Vinuappaa books and stories free download online pdf in Marathi

विनुअप्पा

कथा -

विनुअप्पा

-----------------------------------------------

घराला घरपण देणारी स्त्री , घर टिकवून ठेवणारी स्त्री , घराची वैभव-लक्ष्मी म्हणजे स्त्री , हे आपल्या परिचयाचे आणि अनुभवाचे दृष्य -रूप आहे ,

जे खरे पण आहे.वरील उदाहरणाला शोभेल असा एक पुरुष आहे .

हे लिही पर्यंत ..दुर्दैवाने .." असा एक पुरुष होता " असा उल्लेख करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे..

त्यांचीच ही कहाणी आहे.

विनयकराव असेच म्हणू या त्यांना , आमच्यात अरे तुरे असे एकेरी बोलण्याचे नाते नव्हते .

ते वयाने मोठे असलेले माझ्या ऑफिसातले सहकारी मित्र , त्यांच्याशी बोलतांना “अहो-जाहो ,

तुम्ही "असेच शब्द आम्ही वापरत असायचो .

त्यांचे ऑफिस –रेकॉर्ड मध्ये असेलेले , व्यावहारिक नाव विनायक विष्णू वकील असे होते .

जुन्या पिढीतील त्यांच्यातला कुणी एकजण खूप निष्णात वकील म्हणून प्रसिध्द होऊन गेले

त्या कर्तबगार पुर्वजाचे व्यावसायिक नावच पुढे घराण्याचे आणित्यांचे आडनाव म्हणून परिचित झाले.

विष्णू विनयक यांना सारेजण . व्ही –व्ही अशा नावाने बोलावत असत .

जसाजसा त्यांच्याशी घरगुती स्वरूपातला परिचय होत गेला तेव्हा कळले की त्यांच्या पारिवारिक जीवनात त्यांचे नाव विनू-अप्पा “असे आहे .

इतकेच नाही तर त्यांच्या सौ .सुद्धा त्यांना अहो- विनुअप्पा “असे म्हणतात

मग आम्ही सारे ऑफिसातले लोक , इतर परिचत काही दिवसांनी त्यांना “विनुअप्पा “असेच बोलावू लागलो ,

थोडक्यात घरी दारी –बाहेर आणि बाजारी .सगळीकडे त्यांचे नाव आता विनुअप्पा

हे असेच रूढ होऊन गेले

त्यांना ही याच नावाची सवय लागली , कुणी- अहो विनुअप्पा “असा आवाज दिला तर ते पण “आलो हो थांबा “ म्हणून प्रतिसाद देऊ लागले.

काही माणसे सोशिकपणा हा गुण घेऊनच लहानाचे मोठे होत असतात . शांत आणि अबोल स्वभावाचे गुण विशेष एकदा लोकांनी

चिकटवून टाकले की ..पुढे किती जरी इच्छा झाली तरी अशा माणसांचे मन बोलण्यास धजत नाही

क्षणभंगुर जीवन हे मानवाचे " या काव्यातली करुण अशी वास्तवता नुकतीच अनुभवली ..

चालता-बोलता , हसता -खेळता ..काहीच आजार नसलेला हा धड -धाकट आणि घरासाठीचा कर्ता-पुरुष ..झोपी जातो ते पुन्हा .."कधीच न उठण्यासाठी .!

" हा असा अनपेक्षित ..वेदनारहित मृत्यू ..,

आजाराने खितपत पडलेल्या माणसांच्या हेव्याचा ,असूयेचा विषय होऊन बसला ,ही या घटनेतली आणखी एक बाजू .

काही असले तरी ..विनूअप्पांचे हे असे अवचितपणे जाणे चटका लावणारे होते.

विनुअप्पा सतत कार्यात व्यग्र , कामात मग्न , कामातून फुर्सात नाही , अविश्रांत श्रम करणे ..

यातच या पुरुषाचे शरीर आणि मन झिजत होते ",हे आम्ही पाहत असायचो .

या बदल्यात .काय मिळावे ? याची कधीच काही अपेक्षा नाही ...

या सर्व गोष्टी विनुअप्पा नावाचा हा माणूस करेन " हेच गृहीत धरणाऱ्यांची अपेक्षा त्यांनी नेहमी पूर्ण केली .

किती गम्मत आहे पहा – घराचा कर्ता परुष म्हणून विनुअप्पाचे स्थान किती मोठे आणि महत्वाचे असायला हवे ,पण,

त्यांच्या घरात ..एकमताने ..त्यांची पोझिशन .एक काम करणारा

पुरुष अशीच केली गेली ..तशी ठेवली गेली ..हे आमच्या नजरेने टिपलेले एक कटू सत्य होते .

माणूस मित –भाषी , कमी बोलणारा , अबोल स्वभावाचा असतो ..आमचे हे विनुअप्पा “असेच

आहेत हे जरी मान्य केले तरी ...

यातली एक गोष्ट तुमच्या नजरेस आणूनदेतो –ती म्हणजे ..विनुअप्पा म्हणजे एक रोबोट होते ,

घरातल्या माणसांनी जे जे सांगितले ते ते तर करायचे , अधिक त्यांच्या मनात काय आहे

हे ओळखून या सर्व गोष्टी विनुअप्पाच करणार “ हे वेळोवेळी विनुअप्प्ना सगळ्यांनी न बोलता समजेल

अशा वेगळ्या भाषेतून सांगितले जात असे . ज्याला आपण म्हणतो ..”नजरेच्या धाकात

रहाणार्यांना ही भाषा बरोबर समजली जाते.

विनुकाका भित्र्या स्वभावाचे होते का ?

याचे उत्तर – नाही असे आहे.

मग या माणसाने आपल्याच घरात, आपल्याच माणसांच्या पुढे अशी लीन-दिन –हीन वाटणारी वृत्ती का बरे स्वीकारली असेल ?

विनुअप्पांच्या पत्नी .कजाग नव्हत्या , भांडखोर आणि हेकेखोर नव्हत्या ..

फक्त त्या हट्टी होत्या , आपल्या शब्दांच्या तालावर विनुअप्पाच काय, सगळ्यांनीच

नाचले पाहिजे असा त्यांचा दुराग्रह होता , याचे कारण ..त्यांच्या माहेरच्या श्रीमंतीत होते .

लाडाने वाया गेलेले बालपण आणि मोठेपणी नंतर त्यात पडलेली अधिकची भर .

आईचे असे वागणे ..मुलांचे “बाळकडू “ठरले . अशा रीतीने विनुअप्पा .. पगार

झाला की तो रीतसर बायोकोच्या हवाली करून ..स्वतहा .खर्चासाठी त्यांच्या समोर हात पसरीत दिवस काढणार .

विनुअप्पा कधी मोठ्या आवाजात बोलेले आहेत असे कधी कुणी ऐकले नाही . कारण त्यांचा

आवाज त्यांच्या घरातील सर्वांनी मिळून इतका दाबून टाकला होता की, विनुअप्पाचे स्वर-यंत्र

कधी ही वरच्या पट्टीत काम करू शकेल “ अशी अपेक्षा सोडून देण्यातच शहाणपणा होता.

विनुअप्पाचे मनाने हौशी असणे ,त्यासाठी आवश्यक पैसा असणे या दोन्ही बाबतीत ते नशीबवान होते ..

कुणी काही म्हणण्याआधी विनुअप्पा या इच्छा पुरवत . त्यामुळे एक झाले की

याच गोष्टी विनुअप्पांनी न सांगता ही .."केल्याच पाहिजेत .असे गृहीत धरले जायचे

.तेंव्हा अशा गोष्टी कर्तव्याच्या नावाखाली " कधी कधी मना विरुध्द आणि नाईलाजाने कराव्या लागतात .

"विनुअप्पांच्या मनाचा अशा पद्धतीने त्यांच्या घरात कधीच विचार केला जात नव्हते .

आपल्याला काहीच विचारले जात नाही , फक्त आम्ही असे ठरवले आहे, आम्ही असे करणार आहोत “ हे सांगितले जाते “

न कळतपणे असे दुय्यम स्थान –नंतर अगदी नगण्य होत गेले आणि ते विनुअप्पांच्या गळ्यात बळजबरीने टाकले गेले आहे,

त्याबद्दल त्यांना नक्कीच काही तरी वाटले असणार “

हे लक्षात घ्यावे याची कुणाला कधीच गरज वाटली नाही " ही खंत ,याबद्दलचा विषाद .

त्यांना मनात वाटत होता का ?

विनुअप्प्ना प्रयात्क्ष्यपणे आणि आडून –आडून सुद्धा हे सारे बोलून दाखवावे असे कधीतरी वाटले असेल का ? .

चुकून कधी धीर करून बोलायचे ठरवले असते तर ..?

आपल्याच माणसाला दुखः का द्यायचे.

त्या पेक्षा न बोलता फक्त काम आणि कामं करीत राहायची " ते पण कधी काही न बोलता ,

असे साधे सरळ सूत्र ..विनुआप्पांनी आपले जीवन –सूत्रच बनवून टाकले असावे.

आम्ही त्यांच्यवर अवलंबून आहोत , ते आहेत म्हणून आमचे चालले आहे .त्यांच्या शिवाय आमचे काही खरे नाही ..

वी आर लकी की ..ते आमचे कुणी आहेत .." या अशा शब्दात घरातल्या माणसांनी केलेल्या

स्तुतीने हुरळून जाण्या इतके ते उथळ मनाचे नव्हते .

त्यांना करावी लागणारी सगळी कामे करणे एखादे वेळी त्यांच्या शारीरिक क्षमतेच्या बाहेरचे झाले असेल “

तेव्हा त्यांनी मदतीच्या अपेक्षेने कुणाला म्हटले असतले तर –

त्यांना उलट ऐकावे लागले असेल –

काय विनुअप्पा ,कसे समजत नाही तुम्हाला ?

तुम्हाला नोकरी नाहीये , निवांत आहात , पेन्शन मिळते भरपूर

पुन्हा पैसा गाठीशी ..आराम तर करताय तुम्ही घरात राहून ..

आमचे काय ? आम्ही तर रिकामे नाहीत कुणी , नोकर्या आहेत आम्हाला .

मग ,आता जे काम पडलाय अंगावर ..तर लगेच मदतीची अपेक्षा ..करता का ?

आधीची गोष्ट वेगळी होती ..

आम्ही लहान , तुम्ही एकटेच मोठे .म्हणून करावी लागली तुम्हाला कामे ,

आता तर पूर्णवेळ रिकामे आहात तुम्हे ..

आमच्या नोकरीचा काळ बघा ..किती टेन्शन असते आम्हाला ,

सगळ्यागोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या शिवाय कधी समजू नयेत का ?

असे कसे तुम्ही ? आणि पुन्हा

एकेकाने सुरु केले असेल असे बोलणे -

मला आधीच वेळ नाहीये , माहिती आहे ना तुम्हाला ?

,तरी ..मलाच .म्हणताय तुम्ही वा.....रे..वा विनुअप्पा

तुम्हाला तर माहिती आहे विनुअप्पा -

मला होत नाही , मला कसे जमेल ,?

मी नोकरी करून पुन्हा हे कसे करू ?

विनुअप्पा –हे बघा -

मी केले असते हो ..पण वेळच कुठाय मला ,

अहो विनुअप्पा -

तुम्ही आहात म्हणून..निदान आम्ही काळजीत तरी नसतो ..

हे माझे काम खूप दिवसाचे पेंडिंग आहे, तुम्ही करून टाका

बघा ,घाई नाही फारशी..पण तुमच्या भरवशावर राहू ना ?

इतकी प्रती-उत्तरे मिळाली असती ,

त्यामुळे विनुअप्पाच्या बोलण्याचा शेवट -

-बरं राहू दे, करतो मीच , या वाक्याने होत गेला ,

शेवटपर्यंत यात काहीच बदल झाला नव्हता .

पुन्हा सांगतो –

त्यांचे अचानक जाणे ..खूप शोकिंग आहे ,

या धक्क्यातून - शोकमग्न मन, दुखात बुडालेले घर . सावरेल .

.पण..ही वास्तू ..ती कशी सावरेल स्वतहाला ..?

कारण विनुअप्पा –या पुरुषाचा त्या वास्तूतला वावर एखाद्या गृह-स्वामिनी सारखा ,

घरातल्या कर्त्या बाई-माणसा सारखा होता , विनुअप्पा त्या घरातले एकमेव कर्ते-पुरुष होते . त्यंचे दोन्ही

चिरंजीव स्वतहाला अजून लहान पोरं समजत , त्यांचे मजेत चाललेले बालपण .विनुअप्पा मुळे खूपच

मस्त चालू असतांना ..त्यांना घरातील “पुरुष “ होण्याची अजिबात घाई नव्हती .

मुलींचे काय .लग्न झाले ..,मस्त संसारात रमून गेल्या . आणि त्यांचे नशीब विनुअप्पा पेक्षा

जास्त जोरदार होते .. कारण दोन्ही मुलींचे सासर आणि माहेर एकाच गावात ..

त्यामुळे ..

मुलगी –जावाई , व्याही ..असे सोयरे धायरे .विनुअप्पच पाहुणचार घायला कायम इकडेच

असायचे . मुलींच्या आईला ..खूप कौतुक ..लेकीची , जावयाचे

,त्यांनी नेहमीच यायला पाहिजे ,

असा त्यांचा आग्रह ,मग आज्ञाधारक लेक- जावाई .सासुरवाडीला असायचे .

याबद्दल विनुअप्पांना विचारावे ? अशी पद्धतच विनुअप्पांच्या बायकोने ठेवली नाही .

पाहुणे येणार ..त्यांच्या साठी हे हे आणा , अशी ऑर्डर सुटायची .आणि मग यादी घेऊन

दिवसभर विनुअप्पा बाजार फिरत बसायचे.

घड्याळ काटे –त्यातली वेळ .आणि विनुअप्पा यांची फार दोस्ती नव्हती . किती वाजले ?

हे पहायचे नाही ..बस ..समोर असेल ते काम उरकत राहायचे .

अंगण असो व परस, टेरेस असो वा ग्यालरी , तळ-मजल्यावरचा पिण्याच्या पाण्याचा नळ असो,

किंवा वरच्या गच्चीवर असलेला पाण्याचा हौद असो .

त्यासाठी दिवसभरातून खालून -वर केलेली ये-जा " याची मोजदाद त्यांनी कधी केली नसेल ,

विनुअप्पा अशा स्वरूपात बिझी आहेत हे पाहण्याचीच सवय सगळ्यांना आपोआपच लागली .

.ती इतकी की ..त्यात काही गैर आहे,असे कधी कुणाला वाटले नसावे .

आणि .असे वाटले असते तर ..त्यांना मदत झाली असती थोडीफार कदाचित.

पण तसे फार वेळा घडले नाही.

त्यांच्या अचानक जाण्याचे कारण ,त्याबद्दलचे निदान ..डॉक्टरांनी केले असेल ही .. .

इतरांना मात्र असे वाटते आहे की ..त्यांचे शरीर आणि मन केलेल्या आणि करावे लागलेल्या अतीव परिश्रमाने झिजले असेल . .

खरेच आहे हो ..किती महत्वाचे आहे हे ,

स्वतः -स्वतःकडे लक्ष देऊन काळजी घेणे

पण आपण याकडे लक्ष देत नाहीत .आणि

आपले .आयुष्य तसेच ओढत ओढत नेत जगत असतो .

आराम हवा असतो आपल्या देहाला , स्थिरता हवी असते मनाला .

नेमके हे औषध उपचार करण्याची बुद्धी,आणि जाणीव विनुअप्पाना झाली नसेल का ?

विनुअप्पा जीवाला चटका लावून गेलेले एक सहवासातील माणूस , नाही म्हटले तरी

मनात एक हुंदका दाटून येणारच

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा –विनुअप्पा

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो-९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------