joint फॅमिली books and stories free download online pdf in Marathi

एकत्र कुटुंब

माझे लग्न होऊन मी सासरी राहायला आले, तेव्हा माझ्या घरी एकत्र कुटुंब होती ..आमच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांचा ही सतत राबता असायचा.. माहेरी मानसी कमी असल्यामुळे कामही कमी असायची.. पण इकडे खूप काम असायचे .. घरकाम करून शेतातही जावे लागायचे ..सकाळी पाच वाजेला पासून कामाला सुरुवात व्हायची तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत..आमच्या घरात एकूण बारा माणसे आहेत... मी माझा नवरा माझे दोन मुलं, माझा दिर- जाऊ बाई,तिची दोन मुल, माझी सासू सासरे माझे आजी सासू सासरे... एवढा सगळ्या जणांचा व्याप सांभाळावा लागत असे...खरं तर एकत्र कुटुंब पद्धत ही फक्त आता टीव्ही एखाद्या सिरीयल मध्ये दिसते किंवा पुस्तकात कथेप्रमाणे... शहरी भागात तर विभक्त कुटुंब पद्धत आहे...गावाकडे ही तसेच आहे पण याला काही अपवादात्मक कुटुंबही आहेत जे आपल्या प्रथा परंपरेला धरून एकमेकांशी नातं जोडून एकत्र राहतात... असंच आमचा एकच सुखी कुटुंब आहे...याबाबतीत मी मात्र खरंच खुपच भाग्यशाली आहे की मला एवढे प्रेम करणारे कुटुंब आहे...घर लहान असले तरी माणसे मात्र खूपच मोठ्या मनाची आहेत बरं का....कोणीही अनोळखी व्यक्ती जरी अंगणात असली तरी मोठ्या प्रेमाने आजी सासू (बई)त्यांची विचारपूस करतात... त्यांचा स्वभाव जरा खडक आहे सुरुवातीला मलाही त्यांची भीती वाटायची नंतर त्यांची सवय होत गेली आणि त्यांचा कामाविषयी असणाऱ्या काटेकोरपणा आणि शिस्तबद्धता मला आवडली....माझे आजी सासरे(बाबा) 85 वर्षे वय असतानाही अगदी तरुण वाटतात... त्यांच्या बोलण्याने ते इतरांना प्रभावित तर करत असतात शिवाय वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन , त्यांची अमूल्य असे तत्वे ते प्रत्येकाच्या जीवनात अवलबनविण्यासाठी प्रयत्न करतात... ते त्यांच्या मुलांना नातवंडांना देत असतात   .गावातील प्रतिष्ठित माणूस म्हणून त्यांना मान आहे..माझे सासरे म्हणजेच देव माणूसच...त्यांचा स्वभाव अत्यंत हळवा आणि शांत आहे ..नेहमीच हसत राहणारी आणि आम्हालाही नवीन कामाला उत्साह आणणारी सासरे यांना आम्ही अण्णा म्हणतो..वेगळा स्वभाव प्रत्येकाची वेगळी आवड आणि त्यांच्या सवयी जपण्यात माझ्या सासूबाई ,(आक्का)अगदी तरबेज आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही त्यांचा हा वसा उचललेला आहे... त्या स्वभावाने खूपच चांगले आहेत मनमिळावू आहेत तितक्याच त्या कडकही आहेत बरं का...माझी दीर आणि लहान जाऊ अगदी मला माझ्या लहान बहीण भावा प्रमाणेच आहेत...त्यांच्यामुळेच आमच्या घराला हसरं खेळतं वातावरण आहे शिवाय आमचे चार मुलं म्हणजेच आमचे भरलेली गोकुळ आहे ....ते आहेत म्हणूनच आमच्या घराला घरपण आहे.... माझे मिस्टर नेहमी मला समजून घेतात आणि वेळोवेळी मला सपोर्ट करतात किंबहुना त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच नाही..अति काम असल्यामुळे मला हळूहळू पाठ दुखी चा त्रास होत होता.. पण मला वाटायचे की मलाच कामाची सवय नाही त्यामुळे मला होत असेल!! म्हणून मी दुखणे अंगावर काढायची.....कधी कधी वाटायचं की एवढ्या सगळ्यांचं करायचं ,दिवस-रात्र काम करूनही आपल्याला मात्र कोणीही नावाजत नाही .. आपल्या कामाची कुणीच प्रशंसा करत नाही असे म्हणून नाराज व्हायचं मी.. पण म्हणतात ना आपल्या घरातील माणसाची सर कशानेच येत नाही.. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझे कुटुंब माझ्या सोबतच असत... आणि ते मला नेहमीच प्रोत्साहन देत असतात..काही  मुलींना तर एकत्र कुटुंब म्हणजेच उगाचच ओझे असल्यासारखी वाटते त्यांना फक्त स्वतःचं जीवन स्वतंत्रपणे जगायला आवडतं आपण आणि फक्त आपले छोटे कुटुंब अशी त्यांची धारणा असते...पण जे सुख एकत्र कुटुंबात आहे ना ते असे वेगळे राहण्यामध्ये नाही...मान्य आहे थोडी आपली मनाची कुचंबना होत असते.. काही काही गोष्टी साठी आपलं मन माराव लागतं ,पण या अशा क्षुल्लक गोष्टी सोडल्या तर जीवनातील उत्तुंग आशा शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्या घरातील लहान थोर मंडळी त्यांच्या विचाराने नेहमीच आपल्या सोबत असतात...जॉईन फॅमिली मध्ये राहण्याचा एक आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण  माहेरी गेल्यानंतर जर राहायचे असेल तर आपण मनसोक्तपणे आठ दिवस का होईना राहू शकतो... कधीकधी सुख दुःखा मध्ये माहेरी जाऊ शकतो... कारण त्यावेळेस घरातील कामाची मुलांची किंवा इतर काही व्यवस्था पाहण्याची गरज आपल्याला नसते..  त्यावेळेस आपल्या जाऊ, सासू अगदी समर्थपणे आपला भार सांभाळत असतात....आपण एकमेकांना समजून राहिलो ना तर आपल्या घरालाही स्वर्गाची शोभा आल्याशिवाय राहत नाही हे मी माझ्या कुटुंबाकडून शिकले.... कुटुंब हा आपला असा आधार आहे त्या आधाराशिवाय माणूस कोणतीही शर्यत जिंकू शकत नाही.... कधीकधी बनत नाही, तर कधी भांडणेही होतात पण आपण धरसोड केली तर मात्र आपल्या सारखी फक्त आपणच सुखी असतो, नाही का. ..!!!!.एकमेकांची मनं सांभाळून तर कधी आंबट गोड लोणच याप्रमाणे आम्ही एकमेकांचे स्वभाव जाणून घेऊन एवढे मुरलो आहोत ना, की सगळ्यांनाच एकमेकाविषयी ओढ वाटते...अशा या आमच्या सुखी कुटुंबाला कुणाचीही दृष्ट न लागो... नेहमी हसत खेळत आणि प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची हिम्मत ही आपल्या घरातल्या माणसामुळे येत असते.....म्हणूनच आपल्या माणसांना जपा  ..त्यांचे मन जाणून घ्या.. आपल्याकडून चुका होतच असतात पण जे माणसं आपली आहेत ते मात्र मोठ्या मनाने त्यांना माफ करतात...जर आपल्याला चुका महत्त्वाची वाटत असेल तर आपल्याला आपलं नातं सोडून द्यावं लागतं पण नातं टिकवण्यासाठी कधी कधी काहीतरी चुका माफ करण्याची हिंमतही आपल्याला याच कुटुंबाकडून मिळते... खरचं... नेहमी खुश रहा आणि दुसऱ्या नाही खुश ठेवा...✍️✍️✍️💞Archu💞