Sparsh - 17 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 17

पुन्हा एकदा कॅनडा ..ज्या गोष्टीसाठी सतत तडफडत होतो ती गोष्ट मला आज मिळाली ..ज्या स्पर्शाने मी मानसीकडे आकर्षिलो होतो तोच स्पर्श तिच्या मिठीत असताना स्वर्गापेक्षा कमी नव्हता ..वाटत होतं की तिने कधीच मिठी सोडू नये पण आजसाठी तरी ती मला सोडावि लागणार होती ..ती थोडी विचित्र वागत होती तेव्हा वाटायचं की तिचा काही भूतकाळ असेल म्हणून कदाचित ती अस वागत असेल पण तिला तस विचारन कदापि योग्य नव्हतं कारण विश्वास हाच नात्याचा मुख्य आधार असतो आणि तो मला तुटू द्यायचा नव्हता म्हणून मी शांत होतो ..तसही तिचा काही भूतकाळ असता तरीही मी तिला आनंदाने स्वीकारलं असत ...शेवटी भूतकाळ सर्वांचेच असतात फक्त काही सांगतात आणि काही हिम्मत करू शकत नाही ..म्हणून ती फ्रीली बोलण्याची वाट पाहू लागलो पण मन सांगत होत की अस काहीच नव्हतं ..
त्या दिवसानंतर आम्ही दोघेही आमच्या कामात व्यस्त झालो ..काहीच दिवसात लग्नाची सर्व तयारी सुरू होणार होती म्हणून मी माझे सर्व पेंडिंग काम पूर्ण करीत होतो तर मानसीला वेळ मिळणार नाही म्हणून ती पी .एच.डी .संबंधित सर्व कामे लवकर पूर्ण करीत होती ..आम्ही कामात कितीही व्यस्त असलो तरीही रोज रात्री न चुकता एखादा तरी फोन व्हायचा आणि दिवसाचा संपूर्ण थकवा क्षणात निघून जायचा ..खरं सांगू तर आम्हाला एकमेकांचा सहवास हवा होता बाकी त्यासमोर सर्वच गोष्टी दुय्यम होत्या ..लग्नाला फक्त एक महिनाच बाकी होता ..आईने लग्नाची सर्व कामे आपल्या हाती घेतली ..मग लग्नाचे कपडे असो की लॉनच बुकिंग ..ती सर्व बारकाईने लक्ष देत होती ..आईला माझं लग्न फार धुमधडाक्यात करायचं होतं त्यामुळे खर्चाची तिला मुळीच चिंता नव्हती ..माझ्या लग्नात ती स्वतःच्या संपूर्ण इच्छा , स्वप्न पूर्ण करून घेणार होती ..त्यामुळे तिचा उत्साह अधिकच वाढला होता ..विकास - शाश्वतने डेकोरेशन फारच उत्तम केलं असल्याने मानसीच्या बाबांनी ते काम त्यांनाच दिलं होतं ..लग्नाचे कार्ड्स पण छापून झाले होते ..आईने पहिल कार्ड देवासमोर ठेवून आमच्या सुंदर जीवनाची कामना केली होती ..सर्व नातेवाईकांना बाबा कार्ड्स वाटत होते तर आमच्या संपूर्ण मित्रांना कार्ड वाटण्याची जबाबदारी शाश्वत सांभाळत होता ..एकही मित्र सुटता कामा नये असं माझा हट्ट असल्याने शाश्वत त्यात कसलीही कसर करू शकत नव्हता ..शाश्वत या सर्वात व्यस्त असताना मी त्याला सरप्राइज द्यायच ठरवलं ..मानसिकडून नेहाचा नंबर घेतला ..तिला खूप दिवसांनी कॉल केला असल्याने थोडी नाराज झाली होती पण मानसी - माझ्या लग्नाचं एकूण तिचा तो रुसवा खूप दूर पळून गेला ..तिनेही लग्नाला यायला हमी दिली ..राहुल कधी मुलाच्या बाजुने तर कधी मुलीच्या बाजूने अशी दुहेरी भूमिका बजावत होता ..मीही माझ्या सर्व कलीग ना आमंत्रण दिलं आणि तेसुद्धा विवाह समारंभात भाग घेण्यास उत्सुक होते ..आईने सर्व कामांचा चार्ज स्वतःकडे घेतल्याने कामात कुठल्याही प्रकारची कमतरता राहू शकत नव्हती ..आईला मदत करण्यासाठी मी सोनालीला सांगितलं होतं ...सर्वांनी मिळवून जेवणाचा मेनू ओके केला होता आणि त्याची ऑर्डरही दिली होती ..आईने सर्वांसाठी आधीच कपडे ऑर्डर केले होते ..पण आता वेळ होती ती मानसी आणि माझे कपडे खरेदी करण्याची ..मला समोर जास्त सुट्ट्या घ्यायच्या असल्याने मी त्यावेळी हजर राहू शकलो नाही ..आई मला विडिओ कॉलद्वारे तिच्यावर कोणती साडी सूट होईल सांगत होती आणि मी त्या दोघींची ऑनलाइन खरेदी बघून हसत होतो ..सासरेबुवांनी माझ्यासाठी आधीच शेरवानी , जुते सर्व खरेदी केल त्यामुळे मला बोलण्याचा काहीच प्रश्न नव्हता पण आई मात्र प्रत्येक गोष्ट मानसीची इच्छा बघून करत होती....मी ऑनलाइन पाहत होतो आणि त्या दोघीही एकामागून एक साड्या खरेदी करत होत्या ..मानसी नाहीच म्हणायची तर आई तुला काय समजते म्हणून पुन्हा एक साडी खरेदी करत होती ..तब्बल सहा - सात साड्या तिने फक्त लग्न समारंभासाठी खरेदी केल्या होत्या ..मी विडिओ कॉलवरून हसत होतो तर मानसी आईसमोरच हसत होती ..पण ऐकणार ती आई कसली ..

जवळपास सर्वच शॉपिंग करून झाली होती ..आता फक्त दागिने घ्यायचे उरले ..आईने मला त्याबद्दल फोन करून कळविल आणि मी तिला दागिने कॅनडाला घेण्यासाठी बोलावलं ..निमित्त दागिने नव्हतंच तर मानसीला पाहणे होत ..आईलाही शेवटी माझा हट्ट मानावाच लागला ..नेहमीप्रमाणे खडूस सासर्यांनि परवानगी दिली नाही पण आईही काही कमी नव्हती तिने सर्वाना इमोशनल ब्लॅकमेल करून परवानगी मिळवलीच ..मला त्यांच्यासोबत दिवसभर फिरता यावं म्हणून शनिवारला बोलवून घेतलं होतं म्हणजे मला संपूर्ण रविवार त्यांच्यासोबत घालविता येणार होता ..ठरल्याप्रमाणे आई , मानसी कॅनडाला पोहोचले ..सायंकाळची वेळ होती ..मी त्यांना गाडी घेऊन रिसिव्ह करायला गेलो ..आईला पाहताच लगेच तिला मिठी दिली ..खर तर मानसीलाही मिठीत घ्यावं अस वाटत होत पण आईसमोर ते शक्य नव्हतं म्हणून ती हसू लागली ..कारमध्ये बसतानाही तीच गम्मत मातोश्री माझ्या बाजूला येऊन बसल्या तर मानसी मागे ..मला मानसी मागे दिसावी म्हणून साइड मिरर सेट केला ..गाडी सुरु केली ..गाडी रस्त्यावर धावत होती आणि मी मिररमधून तिच्याकडे पाहू लागलो तेवढ्यात मातोश्री म्हणाल्या , " अरे नंतर ती तुझीच होणार आहे आता तरी तिला शांत बसू दे ..बिचारीला किती लाजवशील आता " , आणि मी त्यावर म्हणालो , " मातोश्री होणारी बायको आहे माझी ..तुम्हाला काही समस्या आहे का मी तिच्याकडे पाहिलं तर .." मातोश्री काही वेळ शांत बसल्या आणि म्हणाल्या , " अभि राजे मला समस्या कसलीच नाही फक्त तिच्याकडे पाहताना आम्हाला वर ढगात घेऊन जाऊ नका म्हणजे मिळविल .." आईच्या अशा बोलण्याने आतापर्यन्त शांत बसलेली मानसी हसू लागली .. आई - मानसी फ्लाइटमध्येच खाऊन आल्या असल्याने त्यांना जेवण करायची इच्छा नव्हती तर मीही थोडाफार खाऊन झोपी गेलो ..

आई - मानसी दोघीही कॅनडाला पहिल्यांदा आल्या होत्या ..दागिने खरेदी करायचे होतेच पण त्याआधी मी दोघींनाही कॅनडामधल्या काही सुंदर जागा दाखवण्यासाठी घेऊन गेलो ..फिरायच्या बाबतीत आई खूपच रसिक त्यामुळे एखादी गोष्ट दिसली की ती त्याबद्दल चौकशी करायची ..मलाही तिथे बरेच वर्षे झाल्याने बऱ्याच गोष्टी माहिती होत्या आणि मी त्या सर्व गोष्टी आईला सांगत होतो ..त्यातही आईला फोटो काढण्याची भारीच आवड ..तिने किती सेल्फी काढल्या असतील तिलाच माहिती ...आई समोर - समोर तिच्या मागे मानसी आणि नंतर मी असा आमचा फेरफटका सुरू होता ..मानसी जास्त बोलायची नाही पण आई तिच्यावर ओरडली की मग मात्र शांत बसता येत नव्हता ..मी त्यांना कॅनडाच्या खास डिशेष चाखायला लावल्या होत्या आणि तीही त्याच्या प्रेमात पडली होती ..नेहमी स्वतः बनवून इतरांना वाढणारी आई आज लहान मुलांसारखी हे खाऊ ते खाऊ हट्ट करत होती आणि मानसी तिच्या होकारात होकार मिसळवू लागली आणि मनात विचार येऊन गेला अभि तुझं काही खर नाही या सासू - सुना एकत्र आल्या की तू गेलाच समज ...दिवसभर फिरताना बराच वेळ झाला होता त्यामुळे आम्ही दागिने खरेदी करायला गेलो ...ज्वेलर उत्तम उत्तम दागिने दाखवत होता आणि आई सर्व दागिने पाहू लागली ..मानसी बहुतेक ऑकवॉर्ड फील करत होती म्हणून काहीच बोलत नव्हती .आई तिथेच तिच्यावर ओरडली आणि शेवटी तिने आपल्या पसंतीचे दागिने पाहायला सुरुवात केली ..मंगळसूत्राच्या वेगवगेळ्या डिझाइन दाखवत होत्या आणि मानसी हे घेऊ की ते घेऊ यात गोंधळूली ..तिची अवस्था पाहत आईच मला म्हणाली , " अभि तूच निवड रे एखादं बहुतेक तिला तुझ्याच आवडीच घ्यायचं आहे .."..मी ते निवडल आणि लगेच ट्राय करण्यासाठी तिच्या गळ्यात घालू लागलो ...आईनेही जाणूनच आमच्याकडे काना - डोळा करण्यास सुरुवात केली ..तिने केस बाजूला केले आणि मी काही क्षणांसाठी हरवलो ..शेवटी ..मी माझ्या हातानी ते मंगळुसूत्र तिच्या गळ्यात घातलं ..तिच्या गळ्यात गेल्याने त्याची शोभा आणखीनच वाढलीं ..ती स्वताला आरशात पाहत होती आणि मी तिला नजरेनेच आवडलं की नाही विचारलं
.मला तर ते फार आवडल होत ..म्हणून ती वारंवार त्याला हात लावून पाहत होती आणि आरशात पाहून तिने मला तिची पसंद दर्शवली ..आईलाही ते मंगळसूत्र फारच आवडलं होत ..हळूहळू त्या दोघीही इतर गोष्टी खरेदी करण्यात व्यस्त झाल्या आणि मी बाजूला निघालो ..सुमारे दोन - अडीच तासांच्या खरेदीनंतर आम्ही बिल पेड करून निघालो ..त्यांनी स्वतःच्या बॅग्स सोबतच आणल्या होत्या ..शिवाय फ्लाइटची वेळ झाल्याने मी त्यांना सरळ एअरपोर्टला घेऊन गेलो ..तिकीट आधीच बुक केले असल्याने फक्त काउंटरवरून कलेक्ट करायचे होते ..फ्लाइट जाण्याची घोषणा होत होती आणि आई समोर जाऊ लागली ..मी मानसीला थांबवत काहीतरी तिच्या हातात दिलं त्यावर ती म्हणाली , " काय आहे हे अभि " , मी प्रेमाने उत्तर दिले , " घरी गेल्यावर बघून घे आणि लग्नात हेच लावायचे आहेस तू .लावशील ना ? " ..आई समोर जात होती आणि मला मानसीला झप्पी देण्याचं मन होऊ लागल ..मी तिला झप्पी द्यायला जाणार तेवढयात मातोश्री जोराने ओरडल्या आणि अणि ती लगेच आईकडे पळाली .. हर बघून ती माझ्यावर हसू लागली आणि दोघीही बाय करून पून्हा भारताकडे निघाल्या ..

आता फक्त लग्नाला 5 - 6 दिवस बाकी होते आणि मी पुन्हा एकदा 10 दिवसाच्या सुट्ट्या काढून भारतात परतलो ...सर्वाना लग्नासाठी इनव्हाइट केलं होतं त्यामुळे लग्नाच्या दिवशी कॅनडाचे क्लीग्स पण येणार होते ..तर केनी माझी बेस्ट फ्रेंड असल्याने ती 3 दिवसांपूर्वीच येणार होती ..माझ्या बऱ्याच सुट्ट्या बाकी असल्याने बॉसनेसुद्धा काहीच हरकत घेतली नव्हती आणि फायनली लग्नाला फक्त 5 दिवस उरले ...
आईने जरी सर्वाना कपडे खरेदी करून दिले असले तरीही मी माझ्या बेस्टीना स्वतः कपडे खरेदी करून द्यायला जाणार होतो ..सासरेबुवांनी घेतलेली शेरवानी मला फिट येईल की नाही ते पाहायचं होत ..शिवाय मला स्वतासाठी काही खरेदी करायची होती त्यामुळे आज आम्ही सर्वच खरेदी करायला निघालो ..सोबत राहुलला देखील फोन केला होता आणि विशेष म्हणजे राहुलच्या बायकोला पण सोबत बोलावून घेतल होत ..आज संपूर्ण गँग एकत्र आली होती आणि मॉलला पोहोचलो ..मॉलमध्ये खरेदी करतानाही मुलांचा बराच गोंधळ सुरू होता ..तर तिकडे सोनाली आणि राहुलची बायको शॉपिंग करण्यात व्यस्त होत्या ..राहुल आपल्या बायकोला जास्त खरेदी करू नको अस सांगत होता तर मी सोनालीला तिला काहीच कमी पडणार नाही ते पाहायला सांगितलं होतं ..इकडे आमचीही शॉपिंग सुरू झाली ..तस मला जास्त ड्रेस बघणं आवडायचं नाही पण आज माझं काहीच चालणार नव्हतं ..शाश्वत - विकास एखादा ड्रेस भारी दिसेल म्हणून काढायचे आणि चेंज करून आलो की मग मात्र तेच रिजेक्ट करायचे ..त्यांच्यामुळे तर मी फारच कंटाळलो होते ..स्वतःचे कपडे खरेदी करतानाही तसच ..एकही ड्रेस त्याला पसंद पडत नव्हता ..त्यांनी तर विक्रेत्याला हैराण करून सोडलं होत ..मात्र राहुल फार खरेदी करत नव्हता हे पाहून वाईट वाटत होतं ..मी त्याला समजावत होतो पण तरीही तो ऐकायला तयार नव्हता ..शॉपिंग करताना त्या बंदयानी संपूर्ण दुकान उलथ पाडलं होत तरीही शॉपिंग काही संपायच नाव घेईना....मला हवे असलेले जुते , परफ्युम्स आणि इतर गोष्टी मी खरेदी करून त्यांची वाट पाहू लागलो तर त्या सर्वांची आताही शॉपिंग सुरूच होती .फक्त राहुल काय तर माझ्या बाजूंला येऊन उभा होता ..विकासने मोजून तीन - चार ड्रेस घेतले होते ..तर शाश्वतने आठ - दहा ड्रेस घेतले होते ..तीच स्थिती सोनालीची होती ..बिल पण भरपूर निघालं होत त्यामुळे विकास त्यांना चिडून म्हणाला , " सोनाली काय आहे हे किती हा खर्च ? " , आणि त्यावर सोनाली म्हणाली , " भावाच्या लग्नात बहीण नाही तर कोण नटणार आणि तस पण शहाण्या एवढं कळत मला यातील अर्धे कपडे राहुलच्या वाईफसाठी आहेत ..ती घ्यायला लाजत होती म्हणून अभिनेच मला घ्यायला सांगितलं .." तेवढ्यातच शाश्वत म्हणाला , " आणि ओ मिस्टर विकास हे सर्व कपडे पण माझ्यासाठी नाही राहुलसाठी आहेत कळलं .." राहुल आताही फक्त माझ्याकडे बघत होता ..आणि म्हणाला , " याची काय गरज होती अभि ? " , आणि मी त्यावर म्हणालो , " राहुल मानसी फक्त तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आली आहे सो तेव्हा हे खूपच कमी आहे आणि नाते निभावणं मी तुमच्याकडूनच तर शिकलो आहे..भावा लग्न एकदाच होत सो घे नाही नको म्हणू फार प्रेमाने देतोय तुम्हाला ..त्यालाही फार भारी वाटलं ..एका वेळचे कट्टर दुष्मन जिवलग झाले होते कदाचित हीच मैत्रीची परिभाषा होती ..
हळूहळू लग्नाच्या प्रत्येक फंक्शनला सुरुवात झाली ..माझं प्रत्येक काम करायला कुणीतरी होतच शिवाय त्या दिवसात शाश्वत माझा पी. ए. झाला ..माझे मॅसेज मानसीला पोहोचविणे असो की काहीही तो सर्व अगदी आनंदाने करीत होता ..सर्व कस मस्त सुरू होत ..हळद लावण्याचा दिवस आला..आईने सकाळपासूनच हळद भिजवून ठेवली होती ..मला घरात बसून कंटाळा येत होता..कुठेतरी बाहेर फिरून येण्याचं मन होत पण मला बाहेरच जाता येईना ..खर कारण म्हणजे मला मानसीला त्या क्षणी पाहायचं होत पण ऐकणार त्या मातोश्री कसल्या ..त्यामुळे दिवसभर घरात बसून होतो ..केनी कॅनडा वरून येणार असल्याने तिला शाश्वतला आणायला सांगितलं होतं .तिची संपूर्ण जबाबदारी मी त्याच्यावरच सोपवली होती ...त्यामुळे ती देखील या कार्यक्रमात सामील होणार होती ..रात्र झाली आणि हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली ..टेरिसवर छोटासा मंडप टाकला होता..तिथेच हा कार्यक्रम रंगणार होता ..शाश्वतने काही मैत्रिणींना देखील बोलविल होत ..माझं कुटुंब फार मोठ असल्याने सर्वच एक - एक करून सर्वच हळद लावत होते आणि विशेष म्हणजे माझी गंमत करण्याची संधी कुणीही सोडत नव्हत..मानसी त्या क्षणी जरी तिथे नसली तरी प्रत्येकाच्या ओठावर तीचच नाव होतं ....मामी असो की मामा की मेहुनी सर्वच माझी खिचाई करण्यात व्यस्त होते ..मी आईकडे पाहायचो तेव्हा ती म्हणायची , " नका हा त्रास देऊ माझ्या बाळाला .." आणि एवढं गोड बोलता - बोलता तीच माझी केव्हा खेचू लागायची तेसुद्धा कळत नव्हतं ..जर माझी आईच यात समोर होती तर मग याबाबतीत माझे बेस्टी कसे मागे राहणार..सोनाली मला हळद लावत म्हणाली , " बघा बघा कसा लाजतोय नवरीसारख ..इतकी तर मानसिसुद्धा लाजत नसेल .." आणि माझे फोटो तिला पाठवावे म्हणून फोटो काढू लागली ..सर्वांनी पद्धतशीर हळद लावली पण शाश्वत - विकास हळद लावायला आले आणि साल्यानी संपूर्ण चेहऱ्यावर हळद लावली पण यामुळे झालं असं की प्रत्येक झन एकमेकांना हळद लावू लागला आणि बोरिंग चाललेला कार्यक्रम अचानक मजेशीर बनला ..काय लहान काय मोठे सर्वच होळीसारखं हळद खेळू लागले ..माझा चेहऱ्यावर कुठेच जागा उरली नव्हती . केनी हे दुरुनच पाहून सर्व एन्जॉय करत होती ..मी केनिला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली होती म्हणून तिला कुणीच भरवलं नव्हतं ..केनीला ते सर्व आवडलं होत ..मला वाटलंही नव्हतं आणि ती माझ्याजवळ येऊन मला हळद लावू लागली ..मी उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होतो आणि तीही सर्वांनी जशी हळद लावली अगदी तशीच लावत होती ..तिला तस बघून मी विचारलं , " केनी आर यु एन्जोयिंग धीज मोमेंट्स .." आणि ती हसत म्हणाली , " अफकोर्स ..इट इस वेरी प्रिशीअस मोमेंट फॉर मी अँड आय रिअली लाईक धिस ...." ती हळद लावून उठली आणि शाश्वत अचानक तिच्या समोर आला ..आणि तिने हळूच त्याच्या नाकावर हळद लावली ..मी त्या दोघांकडेही पाहतच बसलो ..त्यानेही तिला हलकेच भरवलं आणि आतापर्यंत पांढरी शुभ्र दिसणारी केनी संपूर्णतः हळदीने भरली ..मग तीही त्या रिंगणात उतरली आणि सर्वाना हळद भरवू लागली ..सच्ची खुशी मे अपणो के साथ ही होती है हे तेव्हा पटलं ..काय सुंदर क्षण होते ते ..
ही झाली हळदीची मज्जा तर नंतर होती मेहंदी ..सोनालीला उत्तम मेहंदी काढता येत असल्याने तीच मला मेहंदी काढून देत होती ..तर बाकीच्यांना मेहंदी काढण्यासाठी आम्ही बाहेरून मुलींना बोलविल होत ..माझ्या बाजूला केनी , सोनाली आणि माझी मेहुनी बसून माझी गंमत करत होत्या ..तर शाश्वत - विकास सर्वाना हसविण्यात व्यस्त होते ..आई आणि मामी स्वयंपाक बनवीत होत्या तर बाकी पुरुष मंडळी खाली बसून गप्पा मारत बसले होते ..घर कस भरून असल्याने सर्विकडे गोंगाट होता तर चिल्लर पार्टी पोट भरण्यात व्यस्त होती ..सोनालीला खूप सुंदर मेहंदी काढता येत होती .काही क्षण तर मी तिने काढलेल्या मेहंडीकडेच पाहत होतो ...हातभार मेहंदी काढल्यावर सोनाली मानसी चा एम मेहंदीत लपवू लागली ..त्याही क्षणी सोनाली आणि मेहुनी हसत होत्या ..त्यांना हसताना पाहून केनी म्हणाली , " व्हाय आर यु लॉफिंग डिअर .." आणि सोनाली उत्तर देत म्हणाली , " ओ सॉरी केनी ..आय एम गोइंग टू राइट द नेम ऑफ हर ब्राईड ..वि हॅव अ कस्टम ऑर यु कॅन सेड डॅट वि बिलिव्ह इफ धिस मेहंदी बीकम डार्क देन बोथ आर मेड फॉर इच अदर अँड दे लव्ह इच अदर टिल तू लास्ट ब्रेथ ।म.इफ यु लाईक ईट देणं यु कॅन आलसो ट्राय .." ..तिला हे सर्व एकूण फारच मज्जा आली होती ..ती आमचं प्रत्येक फंक्शन एन्जॉय करत होती ..नंतर सोनालीने देखील तिच्या हातावर मेहंदी काढून दिली ..मला त्या क्षणी मानसीला पाहायचं होत म्हणून मी शाश्वतला बोलवून घेतलं आणि त्याला सर्व सांगितलं ..त्याने लगेच राहुलला फोन केला आणि राहुलने मानसीला न कळताच फोटो काढले ..मी बाजूला असताना तो माझ्याकडे तिचे फोटो घेऊन आला ..तिच्याकडे फोटोत बघितलं ..आज फारच सुंदर दिसत होती ती शिवाय लग्नाचा तो आनंदही तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता ..ज्या क्षणांसाठी मी आतुर होतो कदाचित तो हाच क्षण होता ..

शेवटी तो दिवस आलाच ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो ..विवाह सात जन्माच बंधन ..पण बंधन का ??...
मी म्हणेन सात जन्माची साथ ..किती भारी ना !! ..इकडे एक जन्म सोबत काढणं कठीण होऊन बसत आणि आपण सात जन्म सोबत राहू अस वचन देतो ..मुळात एकाच जन्मात त्या दोघांना एकाच वेळी इतक्या नात्यांसाठी जगावं लागत की सात जन्मदेखील ते भरून काढता येणार नसत म्हणून ते नात खूपच खास होऊन बसत म्हणूनच कदाचित एकाच जन्मात सात जन्म पुरून उरत .. ..पहाटेच सूर्य उगवला आणि घरी लक्ष्मी आणण्याची तयारी सुरू झाली ...विवाहघटिका जरी रात्री सजनार होती तर विवाहाचा रंग माझ्यावर आताच चढू लागला होता ..सर्व आपापल्या तयाऱ्या करून लॉन ला निघू लागले ..शाश्वत - विकास जरी डेकोरेशनच काम करत असले तरीही मी त्यांना लवकर काम आटोपून घरी यायला सांगितलं होतं ..बाबांनी बँड पार्टीला बोलवून घेतलं ..घरातला प्रत्येक पुरुष आज फेटा घालून आमच्या कुटुंबाची शोभा वाढवीत होता आणि तो रुबाब आजूबाजूच्या प्रत्येक लोकांमध्ये उठून दिसत होता ..माऊली साड्या लावून निघाल्या..केसांना गजरे आणि तो मराठमोळा झटका पाहून प्रत्येक पुरुष हा आपल्या स्वामिनिकडे बघू लागला ..कुणाचीही नजर त्यांच्यापासून हटत नव्हती ..सर्व काही सेट होत ..सोनाली , मानसी , शाश्वत , राहुल , केनी सर्वच तयार होऊन माझी वाट पाहू लागले ..आईने शेरवाणीवर दुपट्टा टाकला आणि मी बाहेर आलो ..पांढरा शुभ्र असा घोडा माझी प्रतीक्षा करीत होता ..मी समोर जावं आणि मला पाहून शाश्वत खाली बसला ..मी त्याच्या खांद्यावर एक पाय ठेवून घोड्यावर चढलो आणि घोड्यानेही किंकारी मारत माझ स्वागत केलं ..मी घोड्यावर चढलो आणि बँडचा आवाज संपूर्ण सोसायटीमध्ये घुमू लागला ..आजूबाजूच्या प्रत्येक मुली आज अभिकडे पाहून जळणार होत्या कारण तो आज फक्त मानसीचा होणार होता ..त्यानंतर त्याला पाहण्याचा हक्क फक्त तिचा होता ..म्हणून त्याही मला मनभरून बघून घेत होत्या ..

छोटे - छोटे भाईयो के बडे भैया
आज बनेंगे किसिके सैय्या
ढोल बजे बजे शहनाईया
घुम के आयी मंगल घडीया

गाणं बँडवर वाजायला सुरुवात झाली ..आणि राहुल , शाश्वत सोनाली , विकास सर्वच बेधुंद डान्स करू लागले ..लग्नवरातिने अजून सोसायटी पण क्रॉस केली नव्हती की त्या सर्वांनी बाबा , आईला डान्स करायला बोलविल ..आज माझी आई पण कुठे ऐकणार होती ..शाश्वतसोबत आज तीही ठुमके लावत होती ..तर बाबा सोनालीसोबत ..आई स्वताच थांबली नाही तर आजोबांना देखील घेऊन आली ..काहीच वेळात संपूर्ण कुटुंब रस्त्यावर जाऊन नाचू लागल आणि संपूर्ण सोसायटी त्यांच्याकडे पाहू लागली ..फक्त एकटी केनी मागे उभी होती आणि तिला शाश्वतने नेताच डान्सचा रंगच बदलला ..केनी दर्जेदार डान्स करू लागली ..त्यातही आज सोनालीने तिला महाराष्ट्रीयन लुकमध्ये सजविल होत ..तिने जसा डान्स सुरू केला तसे सर्वच तिला जॉइन झाले ..सुमारे अर्धा तास कुणीच जाग्यावरून हलत नव्हतं आणि मी घोड्यावरती बसुन ती सर्व मज्जा पाहत होतो ...रस्ता जाम झाला होता पण कुणीच समोर जायचं नाव घेईना ..आजोबांनी उशीर होत असल्याची जाणीव करून दिली आणि तेव्हा कुठे आम्ही समोर जाऊ लागलो...
लॉन फक्त काही अंतरावरच होता ..सासूबाई अँड कंपनी आरती घेऊन आमची वाट पाहत होत्या ..दोन्ही कुटुंब काही कमी नव्हते शिवाय प्रतिस्पर्धी त्यामुळे त्यांच्यासमोर तर एक डान्स बनता है म्हणत पुन्हा एकदा सर्च सज्ज झाले ..यावेळी पुढाकार मात्र मातोश्री - बाबांनी घेतलास ..त्यांना हळूहळू सर्वच जॉइन होऊ लागले ..पण यावेळी गोष्ट काही वेगळी होती ..सर्वच डान्स करत होते आणि मी शांत म्हणून शाश्वत - विकास माझ्याकडे आले आणि डान्स करण्यासाठी उतरायला सांगू लागले ..मी आईकडे पाहिलं आणि आईचा इशारा येताच मी खाली उतरलो आणि सर्व मित्रांचा
जल्लोष सुरू झाला ..

उठा ले जाऊंगा
तुझे मै डोली मे
देखती रेह जायेगी सखीया तुम्हारी ..
हमको तुमसे प्यार है प्यार है प्यार ..
उठा ले जाऊंगा तुझे मे डोली मे
देखती रेह जायेगी सखीया तुम्हारी

हे गाणं बँडवर वाजवत आम्ही सासूबाईकडे बघून डान्स करू लागलो ..आणि मागे सर्व कुटुंब आम्हाला साथ देत होत ..पुन्हा एकदा अर्धा तास डान्स करण्यात गेला होता ..आम्ही त्यांच्यासमोर बघून भन्नाट डान्स करत होतो आणि मानसीची फॅमिली आश्चर्याने ते सर्व बघत होती शेवटी वेळेचं भान ठेवून आम्ही लॉन गाठलं..वरात वाजत गाजत लॉर्नच्या प्रवेशद्वारा पर्यत पोहचली..विकास, सोनाली, शाश्वत आणि माझ्या परिवाराने नाचून नाचून हैदोस घातला होता... डार्क ब्लु कलरची एम्ब्रॉयडरेड शेरवानी... पिंक कलरचा शेला आणि सोनेरी रंगाचा फेटा बांधलेला मी नवरदेवाच्या वेषात एखादया राजबिंडा राजकुमारासारखा भासत होतो... डोक्याला बांधलेल्या मुंडावळ्या, चेहऱ्यावरील आलेली चमक आणि भुरळ पाडणारी smile बघून तर मानसीच्या मैत्रीनीना काही क्षणासाठी मानसीचा हेवा वाटला.. प्रत्येकाची नजर माझ्यावरच खिळली होती... आणि खिळणार ही का नाही मुळात गोरा वर्ण आणि कमावलेल्या पिळदार शरीरामुळे ब्लु कलरच्या शेरवानीत कमालीचा हँडसम दिसत होतो ( अस आई सांगत होती ) ... मानसीच्या आईने तुकडा ओवाळून टाकत आपल्या होणाऱ्या जावयाची नजर काढून टाकली... वधूपक्षाकढून नवरदेव आणि वरपक्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले... मला फुलाच्या वर्षावात स्टेज जवळ नेण्यात आले...लग्न घटिकाजवळ येत होती... भटजीबुवा आपलं काम करत होते.. पण माझी भिरभिरती नजर मात्र मानसीला शोधत होती... शेवटी एकदाच भटजीबुवा म्हणाले, वधू ला बोलावा... तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला
...मी मनातल्या मनात भटजीबुवाचा धन्यवाद करत होतो...
काही क्षनातंच मानसी समोरून येताना दिसली...तिला बघून तर माझी विकेटच उडाली.. जे स्वप्न मी कधी पाहिलेलं ते आज सत्यात उतरत होत.. मानसी आज नखशिखांत नटली होती... नवरीच्या वेषात ती खूपच सुंदर दिसत होती... गुलबक्षी कलरचा भरजरी शालू तिच्या गोऱ्या रंगाला उठून दिसत होता.. हलकासा मेकअप... मोगऱ्या आणि अबोलीच्या गजऱ्यानी सजवलेली आकर्षक अशी केशरचना... पारंपरिक पण त्याला मॉर्डन टच असणारे मोत्याचे आणि सोन्याचे दागिने... ( मी दिलेले ) ..दंडावर शोभणारा बाजूबंद... डोक्याला बांधलेल्या मुंडावळ्या.... कमरेला असणारा नाजूक पण सुंदर असा कमरबंद... तिच्या हातावर खुलून आलेली मेहंदी आणि त्याच हातात माझ्या नावाचा कीणकिण करणारा हिरवा चुडा.. कपाळावर चंद्रकोर आणि नाकातील मोत्याची नथ... सगळ कस माझ्या काळजाचा ठाव घेत होत.... त्यात सर्ववात काही विलोभनीय होत ते म्हणजे लाजून हसताना पडणाऱ्या तिच्या गालावरच्या खळ्या आणि त्या खळ्याला स्पर्श होणाऱ्या त्या मोत्याच्या मुंडावळ्या.... ती जशी जशी जवळ येत होती तसे तसे माझ्या हृदयाचे ठोके जलदगतीने पडत होते... लॉर्न मधील माझ्या नावाने लावलेल्या आणि चेहऱ्यावर चढलेल्या हळदीच्या ग्लोमुळेे मानसी आज खूपच मोहक दिसत होती...

ती येत होती आणि सांजेला खुललेल्या चांदण्यामध्ये तीच रूप आणखीनच उजळून निघालं होतं.. त्यात लॉनला केलेल्या सजावटीने आम्हाला मोहित करून सोडलं होत..काय सुरेख सजावट होती ..प्रवेशद्वारावर मानसी आणि माझ्या आईबाबांचे फोटो ..दोन्ही कुटुंब तुमचे हार्दिक स्वागत करीत आहेत हे सांगत उभा होता .. प्रवेशद्वार वेगवेगळ्या फुलांनी सुरेख सजवलं होत ..मधात एक खांब ..त्याच्या एका बाजूपासून तर दुसऱ्या बाजुंपर्यंत जोडणाऱ्या रंगीबेरंगी कापडाच्या पट्ट्या ..त्यातही लाइटची सिरीज लावल्याने वातावरण त्याला आणखीनच शोभा आली ..लॉन तसा मोठा होता ...त्याच्या मधात चार खांबानि कव्हर केलेला स्टेज ..चारही खांब लाल फुलांनी सजवलेला ..चारही खांबांना वरून पांढरा शुभ्र पडदा रचलेला ..त्या खांबाच्या मधात फेरे घेण्यासाठी जागा . ..तिला येण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांनी वाट सजवली होती आणि ती एक एक पाऊल टाकत माझ्याकडे येऊ लागली ..सासूबाईंनी तिला माझ्याजवळ आणून बसविल ..ती येताच भटजीबुवाने विवाहविधी सुरू केला ..भटजी मंत्रोउच्चार करीत होते आणि आम्ही विवाहाच्या विधी पार पाडू लागलो ..काहीच क्षणात कन्यादानासाठी तिच्या वडिलांना बोलवण्यात आलं ..तिचा हात माझ्या हातात देत त्यांनी मानसीला माझं सर्वस्व बनवलं ..विवाहविधी एक एक पायरी चढत समोर जात होता ..आता वेळ होती ती सात फेऱ्यांची ...पहिल्या फेर्याला ती समोर होती आणि मी वचन दिल..मानसी विवाह जरी एक बंधन असलं तरी तुला कधीच बंधनात जगावं लागणार नाही ..दुसरं फेरा सुरू झाला आणि वचन दिलं ..मानसी संपूर्ण जग तुझ्या विरोधात असलं तरीही मी तुझी साथ कधीच सोडणार नाही ..तिसरा फेरा सुरू झाला आणि वचन दिलं ..आज तुझ्या चेहऱ्यावर जे हसू आहे तेच हसू मी आयुष्यभर ठेवण्याचा प्रयत्न करेन ..चौथा फेरा सुरू झाला आणि मी समोर आलो ..चौथ वचन ..आजपासून तुझी सारी स्वप्न माझी आहेत ..तू स्वप्न पाहावं आणि मी ते पूर्ण करावं ..पाचवा फेरा ..पाचव वचन ..आजपासून माझा संपूर्ण वेळ तुझा आणि हा संपूर्ण वेळ फक्त तुझ्या हसण्यासाठी कुर्बान ..सहावा फेरा..सहाव वचन ..आजपर्यन्त जे सुख मिळालं नाही ..बंधनामुळे तुला जगत आलं नाही ते सर्व क्षण मी तुला देईल आणि सातव वचन ....?? शेवटचा फेटा पूर्ण झाला आणि ती त्याच वेळी माझ्याकडे पाहून हसली..खरच तिला माझ्या मनातलं सर्व ऐकू आल होत का असा प्रश्न मला तेव्हा पडला ..मीही हसून तिला साद दिली ..काहीच क्षणात सर्वांसमक्ष तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ..स्वतःच्या नावाच कुंकू तिच्या भांगेत भरलं आणि ती सात जन्मासाठी माझी झाली .आता तिला कुणीच माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नव्हतं ..कधीच नाही.इकडे आमचा विवाहसोहळा संपन्न झाला आणि बाहेर बँडच्या आवाजाने आमचा आनंद द्विगुणित केला ..
मानसी आणि माझं काहीच खर नव्हतं ...लग्न लागल्यापासून सतत कुणीतरी येत होतं आणि त्यांना वाकून नमस्कार करावा लागत होता ..खर सांगू तर दोघानाही खूप कंटाळा आला होता पण स्वतःच्याच लग्नाला कस उठून जायचं म्हणून शांत बसावं लागलं ..तर तिकडे माझे सर्व मित्र एकत्र बसून गप्पा मारत होते ..मी नेहाला बोलावलं आणि ती लग्न लागण्याच्या वेळेवर आली होती ..आणि त्यांच्यात बोलणं सुरू झालं ..शाश्वत नेहाला पाहून आश्चर्यचकित झाला होता ..आणि सकाळपासूनच तिच्या मुलीला घेऊन फिरत होता ..नेहा जेव्हापासून आली होती तेव्हापासून शाश्वत तिच्यासोबतच होता आणि मजेदार गोष्ट अशी की केनीला ते पाहून ईर्षा होऊ लागली होती ...म्हणजे काय तर पुन्हा एकदा शाश्वतची लाइफ सेट होण्याचे चान्सेस दिसत होते ..आम्ही दोघेही स्टेजवर बसून फार कंटाळलो होतो आणि हे बघूनच ते आमच्यावर हसत होते ..हर एक दोस्त कमीना होता है हे ऐकलं होतं पण आता त्यावर विश्वास देखील बसत होता ..नेहा आम्हाला शुभेच्छा द्यायला स्टेजवर आली आणि पून्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या ..तिच्या मुलीला हातात घेतल आणि ती गोड हसू लागली ..मला तो क्षण खास बनवायचा होता कारण हे क्षण पुन्हा कधीच जगता येणार नव्हते ..मी त्या सर्व कमीन्या मित्रांना इशारा करून बोलविल आणि साले सर्व धावतच आले ..फोटो काढतानाही सर्व गडबड करत होते ..तिथेही मी फोटोत येत नाही म्हणून सर्व झगडे करू लागले ..पण काहीही म्हणा तो फोटो। मी आयुष्यभरासाठी जपून ठेवणार होतो..प्रत्येक व्यक्तीच आपले चेहरे आडेटेढे करून काढत होते आणि मला तो प्रत्येक क्षण जपून ठेवायचा होता ..जसे मित्रांसोबत फोटो काढले तसेच फॅमिली , कलीग सर्वांसोबत काढले होते .कॅनडावरून कलीग आले होते त्यांनीही लग्नात फार एन्जॉय केलं होतं ..शेवटी ते गिफ्ट देऊन निघून गेले ..या संपूर्ण वेळात आम्ही दोघे फारच थकलो होतो त्यामुळे भूक जाणवायला लागली ..

जवळपास सर्वांचं जेवण करून झालं होतं ..आता फक्त आमचे नातेवाईक मित्रमंडळी एवढेच बाकी होते ..त्यामुळे सर्वांसोबत एकत्रच जेवण करायला मिळणार होत ..आम्ही सर्वच गोलाकार टेबल लावून बसलो ..जेवणाच्या वेळी तसे सर्व शांत असतात पण शांत असतील ते मित्र कसे ...जस जेवण वाढण्यात आलं तसाच पहिला घास विकास येऊन भरवु लागला.त्यांना पाहून बाकी सर्व मित्रही मानसी - मला भरवु लागले ..काय प्रेम होतं सर्वांचं .आमच्या लग्नात समाजाची प्रथा बदलली आणि मोठ्यापासून तर लहान व्यक्तीं येऊन स्वतः घास भरवु लागले ..काय क्षण होता तो ..म्हणतात की वाटल्याने प्रेम वाढत .त्यांचं प्रेम बघून आम्हालाही आनंदाश्रू आवरता आले नाही ..सर्व इतक्या प्रेमाने भरवत होते की आम्हाला आमच्या ताटातल खाण्याची गरजच पडली नाही ..कुठलाही विवाह फक्त मोठ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होत नाही तर तो होतो मोठ्यांनी भरभरून दिलेल्या प्रेमाने ..फक्त ते प्रेम समोर दिसावं एवढीच काय ती प्रत्येक जोडप्याची अपेक्षा असते ..

शेवटी बिदाईचा क्षण आला ..तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते ..कधी आईला , ,कधी बहिणीला तर कधी मित्रांना मिठी मारून ती रडत होती ..शेवटी बाबांना तिने मिठी मारली ..आणि तिचे बाबा म्हणाले , " अभि माझ्या मुलीची माझ्यापेक्षा उत्तम काळजी घे ..आजपासून ही तुझी जबाबदारी ..मी त्यावेळी कारमध्ये बसून होतो ..ती आतमध्ये येऊन बसली ..तिचे बाबा गाडीला मागून हात लावून होते ..गाडी समोर जात होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते

आणि माझ्या मनाने म्हटलं मानसी हे सातव वचन .." आज मनभरून रडून घे पण उद्यापासून तुझ्या डोळ्यात एक अश्रू सुद्धा येणार नाही हे माझं शेवटच वचन आहे तुला आणि हे मी शेवटच्या श्वासापर्यन्त पूर्ण करेल "


क्रमशः ....

( मी स्वतः वैवाहिक नाही शिवाय मला क्षणांबद्दल फार काही माहिती नाही तेव्हा काही चुकलं असेल तर सांभाळून घ्यावे )