Addiction - 2 - 30 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 30

तुझको पाकर लगता था
मैने जी ली अपनी जिंदगी
तुझको खोकर मैने जाना है
तेरे बिना तो मै कुछ भी नही

हाथो से हाथ छुट गये
रास्ते सुनसान हो गये
मै चलती जा रही हु अंधेरी रात मे
आवाज गुंज रही है फिर भी तू मेरे पास नही

याद आते है वो दिन
जब भी तुम छेडा करते थे
गुस्सा होकर भी तुम
मुझसे अकसर प्यार जताते थे
अब ना वो गुस्सा है
ना कही प्यार है
तुम छुपे हुये हो इस पल
ना कुछ होश है ना मेरा खयाल है

क्या गुनाह हो गया मुझसे
अब तो बता दे ए हमसफर
किस राह पर मिलोगे तुम
भेज देना मुझे वो खबर

मै दौडी चली आउंगी
तुझसे मिलने के लिये
बस केह दे तू एक बार
और मै मर जाउंगी तेरे लिये ..

अब तो जाण चुकी हु
हर बार तेरा यु रुठ जाना
एक बार गले लगाकर
मुझे वो हसीन शाम दे दे ..

भूल जाउंगी वो हर दर्द
जो जमाणे ने हर पल दिये है
बस पास आकर लग जा सिने से
फिर तुझसे कोई शिकवा नही है
शिकवा नही है
रात्रीचे 2 वाजले होते ..बाहेर कडाक्याची थंडी पडली होती आणि मृणाल एकटीच टेरिसवर बसून अजिंक्यचा विचार करीत होती..अजिंक्य गेल्यानंतर तिला स्वतःची पर्वासुद्धा नव्हती आणि म्हणूनच तिने साधी शालसुद्धा अंगावर ओढली नव्हती ..कितीतरी वेळ ती टेरिसवर एकटीच उभी होती आणि चांदण्याकडे पाहत म्हणाली , " अजिंक्य तू बरोबर म्हणाला होतास ..आपला संघर्ष असा असावा की आयुष्याकडे हार मानून आपल्याला वर नेण्यापेक्षा दुसरा पर्यायच बाकी नसावा ..पण तुझ्या जाण्याने माझी काय स्थिती झाली आहे तुला काही ठाऊक आहे ? ..अगदी तुझा चेहरा पाहिला की मला जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळायची पण तूच गेलास आणि हे जीवनही नकोस होऊन बसल ..विचार तर येतोय की यावं तुझ्याकडे लगेच पण मला तुझा राग माहीत आहे ..मी वर आले तर तू माझ्याशी कधीच बोलणार नाहीस म्हणून इथेच शांत बसून आहे ..तू होतास तेव्हा कधी एकट वाटलं नाही पण तू जावं आणि स्वतःला बंदिस्त करून घेतलं ..जग काय असत हे विसरूनच गेले रे मी !! .कारण माझ्यासाठी तूच जग होतास ..मी अशा एका भोवऱ्यात सापडले आहे जिथे जिवंतही राहता येत नाही आणि मरताही येत नाही ..आता तुच सांग जीवन जगून तरी नक्की काय करू ? "

तिचे शब्द पूर्ण व्हावे आणि वाऱ्याची शांत झुळूक तिला सुखावून गेली ..ती आपल्या केसांना हात लावत म्हणाली , " अस!! ..आज पण छेडणार आहेस मला !! ..तुला फार आवडतात न हे केस म्हणून मला छेडत आहेस ..मला न तुझा हा स्वभाव अजिबात आवडत नाही अजिंक्य ..पण ना मी हे सर्वच खूप मिस करतेय ..तुला आठवतंय जेव्हा मी खूप बोलायचे तेव्हा अगदी ओठांवर ओठ देऊन तू मला शांत करायचास ..कधी आरशात मला तासन्तास पाहत राहायचास तर कधी गजरा आणून केसात माळायचास..सर्व कस अगदी समोर घडल्यासारख वाटत आहे पण आज तू सोबत नाही आहेस ..अजिंक्य तू आज गेलास आणि मी स्वतःलाच हरवून बसले ..जी भीती मला लग्नाआधी वाटत होती तेच खर झालं ..तुला मी कायमच गमावलं ..कदाचित मी तुला स्वीकारलं नसत तर आज तू जिवंत असतास ..हे गिल्ट मी केव्हांपर्यंत घेऊन जगू की तू फक्त माझ्यामुळे जग सोडून गेलास ..केव्हांपर्यंत ? "

शांत असलेला वारा अचानक जोर्याने वाहू लागला ..झाडाची पाने आवाज करू लागली ..बाहेर खिडक्याचे आवाज येऊ लागले हे पाहून मृणाल म्हणाली , " रागावला आहेस बर सॉरी ..मला माहित आहे तू आता असतास तर नक्कीच रुसला असतास पण मला तुझ तेच रुसणं हवंय ( वारा आणखीच जोर्याने वाहू लागला ) बर बर समजलं मला अंगावर शाल ओढली नाही म्हणून रागावला आहेस ना ? ठीक आहे जाते मी इथे पण तुझाच हट्ट पूर्ण कर ..हो पण मी पुन्हा उद्या येते याच वेळी भेटायला आणि तुही ये बर का ..विसरू नकोस यायला ..चल मस्त झोप खूप रात्र झाली आहे ना ..लव्ह यु ..मी जातेय झोपायला .."

एकीकडे मृणालच्या डोळ्यात अश्रू होते तर दुसरीकडे रियानेही रडून रडून हालत खराब केली होती ..वेळ तीच होती पण ठिकाण मात्र वेगळं होत ..रियाची अशी स्थिती बघून स्वप्नील ( रियाचा पती ) तिला सावरत होता पण ती काही शांत होत नव्हती आणि बऱ्याच वेळ रडल्यानंतर ती त्याला म्हणाली , " स्वनिल देव अस इतका निष्ठुर कसा रे ? तो चांगल्याच लोकांना का वर घेऊन जातो ? ..तुला माहिती आहे त्याच्यामुळेच मी तुझी होऊ शकले ..जेव्हा मला मरावस वाटत होतं तेव्हा त्याने मला समजावलं की प्रेम नक्की काय आहे आणि ते कसं जगाव ..तू आयुष्यात आलास आणि त्याच म्हणणं मला पटलं ..तो मला सदैव मदत करीत राहीला पण तो अस अचानक जाईल अस कधीच वाटलं नव्हतं ..आज मी त्याच्यासाठी मृणालसाठी काहीच करू शकत नाही याचं वाईट वाटत ..स्वप्नील खरच त्याच्यासारखा मित्र भेटायला फार नशीब लागत ..त्याचा असा करूण शेवट होईल असं कधीच वाटलं नव्हतं ..मी मृणालसाठी कठोर होऊन जगू शकले ..पण आता स्वतःला सावरू शकन कठीण जातंय ..उद्यापासून तो मला दिसणार नाही हे सहन होत नाही ..दररोज ऑफिसला गेले की आठवणीने तो कॉफी मागवायचा आणि त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर दिवस खूपच सुंदर जायचा ..आता तो आणि त्याच्यासोबतचे क्षण मला कसे मिळतील ..खूप मिस करतेय रे मी अजिंक्यला ..अजिंक्य तू अस जायला नको होतंस .."

स्वप्नील तिला आपल्या बाहुत घेऊन शांत करू लागला ..तिचे अश्रू पुसल्यावर तो म्हणाला , " हो खरंय तुझं ..मीही खूपदा भेटलो त्याला पण अनोळखीपणाचा भाव कुठेच आला नाही ..रिया एक सांगू आज अजिंक्य नाही त्यामुळे मृणाल एकटी पडली आहे सो तुला खरच त्याच्यासाठी काही करावंसं वाटत असेल तर मृणालला सावर ..घरच्याची काळजी नको करू मी त्यांना सांभाळून घेईल ..आज तिच्याजवळ कुणी नाही पण तू तिच्यासोबत राहून काही अंशी मृणालच दुःख कमी करू शकतेस..हीच अजिंक्यला आपल्याकडून खरी श्रद्धांजली असेल ..चल आता रडू नको आणि त्याला दिलेलं वचन पूर्ण कर .." स्वप्नीलचे शब्द तिच्या कानावर पडले आणि ती स्वतःच आपले अश्रू पुसू लागली आणि तिला कळून चुकलं की नाती फक्त सांगायची नसतात तर वेळ आल्यावर ती निभावायची असतात ...स्वप्नीलचा तिला फार अभिमान वाटू लागला आणि ती आज समाधानाने झोपी गेली

दुसरा दिवस उगवला ..मृणाल एकटीच घरात बसून होती आणि अचानक दारावर थाप पडली ..मृणालने बाहेर जात दार उघडलं तेव्हा तिला समोर रिया दिसली आणि मृणाल लगेच म्हणाली , " रिया तू सकाळी सकाळी इथे ? " आणि रिया उत्तरली , " काही नाही ग करमत नव्हतं म्हणून आले .." मृणाल समोर काही बोलणार तेव्हड्यात ती समोर समोर जाऊ लागली आणि मृणाल तिला शंकेने विचारू लागली , " काय ग काय झालं ? " मृणाल तिच्याकडे पाहत पून्हा उत्तरली , " काही नाही ग कॉफी बनवत आहे दोघांसाठी .." रियाला समोर जाताना पाहून मृणाल म्हणाली , " मी बनवते ग तू थांब !! " आणि रिया उत्तरली , " नको ग बाई तू बनवली की त्यात अश्रू पडल्याने खारट होईल आणि मला ते अजिबात आवडणार नाही .." रियाने तिला हसविण्याचा प्रयत्न केला पण तिच्या चेहऱ्यावर कुठेच हसू आलं नाही ..शेवटी रिया कॉफी बनवून हॉलमध्ये घेऊन आली ...मृणाल अगदीच शांत बसलेली पाहून रिया म्हणाली , " का ग अशी बसून आहेस ? काही झालंय का ? " मृणालने तिच्याशी बोलणं टाळलं हे पाहून पुन्हा रियाच म्हणाली , " अजिंक्य कारण आहे तर !! तो होता तेव्हा बोलायचा तुझ्याशी आणि तुही बोलायचीस पण आता माझ्याशी का बोलशील ? मी आहेच कोण ? ..सॉरी डिअर मी कॉफी घेऊन निघते लवकरच ..ती कॉफी संपवून बाहेर जाणार तेवढ्यातच मृणाल तिला पकडून रडू लागली ..रिया तिला शांत करीत होती पण तिचे अश्रू काही थांबत नव्हते ..बऱ्याच वेळ रडून झाल्यावर ती स्वतःच रडायचं थांबली आणि म्हणाली , " सॉरी रिया पण त्याच्याविना जगणं अशक्य झाले आहे ..त्याची सवय झाली आहे ना म्हणून असेल ..तो माझ्यामुळे गेलाय हे गिल्ट मनातून निघतच नाहीये ..कधीकधी मरायचा विचार येतो पण ...." मृणाल बोलायच थांबली ...रियाला तिची मानसिक अवस्था कळून चुकली होती आणि तिने मृणालला बाजूला बसविले ..तिचा हात स्वतःच्या हातात घेत म्हणाली , " मृणाल तुला माहिती आहे अजिंक्य बऱ्याच वेळा माझ्याजवळ तुला होणारा त्रास व्यक्त करीत होता पण त्याच्या तोंडून मी हे कधीच एकल नाही की तुला स्वीकारून त्याने चूक केली उलट तो नेहमीच म्हणायचा की रिया माझ्या आयुष्यात आलीय त्यामुळे मी सर्वात नशीबवान व्यक्ती आहे ..त्याला हे नक्कीच माहिती होत की तो या जगातून जाणार आहे आणि तू त्यासाठी स्वतःला ब्लेम करशील ..पण त्याने त्यावेळी मला सांगितलं होतं की तिला समजावं की प्रत्येकाला कधी न कधी कधी जावंच लागत यात तिची काहीच चूक नाही ..मृणाल तुला सांगू आत्महत्या करायला फक्त दोन मिनिटे लागतात ..ती संधी तुला केव्हाही मिळू शकते ..हिम्मत लागते ती जगायला ..अजिंक्य जीवंत असताना कधीच हरला नाही पण नियतीसमोर मात्र तो काहीच करू शकला नाही ..त्याने आपल्या सर्वांना शिकविल प्रेम काय असत आणि आज तू स्वतः हरलीस तर अजिंक्यही हरेल ..बघ विचार करून तुला हरायच आहे का तर ? शिवाय आज तू आत्महत्या करून ही लढाई इथेच अर्धी सोडली तर पुन्हा कुठलाच अजिंक्य मृणालला स्वीकारणार नाही ..त्याला वाटेल की सर्व मृणाल कायर असतात आणि नकळत का होईना यात अजिंक्यच प्रेम हरेल ..तुला त्याला हरवायचं आहे ? ..मृणाल हे मान्य की मी तूझ दुःख समजू शकत नाही आणि हेही मान्य की तू आपल्याच लोकांमुळे दुखावली आहेस आणि तुझ्यासोबत आज कुणीच नाही पण तुला नियतीने एक संधी दिली आहे ..जा उठ आणि मुंबईला जाऊन अनाथ आश्रमाला सेवा अर्पण कर ..तुला अजिंक्यची वाट पाहावी लागणार नाही तर तूच कितीतरी अजिंक्य निर्माण करू शकतेस ..बघ विचार करून शेवटी तुझा निर्णय .."

रिया शांत झाली तेव्हाही मृणाल काहीच बोलली नाही ..कितीतरी वेळ रिया फक्त एकटीच बोलत होती पण समोरून मृणाल काहीच बोलत नव्हती .काही वेळात रिया उठली आणि मृणालला तयारी करून बाहेर घेऊन जाऊ लागली ..मृणाल नकार देत होती पण रियासमोर तीच काहीच चाललं नव्हतं ..आणि दोघेही बाहेर पडले ..

जवळपास सायंकाळी मृणाल घरी परतली तेव्हा तिचा चेहरा थोडा खुलला होता ..तिच्या डोक्यात थोड्या वेळापूर्वीचे प्रसंग उभे होते ..समोर लावलेल्या अजिंक्यच्या हसऱ्या फोटोकडे तीच लक्ष गेलं आणि तिच्याही चेहऱ्यावर नकळत हसू आलं ..आज रिया तिला ऑफिसच्या पार्टीमध्ये घेऊन गेली होती ..त्यांच्या सरांना बिजीनेसमेन ऑफ द इयर चा 'किताब मिळाला नि त्यासाठीच पार्टी ठेवली होती ..मृणाल तिथे पोहोचली आणि सरांनी तो 'किताब अजिंक्यला बहाल केला ..त्या पार्टीत सर्व स्टाफ अजीबक्यबद्दलच बोलत होता आणि त्याने काय कमावून ठेवलं हे तिच्या लक्षात आलं आणि म्हणूनच ती समाधानी होती ..अजिंक्यच्या फोटोकडे तीच लक्ष गेलं आणि तिला त्याचे शब्द आठवले , " मृणाल - अजिंक्य आज आहेत उद्या नसतील पण त्याचं प्रेम कधीही नाहीस होणार नाही ..ते शाश्वत आहे आणि त्यासाठी आपल्याला जगाव लागेल ..आज कितीतरी मृणाल अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी अजिंक्य हवे आहेत आणि आपल्याला ते प्रयत्न करायला हवेत ." तिला मग रियाचे शब्द आठवले अजिंक्य हरला तर तुला आवडेल ? ..जा जग काही अजिंक्य निर्माण करण्यासाठी ..त्या विचारांनी तिच्या अंगात सरसरी निर्माण झाली आणि अजिंक्य तिच्यासमोर उभा होऊन तिला हे सर्व सांगत आहे असंच तिला वाटलं ..तिने जवळून त्याच्या फोटोला पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे बघून हसत होता आणि तिला कळून चुकलं की अजिंक्य माझ्या निर्णयावर खुश आहे ..तिने त्याच्यासमोरच आपल्या डोळ्यातीळ अश्रू पुसले ..तिच्या चेहऱ्यावर तरतरी जाणवत होती आणि सोबत होता तो अजिंक्यचा विश्वास ..आता ती अजिंक्यचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निर्भय मनाने पुन्हा त्याच स्वप्न नगरीत निघणार होती जिथे तिने आपलं आयुष्य सुरू केलं होतं ..कदाचित तीच हे पाऊल बऱ्याच लोकांना जगायला शिकविणार होत ..आणि तीच जगाला शिकविणार होती प्रेम म्हणजे नक्की काय असत ? एक वैश्याही खर प्रेम करु शकते का आणि किती हदपर्यंत हे मृणाल आता जगाला सांगणार होती ..


क्रमशः ....