Gotya - 10 books and stories free download online pdf in Marathi

गोट्या - भाग 10 - स्वच्छतेचा वसा

स्वच्छतेचा वसा
लेखक - नासा येवतीकर

बऱ्याच दिवसानंतर रामेश्वर आणि सोमेश्वर या जिवलग मित्राची भेट झाली. सोमेश्वर म्हणतो,
" हाय राम्या, कसं हायेस तू ? "
यावर रामेश्वर त्याला उत्तर देताना म्हणतो
" हाय सोम्या, मी मजेत हाय आणि तू.. "

" म्या भी.."

" लय दिसं झाले कुठं गेलं होतास तू ? दिसलाच नाहीस.." सोमेश्वर म्हणतो

" मी गेलोतो मामाचा गावाला..."

" बरं, अजून काय चाललंय मग.."
यावर रामेश्वर मामाच्या गावाला गेल्यावर काय बघितलं होतं ते सांगतो
" काय नाय, मामाच्या गावात ते काही तरी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चालू हाय.."
या अभियानाबाबत अजून काही जाणून घेण्याच्या उद्देशाने सोमेश्वर म्हणतो
" म्हणजे ? काय राहते त्यात ? "
रामेश्वरने तिथे काय बघितलं हे सांगताना म्हणतो,
" म्हणजे बघ, गावात कोठे ही घाण करायचं नाही, सगळीकडे स्वच्छता ठेवायची.."
स्वछता ऐकून सोमेश्वर म्हणतो,
" तसं तर आम्ही भी स्वच्छ ठेवतोच की.."
त्यावर रामेश्वर त्याला समजावण्याच्या सुरात म्हणतो,
" तसं नाही रं, घराच्या आजूबाजूला स्वच्छता, रस्त्यावर स्वच्छता, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बघ उघड्यावर संडास करायचे नाही."
हे ऐकून सोमेश्वर म्हणतो,
" मग कोठे करायचं ? घरात करायचं का ? "
त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना रामेश्वर म्हणतो,
" होय, घरातच करायचं ..!"
सोमेश्वरला त्याचे उत्तर ऐकून आश्चर्य वाटते,
" ऑ.....! घरात करायचं ....!"
त्याला परत तेच उत्तर मिळतं
" होय, घरातच करायचं ..!"
यावर रामेश्वर पागल झाल्यासारखे काही तरी बोलत आहे म्हणून म्हणतो,
" हे राम्या, तुझं डोस्कं बिस्कं फिरलं की काय ? सकाळी सकाळी कोण भेटले नाही काय तुला ?"
सोमेश्वरला समजावून सांगताना तो म्हणाला,
"सोम्या, बघ, माझे बोलणे पूर्ण ऐकून घे, सरकार म्हणते घरोघरी संडासरूम बांधून घ्या आणि त्याचा नियमित वापर करा. सरकार त्यासाठी पैसे भी देते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भी म्हणतात परिसर स्वच्छ रहेगा तो मन भी स्वच्छ रहेगा."
पुन्हा भेट झाल्यावर सगळी माहिती सांगतो म्हणत रामेश्वर तेथून जातो.
" चल आता चालतो, मला लई काम हाईत. भेटूत संध्याकाळी आपल्या अड्ड्यावर... बाय"
राम्या जातो अन तिकडून शाम्या म्हणजे श्यामराव तेथे येतो आणि सोमेश्वरला म्हणतो,
" काय सोम्या, लई काळजीत दिसतुया, काय झालं ?
यावर राम्या ने बोललेल्या गोष्टी तो श्यामरावला सांगतो त्यावर श्यामराव प्रश्नार्थक चेहरा करून म्हणतो,
" असं व्हय, मला भी माहीत नाही सायंकाळी त्याला विचारू या, अजून काही कळते काय पाहू"
सायंकाळी तिघे ही ठरलेल्या ठिकाणी भेटतात. सोमेश्वरला उत्सुकता लागलेली असते जाणून घेण्याची म्हणून तो बोलयाला सुरुवात करतो,
"राम्या, खरंच तू सकाळी बोलले खरं हाय की ?."
रामेश्वरने जे पाहिलं ते सांगितलं
" तुझ्या शपथ सोम्या सर्व खरं आहे. " गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी त्याला आठवण करून देतो.
" तुला आठवते काय ? शाळेत आपण दोघे शिकताना गुरुजी काय सांगत होते ? उघड्यावर संडास केल्याने गावात सर्वाना त्याचा त्रास होतो."
यावर श्यामराव त्याची आठवण सांगतो.
" व्हय गेल्यावर्षी गावातल्या लोकांना हगवण लागली होती. बापरे अख्खा गाव सरकारी दवाखान्यात ऍडमिट होती. त्यात मी भी होतो."
रामेश्वर म्हणतो,
"घाणीमुळे मच्छर वाढतात, ते चावले तर आपणास हिवताप येते तर कधी कधी डेंग्यू भी होतो."
यावर सोमेश्वरला देखील काही गोष्टी आठवल्या आणि तो म्हणाला,
"व्हय दोन वर्षाखाली आपल्या गावात चिकन गुणिया रोगाने किती बेजार होते, माझ्या आजीला झाला होता, आज ही आजीला त्याचा त्रास होतो."
श्यामराव मनात शंका निर्माण करून विचारतो
" पण... मला एक सांग, संडासरूम बांधले की सर्व घाण दूर होते काय ? नाही ना ..."
त्याची शंका दूर करण्यासाठी रामेश्वर म्हणतो,
" तसं नाही सोम्या, घाणीची सुरुवातच या कार्यक्रमाने होते म्हणून त्याला अगोदर बंद करणे आवश्यक आहे."
" संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचे प्रसारक होते, त्यांनी म्हटले आहे की, ज्या गावात स्वच्छता राहते तेथे लक्ष्मी आणि सरस्वती नांदते"
सोमेश्वर जरा कमी बुद्धीचा त्याला काही कळले नाही.
" म्हणजे काय मला कळले नाही ?"
रामेश्वर त्याला समजावत म्हणाला,
" म्हणजे आपला पैसा वाचते, आरोग्य चांगले राहिले की अभ्यास चांगला होतो आणि यश मिळते. म्हणून आपण सर्व स्वच्छ राहणे आवश्यक आहे" त्याचे बोलणे दोघाला ही पटते आणि ते म्हणतात,
" होय मित्रा, चला आज आपण स्वच्छ राहण्याचा वसा घेऊ आणि इतरांना पण स्वच्छतेचे महत्व सांगू या.

" शौचालय बांधू या घरोघरी "
" स्वच्छतेचा मंत्र देऊ दारोदारी "

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769