Addiction - 2 - 27 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन- पर्व दुसरे - भाग 27

प्रज्ञा जसजशी मोठी होऊ लागली तसतसा तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला ..हेच ते वय असत जेव्हा मूल बाहेरच्या जगात स्वतःचा आनंद शोधू लागतात ..तेव्हा त्यांना समजावून सांगण , त्यांच्यावर अधिक नजर ठेवण फार गरजेच होऊन जात ..पण प्रज्ञाचे आईवडील सोबत नसल्याने तिला बर वाईट यातला फरक सांगणार कुणीच लाभलं नाही आणि ती त्यालाच जीवन समजत जगू लागली . ..तिच्यासाठी सलीलच प्रेमच सर्व काही बनत गेलं ..पण ती हे विसरत गेली की प्रेम एका मर्यादेपर्यंत आनंद देऊन जात आणि जेव्ह प्रेम आपली मर्यादा तोडू लागत तेव्हा ते सर्व काही अस्ताव्यस्त करून जात ..व्यक्ती त्या नशेत काय करतो आहे हे त्याला माहित नसत आणि नशा उतरल्यावर सर्व काही सुधारन्यासाठी त्याच्या हातात काहीच उरत नाही ..प्रज्ञाही सलीलच्या प्रेमात प्रेमवेडी झाली होती ..मग या सर्वात तिला कशाचच भान नव्हतं ..

प्रज्ञाची कॉलेज लाइफ सुरळीत चालली होती ..एन्जॉयमेंट पार्टी या सर्वात तिने स्वतःला गुंतवून घेतलंं ..नवनवीन मित्र जुळत गेले आणि सदैव चिकटून असलेला एकटेपणा नाहीसा झाला ..परंतु या सर्वात अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाल ..प्रज्ञा सलीलचा बारावीचा निकाल आला तेव्हा ते काठावर पास झाले होते आणि सलीलच्या घरचे तर त्याच्यावर ओरडलेही होते ..तर प्रज्ञाला इतकं स्वातंत्र्य लाभलं होत की तिच्यावर कुणीच ओरडण्याचा प्रश्नच येत नव्हता ..इतकं सर्व घडलं असतानाही त्यांना काहीच फरक पडला नव्हता ..प्रज्ञाच्या आजीला सलील दुसऱ्या कास्टचा आहे हे माहीत झाल्यावर मात्र त्यांच्या घरी रोजच वाद होऊ लागले ..प्रज्ञा त्यांचं काही एकूण घेत नव्हती आणि आपल्याला हवं तसच जीवन जगत होती ..तिच्यासाठी जीवन म्हणजे फक्त मज्जा - मस्तीच होत गेली ..

अगदी काही दिवसातच प्रज्ञाच्या आजीला मृणाल आणि अजिंक्यची कमी जाणवू लागली ..तीला आपण चुकलो हे माहिती होत पण त्यांच्यासमोर झुकून स्वतःची हार स्वीकारणं तिला मंजूर नव्हतं त्यामुळे प्रज्ञाकडून मिळणारे घाव ती दररोज सोसू लागली ..सलील दुसऱ्या कास्टचा असल्याने अजिंक्यच्या काकानेही त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं होतं ..अगदी वयाच्या शेवटच्या पर्वात त्यांना काम करून जगाव लागत होतं आणि नकळत का होईना डोळ्यातून अश्रू येऊ लागले ..हे अश्रू पचतावण्याचे होते की प्रज्ञाकडून स्वतःला होणाऱ्या त्रासामुळे नकळत आले होते हे मात्र त्यांनाच माहिती होत ..

दिवस जाऊ लागले ...सलीलच घरात लक्ष नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याच्या काकाच दुकान सांभाळायला लावलं शिवाय तो जबाबदार व्हावा म्हणून त्याच आपल्या मित्राच्या मुलीशी लग्न लावून देण्याचा विचार सतत त्यांच्या मनात सुरू होता ..सलीलने नकार देण्याचे बरेच प्रयत्न केले होते पण त्यांनी त्याच काहीच एकल नाही आणि त्याचा होकार न घेताच लग्नाची तयारी सुरू केली ..त्यालाही कळून चुकलं होत की आता आपल्याला नकार देता येणार नाही . सलीलचा वागणं पाहता त्याच्या घरच्यांनी त्याच बाहेर जाण सुद्धा बंद केलं पण आज शेवटचच मित्रांना भेटायला जातोय म्हणून तो घराबाहेर पडला ..त्याने सर्वाना मॅसेज करून आधीच बोलावून घेतलं होतं ..त्यात प्रज्ञाही आली होती ..सलील तिथे आला आणि घरी काय काय चालल आहे त्याबद्दल सांगू लागला ..सर्व मित्र कान देऊन ऐकत होते ..तर सलीलच्या लग्नाचं एकूण प्रज्ञा रडू लागली होती अगदी तीच स्थिती सलीलचीही होती ..कुणालाच काही सुचेना त्यामुळे सर्व मित्र शांत बसले होते ..तेव्हाच एक मित्र उभा होत म्हणाला , " सलीलच लग्न होणार आहे न ? झालं तर नाही ? " आणि सलील - प्रज्ञा दोघेही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले ..तो पूढे बोलू लागला , " सलील मान्य की तुला घरच्यांच्या मर्जीने लग्न करायचं नाही पण स्वतःच्या मर्जीने तर करू शकतो ? आणि उद्यापासून तुला घराच्या बाहेर निघता येणार नाही तेव्हा तुम्ही आजच लग्न करून स्वतःच जीवन जगा मग बघू कोण अडवत तुम्हाला ..? " मित्राचं बोलणं ऐकून बाकी सर्व खुश झाले होते आणि त्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा दिला आता फक्त वाट होती ती त्या दोघांच्या उत्तराची ..सलीलला आपल्या घरच्यांची फार काळजी वाटत होती शिवाय त्याने लग्न केलं असत तर कुणीही त्यांना घरात घेतलं नसत म्हणून त्याच्या डोक्यात विचार सुरू होते ..त्याने एकदाच प्रज्ञाच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे नजर टाकली आणि त्याला त्याच उत्तर मिळाल ..प्रज्ञासाठी सलील म्हणजे सर्वस्व तेव्हा तिच्या नकारचा प्रश्नच नव्हता ..त्यांचे होकार आले आणि सर्व मित्र लग्नासाठी आवश्यक गोष्टी आणायला बाहेर पडले तर काही मित्र त्या दोघांना घेऊन मंदिरात पोहोचले ..त्यांचे मित्र दिवसभर लग्नासाठी धावपड करत होते तर सलीलच्या घरून फोन येत असल्याने त्याला फारच भीती वाटू लागली होती ..शेवटी सर्वांच्या मदतीने त्यांचा विवाह पूर्ण झाला ..सलील घरी गेला असता तर खूप प्रॉब्लेम झाले असते त्यामुळे त्यांनी घरी जाण्याऐवजी बाहेर राहण्याचा निर्णय घेतला ..आजची रात्र ते हॉटेलमध्ये काढणार होते आणि नंतर मित्रांच्या मदतीने ते वेगळी रूम करून आपला संसार नव्याने मांडणार होते ..

इकडे सलील - प्रज्ञाच लग्न झालं होतं पण कुणाला काहीही खबर लागली नव्हती ..सकाळची सायंकाळ झाली आणि सायंकाळची रात्र पण प्रज्ञा घरी आली नव्हती त्यामुळे आजीला तिची काळजी वाटू लागली .बऱ्याच वेळेपासून तिला फोन लावण्याचे प्रयत्न सुरू होते पण मोबाइल बंद असल्याने तिच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता त्यामुळे त्यांना फारच भीती वाटू लागली ..या अवस्थेत त्यांच्याकडे एकच पर्याय उरला तो म्हणजे अजिंक्यला फोन लावणं ..आपली मान खाली जाईल म्हणून आईने अजिंक्यला फोन केला नाही पण सुरजला भीती वाटू लागली आणि त्याने अजिंक्यला फोन करून प्रज्ञाची चौकशी केली पण ती तिथेही नसल्याने सरविकडे चिंतेच वातावरण तयार झालं ..अजिंक्यला बातमी मिळताच त्याने तिच्या काही मित्रांना फोन लावण्यास सुरुवात केली ...एकावर एक फोन लावल्या जात होते पण तिची काहीही खबर मिळत नव्हती ..शेवटचा पर्याय म्हणून अजिंक्यने प्रियाला फोन लावला ..अजिंक्य काही वेळ प्रियाशी बोलत होता ..त्याचा आवाज अचानक कमी झाला ..वातावरण अगदीच शांत झाल आणि काही वेळात तिने फोन ठेवला ..मागून मृणाल हे सर्व पाहत होती पण तिला त्यातलं काहीच कळत नव्हतं शेवटी न राहवुन तिने त्याला विचारलंच , " अजिंक्य इतका शांत का आहेस ? आपल्या मुलीसोबत काही चुकीचं तर झालं नाही ना ? " अजिंक्य आताही शांतच होता ..त्याला हलवत ती म्हणाली , " काय झालं सांग ना !!..मला खूप भीती वाटते आहे .." आणि अजिंक्य शांत होत म्हणाला , " मृणाल प्रज्ञाने पळून लग्न केलं .." अजिंक्यच्या तोंडून शब्द बाहेर यावे आणि सर्विकडे निरव शांतता पसरावी ..मृणाल तर काहिच बोलत नव्हती आणि अजिंक्य कसातरी भिंतीला टेकून उभा होता ..दोघेही काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हते तरी हिम्मत करून मृणाल म्हणाली , " अजिंक्य आजच्या मुलांना नेमकं झालं तरी काय ? प्रेमात किती आंधळे झाले आहेत ते की घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावं ..चला हे मान्य केलं की प्रेम केलं पण आधी आपण हा संसार चालवू शकतो का याचा तरी विचार करावा ..उद्या कस पोसणार आहे तो आपल्या मुलीला ..आणि कसे राहतील या जगात ..मित्र काय दोन दिवस सोबत असतात पण जेव्हा त्यांची मदत करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ते कुणीच सोबत नसतील हे कसं कळत नाही आजच्या मुलांना .." तीच बोलणं झालं ..अजिंक्य आताही शांतच होता ..क्षणात त्याला काय सुचलं माहिती नाही पण मोबाइल काढून तो पटापट टाइप करू लागला ..इतक्या क्रिटिकल परिस्थितीत तो असा का वागतो आहे हे तिला कळतच नव्हतं ..आणि शेवटी न राहवुन तिने पुन्हा विचारलं .., " मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते आहे आणि तू असा का वागतो आहेस .." तरीही त्याने तिला काहीच उत्तर दिलं नाही पण आतापर्यंत मोबाइल बघत असलेल्या अजिंक्यने मोबाइल बाजूला ठेवला ..त्याक्षणी त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होत ..तर मृणाल त्याला बघून पुरती गोंधळली होती ..तिने त्याच स्थितीत त्याला विचारले .." काही बोलनार आहेस का आता ? " आणि खूप वेळेपासून शांत बसलेला अजिंक्य म्हणाला , " अग काही नाही आपण वेगळं राहतोय ना तरी आपल्याकडे सर्वच आहे पण आपल्या मुलीकडे मात्र काहीच नाही ..बिचारीने जेवण केलं की नाही हेसुद्धा माहिती नाही ..उद्या बाहेर जगायचं झालं तर कशी जगणार? म्हणून तिला काही पैसे सेंड केले .."

आता मात्र मृणालचा पारा अधिकच चढला होता आणि ती रागावत म्हणाली , " म्हणजे तुला त्यांचा निर्णय मान्य आहे ? खूप लहान आहेत ते अजून ? कस सांभाळतील सर्व .." अजिंक्य किंचित हसला आणि म्हणाला , " तिने चुकीचं केलं आहे का माहिती नाही ..पण ज्या मुलीला खांद्यावर बसवून संपूर्ण गाव फिरवलं , तिने काही खायला मागितलं तर रात्री बेरात्री तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आज ती अशी एकटीच आहे हे पाहवत नाही ..तिला जरी आपण मान्य नसलो तरीही ती माझ्या काळजाचा तुकडा आहे ...नाही पाहू शकत मी तस तिला .ती आजारी पडली असे तेव्हा रात्र रात्र जागून आपण तिची काळजी घेतली ..तूच सांग तिला अस एकट कस सोडू ? " अजिंक्य फारच हळवा झाला होता आणि म्हणून मृणाल त्याला काहीच बोलू शकली नाही ..तिचे श्वास चढू लागले आणि स्वतःला सावरत ती म्हणाली , " तू बोललास त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे आणि त्यांनी आपलं अस वागणं फार जवळून पाहिलं आहे मग अजिंक्य मुलांना आपल्या आईवडिलांच प्रेम का कळत नाही रे ? ..तिला तुझी इतकी काळजी का दिसत नाही ? किती दिवस झाले तू तिच्यासाठी किती तडफडतोस पण तिला काहीच कस समजत नाही .." मृणालच्या प्रश्नांनी अजिंक्यच्या मनात खोलवर उसंडी घेतली ..तीचा प्रत्येक प्रश्न त्याला त्रास देऊन गेला ..आणि नकळत का होईना अजिंक्यच्या चेहऱ्यावर हसू आलं ..अजिंक्य हसला म्हणजे तो दुखावला हे तिने अचूक हेरलं आणि तिने त्याच्या मनातल्या सर्व वेदना सहज ओळखल्या ..प्रज्ञाला ओरडताना ती नकळत अजिंक्यला दुखावून गेली हे तिला कळताच तिने त्याला जवळ घेतलं आणि तोही तिच्या मांडीवर शांत पडला ..पण तिच्या मनात आताही ते प्रश्न फिरत होते ..खरच मुलांना आपल्या आईवडीलांचे प्रामाणिक प्रयत्न का दिसत नाहीत ? आईवडील श्रीमंत असो की गरीब प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने त्यांना सर्व काही देतो तरीही त्यांना जास्तची अपेक्षा का ? का मूल आईवडिलांना यातना देऊन सोडून जातात ?

अजिंक्यला बातमी मिळाल्यावर आईला सांगू की नये म्हणून त्याने बराच विचार केला कारण आईला हा आघात पचणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं ..मनात बरच द्वंद्व सुरू होत पण तिची काळजी बघून शेवटी त्याने सुरजला सर्व काही सांगितलं ..सुरज चाचपडतच त्यांच्या घरी आला आणि प्रज्ञाच्या लग्नाची बातमी त्यांना दिली ..बातमी ऐकताच आईचा जीवच हरपला ..ती खाली पडणार तेवढयात सुरजने तिला सावरले ..तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले होते पण त्या अश्रूंना सावरणारा खांदा मात्र तिला भेटत नव्हता ..सुरज तिला आतमध्ये सोडून आपल्या घरी परतला आणि आईच्या डोक्यात विचार येऊ लागले ..ज्या प्रज्ञासाठी तिने आपल्या सुनेला घरातून बाहेर हाकलून लावलं होत तीच प्रज्ञा तिला काहीही न सांगता निघून गेली हा तिच्यासाठी फार मोठा झटका होता ..ज्या समाजाच्या बोलण्याने तिने मृणालला घरा बाहेर काढले होते तो समाज आता तिच्या जवळ नव्हता हेही त्याक्षणी तिच्या लक्षात आलं..सोबत होता तो फक्त अंधार ..असा अंधार जो तिला या नरक यातनेमधून बाहेर पडू देणार नव्हता ..आणि तिला कळून चुकलं की आपण फार मोठी चूक केली आपल्या मुलांना दूर करून...तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ते कशाचे होते ? तिला होणाऱ्या त्रासाचे की पश्चातापाचे ?

पण खरंच इतकं घडल्यावर ती त्या सर्वांची माफी मागण्याची हिम्मत करू शकली असती ? की त्या आधीच सर्व काही संपल असत ..कारण खरेपणा सिद्ध करायला नेहमीच त्याग करावा लागतो आणि तो त्याग म्हणजे नक्की काय ?


क्रमशः ....