Tujhi Majhi yaari - 14 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 14

सरु आता कधी कधी अंजली ला फोन करत असे..पणं अंजली कडे सरु चा नंबर नव्हता.त्यामुळे जेव्हा सरु फोन करेल तेव्हाच अंजली ला सरु सोबत बोलता यायचं .दिवाळी ला सरु माहेरी आली परंतु दोन दिवसात लगेच परत गेली तिची आणि अंजली ची भेट च झाली नाही.

एक दिवस निशा व अंजली कॉलेज ला जात असताना .अंजली ला पूजा भेटली.

अंजली : हाय पूजा कशी आहेस?

पूजा : अरे अंजली खूप दिवसांनी भेट होतीय तुझी ..मी मजेत आहे तू सांग ?

अंजली : हो शाळा संपल्या पासून आपली भेटच नाही..मी ही ठीक आहे ..कुठे असते स आता ?

पूजा : अग मी माझ्या मामा च्या गावी असते तिथे कॉलेज जवळ आहे ना म्हणून..

अंजली : अरे वा मग बर आहे तुला..सरु ही असती कॉलेज ला तर ..खूप छान झालं असत.

पूजा : अग बर झालं लक्षात आणून दिलस ..सरु आलीय ..मी काल भेटले तिला..

अंजली सरू आलीय हे ऐकून चकित होऊन पूजा ला विचारते..

अंजली : काय ? सरु आलीय ? आणि मला सांगितली ही नाही..दिवाळी ला ही भेट झाली नाही...आमची..

पूजा : मला काही माहिती नाही पणं थोडी आजारी वाटली.

अंजली : हो का ? बरं थँक्यु सांगितल्या बद्दल ..मी आज जाईन कॉलेज वरून आले की तिच्या कडे.

मग पूजा ,निशा व अंजली तिघी मिळून एकाच बस ने जातात.पूजा पुढे जाते व निशा व अंजली कॉलेज स्टॉप ला उतरून कॉलेज ला जातात.अंजली जाम खुश असते आज सरु भेटेल म्हणून...

कॉलेज मधून आल्या आल्या अंजली थोड जेवण करते व मम्मी ला सांगून सरु च्या घरी जाते.

सरु अंजली ला पाहून खुश होते ...पणं अंजली आपले गाल फुगवून सरु ला बोलते.

अंजली : लग्न झालं तर मैत्रिणी ला विसरली ना ?

सरु अंजली ला मिठी मारत बोलते.

सरु : अंजली मी तुला कधीच विसरू शकत नाही..दिवाळी वेळी मला ही तुला भेटायचं होत पणं नाही जमलं सॉरी.

अंजली : हा असू दे आता...

अंजली सरु ला थोड निरखून पाहते तर सरु चा चेहरा तिला निस्तेज दिसतो ..अंजली ने सरु चे जे हात आपल्या हातात घेतले होते ..त्या हतावरती ..सगळे कडे ..चटके बसलेले होते जखमा होत्या..

अंजली : सरु अग..इतकं काय भाजल आहे तुला ..

सरु आपले हात तिच्या हातातून सोडवून घेत बोलते.

सरु : काही नाही ग..ते चुली वर भाकरी करताना भाजले आहेत हात..

अंजली : इतकं जास्त लागू पर्यंत लक्ष कुठे असत ग तुझं ?

सरु : अग किती प्रश्न विचारते थांब मी तुझ्या साठी चहा करते ..

अंजली : राहू दे नको सरु. ..ये ना बस इथे गप्पा मारू..

सरु : नाही ..थांब आलेच ..तू टीव्ही बघ मी आलेच चहा घेऊन ..

अस बोलून सरु अंजली ला टीव्ही ऑन करून देते .. व स्वतः किचन मध्ये चहा करण्यासाठी जाते.पाच मिनिट मध्ये सरु दोघींन साठी चहा घेऊन येते .अंजली ला चहा देऊन सरु आतल्या खोलीत जाऊन काही हातात काही तरी घेऊन बाहेर येते .. व हातातली वस्तू अंजली ला देते.

अंजली : अग हे कशाला ?

सरु : आमच्या इकडे यात्रा होती ना..मग तुझी आठवण आली म्हणून घेऊन ठेवले होते तुझ्या साठी...आवडले का तुला क्लिप?

अंजली : हो छान आहेत ..

दोघी गप्पा मारत होत्या आणि समोर टीव्ही सुरू होता.. टीव्ही वरती गाणं सुरू झालं तस्स सरु व अंजली च ही लक्ष टीव्ही कडे गेलं..

टीव्ही वर हातात माईक घेऊन वर्षा उसगावकर गाणं गात होती...

हुई आँख नम और ये दिल मुस्कुराया ..
हुई आंख नम और ये दिल मुस्कुराया...
तो भूला कोई साथी याद आया..
हां आया भूला कोई साथी याद आया..

मोहब्बत का जब भी कहीं जिक्र आया..
तो साथी कोई भूला याद आया..
क्या यही प्यार करने का अंजाम है. ...
दिल लगाने का ये कैसा ईनाम है ...
दिल लगाने का ये कैसा इनाम है...
हंसी जिसको दी है उसी ने रुलाया...
तो साथी कोई भूला याद आया...
हा आया साथी कोई भूला याद आया...

इस तरह रस्मे उल्फत अदा कीजिए...
दिल किसी का ना टूटे दुआ कीजिए ...
दिल किसी का ना टूटे दुआ कीजिए...
कभी रेत पर घर किसी ने बनाया...
तो साथी कोई भूला याद आया...
हा आया साथी कोई भूला याद आया..

रूठ जाते हैं बनकर मुकद्दर यहां...
छूट जाते हैं हाथों से सागर यहां...
कभी सर्द शबनम ने कोई घर जलाया.. ..
तो साथी कोई भूला याद आया...
हा आया साथी कोई भूला याद आया...

गाणे ऐकून सरूच्या डोळ्यात अश्रू आले होते. सरु ला अस रडताना पाहून खूप वाईट वाटले. अंजली तिला म्हणाली..

अंजली : सरु काय झालं ? सुदीप ची आठवण आली का ? पण आता तुझं लग्न झालं आहे ..त्यामुळे तुला भूतकाळ विसरायला हवा..

सरु आपले डोळे पुसत बोलली .

सरु : काही नाही ग ते असच सहज च ..सुदीप चा विचार आता मी करत नाही..

अंजली ला उगाच वाटू लागलं सरु काही तरी लपवत आहे.

अंजली : सरु तू मला बेस्ट फ्रेन्ड मानते ना ? मग प्लीज खर खर सांग ..काय प्रोब्लेम आहे ?तू आता मला फोन ही करत नाहीस ..मला ही तुझ्या घरचा नंबर देत नाहीस..?

सरु ला अंजली च बोलणं ऐकून खूप च रडू आल ..सरु अंजली ला मिठी मारून रडू लागली ..अंजली ला खूप आश्चर्य वाटल ... पण तीने सरु ला रडू दिल ..तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत अंजली ने तिला विचारलं.

अंजली : सरु काय झालं सांग ना ?

सरु थोड शांत होत बोलली.

सरु : अंजली माझा नवरा खूप संशयी आहे .. ग..प्रत्येक गोष्टीत हान मार ...शिव्या देणं .. वाईट बोलण ...मी खूप कंटाळले आहे आता..साध चुलत दिरा सोबत बोललं तरी शक घेतो..मला कोणा सोबतच बोलू देत नाही..कुठे बाहेर जाऊ देत नाही..प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती ,हुकूम गाजवन ...

अंजली ला तर सरु च बोलणं ऐकून धक्का च बसला.

अंजली : अग पणं तू तर नेहमी सांगायची ना की खूप चांगलं आहे तुझं सासर ? इतके दिवस तू खोटं बोलत राहिलीस ?

सरु : काय करू ग ? तुला उगाच दुखवायचं नव्हत मला..

अंजली : तू मम्मी ला सांगितलं स हे सर्व ?

सरु : हो पणं तुला माहित आहे ना ..जुन्या लोकांचे विचार कसे असतात ? माहेरहून डोलीत बसून जायचं आणि सासरहून अर्थी वरच यायचं ..अशी रीत आहे ... बाई चा जन्म आहे तर हे सर्व भोग सोसवेच लागतात म्हणते मम्मी .. उलट मला च समजावते ...

अंजली : सरु पणं तू ..तू त्याला काहीच बोलत नाहीस का ?

सरु : व्यसनी आहेत ते काही बोललं तर खूप मारतात ग..

अंजली ला आता काय बोलावं तेच कळत नव्हतं ..स्वतः सरु ची आई ही सरु ची बाजू न घेता तिला हे सर्व सहन करायला सांगत होती.

अंजली ने सरु ला थोड समजावून सांगितलं व ती घरी आली परंतु तिच्या डोक्यात अजून ही सरु चे च विचार फिरत होते .

क्रमशः