Sparsh - 15 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 15

दुपारची सायंकाळ झाली होती पण राहुलचा फोन काही आला नव्हता ..इकडे माझी बेचैनी अधिकच वाढू लागली होती ...जेवणातसुद्धा मन लागत नव्हत ..जेवण करून सर्व झोपायला गेले आणि मी टेरिसवर मोकळ्या हवेत पोहोचलो ..तितक्यात कुणाचा तरी फोन आला पण तो राहुलचा नव्हता म्हणून मी उचलला नाही ..फोन कट झाला आणि पुन्हा एकदा आला आणि कंटाळून शेवटी उचललाच .." हॅलो ..आपण अभिच आहात ना ? " , ती म्हणाली आणि मी उत्तर देत म्हणालो , " आपण कोण ? " ..ती समोरून हसत म्हणाली .., " वा !! काय लोक आहेत ना काही तासाआधी मला पाहायला आले होते नि एवढ्या लवकर विसरले पण बघा बघा !!..लग्नानंतर काही खर दिसत नाहीये माझं .."

" अग हो थोडा विचारात होतो म्हणून आवाज ओळखला नाही आणि काय म्हणालीस लग्नानंतर म्हणजे होकार आहे घरून ? " मी उत्सुकतेने विचारू लागलो आणि तीही थोडी भाव खात म्हणाली , " हम्मम ..हो आहे तर सही ..मी सात - आठ मुलांना नकार दिला न म्हणून यावेळी घरच्यांनी मला विचारलंच नाही ..मी स्वतः जाऊन जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी हालचाल करायला सुरुवात केली ..मग वाटलं की ही खुशखबरी स्वताच द्यावी म्हणून फोन केला ....आता मिटली का चिंता ?? .." ती समोरून हसत होती आणि तिच्यासोबत मीही हसू लागलो ..तिच्यासोबत काही क्षण असेच गेले .." बर ऐक ना मानसी आपण भेटू शकतो का उद्या.. तुला हवं असेल तरच ..कॉफीवर .." , मी तिला विचारल आणि तीही मला भेटायला तयार झाली ..तिच्या मागून तिचे बाबा आवाज देत होते त्यामुळे तिने लगेच फोन ठेवून दिला ...

सात वर्षे ...किती मोठा काळ असतो ना ?? ..कधीतरी तिला मनातलं सांगण्यासाठी तडफडत होतो ..आता तर ती माझी होणार या कल्पनेनेच झोप येणार नव्हती ..टेरिसवर बसून होतो तेव्हा वाटलं सर्व लोकांना ओरडून सांगावं पण एकदा नजर सर्विकडे टाकली आणि लोक मारतील म्हणून स्वतःच्या भावनांवर ताबा मिळविला ..विकास , शाश्वत सर्वानाच रात्रीच त्रास देऊ लागलो ..आधी फोन उचलुन शिव्या देणारे ते तिचा होकार कळल्यानंतर मात्र फोन ठेवायला तयार नव्हते ..तिघेही फोनवरच गप्पा मारत होतो ..पाहता - पाहता रात्रीचे 12 वाजले होते आणि शेवटी झोपायला गेलो ..मला तर आता झोपच येणार होती ..आईला बातमी सांगण्यासाठी सकाळची वाट पाहावी लागणार होती ..कशीतरी रात्र काढली आणि माझ्या स्वप्नानी अचानक भरारी घ्यायला सुरुवात केली ..
सकाळी - सकाळी आईला सर्व सांगितलं आणि तिनेही सर्व नातेवाईकाना फोनवरून कळविल होत .आईच्या आनंदाला आता कुठलीच सीमा नव्हती ..मी ते सर्व कुतूहलाने पाहू लागलो ..आईने सकाळी- सकाळीच माझं तोंड गोड केलं होतं शिवाय शाश्वत , सोनाली - विकास सकाळीच घरी येऊन गेले होते ..घरच सर्व वातावरण कस उजळून निघालं होत ..आई सकाळपासून फोनवर बिजी होती ..तिने तर आतापासूनच लग्नाची तयारी सुरू केली होती आणि मी ते सर्व कुतूहलाने पाहत होतो ..
मानसीने दुपारी बारा वाजता भेटायला बोलविल असल्याने मी माझी तयारी सुरू केली ..आमच्या लग्नासाठी होकार मिळल्यानंतर मी पहिल्यांदाच तिला भेटायला जाणार होतो .त्यामुळे थोडं सजून जायचा मूड होता ..आता तर माझा ड्रेसिंग सेन्स पण सुधारला होता ..त्यामुळे मस्त सजून निघालो होतो ..आईला तिला भेटायला जाणार सांगितलं होतं त्यामुळे दुपारचं जेवण तिच्यासोबतच करणार होतो ..पुन्हा एकदा आपली बाईक काढली .थंडीची वेळ असल्याने रस्त्यावर फार अशी गर्दी दिसत नव्हती ..थोडी फार गर्दी त्यातही कमी ट्रॅफिक त्यामुळे तिथे पोहोचायला देखील जास्त गडबड करावी लागणार नव्हती ..गाडीवरही सतत तिचाच विचार येत होता ..लग्नानंतर तिचा चेहरा किती खुलला असेल न ?..त्या चेहऱ्यावरची खुललेली लाली पाहण्यास मी उत्सुक होतो ..लग्न म्हणजे पुन्हा एकदा नव्याने प्रेम होणं ..त्यात माझं तर तिच्यावर आधीच प्रेम होतं त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दुप्पट खुशी जाणवत होती ..तिच्याच विचारात रस्ता सर करू लागलो ..जात असताना रस्त्याच्या कडेला एक आजी फुल विकत होती ..मी लगेचच गाडी थांबवली ..तिच्याकडे वेगवेगळ्या कलरच्या फुलांचे बुके होते ..त्यात गुलाबाच्या फुलांनी मला त्यांच्याकडे आकर्षित केलं ..माझी नजर पडताच मी त्यांना आपलस करून घेतलं ..सकाळची वेळ असल्याने आजीबाईकडे सुटे पैसे नव्हते ..ती इकडे - तिकडे शोधू लागली ..मी तिच्या हातात पाचशेची नोट दिली आणि निघू लागलो ..तिने मला पैसे परत करण्याबद्दल विचारलं पण मला आज त्याची गरज नव्हती .मी तिच्याकडे बघून फक्त हसलो आणि तिने मला अमूल्य असे आशीर्वाद दिले ...मी पुन्हा एकदा गाडी स्टार्ट केली आणि रस्ता सर होऊ लागला ..सुमारे अर्ध्या तासाने कॉफी शॉपवर पोहोचलो ..कॅफे मित्राचाच होता ..गाडी पार्क करून आतमध्ये पोहोचलो पण ती अजूनही आली नव्हती ...तिला फोन करून त्रास देण्यापेक्षा तिची वाट पाहू लागलो ..मित्राशी बोलून सेपरेट टेबल बुक केला होता त्यामुळे आम्हाला कुणीच डिस्ट्रब करू शकणार नव्हतं ..तेव्हाच ती स्कुटीवर येताना दिसली ..गाडी पार्क केली आणि चेहऱ्यावर बांधलेला स्कार्फ काढू लागली ..मला वाटलं होतं की ती नटून - सजून मला भेटायला येईल पण तस काहीच झालं नव्हतं उलट ती नेहमीसारखी साध्याच वेशात आली होती ..पण मला त्याचीही पर्वा नव्हती कारण ती मला तशीही फार सुंदर दिसत होती ..शेवटी ती माझ्याजवळ येऊन पोहोचली ..मित्राशी काही वेळ दोघेही बोललो आणि वेटर आम्हाला आमच्या टेबलकडे घेऊन गेला ..तिने आपला स्कार्फ , बॅग बाजूला ठेवली ..केस एकदा बांधून घेतले ..मी तसाच तिला न्याहाळत होतो ..तेव्हढ्यात वेटर आला आणि मला इच्छा नसतानाही तिच्यावरून नजर हटवावि लागली ..मी माझ्या हातात असलेला गुलदस्ता तिला दिला आणि ती त्या फुलांचा सुगंध स्वतात सामावून घेऊ लागली .तिने कॉफी ऑर्डर केली पण मी घरी खाऊन येणार असल्याच सांगितलं होतं नाहीतर उपाशी राहावं लागणार होतं त्यामुळे तिला हट्ट केला आणि ती खायला मानली .. ती चेअरवर सेटल झाली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली , " बोल अभि काय म्हणतोस ..काही काम होत का ? " ..मी हलकेच स्मित करत म्हणालो , " काही काम नाही ग खूप दिवस झाले भेटलो नाही शिवाय काल पण फार कमी वेळ मिळाला म्हणून थोडं शांतपणे बोलता यावं म्हणून बोलावून घेतलं .." ,

" अस व्हय !! ए पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायच आहे ..चालेल ना " , ती माझ्याकडे पाहत विचारू लागली..मी तिला परवानगी दिली आणि ती म्हणाली , " अभि काल मी बाबांसमोर बोलू शकले नाही पण तुला सांगायचं होत ..मला माझी पी. एच .डी . पूर्ण करायची आहे तुला काही प्रॉब्लेम नाही न " , आणि मी हसत म्हणालो , " अजिबात नाही ..तू तुझे सर्व निर्णय घेऊ शकतेस बिनधास्त .." मी थांबत नाही तेव्हांच ती म्हणाली , " आणखी एक ..शिक्षण पूर्ण करायचं म्हटलं तर कदाचित मी तुझ्याबरोबर कॅनडाला राहू शकणार नाही ..सुट्ट्यात येईल तुला भेटायला पण नेहमीसाठी सध्या तरी येऊ शकणार नाही ..प्लिज समजून घेशील मला .."

आता मी थोडा शांत झालो ..तिच्या या प्रश्नाचं उत्तर मुळात माझ्याकडे नव्हतंच ..मला शांत पाहून ती म्हणाली , " म्हणजे तुला हे मान्य नाही ..इट्स ओके काही हरकत नाही ..मी मॅनेज करून घेईल .." तिच्या चेहऱ्यावर उदासीचे जाळे पसरले होते ..मला तिला अस पाहणं शक्य नव्हतं म्हणून चुप्पी तोडत तिला म्हणालो , " मानसी काल तू म्हणाली होती न की आई तुला घेऊन आली की तूच तिला घेऊन आलास .." ती नाराजीच्या सुरात म्हणाली , " हो मग ? "

" मग काही नाही ..आता आपल्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे म्हणून तुला काहीतरी सांगायचं आहे ..( तीच फक्त माझ्याकडे लक्ष होत पण तीच मन काहीही ऐकण्यास तयार नव्हत मी तिच्याकडे दुर्लक्ष करून बोलू लागलो ..) मुळात तुला ही गोष्ट माहिती नाही ..एक मुलगी होती ..तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता ..ती चालत असताना माझा नकळत तिला स्पर्श झाला ..माहिती नाही त्या स्पर्शात काय जादू होती पण तिला पाहताच तिचा झालो ..कॉलेजला असताना फक्त तिचाच विचार असायचा ..तिला चोरून - चोरून पाहण्यातदेखील खूप मज्जा होती ..कधी वाटायचं की तिला त्याच क्षणी जाऊन मनातलं सांगावं पण हिम्मत गोळा करू शकलो नाही ..ती कधीकधी माझ्या घरी यायची ..तेव्हा आईने मला सांगितलं होतं की मला हीच सून हवी आहे ..त्याच वेळी ठरवलं होतं की ती आपल्याच आयुष्यात हीच असेल जीवनसाथी म्हणून ..मी तिला मनातलं सांगायचं ठरवलंच होत की सोनाली म्हणाली हे क्षण जग..ये पुन्हा कधीच मिळणार नाहीत.. मनातलं काय केव्हाही सांगता येईल आणि मला तीच म्हणणं पूर्णतः पटलं ..मला जस हवं तसच ती हळूहळू माझ्या जवळ येऊ लागली ..स्नेहसंमेलनाला तर खुद्द तिने मला डान्सला विचारलं त्यामुळे खूप खुश होतो ..( आता तिला कळाल होत की मी तिच्याबद्दलच बोलतोय म्हणून लक्ष देऊन ऐकू लागली ..) ..जेव्हा तिने पहिल्यांदा डान्समध्ये बक्षीस जिंकल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून लक्षच हटत नव्हतं .पहिल्यांदाच अस घडलं होत की माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद आला होता त्यामुळे माझ्यासाठी तो खूप मौल्यवान क्षण होता...नंतर तिच्या वाढदिवसाला सरप्राइज दिलं आणि तेव्हा ती खूपच खुश झाली ...तिलाही माझ्यावर विश्वास पटायला लागला होता ..हे सर्व झाल्यावर आता मला तिला आपल्या मनातील सांगायचं होत ..म्हणून ट्रॅडिशनल डे निवडला ..ती त्यादिवशी खूप सुंदर दिसत होती ..शाखेतील संपूर्ण मूल तिच्याकडेच पाहत होते ..मला तिला पाहताच सांगायचं होत की तू खूप छान दिसते आहेस पण कुणीतरी राहुल ने येऊन तिची स्तुती केली आणि मला त्याचा राग आला म्हणून मी दिवसभर तिच्याकडे पाहण्याच टाळत गेलो ..त्यादिवशी तिची स्तुती तर सोड पण मी साधं बोललो सुद्धा नाही ..सायंकाळी माझा मूड छान झाला होता आणि तिला मनातलं सांगायचं ठरवलं ..तिला वेड्यासारखं सर्विकडे शोधत होतो ..पण ती कुठेच सापडली नाही शेवटी इलेक्ट्रिकल शाखेला ती सापडली ..बघितलं तर तिला राहुल तिला प्रपोज करत होता आणि मी ते सर्व समोर उभा राहून पाहत होतो ...खर तर तिने त्याला होकार कळविला नाही पण ती जशी त्याच्या मिठीत गेली .माझे तिच्या आयुष्यात परत येण्याचे सर्व रस्ते बंद झाले ...ती राहुलची झाली म्हणून तिच्याशी बोलणंच सोडून दिलं ..मग तिचा राग यायचा .तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा होत नसे ..कदाचित म्हणूनच शेवटच्या वर्षाला तिच्यासोबत डान्ससुद्धा केला नव्हता आणि तिलाही त्या वर्षी डान्स करता आल नाही ..खर तर तिच्यावर राग नव्हता पण राहुलवर मात्र होता ..रागातच सर्व काही सोडून कॅनडाला गेलो ..तिथे तीन वर्षे कसेतरी काढले पण तिच्या आठवणीने जगू दिलं नाही ..तिच्यासाठी एवढं बेचैन झालो होतो की ती एका क्षणांसाठी जरी आयुष्यात परत आली तरी स्वीकारायला तयार झालो ..पण तेव्हा माहिती होतं की ती माझी होऊच शकणार नाही आणि कदाचित हे सत्य मी स्वीकारलं ..काही दिवसाआधी कॉलेजला आलो तेव्हा ती पुन्हा दिसली आणि जून सर्व आठवलं ..तिच्याबद्दल जाणून घेतलं तेव्हा कळाल की तीच लग्न झालं नाही आणि राहुल ला भेटलो ..तेव्हा जाऊन त्यांनी सांगितलं की तिने होकार दिलाच नव्हता ..तो सरळ तुझा गैरसमज झाला ..राहुलच लग्न झालं होतं म्हणून त्याच तिच्याशी लग्न करण्याचा संबंध नव्हता ..आणि शेवटी राहुलशी बोलून सर्व काही जळूवून आणलं ..आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर ..तू फक्त एका क्षणासाठी आयुष्यात यावी हीच अपेक्षा केली होती आणि मला त्यापेक्षा जास्तच मिळालं ..आयुष्यभरासाठी तुझ्याशी नाव जोडलं जाईल यापेक्षा मला आणखी काहीच नको ..तू मला हक्काचे चार दिवस दिले तरी खूप आहे ..बाकी तुला हवं ते कर मी तुला कधीच अडवणार नाही " , मी एका श्वासात म्हणालो..

ती माझ्याकडे पाहत होती आणि अचानक तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ..मी तिला रुमाल देत विचारू लागलो , " काय ग काय झालं ? " आणि ती अश्रू पुसत म्हणाली , " काही नाही रे असच ..एवढं सार घडलं आणि मला कळाल सुद्धा नाही..हो पण तू एकदा बोलायला हवं होतं माझ्याशी ..मी तेव्हाच तुला समजावून सांगितलं असत त्याने कमीत कमी तुला त्रास तरी झाला नसता .."

मी हसत म्हणालो , " हीच तर चूक केली मी असो पण आता सर्व ठीक आहे त्यामुळे हे अश्रू वगैरे नकोय ..मला राग येतो ह्यांचा .." ती आता हसू लागली होती ..एव्हाना ऑर्डर पण आली होती आणि खातानाच तिला म्हणालो , " जर मी काही विचारलं तर रागावणार नाही ना ? " ती उत्तरली , " अजिबात नाही विचार की "

" काल न जेव्हा तू होकार कळविला तेव्हा माझं लक्ष तुझ्याकडेच होत ..माझ्या चेहऱ्यावर तो आनंद लपवूनसुद्धा लपत नव्हता पण तुझ्या चेहऱ्यावर मात्र तो आनंद कुठेच आढळला नाही ..काही झालंय का तस सांगू शकतेस तू आणि लग्नासाठी तयार नसशील तर तसपण सांग उगाच ओझं बनवून होकार कळवू नको आणि मला वाईट पण वाटणार नाही " ..तिचा चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले ..ती पेल्यातून पाणी घेत म्हणाली , " नाही रे अभि..मी खुश आहे लग्नाचं एकूण ..पण इतके दिवस बंधनात होते ..स्वतःच्या मनासारखं कधी वागताच आलं नाही म्हणून कदाचित त्यावेळी गोंधळले ..त्यावेळी नेमकं कस वागावं तेच कळाल नाही ..तू उगाच गौरमसज नको करून घेऊ ..मला काही दिवस दे त्या वातावरणातून बाहेर निघायला ..मी येईल नक्कीच बाहेर मग तो आनंदही तुला जाणवेल .."

मला हवं ते उत्तर मिळाल होत ..नाश्ता करून सुमारे एक तास वरती झाला होता ..तिलाही क्लास असल्याने मला तिला लवकरच सोडावं लागणार होतं ..शेवटी आइस - क्रीम मागवली आणि ती बाहेर पडली...हो पण जातानाही त्या मनमोहक गुलाबाच्या फुलांचा सुगंध तिला स्वतःकडे आकर्षित करीत होता ..आणि ती त्या गुलदस्त्याला वारंवार पाहत होती ..मी तिच्याकडे आताही तसाच पाहत होतो ..गाडी सुरू केली आणि ती समोर जाऊ लागली ..तिला अचानक काय झालं माहिती नाही ..तिने गाडी पलटवली माझ्याकडे पाहत एक सुंदर स्माईल दिली ..बाय करण्यासाठी हात हलविला आणि नंतर वाऱ्यासारखी झटकन उडून गेली..

कॅनडावरून इथे येऊन जवळपास सात - आठ दिवस झाले होते ..दोन्ही कुटुंबाकडून होकार मिळाल्याने आता लग्नाची समोरची बोलणी करता येणं शक्य होत ..मलाही कॅनडाला काही दिवसात परत जायचं होतं ..त्यामुळे आईला माझी सगाई करण्याची घाई झाली होती ..खर तर मलाही तेच हवं होतं नाही तर मी तिकडे गेल्यावर माझे खडूस सासरे पलटले असते तर सर्व मेहनत वाया गेली असती त्यामुळे रिस्क नको होती ..आईने आजोबांच्या मागे लागून त्यांना पण मनवल ..आता फक्त मानसीच्या बाबांना पटवायचं होत ..त्यासाठी आजोबा आणि आईला आम्ही सामोरं केलं ..मानसिचे बाबा आधी तयारच होईना पण आजोबांनी समजावल्यावर ते तयार झाले ..तरीही एवढ्या कमीत वेळात सर्व कस होईल याची चिंता त्यांनी बोलून दाखवली होती ..पण जिथे आई होती तिथे कसलं टेंशन ..ती सरळ सासरेबुवांना सांगून आली की ते सर्व आम्ही बघतो तुम्ही फक्त आपल्या मुलीला आमच्याकडे पाठवा ..इकडे माझी आई फॉर्ममध्ये होती तर मग सासरेबुवा कसे मागे राहणार ..त्यांच्याही इज्जतीचा प्रश्न होता शेवटी..त्यांनीही आईला आम्ही कशी तयारी करतो पाहाच अस सांगितलं आणि दोन्ही कुटुंबात मजेदार अशी स्पर्धा सुरू झाली ..सगाई लॉनमध्ये होणार होती आणि वेळ फार कमी असल्याने आम्ही फक्त काही जवळच्या लोकांनाच बोलवून घेणार होतो ..सासरेबुवाचे खोचट शब्द एकूण आई पण फॉर्ममध्ये आली होती ..तिने घरी येताच ..काकांना , आत्याना फोन लावले ..गावकडे आमची जॉईंट फॅमिली असल्याने सदस्यांची काहीच कमी नव्हती ..गावाकडे जसे फोन गेले तसेच दुसऱ्या दिवशी सर्व घरी दाखल झाले ..घर लहान मुलांपासून तर वृद्धांनी भरलं होत ..त्यात माझे मित्रही सामील झाले ..फक्त राहुल ने आमची पार्टी बदलून मानसीची पार्टी जॉइन केली ..आई आमच्या प्रधानमंत्री बनल्या आणि बाकी सर्व तिचे मंत्री ..तिने येताच सर्वाना आपले - आपले काम वाटून दिले आणि सर्वच आपले काम व्यवस्थतीतरित्या पार पाळत होते ..मी कॅनडाला जाण्याच्या एका दिवसापूर्वी सगाईचा मुहूर्त काढण्यात आला होता ..शाश्वत , विकास - सोनाली यांच्याकडे डेकोरेशनची जबाबदारी सोपविण्यात आली होती शिवाय इव्हेंट मॅनेजर सोबत होताच ..सर्व कस प्लॅन केल्याप्रमाणे घडत होतं ..प्लॅंनिंग करायची असल्याने ते तिघेही आमच्याकडेच जास्त वेळ राहत असत फक्त झोपायला घरी जात होते ..सर्वांनी आपल्या परीने तयारी केली होती ..आईला मी एकुलता एक असल्याने तिने सर्वानाच सगाईलासुद्धा कपडे घेऊन दिले ..दिवसभर थकत असली तरीही तिने त्या दिवसात कधीच माघार घेतली नाही उलट ती मला ताजी - तवानी दिसत होती ..भारीच होती आई पण ..

आज सगाईचा दिवस ..घरात बरीच मंडळी असल्याने पहाटे चार पासूनच सर्वांची तयारी सुरू झाली ..लहान असो वा मोठे सर्व कसे चमकून दिसत होते ..पुरुष आपली तयारी आटोपून सकाळीच हॉलला पोहोचले होते ..त्यांना देण्यात आलेले काम ते करू लागले ..तर इकडे माऊलींची तयारी काही संपेना ..आई सर्वाना ओरडून - ओरडून थकली होती तरीही तीच कुणीच एकत नव्हतं ..आणि एखादं बारक पोरग तिला खाण्यासाठी येऊन त्रास देऊ लागल की मग काहीच पाहायची चिंता नाही ..कार्यक्रम जरी सायंकाळी असला तरी सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू होती ..आई काम करून थकली होती ..त्यामुळे थोडी मदत करू लागलो ..ती माझ्यावर रागावत होती तरीही तीच मी काहीच एकत नव्हतो शेवटी मामी आईची मदत करायला आल्या आणि मी बाहेर निघालो ..लॉनमध्ये सकाळपासूनच शाश्वत , सोनाली , विकास , राहुल तयारी करत होते ...घरात कुठलंच काम नसल्याने मी तयारी पाहायला गेलो ..एव्हाना त्यांची अर्धी तयारी झाली होती ..पण सर्व काही पडद्याचा आतमध्ये होत होत ..मी पहायला गेलो आणि त्यांनी मला हाकलून लावलं ..मी काही वेळ तिथेच थांबलो आणि मलाही तयारी करायची असल्याने आईने बोलवून घेतलं म्हणून परत घरी आलो ..

सर्वाना ज्याची वाट होती तो क्षण शेवटी आलाच ..सायंकाळची वेळ ..मी तयारी करण्यासाठी लॉनकडे पोहोचलो होतो ..आज आईने माझ्यासाठी ब्राऊन कलरची शेरवानी आणली होती .मी ती परिधान केली ..केसांपासून तर मेकअप सर्वच माझी लाडकी मेहुनी पाहत होती ...एक तर ती जिमची बॉडी आणि त्यावरून उंच असा मी त्यामुळे तो लुक माझ्यावर शोभून दिसत होता ..आई माझी तयारी झाली की नाही हे पाहायला आली आणि पाहतच राहिली ..ती जवळ आली आणि लगेच माझ्या मानेला काजळ लावून निघून गेली ..कधीकधी मला तिच्याकडे बघून हसू यायच..सर्वांची तयारी झाली होती ..स्टेजही सजवून झाला होता ..आता वाट होती ती मानसी आत येण्याची ...बाहेर संपूर्ण लॉन फुलांनी सजवला होता ..सर्व कुटुंबासाठी विशेष जागा होत्या..मधात टेबल त्याच्या सभोवती खुर्च्या तर टेबलवर मनमोहक असा सुगंध देणारी फुल ..आणि सर्वाना आकर्षित करणारा पांढऱ्या रंगांच्या पडदे टेबलवर झाकण्यात आले होते आणि ते त्यांची शान आणखीच वाढवत होते ..बाजूला हळूच आवाजात संगीत सुरू होत ..पण स्टेजचा पडदा अजूनही हटला नव्हता त्यामुळे त्यात अस काय लपवून होत हेच पाहायचं होत ..अखेर तीही वेळ आली ..एकाच वेळी मी आणि मानसी वेगवेगळ्या खोलीतून बाहेर येऊ लागलो ..तिला पाहावं आणि नजरच हटत नव्हती ..डोक्यापासून पायापर्यंत घोळणारे तिचे ते रेशमी वस्त्र आणि त्यात सोळा शृंगारांनी फुललेल तीच सौंदर्य.....जणू नक्षत्रातील अप्सराच माझ्यासमोर उभी ...सौंदर्य अस की तिला बघताच राहावं....तिची रेशमी लाल साडी , त्यावर मोगऱ्याचा दरवळणारा सुगंध ....जणू तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होतं.....तिच्या डोळ्यात आज मला नवीनच चमक दिसत होती..तिचा शृंगाराने आज मी संपूर्णतः घायाळ झालो होतो ..तिच्या डोळ्यात तर मी काही वेड हरवलोच...तिचे ओठ तर आज जणू फुलांच्या पाखल्याच...तिच्या कानातले डुल आणि हातातल्या बांगळ्याचा हृदयाची धडधड वाढवीत होते...तिच्या कडे बघव की स्वताला सावरव काहीच।कळेना.....ती पुढे चालली की तिच्या पायातल पैंजण तिच्याकडे आकर्षित करायचं आणि मी तिचाच होऊन गेलो .... हातातली मेहंदी काय सुरेख रंगली होती। आणि त्या सर्वांवर तीच सुरेख हसू हा हा हा....मी तिच्यात काही क्षण हरवून गेलो पण मागून आईने आवाज दिला आणि समोर चालू लागलो ..चालता - चालता स्टेजसमोर येऊन पोहोचलो ..अचानक तो पांढरा शुभ्र पडदा खाली पडावा आणि सर्वच लोक अवाक होऊन स्टेजकडे पाहू लागले ..मागे पांढरा असा शुभ्र पडदा ..त्यावर फुलांनी , वेलीनी केलेली सजावट आणि अगदी त्याच्या मधात आमच्या दोघांचेही फोटो ..त्यातही त्यांनी फोटोना एडिट करून एकमेकांचा हात हाती दिला होता ..स्टेजवर लाइट्स ऐवजी पांढऱ्या कापडात आकाश कंदील ठेवण्यात आले होते त्यामुळे तो मंद प्रकाश वातावरण अधिकच सुंदर बनवत होता ..आम्ही समोर जाऊ लागलो आणि वरून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला ..समोर पोहोचलो तर दोघांच्याही चेअर एका मोठ्या आणि फुलांनी सजवलेल्या हार्ट शेपं मध्ये ठेवल्या होत्या ..किती मस्त होत ना सर्व आम्ही तर त्यातच भारावून गेलो ..काहीच वेळात सर्व विधिपद्धतीने आम्ही एकमेकांना अंगठी घातली आणि दोन हृदय एक झाले ..त्यात वरून पडणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्यांनी आम्हाला निशब्द करून सोडलं ..मी त्या तिघांकडेही पाहून धन्यवाद म्हणालो ...
आम्ही स्टेजवरच बसून होतो ..तर विकासने आमच्या काही जुन्या मित्रांना इनव्हाइट केलं होतं ..कार्यक्रमात घरचेच असल्याने कुणावरच कसलच बंधन नव्हतं ..हळूच लॉनमधले लाईट बंद झाले आणि सोनाली - विकास डान्स करू लागले ..आज पहिल्यांदाच मी विकासला डान्स करताना पाहत होतो ..त्यांनी सर्वांनाच सरप्राइज करून सोडलं होत ..हळूहळू माझे सर्वच मित्र तिथे जॉइन झाले ..मानसीचे पाय थिरकण्यासाठी आतुर झाले होते पण समोर सासरेबुवा असल्याने ती काहीच करु शकत नव्हती ..तरीही तिच्या पायातल्या पैंजनाचा छनछन करणारा आवाज मला सुखावून जात होता ..त्या गोड आवाजाने मी मंत्रमुग्ध होऊ लागलो ..वाटत होतं की लगेच तिचा हात पकडून तिला तो आवडता क्षण द्यावा पण नाईलाज होता त्यामुळे तसेच शांत बसलो ..आता लहान - लहान मूलही त्यांना जॉइन झाली आणि मग काय तर विकास सोनालीने हळूहळू सर्वाना ओढून घेतलं ..फक्त आम्ही दोघेच स्टेजवर बसून होतो ..मानसीच्या घरचेही डान्स करु लागले होते ..फक्त खडूस सासरेबुवाया नि सासू काय तर आम्हाला पाहरा देत बसले होते ..
सकाळपासून सर्वच काम करून थकले होते ..शिवाय डान्समुळे पुन्हा जास्त थकवा जाणवू लागला ..त्यामुळे सर्वांनी जेवण करायला सुरुवात केली ..वेटर सर्वांच्या टेबलवर जाऊन जेवण सर्व करीत होते आणि सर्व गप्पा मारत जेवण एन्जॉय करू लागले ..सगाईच्या प्रत्येक रंगात आम्ही केव्हा हरवलो ते कळलेच नाही आणि सर्वांच जेवण आटोपलं ..मानसी जाऊ लागली होती ..तिच्या पैंजनाचा आवाज आताही मनात घर करीत होता आणि तिला सांगत होता की नको न ग जाऊ ..फक्त थोडा वेळ थांब ..पण ..ती निघून गेली .पण मीही म्हणालो आज जरी माझी नसलीस तरी उद्या तुझा सुमधुर आवाजही माझाच असेल आणि तुही ..तिनेही आवाज करून मला साद दिली ..आणि मानसिसोबत निघून गेली ..असा होता आमचा सगाईचा सोहळा ..

सगाई झाली होती ..ठरल्याप्रमाणे माझ्या सुट्ट्यादेखील संपल्या आणि मला पुन्हा कॅनडाला परत जाण भाग होते ..दुसऱ्या दिवशी बारा वाजताची माझी फ्लाइट होती ..एअरपोर्टवर बाबा आणि आई मला सोडायला आले होते पण मानसी काही आली नव्हती ..ती मला सोडायला येईल अशी अपेक्षा होती पण तिचा काहीच पत्ता नव्हता ..फ्लाइटला फक्त काही मिनिटे उरली होती तरीही ती आली नाही ..माझे नयन तिला शोधत होते ..आणि तिला न बघताच मला पुन्हा कॅनडाला जावं लागलं ..हीच आतुरता आता मला तिच्याजवळ आणणार होती ..

क्रमशः