याचा बदला पूर्ण झाला होता म्हणून तो फार खुश होता ..कधीतरी तिच्यावर प्रेम करणारा तो आता तिला बरबाद करायला निघाला होता ..प्रेमाची जागा बदल्याने घेतली आणि फक्त तिचा नकार आला म्हणून तिला उध्वस्त करायला निघाला होता ..

विडिओ दिसला आणि सर्विकडे एकच चर्चा जन्माला आली ..मृणाल एके काळी वैश्या होती ..मूल दुकानावर चर्चा करू लागले ..मुलांच्या माध्यमातून ही गोष्ट पुरुषांपर्यंत पोहोचली आणि पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत पोहोचली . क्षणात सर्व काही बदललं ..मृणाल वैश्या असल्याची गोष्ट गावभर पसरली ..जिकडे - तिकडे याच चर्चा होऊ लागल्या .लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक घरात , प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात मृणालच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते ..अजिंक्य ओरडल्यामुळे स्वताच नाव खराब झालं होत त्यामुळे जोशी काकूंदेखील मी कशी योग्य होते याची गावभर बतावणी करू लागल्या ..काहींना यावर विश्वासच नव्हता पण सर्वांच्या बोलण्यात त्याही सामील झाल्या .. चर्चेला उधाण आलं असताना मृणालच्या घरातील कुठला व्यक्ती दिसला की मग मात्र सर्व शांत होत ..अजिंक्य फार कुणाशी बोलत नव्हता पण आई कुणाशी बोलायला गेली की सर्व बाया दूर पळून जात ..नेमकी हीच स्थिती मृणालसोबत देखील घडून येत होती ..मृणालच घर सोडून संपूर्ण गावाला हे सत्य माहिती झालं होतं ..गावातले लोक आपल्याकडे बघून अस का वागत आहेत हे त्यांना सुद्धा कळाल नव्हतं ..नक्कीच ही गोष्ट अजून घरच्यांना माहिती झाली नव्हती पण पुढे नक्कीच माहिती होणार होती ..तेव्हा आता मृणालचा खरा प्रवास सुरु झाला होता ...म्हणतात कठीण प्रसंगी नात्यांची ओळख होते ..आणि तो कठीण प्रसंग आता मृणालवर आला होता ..तेव्हा अजिंक्य , त्याच्या घरचे तिला साथ देतात की तीच सत्य एकूण तिला घराबाहेर काढतात हेच पाहायचं होत ..आता नात्यांची परीक्षा सुरू झाली होती ..कुठलं नात या स्थितीत तग धरून राहत हेच पाहायचं होत ..अजिंक्यही तर तिची साथ सोडणार नव्हता ना ?

क्रमशः ...