Addiction - 2 - 21 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 21

मृणालच्या शब्दांनी समीरला मिरची लागली आणि तो पाय काढत घराकडे पसार झाला ..आपण तिच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आणलं तरी तिच्या चेहऱ्यावर भीती नसून ती आणखीच कठोर झाली आहे हे पाहून तो संतापला ..त्याच डोकं पुन्हा एकदा गरगर फिरू लागल..डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले आणि नाईलाजाने पियुषला फोन लावला ...पियुषला फोन लावून त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं ...बराच वेळ झाला तरीही त्यांचं बोलणं सुरूच होत ..पियुष त्याला बरच काही समजावत होता पण तो काहीच एकूण घ्यायला तयार नव्हता ..त्याला तर फक्त मृणालने त्याच्या पायावर पडून नाक घासण हवं होतं ..पियुषणे त्याला दोन गोष्टी सांगितल्या होत्या आणि ते दोन्ही पर्याय एकूण तो आणखीच खुश झाला ..

दिवस जाऊ लागला आणि त्याला संध्याकाळ होण्याची आतुरता झाली ..त्याच महत्त्वाचं शस्त्र म्हणजे अजिंक्यची आई होती ..अजिंक्यची आई एकमेवच होती जीचे शब्द मृणालला फार यातना द्यायचे आणि ती उलट प्रश्न सुद्धा करू शकत नव्हती ..याच गोष्टीचा त्याने फायदा घ्यायचे ठरविले ..अजिंक्यची आई घरी आली आणि समीर जाणूनच चेहरा पाडून बसण्याच नाटक करू लागला ..आई येताच त्याला म्हणाली , " काय रे समीर असा उदास काय बसला आहेस ? " आणि तो डोळ्यात खोटे अश्रू आणत म्हणाला , " काही नाही ग मी परत जातोय दिल्लीला ..इथे कोण काय बोलेल काहीच सांगता येत नाही ..मी जातोय दिल्लीला .." आणि आई ओरडत म्हणाली , " कोण काय बोललं ? थांब उतरवूनच ठेवते त्यांची .." आणि समीर आईचा हात पकडत म्हणाला , " मोठीआई लोक नेहमीच बोलत राहतील ..आपण किती लोकांना शांत करणार आहोत ..तसही या सर्वाच कारण तुला माहिती आहे काय आहे तर ? आणि काहीही झाल तरी ते आपलेच आहेत सो त्यांना घरातून हकलायला आपण नाही सांगू शकत ..सो जाऊ दे मीच जातो .." त्याला जे म्हणायचं होत ते तो बोलून गेला होता आणि आईने ते क्षणात पकडल .आई पुन्हा म्हणाली , " समीर ते नाहीत रे माझे ।. तूच माझा मुलगा आहेस आजपासून ..ते दोघे मरण पावले माझ्यासाठी ..आणि तू बरोबर बोलत आहेस दोघेही जोपर्यंत इथे राहतील तेंव्हापर्यंत हे असंच घडत राहील .थांब मी बघतेच आता ही आता कशी राहते इथे तर ? " म्हणत आई मृणालच्या घरासमोर उभ्या झाल्या ..समीर मागून पाहू लागला ..आणि आई जोरात म्हणाल्या , " ए महामाया बाहेर निघ !! " आईचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे सर्वच शेजारी बाहेर निघाले ..मृणालही बाहेर आली आणि आई म्हणाल्या , " तुझ्यामुळे आम्ही खूप काही सोसल आहे ..तुझ्याशी नात पण तोडल तरीही तुझी मनहुस साथ आमचा काही पिच्छा सोडत नाहीये ..आम्ही असे कोणते पाप केले होते काय माहीत की तू आमच्या घरात आलीस ..आता लोकांचा हा तिरस्कार आम्हाला सहन होत नाही ..आम्ही दोन दिवस सुखाने जगत आहो हे तुला आवडत नाही का ? की आम्हाला वर नेऊनच सोडशील ..तू माझ्या मुलावर काय जादू केलीस माहीत नाही पण तो तुझ्या बाजूने राहिला आणि आपल्या या आईलाही सोडायला मागे पुढे पाहिलं नाही..माझा श्राप आहे की तू जस माझ्या मुलाला माझ्यापासून तोडल तसच तुही आपल्या मुलीसाठी वणवण भटकशील पण तीच प्रेम तुला मिळणार नाही ..आम्हाला जगू दे ग बाई शांतपणे ..जा हे घर सोडून म्हणजे आम्ही सुखाने मरू तरी शकू .." बोलता - बोलता आईच्या डोळ्यात अश्रूंनी गवसणी घातली ..

आईचा प्रत्येक शब्द मृणालच्या मनावर घाव करून गेला होता ..त्या यातना , तो श्राप तिला तीळतीळ तोडत होता ..तिच्या शब्दांनी कुणीतरी हृदयाचे तुकडे केल्यासारख जाणवू लागल आणि ती उशीमध्ये चेहरा लपवून कितीतरी वेळ तशीच रडत राहिली ....रडून रडून तिचे डोळे सुजले होते पण तिने रडन काही थांबविल नव्हतं ..

काहीच क्षण गेले होते ..बाहेर लोकांचा आवाज तिला येऊ लागला ..ती चेहऱ्यावर पाणी घेऊन पुन्हा बाहेर पोहोचली ..दारातूनच बाहेर नजर टाकली तेव्हा जाणवलं की जवळपास पन्नास लोक तिच्या घरासमोर उभे आहेत ..त्यात स्त्रियाही आहेत ..ती समोर समोर जाऊ लागली आणि गावचा सरपंच बोलू लागला " अजिंक्यच्या आई आम्ही खुप सहन केलंय पण आता नाही ..एका वैश्येला या गावात आम्ही कदापि राहू देणार नाही ..आमच्या मुलीही तिला पाहून काही चुकीच शिकल्या म्हणजे आम्ही काय करू ? नाही आता ही इथे राहणार नाही .." आणि त्यावर आई म्हणाल्या , " मीही थोड्यावेळापूर्वी हेच सांगितलं तिला ..पण जायचं नाव घेईल तेव्हाच ना ? तुम्हीच काढा हात धरून तिला घराबाहेर .." जवळपास पन्नास लोक जोराजोराने ओरडत होते ..त्यात काही स्त्रिया तिच्या बाजूने येऊ लागल्या ..तिच्या मनात धडधडी भरली आणि पुन्हा एकदा हातपाय थरथरायला लागले ..तितक्यात अजिंक्य प्रज्ञाला शाळेतून घेऊन घरी आला ..सुरज प्रज्ञाला आत घेऊन गेला आणि तिला काही कळू नये म्हणून दार लावून घेतलं ..आणि अजिंक्य जोरात म्हणाला , " अरे बापरे आज सर्व गावच घरी आलंय वाटत ..मृणाल कशी ग वेंधळी तू जा सर्वाना चहा टाक ..दररोज थोडी येतात हे सर्व .." आणि मृणालला थोडा धीर आला …तेवढ्यात सरपंच म्हणाले , " अजिंक्य ही गंमत करण्याची वेळ नाहीये ..आम्हाला तुझ्यापासून काहीच समस्या नाही पण एका वैश्येला आम्ही इथे ठेवू शकत नाही ..त्यांच्या आमच्या मुलांवर चुकीचा परिणाम होतो .." आणि अजिंक्य जोराजोराने हसू लागला ..समोर लोकांचा राग आणखी वाढू लागला आणि गर्दीतून कोणीतरी म्हणाल ," सरपंच काय प्रेमाने सांगत आहात काढा हात धरून तिला घराबाहेर .." आणि पहिल्यांदाच अजिंक्य खूप जास्त भडकला ..त्याला राग अनावर झाला आणि म्हणाला , " समोर तर येऊन बघा ..एकेकाचे हात नाही कापले तर नाव अजिंक्य लावणार नाही ..वैश्या काय ? सात - आठ वर्षाचा काळ झालाय इथे राहून ..कधीतरी तिने परपुरुषाला घरात तरी येऊ दिलं का ? हे तुमच्या मनाला माहिती आहे पण तुमचं मन मानायला तयार नाही ..संपूर्ण गाव आपल्या विरोधात जाईल म्हणून घाबरून त्यांच्यात सामील झालात असो..आणि प्रभाव पडायला ती वैश्या आहे नाही तर कधीतरी होती सो त्याचा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही ..आणि जेव्हा तिला मी स्वीकारलं तेव्हा मला सर्वच माहिती होत सो मला याने काही फरक पडत नाही ..वैश्या होती तरीही आता ती माझी बायको आहे आणि आमचा संसार छान चालला आहे सो उगाचच आमच्या विषयी बोलून स्वतःचा वेळ वाया घालवू नका .." मधातूनच अमोलची आई म्हणाली , " संसार आहे ते ठीक आहे पण आमचे मुलेही तीच पाहून शिकली तर मग आम्ही कुठे जायचं ? " आणि अजिंक्य शांत होत म्हणाला , " काकू तुम्ही खूप साध्या आहात ..त्यामुळे रागावून बोलणार नाही ..त्यादिवशी तुमचा मुलगा सर्व मित्रांसमोर म्हणाला बायको घरी नाही तर मृणालला पाठवतोस का म्हणून ? का त्याला त्याची बायको आवडत नाही की समाधान देत नाही ..जिथे तुमचे मूल आधीच बिघडले आहेत तिथे आणखी किती बिघडणार ..मी कधी काही म्हणालो नाही पण इथे चव्हाट्यावर बसून मूल मृणालला रात्री येणार का ? अस विचारतात मग तेव्हाही मृणालचीच चूक असेन नाही का ? .. तेव्हा तुमच्या मुलांना तुम्हाला सांभाळता येत नाही का की तुम्हाला वाटत तो पुरुष आहे आणि त्याने कसही बोललेलं चालत ..तो खरा मर्दपणा आहे ?? .मुलगा आहे तो म्हणून कसाही बोलेल वागेल ते चालत , नाही का ? ..मग तुम्हाला आधी आपल्या मुलांशी बोलावं लागेल कारण स्वतःचीच मूल चुकीची असताना तुम्हाला मृणालला बोलण्याचा काहीच हक्क नाही .. ..आणि तिला वैश्या म्हणता !! ..इथे आलेल्या एका व्यक्तीने म्हणावं की माझी मुलगी / मुलगा बाहेर काय करते सर्व माहिती आहे !! ते दुधाने धुतलेले आहेत ..अस निघालं तर स्वतः मृणालला इथुन घेऊन जाईल ...ती वैश्या होती म्हणून तुम्ही तिला बोलत आहात मग बाहेर रंग उधळवणार्या आपल्या मुलांना काय म्हणाल ? " त्याच्या अशा बोलण्याने सर्व शांत झाले .कुणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता ..इतक्या मोठ्या गर्दीत सुई पडल्याचासुद्धाआवाज येईना आणि बऱ्याच वेळ शांत बसलेली आई अजिंक्यला म्हणाली , " अजिंक्य त्यांचं ठीक आहे पण तुझ्या बायकोमुळे आम्ही केव्हापर्यंत बोलणं खायचं लोकांचं .." अजिंक्य आईला काहीच उत्तर देऊ शकत नव्हता ..तो आईवर खूप प्रेम करत होता त्यामुळे शांतच राहिला ..आई पुन्हा एकदा म्हणाली , " सांग ना एका वैश्येचा त्रास आम्ही का भोगावा ? .." ..अजिंक्यला आईचे ते शब्द लोकांपेक्षा जास्त दुखावून गेले तरीही तो शांत होत म्हणाला , " नात तर केव्हांचच तोडल आहेस ग मग आता एका वैश्येचा आणि तिच्या नवऱ्याचा त्रास तुम्हाला का होतोय? ..जिथे नातच नाही तिथे त्यांचं बोलणंही लागायला नको .." त्याच्या अशा बोलण्याने आई रडत - रडत घरात गेली तर गावातले लोक सुद्धा घराकडे गेले ..फक्त उभे होते मृणाल आणि अजिंक्य सर्वांशी झुंज देत..मनात घाव त्यांच्याही होते पण कुणालाच त्यांच काहीच करायचं नव्हतं ..

अजिंक्यला इतक्या रागात मृणाल ने पहिल्यांदाच बघितलं होत त्यामुळे ती आश्चर्यचकित होऊन त्याची प्रत्येक हालचाल टिपत होती ...तीच मधातच त्याच्याकडे वळून पाहणं त्याला गमतीशीर वाटत होतं ..आणि तो स्वताच हसू लागला ..प्रज्ञा आज आजीकडेच थांबली होती आणि जेवण करूनच येणार होती ..तर घरात फक्त दोघेच होते ..मृणाल स्वयंपाक बनविताना अजिंक्यच्या सर्व गोष्टी आठवत होती आणि त्याच्यावरच प्रेम आणखीच वाढत होत ..मृणालचा स्वयंपाक पण आवरला होता आणि जेवण करून दोघेही आपापल्या कामाला लागले ..मृणाल सर्व आवरून लगेच बेडरूमला पोहोचली ..त्यावेळी अजिंक्य काही मेल्स चेक करत होता ..ती त्याला लागेच म्हणाली , " अजिंक्य एक ना मला तुझ्याशी काही बोलायच आहे .. " अजिंक्य लॅपटॉपमध्ये गुंग होत म्हणाला .., " फक्त 10 मिनिटे थांब मी काम पूर्ण करतो मग निवांत बोलू .." मृणाल आपल्या विचारात गुंग झाली आणि अजिंक्य आपल्या कामात ..

अजिंक्य आपलं काम पूर्ण करीत म्हणाला , " आता बोल ? " आणि मृणाल त्याच्या बाजूने वळत म्हणाली , " अजिंक्य माझ्या इथे राहण्याने सर्वाना प्रॉब्लेम आहे मग इथून आपण दूर नाही जाऊ शकत का ?..आपला छोटासा संसार असेल तिथे आपण नक्कीच खुश राहू आणि दुसर्यांना त्रास पण होणार नाही ..कदाचित आपल्यालाही त्रास सहन करावा लागणार नाही .." मृणाल तिच्यावर हसत म्हणाला , " लोकांचं मनावर घेतलंस का ?..लोक आज बोलतील आणि बोलून - बोलून थकले की सर्व सोडून देतील ..सो एवढं मनावर घेऊ नये ..विसर त्यांना .." आणि मृणाल हळुवार आवाजात म्हणाली , " लोकांचं बोलणं मनावर नाही घेत आहे रे ..आईच बोलणं मनावर घेत आहे ..लोक येण्यापूर्वी आई मला खूप काही बोलल्या ..आई म्हणाल्या की तुमच्यामुळे आम्हाला सुखाच जीवन जगता येत नाही ..तुझ्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो ..तू अजिंक्यला आमच्यापासून दूर केलंस तुही सुखात जगणार नाहीस " ..अस खूप काही बोलल्या आणि त्यांचा प्रत्येक शब्द मनाला लागला ..त्यांना मला नाही दुखवायच रे !!..त्यांना जर आपल्या राहण्याने खूप त्रास होत असेल तर जाउया सोडून हे सर्व ..शेवटी तू जिथे असशील तिथेच माझं जीवन आहे ..." अजिंक्य तिच्या बाजूने सावकाश वळत म्हणाला , " जायला काही सेकंद लागतील मृणाल पण मला जायचं नाही ..आपण दोघांनी प्रेम केलय काही चूक तर नाही केली ..आज तू इथून जाशीलही पण जिथे - जिथे जाशील तिथे असेच लोक सापडतील तेव्हा आपण पळवाट शोधून जमणार नाही ..तसही मृणाल ही लढाई फक्त आपली नाही ..अशा कित्येक मृणालची आहे ज्यांना एखादा अजिंक्य स्वीकारणार असतो पण समाजाच्या , कुटुंबाच्या भीतीमुळे तो तिला स्वीकारू शकत नाही ..आज आपण पळवाट शोधली तर अशा कित्येक मृणालला अजिंक्य स्वीकारणार नाही ..तेव्हा आपण शस्त्र टाकून चालणार नाही ..झुंज देत राहू ..हरलो तरीही काही गम नाही पण स्वतःच्या प्रेमासाठी लढलो म्हणून समाधान नक्कीच मिळेल ..आणि आज आपण इथून सोडून गेलो तर लोक आपल्याला चुकीच समजतील आणि तेव्हा मात्र मी हरेल ..तुला मी हरलेलं चालेल ? " आणि मृणाल उत्तर देत म्हणाली , " अजिबात नाही ..तुला मी कधीच हरू देणार नाही ..मग मला कितीही त्रास होऊ दे ..आज खूप अभिमान वाटतोय स्वतःचा की मी तुला निवडल .." आणि अजिंक्य तिला गुदगुल्या करत म्हणाला , " इथेही तुमचंच क्रेडिट का ? नवऱ्याला काही भावच नाही हा ? " आणि मृणाल त्याचे गाल खेचत म्हणाली ..

तुही मेरी दुनिया तुही जहाँ है
तुझपे सब कुछ कुर्बान है
जरूर है मेरा इक अपना औदा
पर तुझंसेही जुडे मेरे हर अरमान है

तुजो नही तो ये जहाँ है अधुरा
तुझकोही धुंडता है मेरा हर सवेरा
रोज जो चेहरे पे आती वो मुस्कान है
तेरे बिन तो अब तो सब कुछ बेजाण है

हा ..जरूर नाम बटे है दोनो के
उन्हे एक करे वो प्यार है
मै जी लेती हु अकसर दिन और रात खयाल मे
पर कैसे बताऊ तुझे तूही तो मेरी पहचान है
तुही तो मेरी पहचान है

अजिंक्य तिच्याकडे पाहतच होता आणि ती पुन्हा म्हणाली , " अस नको बघुस कसतरी होत रे मनात ..ए पण मला आजचा अजिंक्य फार आवडला ..हात लावला तर तोडून फेकून देईल म्हणणारा .." ती त्याची खेचत होती आणि दोघेही कितीतरी दिवसानी मनमोकळेपणे हसले ..समोरून आई - आई करत प्रज्ञा आली आणि धावतच मृणालच्या मिठीत शिरली ..तिघेही एकमेकांना गुदगुल्या करीत होते तर प्रज्ञा आणि मृणाल अजिंक्यला उशी फेकून मारत होते.. आणि काही क्षणापूर्वी घडलेल महाभारत ते सहज विसरून गेले .. त्यांनी या दुःखातही काही आनंदाचे क्षण शोधून घेतले होते ..जे पुढेच्या परिस्थितीशी सामना करण्यास त्यांना बळ देणार होते ..पण त्यांना माहिती नव्हत की हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे जेव्हा तिघेही एकत्रच आनंदी होते ..


क्रमशः....