Shodh Chandrashekharcha - 6 in Marathi Social Stories by suresh kulkarni books and stories PDF | शोध चंद्रशेखरचा! - 6

शोध चंद्रशेखरचा! - 6

शोध चंद्रशेखरचा!

६---

कॅफे रुद्राक्ष, विकीच्या घरा पासून फक्त हाकेच्या अंतरावर होते. पैशाची बॅग पाठीशी लावून घरी येता येणार होते. दुसरे कारण असे होते कि, गाडी सफाईचा नादात त्याचे कपडे खराब झाले होते, ते पण त्याला चेंज करता येणार होते. तो घरात घुसला, तोंडावरून पाण्याचा हात फिरवला, तोच ओला हात डोक्यावरच्या केसातून पण फिरवला. कपडे बदलले. फसाफसा अंगभर डियो मारला. त्याने मनगटावरल्या घड्याळात नजर टाकली. घरापासून मोजून सात मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर कॅफे रुद्राक्ष होते. आजून त्याच्या कडे बराचसा वेळ होता. खुर्चीत तांगडे फाकवुन बसत, त्याने टीव्ही ऑन केला. ब्रेकिंग न्यूज चालू होत्या. त्याकडे लक्ष न देता, त्याने आधी सिगारेट पेटवली. ब्रेकिंग न्युज चंद्रशेखरच्या कार अपघाताचीच चालू होती. विकी सावरून बसला.

" नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार, गेल्या काही वर्षात वेगाने प्रगती करणाऱ्या गॅलॅक्सि सोल्युशन्सचे सर्वेसर्वा चंद्रशेखर, यांची BMW MH-०२/XXXX कार अपघातात सापडली आहे. घाटातील वळणावरल्या झाडाला गाडीने जबरदस्त धडक दिली आहे. कारचे दुरुस्ती पलीकडे नुकसान झाले आहे. पण खरी बातमी पुढेच आहे. अपघातग्रस्त गाडी जवळ वाहन चालक सापडलेला नाही! गाडी कोण चालवत होते, अपघात समई गाडीत किती जण होते, आदी माहित आजून आमच्या पर्यंत पोहचलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार अपघात कालरात्री आठ ते दहाच्या दरम्यान झाला असावा. गाडीत ड्रायव्हिंग सीटवर आणि त्याच्या आसपास रक्ताच्या थारोळ्याचे डाग आहेत! जखमींचा आजून पर्यंत, म्हणजे तब्बल बारा तास उलटून गेल्यावर हि, तपास लावण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही! पण इन्स्पे. इरावती सारख्या कर्तव्यदक्ष पोलीस इन्स्पेक्टरच्या हाती हि केस आहे, हि जनतेच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे." लोकल न्यूज चॅनल, ऐकीव माहितीवर बातमी देत होते, हे विकीला चटकन लक्षात आले .

विकीच्या पाया खालची जमील सरकली नसली, तरी हादरली जरूर होती. म्हणजे तो जखमी, ज्या घरा जवळ ठेवला होता, तो त्या घरातल्या लोकांना दिसलाच नाही? हे कसे शक्य आहे? कंपाउंड वॉलच्या कॉलबेलची बेल वाजवली तेव्हा, वरच्या खोलीत लाईट लागला होता.

टीव्हीच्या स्क्रीनभर ठळक अक्षरात बातमी दाखवली जात होती. - चंद्रशेखर किडन्याप! धमकीचा फोन!

विकीच्या पायाखालची जमीन, या बातमीने सरकली. म्हणचे ती चुचुन्द्री पोलिसात गेली होती तर! विकी खंडणीची बॅग हस्तगत करायला निघाला होता, तो मटकन खाली बसला. साला, म्हणजे सगळी मेहनत मातीत गेली! आता कॅफे रुद्राक्षला जाणे म्हणजे, पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासारखे होते!

पण असे हातपाय गाळून चालणार नव्हते. त्याने नव्याने एक सिगारेट पेटवली. आणि तो विचारात गढून गेला.

०००

इन्स्पे. इरावतीने, आशाने आणून ठेवलेला कॉफीचा मग तोंडाला लावला. कॉफी तिला हवी तशी, थोडीशी कडवट होती. तिच्या समोर फॉरेन्सिस लॅब रिपोर्ट्स, फिंगरप्रिंट रिपोर्ट्स, आणि अपघाताचे ऑन द स्पॉटचे फोटो पडले होते. तिचे डोके विचार करून थकले होते. गरम कॉफीने तिला बरे वाटले. तीने पुन्हा चंद्रशेखरच्या केसवर काँसंट्रेट केले.

इरावतील चंद्रशेखरच्या ऑथराईज्ड फिंगरप्रिंट्स मिळवण्यासाठी, साठी थोडी कसरत करावी लागली होती. त्या साठी तिला पासपोर्ट ऑफिसने मदत केली होती.

फिंगरप्रिंटच्या रिपोर्टप्रमाणे, गाडीत दोन माणसांच्या हाताचे ठसे सापडले होते.एक तर चंद्रशेखरच्या हाताचे होते. आणि ते असणे स्वाभाविकच होते. पण दुसरे ठसे, कोणी तरी कार मध्ये असल्याचे दर्शवत होते. विशेष म्हणजे ते ठसे फक्त समोरच्या सीटच्या आसपासच होते. मागील सीटवर नव्हते. म्हणजे ती व्यक्ती अपघाताच्या वेळेस गाडीत होती किंवा नंतर गाडीच्या पुढील भागात वावरली होती! फॉरिनसीसीच्या रिपोर्ट प्रमाणे, त्या कापडाच्या तुकड्यावरले डाग रक्ताचेच होते. आणि ते गाडीतील रक्ताच्या माणसाचेच होते! मातीत सापडलेला डाग, इरावतीच्या अपेक्षेप्रमाणे इंजिन ऑईल्सचा होता. या वरून एक छोटेसे चित्र स्पष्ट होत होते. एका गाडीला अपघात होतो. समोरून येणारी गाडी थांबते. त्यातील व्यक्ती अपघातग्रस्थ जखमी आपल्या गाडीत घेऊन जाते. जखमीला गाडीत ठेवताना, जखमी माणसाच्या कपड्याचा तुकडा काटेरी झुडपात अडकतो.

कस्तुरी! चंद्रशेखरची बायको. सुंदर आणि स्मार्ट आहे. पण चंद्रशेखरच्या आणि तिच्या वयात बरेच आंतर दिसतंय. तिचे चंद्रशेखरशी संबंध टेन्स असावेत. तिला सिगारेट आणि नशील्या पदार्थाचे व्यसन असावे. किमान दारूचे तरी. तिच्या म्हणण्या प्रमाणे तिला, चंद्रशेखरला किडन्याप केल्याचा फोन आला. आणि तोही चंद्रशेखरच्याच फोनवरून? त्याहून हि गमतीचा भाग, काय तर बारा तास उलटून गेले तरी, खंडणीची रक्कम कोठे आणण्याची याचा, किडन्यापरने फोनच केला नाही म्हणे! किडन्यांपिंगची बातमी खरी का पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम पेरलेली? अपघाताची गाडी चंद्रशेखर चालवत होता, हे स्टियरिंग वरील अंगठ्याचा आणि इतर ठश्यावरून दिसत होते. अपघात झाल्यावर तो गेला कोठे? खरे तर त्याला नेले गेले होते. पण कोण? ती गूढ व्यक्ती कोण आहे? जिने चंद्रशेखरला उचलून नेले. या प्रश्नांची उत्तरे इरावतीला हवी होती. पण ती काळाच्या उदरात ती दडली होती.

तिने राकेशला फोन लावला.

"राकेश, चंद्रशेखरचा मोबाईल नंबर, तूच मला पाठवला आहेस. तेव्हा त्याचे आत्ताचे लोकेशन मिळते का ते पहा. त्याच फोन वरून कसुरीला किडन्यापरची धमकी आली होती!"

"कोण कस्तुरी? कोण किडन्यापर?" राकेश गोंधळा होता.

"सॉरी, मला फक्त लोकेशन हवाय!" तिने फोन कट केला. राकेशला सगळ्या फॅक्ट माहित आहेत असे तिने गृहीत धरले होते.

तिचा मोबाईल वाजला. कस्तुरी?

"बोला!"

"मॅडम, काही वेळा पूर्वी त्या किडन्यापरचा फोन आला होता!"

"व्हॉट? काय म्हणाला?" म्हणजे ती किडन्यांपिंगची बातमी खरी होती? कि हे एक्सटेंडेड नाटक?

"रात्री आठ पंच्चावनला, लॅपटॉपच्या ब्याकसॅक मध्ये पैसे भरून, कॅफे रुद्राक्ष मध्ये ठेवायचे आहेत!"

इरावतीचे डोके कॉम्युटरच्या वेगाने काम करू लागले. बातमी खरी असो व खोटी, ऍक्शन घ्यावी लागणार होती.

"कस्तुरी, इतके पैसे आहेत का घरात?"

"हो, आहेत!"

"बागेत भरून ठेवा."

"ठेवलेत!"

हि बया, किडन्यापरच्या घेण्या पेक्ष्या, त्याला देण्यासाठीच उतावळी झालेली दिसती आहे! हिचाच तर गेम नसेल?

" ओके. तूम्ही वेळेवर जा. कोणत्या टेबल नंबर वर ठेवणार आहात?"

"चार नंबरच्या!"

" बिनघोर ठेवून या, आमची माणस तुमच्या बॅगवर नजर ठेवून असतील!"

तिने फोन कट करून,तिने शिंदे काकांना आणि शकीलला बोलावले. सर्व प्लॅन तयार झाला. शकील, शिंदे आणि आजून चारजण साध्यावेशात रात्री आठ वाजता कॅफे रुद्राक्ष कडे रवाना झाले. खरे तर तिलाच यात लीड करायला हवे होते. पण तिला एका गुप्त मिटिंग साठी, जोग साहेबानी बोलावले होते.

आठ दहाला कस्तुरी आपल्या लालचुटुक कारमधून, कॅफे रुद्राक्ष कडे जाण्यासाठी कंपाऊंडवॉल बाहेर पडली, तेव्हा तिच्या कारचा पाठलाग, एक बाईकस्वार करत होता! ती अर्जुना होती!

०००

अर्जुनाने आपले जिनचे जॅकेट अंगातून काढून झटकले. कस्तुरी घरातच होती. थोड्यावेळात ती दारूचा ग्लास घेऊन बेडरूम समोरच्या टेरेसमध्ये बसून, दारू पिणार आणि मग झोपणार! अर्जुनाचे आजचे काम संपले होते. ती निघण्याच्या बेतात होती. तितक्यात कस्तुरी कॉलेज स्टुडंट सारखी, ब्याकसॅक पाठीला लावून, तिच्या गाडीकडे जाताना अर्जुनाला दिसली. हि बया रात्रीच कुठं निघाली? तिने मोबाईल काढला. इरावती मॅडमला इन्फॉर्म करायला हवे होते. पण दुर्दैव मोबाईलची बॅटरी संपली होती. तिने घाईत बाईकला किक मारली.

कॅफे रुद्राक्ष जवळ कस्तुरी उतरली. सोबत तो सॅक होती. चार नंबरच्या टेबलवर ती बसली. तिने घड्याळात पहिले. आठ चाळीस झाले होते. अजून पंधरा मिनिटे बाकी होती. या चंद्रुमुळे आज हे पाच लाख हातचे जाणार. हा विचार तिच्या मनात चौथ्या वेळेस डोकावून गेला. तिने एक कॉफी मागवली. ती पितापिता आसपास नजर टाकली, इन्स्पे. इरावतीच्या म्हणण्या प्रमाणे, पोलीस कोठे दिसत नव्हते! अचानक एक हट्टी कट्टी मुलगी, डोक्यावर हेल्मेट तसेच ठेवून, समोरच्या टेबलवर येऊन बसली. काय विचित्र कार्टी, आता चेहरा झाकणार हेल्मेट घालून, हि बया कॉफी कशी पिणार? आठ पंचावनला शंभराची एक नोट कॉफीच्या मगाखाली ठेवून, कस्तुरी झटक्यात निघून गेली.

स्टुपिड कस्तुरी, ती सॅक तशीच विसरून गेली कि! अर्जुनाला ते हेल्मेट मधून दिसत होते. अर्जुना झटक्यात उठली. तिने ती सॅक पाठीला लावली. तेव्हड्यात तिच्या मानेला थंडगार धातूचा स्पर्श झाला.

"हॅन्ड्स अप!"

तो पिस्तुलाचा स्पर्श होता, याची अर्जुनाला जाणीव झाली. धोका!

******

Rate & Review

Rajan Kulkarni

Rajan Kulkarni 2 years ago

Mukta punde

Mukta punde 2 years ago

Sudha

Sudha 2 years ago

Manali Sawant

Manali Sawant 2 years ago

Manasi

Manasi 2 years ago