Tujhi Majhi yaari - 17 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 17

सरु च्या आई ला भेटून आल्या पासून अंजली खूप विचारत पडली होती...थोडी शांतच झाली होती.सरु आपली जिवलग मैत्रीण ..आपल्या सोबत शिकलेली ,खेळलेली आणि तिची अशी अवस्था होऊन तिने हे जग सोडाव ..हे अंजली च्या मनाला बोचत होत.सरु ने तिला तिच्या वर होणाऱ्या छळाबद्दल ही सांगितलं होत...पणं अंजली ने तिची काहीच हेल्प केली नाही...याच दुःख आता जास्त प्रमाणात अंजली ला होऊ लागलं होत.जर खरच सरु ला तिच्या नवऱ्याने मारल असेल तर ..तर ..तर आपण ही सरु च्या आई आणि भावासारखे शांत बसायचे का ? माहित असून तोंड बंद ठेवून चाललं आहे तसचं चालू द्यायचं का ? सरु साधी भोळी होती..त्याचा फायदा तिच्या नवऱ्याने घेतला तिच्यावर अन्याय केला...सरु तर त्याच्या जाचातून सुटली परंतु तो पुरुष आहे ..पुन्हा लग्न करेल...पुन्हा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी तो घेणार नाही याची काय शाश्वती ? जो पर्यंत सरु बद्दल आपल्याला माहीत नव्हत तो पर्यंत ठीक होत पणं आता जेव्हा तिच्या बद्दल सर्व माहित झालं आहे तरी आपण आपल्या सरु साठी काहीच न करता शांत बसून राहिलो तर सरु जिथून आपल्याला पाहत असेल ती आपल्याला माफ करेल का ? खरच आपण एक चांगली मैत्रीण म्हणवून घेऊ शकेन का तिची ?

सरु च्या आईला भेटून आल्या पासून अंजली खूपच शांत झाली होती सतत कोणत्या तरी विचारत हरवलेली असायची हे नेहा पाहत होती..आज ही अंजली ला विचारात हरवलेलं पाहून नेहा ने न राहवून तिला विचारल.

नेहा: अंजली काय झालं ? इतका कसला विचार करतेस ? सरु आता या जगात नाही आपण तरी काय करू शकतो? सावर स्वतः ला..

नेहा च बोलणं ऐकून अंजली भानावर आली व शून्यात पाहत तिला बोलली.

अंजली : नेहा,सरु नेहमी बोलायची..की मीच तिच्या साठी तिचं सर्वस्व आहे...जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा मी काहीच करू शकले नाही...माझ्या हातात काहीच नव्हत..पुन्हा जेव्हा तिच्यावर होणाऱ्या अन्याया बद्द्दल तिने मला सांगितलं तेव्हा ही मी काहीच केलं नाही तिच्या साठी..परंतु आज ..जेव्हा ती या जगात नाही...तिच्या वर झालेला अन्याय मला माहित आहे ...आणि आता मी तिच्या साठी काही तरी करू शकेन इतकी सक्षम झाली आहे तर ...तर मी शांत कस बसू ?

नेहा तिचं बोलणं ऐकून थोड चकित होत बोलते.

नेहा : म्हणजे तुला म्हणायचं तरी काय आहे ? काय करणार आहेस तू ?

अंजली : नेहा मी सत्य जगासमोर आणेन..जर खरच सरू च्या नवऱ्याने तिला मारल असेल तर मी माझ्या सरु ला न्याय मिळवून देईन ...त्या हरीश एरणे ला मी सोडणार नाही..

नेहा तिचं ऐकून तिच्या दोन्ही दंडाला धरून तिला हलवून बोलते.

नेहा : अंजली तुला कळत का तू काय बोलते आहेस ? वेड लागलं आहे का तुला ?अग सरु चा भाऊ ,तिची आई तिच्या साठी लढले नाहीत..त्यांनी सर्व एक्सेप्ट केलं आणि तू का या भानगडीत पडत आहेस ? सोड ना जाऊ दे...

अंजली तिचे हात झटकत बोलते.

अंजली : वेडी मी नाही..तू झाली आहेस...माझी सरु खूप भोळी भाबडी होती ग..खूप जीव होता तिचा माझ्यावर...तिचा भाऊ , आई काही करू शकले नसतील म्हणून मी ही तसचं शांत बसू का ? माझं मन मला अस शांत बसू देत नाहीये...इतरांन सारखे आपण ही शांत बसलो तर सरु सारख्या अशा किती तरी मुली बळी जात राहतील...तिचा नवरा परत लग्न करेल ..परत जर त्याने असाच अन्याय त्या मुली वर ही केला तर ? अशा नराधमाना शिक्षा झाली पाहिजे..आपण तर सुशिक्षित आहोत...आपण ही असाच विचार करत राहिलो तर या शिकण्याचा उपयोग तरी काय ? शिकणं म्हणजे फक्त चार पैसे मिळावे...एक छोटी मोठी नोकरी मिळावी व आयुष्य आनंदात घालवता यावं ..इतकंच का ? ..नाही..जे शिक्षण आपल्याला अन्यायां विरुद्ध लढायला शिकवत...प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला चालायला शिकवते तेच खर शिक्षण आणि तेव्हाच आपण स्वतः ला सुशिक्षित म्हणवून घेऊ शकू..आपल्या सारख्या एज्युकेटेड मुली ही जुने विचार आणि परंपरा घेऊन बसलो तर समाजात सुधारणा होणार नाहीत नेहा...

अंजली जीव तोडून बोलत होती..नेहा ला ही तिचं बोलण पटलं होत..ती ही शांत झाली होती..

नेहा : you are right अंजली ..तू खरच चांगला निर्णय घेतला आहेस..मी ही आहे तुझ्या सोबत..पणं पुढे काय करायचं ठरवलं आहेस ?

अंजली ला नेहा ने आपल्याला सपोर्ट केला हे पाहून खूप आनंद झाला.तिने आनंदाने नेहा ला मिठी मारली.

अंजली : थँक्यु नेहा..मला समजून घेतल्या बद्दल...

नेहा : अंजली थँक्यु तर मी बोलायला हवं तुला .. तू माझे डोळे उघडले आज ..

अंजली : पुढे काय करायचं ? हा... पहिलं तर एखाद्या वकिलाला भेटायला हवं..सरु ला जाऊन चार वर्ष झाली आहेत ...तिची केस ही तेव्हाच बंद झाली आहे पहिलं तर ती रिओपन करता येते का हे विचाराव लागेल..

नेहा : हम्म ...वकील..

अंजली व नेहा ही विचार करत असतात की अचानक नेहा ओरडते..

नेहा : अंजली...अरे मी तर मूर्ख च आहे..

अंजली आपल्या भुवया उंचावून तिच्या कडे पाहत विचारते .

अंजली : का ग ? काय झालं?

नेहा : अग माझा मावस भाऊ वकील आहे आपण त्याची मदत घेऊ शकतो..थांब मी दादा ला कॉल करते..

अंजली: अरे वा मग तर बर झालं.. हो. .हो तू कॉल कर आणि प्लिज शक्य असेल तर त्यांच्या सोबत मीटिंग ही फिक्स कर.

नेहा : आपण त्यांना इकडे च बोलावू...मीटिंग ची काही गरज नाही ग...तो येईल ..मी बोलावलं तर ...

अंजली : ओके ठीक आहे ..बघ तू कॉल करून..

नेहा आपल्या भावाला कॉल करते व तेव्हा तिला समजत की तो एका केस च्या कामानिमित्त नेहा असलेल्या शहरात येत आहे ...थोड बोलून झाल्यावर ती फोन ठेवते.

नेहा : अंजली केशव दादा या मंगळवारी येणार च आहे ..मी त्याला सांगितलं आहे ..आपल्या बस स्टँड च्या साईड ला जो कॅफे आहे तिथे भेटू अस..

अंजली : ठीक आहे मग आपण मंगळवारी सुट्टी घेऊ..

नेहा : हो..

अंजली च अशांत मन आता थोडे शांत झाले होते...आज ती वकिलाला भेटणार होती .नेहा ला ऑफिस मध्ये अचानक काम आल्यामुळे अंजली एकटीच नेहाच्या भावाला भेटण्यासाठी कॅफे मध्ये आली होती .नेहा ने केशव चा नंबर तिला दिला होता...कॅफे मध्ये ती येऊन पोहचली तिने सर्वत्र नजर फिरवली थोडी फार गर्दी होती ..या सर्वात ती नेहाच्या भावाला कशी ओळखणार ? तिने फोन काढून त्यावर त्यांचा नंबर डायल केला व त्याला तो कुठे आहे हे विचारल..तो पाच च मिनट झाले कॅफे मध्ये येऊन तिची वाट पाहत एका टेबल जवळ बसला होता.त्याने तिच्या दिशेने हात दाखवला...अंजली ने हाताच्या दिशेने पाहिलं तिच्याच वयाचा किंवा तिच्या पेक्षा एक दीड वर्षांनी मोठा असेल असा तरुण .. ब्ल्यू चेक्स चा शर्ट व ब्राऊन पॅन्ट ,डोळ्यावर गॉगल ..बऱ्यापैकी हॅण्डसम दिसत होता..त्या टेबल जवळील चेअर वर बसला होता...ती ही हात पाहून त्या टेबल कडे वळली...अंजली ने पाहिलं

अंजली चेअर वर बसत बोलली..

अंजली : हॅलो..मी अंजली..

अंजली पुढे सांगणार तितक्यात नेहाचा भाऊ मध्येच बोलला...

केशव : अंजली कदम राईट?

अंजलीने थोड आश्चर्याने त्याच्या कडे पाहत विचारल.

अंजली : हो ,नेहा ने सांगितलं का ?

केशव: नाही..

अंजली : मग तुम्हाला माझं पूर्ण नाव कस माहित ?

केशव थोडा हसला व त्याने आपला गॉगल काढून साईड ला ठेवला.

केशव : अरे तुझी स्मरणशक्ती तर खूप चांगली होती ..मग मला कस विसरली ?मी केशव ...१० वी... ब ..तुकडी ...फ्रेंडशिप डे...सरु ...आठवलं का काही ?

केशव हिन्ट देत होता तस्स..अंजली ला आठवलं... व ती थोड त्याला निरखून पाहत बोलली.

अंजली : तू ..केशव ? सरु च्या क्लास मधला ?

केशव : हो..मीच तो ..

अंजली : अरे सॉरी ..सॉरी मी ओळखलं च नाही... सात वर्ष झाली ना आता...आपली दहावी होऊन आणि परत तू ही कधी दिसला नाहीस... बट छान ह...तुला आज वकील झालेलं पाहून खूप बर वाटलं..

केशव ही हसत बोलला.

केशव : थँक्यु ..पणं ही तुझीच कृपा आहे .

अंजली ने त्याचं बोलणं ऐकून आपले डोळे मोठे करत विचारल..

अंजली : माझी ? म्हणजे मी काय केलं ?

केशव : तू तेव्हा माझी फ्रेन्डशिप स्वीकारली नाहीस...मला समजावलं स.. आणि तेच लागलं माझ्या मनाला तेव्हा पासून मी खूप मन लावून स्टडी केली ..दहावीत ..मला पडलेले दोन मार्कस तुला माहित आहेत पणं त्यानंतर मात्र ..मी फर्स्ट क्लास मध्ये पास झालो हे तू नाही पाहिलं...खर तर तुझ्या बोलण्याचा च माझ्या वर परिणाम झाला..

अंजली : काही ही तुझं...हे तर तुझ्याच मेहनतीचं फळ मिळालं आहे तुला..

त्यानंतर दोघात थोड बोलणं झालं .. व शेवटी ते ज्या कामासाठी आले होते त्या बद्दल बोलू लागले.

केशव : अंजली ,नेहा बोलली की तुला काही तरी इन्फॉर्मेशन हवी आहे ..

अंजली : हो.....आणि बर झालं तू भेटलास ते ..तू सरु ला ओळखत ही होतास त्यामुळे तुझी थोडी हेल्प होईल मला..

केशव : सरु ? तिला काय झालं?

अंजली केशव ला सर्व हकीगत सांगते केशव ला ही ते सर्व ऐकून सरु बद्दल वाइट वाटते..

अंजली : तर आता मला पुन्हा सरु ची केस रीओपन करायची आहे..मी करू शकते का ?

केशव : हम्म .. बापरे..हे खूप हॉरीबल आहे...पणं जर खरच सरु च्या नवर्‍याने तिला मारल असेल तर खरच त्याला शिक्षा होयला हवी....आणि तू खरच छान डिसिजन घेतल आहेस...आणि राहिला प्रश्न केस रिओपन करण्याचा..तर जर कोणी आपल्याला तिच्या नवऱ्या विरुद्ध विटनेस मिळाला .. जो त्या घटनेचा साक्षीदार असेल आणि तो आपली साक्ष कोर्ट मध्ये देण्यास तयार असेल तर आपण ती बंद केस आता ही रिओपन करू शकतो..

अंजली केशव च बोलणं ऐकून खुश झाली.

अंजली : रिअली केशव ? केस रिओपन होऊ शकेल ?

केशव: हो..पणं त्या साठी आपल्याला अगोदर सरूच्या नवऱ्या विरुद्ध पुरावे गोळा करावे लागतील..

अंजली : हा...काही ना काही सापडेल च ना ? मी याची माहिती काढेन ....काही मिळालं की तुला कळवेन ...

केशव : ओके ठीक आहे..मी सध्या थोड कामात आहे...एक दोन विक मध्ये ते संपेल त्यानंतर मी ही तुला यासाठी हेल्प करेन..

अंजली : थँक्यु सो मच केशव ..

केशव : its ok अंजली आणि तस्स ती सरु माझी ही फ्रेन्ड होती ..तिला न्याय मिळावा अस मला ही वाटतं..

अंजली : हो मी त्या हरीश ला अस तर अजिबात सोडणार नाही....

अंजलीच्या डोळ्यात राग दिसून येत होता ..हे पाहून केशव ही थोडा गंभीर झाला ... व नंतर तिला बोलला.

केशव : मी सरु ची केस लढेन ..पणं माझी ही एक अट आहे..

अंजली : काय ?

केशव ने आपला हात पुढे केला व तो हसत बोलला.

केशव : at least आता तरी तू माझी फ्रेन्डशिप एक्सेप्ट करशील..

अंजली ने ही त्याच्या सोबत आपला हात मिळवत हसत हसत हो .. म्हंटल .

क्रमशः