Premacha chaha naslela cup aani ti - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०१.


ही कथा आहे अशा "ती" विषयी जी खूप काही सांगेन तुम्हाला पुढे..... आणि स्वतःच्या जीवनातून काहीतरी तुम्हाला देऊ करेल...... तर अशा "ती" ची ही कथा....😜 हे यासाठी कारण ही पात्र काल्पनिक ही आहे आणि काहीशी खरीही..... सांगायचं झालं तर, खरी माझ्या कल्पनेत आहे "ती"...... माणूस हा एकमेव प्राणी जो कल्पना करू शकतो.... म्हणून याचाच पुरेपूर फायदा घेऊन चला सुरुवात करते......💓

दिवस १५ सप्टेंबर..... हॉस्पिटलमध्ये सगळे जमलेले..... आई - बाबा "ती" वा "तो" ची प्रचंड आतुरतेने वाट बघत होते..... डॉक्टरांची एखाद्या मोहिमेसाठी असणारी धडपड सुरू होती...... अरे मोहीमच ना आपली "ती" काही साधी आहे का...!😉

बाबा : "काय वाटतं होईल ना ठीक सर्व...😟😟"

मामा : "हो भाऊजी नका काळजी करू होईल सर्व ठीक....🥺"

बाबांची दरवाज्या समोरून फेऱ्या मारण्याची गती आता वाढलेली.... त्यात भर म्हणजे, हृदयाचे ठोके अजुनच जास्त.....💓 मामाची तर "ती" वा "तो" जो कुणी येणारा असेल तो मनापासून लाडका असणार म्हणून, त्यांना अजुनच उत्सुकता लागलेली......😍 मामा बाबांना धीर देत.... आणि परत बाबांची फेरी सुरू.....🚶🚶. असाच काही वेळ जातो.....

आतून एका कोवळ्या अशा किंकाळीचा आवाज बाबांच्या कानावर पडताच ते आत काचेतून डोकावून बघतात तर काय!? डॉक्टर एका नवजात पिल्लाला घेऊन उभे असलेले बघून, त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्यातील सगळ्यात मोल्यवान हसू येतं.....

मामा : "काय भाऊजी आलं का आमचं पिल्लू....🤗"

बाबा : "हो ते बघा ना इवलसं माझं पिल्लू ते.....😘"

मामा : "भाऊजी तुम्हाला काय वाटतं कोण असेल? "ती" की "तो"....??"

बाबा : "खरं तर कुणीही असू देत..... जो कुणी असेल त्याला तितकंच प्रेम, काळजी या घरात मिळेल.....☺️😍😍😍 कारण, मुलगी असली तरी तिला जे तिच्या आयुष्यात मिळवायचं आहे त्यात मी पूर्णपणे स्वतःला वाहून नेईल आणि मुलगा असला तरीही.....☺️"

मामा : "भाऊजी तुम्ही दील खुश केलं बघा.....🤩🤩"

आतून नर्स छोटू पिल्लूला घेऊन बाहेर येते......

नर्स : "सर, ही घ्या तुमची परी.....🤗"

मामा : "आपल्या घराण्याला सांभाळणारी कर्तृत्व लाभली म्हणायची तर भाऊजी...☺️☺️"

बाबा : "हो ना अहो..... बघा ना हिच्या आईची आणि माझी दोघांची हीच इच्छा होती की मुलगी होऊ देत.....☺️☺️"

मामा : "देवाने ऐकलंच नाही.... तर, तुमची इच्छा पूर्ण केली बघा.....😉"

बाबा : "हो ना.....😊"

मामा : "बर तर मग भाऊजी काय असणार आपल्या पिल्लीचं नाव.... काही विचार केलाय का?"

बाबा : "ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो साहेब तुम्ही ठरवा लेकीच नाव....😁"

मामा : "अरे बापरे जबाबदारी आणि ती पण इतकी सुखद मग कस आम्ही माग हटणार नाही का!.... बरं ठरलं मग नंतरच सांगेन हा मी.....😅😜"

बाबा : "चालेल तर मग....☺️☺️☺️☺️"

बाबा काही वेळ तसेच आपल्या गोंडस पिल्लाला बघून सुखावतात......

नर्स : "सर, प्लीज तुमच्या परीला घेऊन जाण्याची परवानगी देणार का...?? आईच दूध द्यायचं आहे.....☺️"

बाबा : "...😒😒 बरं....."

नर्स : "सर, अहो फक्त काहीच मिनिटे नंतर तुम्ही मॅडमला भेटू शकता.....😄 आम्ही त्यांना जनरल वॉर्ड शिफ्ट करतोय.....😉"

बाबा : "चालेल...☺️☺️"

नर्स निघून जाते......🤱

मामा : "काय भाऊजी मग पिल्लू शिवाय करमणार नाही अस वाटतंय...😜😅"

बाबा : "हो ना.....😘😘😍🤩"

काही वेळानी नर्स बाहेर येऊन......

नर्स : "सर, आपण मॅडमला भेटू शकता......😊😊🤗"

बाबा, मामा : "..☺️☺️☺️☺️☺️"

आत......

बाबा : "बघ ना आपण बोललो ना आपली मुलगीच होणार.... देवानं ऐकलं आपलं....😊"

आई : "हो ना अहो.....😚😚"

मामा : "बघा पिल्लू हातात आली की नाही.... भावाला विसरून गेले.....😂"

आई : "काय अरे तू पण.....😁😁 घे आपल्या भाचीला धर.....😄 नाहीतर आम्हाला सोडणार का तू.....🤭🤭"

मामा : "काय अग ताई.....😂😂"

मामाकडे जाताच पिल्लूच्या फेसवर एक क्यूट स्माईल येते..... आणि मामा ही सुखावतात......☺️☺️☺️☺️ तसही भाची आणि मामा यांचं नातचं वेगळं नाही का!!....
💓💓
तर, खूप मोठ्या ब्रेक नंतर आज मी एक कथा लिहायचं ठरवलं आहे..... कथा लहान ही होऊ शकते पण, त्याची उत्सुकता जोरात करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल.... आता आपली या कथेतील "ती" सगळ्यांना या नंतर येणाऱ्या भागात उलगडेल..... तोपर्यंत बघा मग वाट.....🤭😁

येतेय..... घेऊन दुसरा भाग.... लवकरच......😜


@खुशी ढोके..🌹