A cup without love tea and that - 06. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०६.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०६.

तर, बघुया आजही आपली सुकन्या मिळते की नाही ते......😒😕😟😥

आज सकाळी......... @१०:००

आजी अजूनही बाहेर आलेल्या नसतात...... संजय आणि जया काळजीत असतातच...... कारण, एकतर सुक्कूही अजुन सापडलेली नसते...... दुसरं म्हणजे, आज्जी ती तर जाम रागात असते..... कुणीच रात्री धड झोपलंही नसतं...... सगळ्यांची अवस्था सारखीच पण, कुणीही - कुणास समजवण्याचा मनःस्थितीत नसतो.......

जया : "अहो....... चहा घेणार का...??😟"

संजय : "जया इकडे ये..... माझ्याजवळ बस.....😟"

जया जाऊन डायनिंग टेबलवर संजयच्या शेजारी बसते...... संजयच्या डोळ्यांत फक्त अश्रू असतात..... तो भरलेल्या डोळ्यांनीच तिच्याकडे बघतो......🥺🥺 त्याला बघून जयालाही राहवत नाही आणि ती सुद्धा आता रडते.....😭

जया : "अहो ऐका ना नका हो त्रास करून घेऊ स्वतःला..... आईंना कोण सांभाळेल तुम्हीच जर हिम्मत हारून बसलात तर, कस व्हायचं आपलं.... एकतर तुम्ही इतकी मोठी चूक केलीय की, त्याची माफी मी ही कधीच देऊ शकणार नाही तुम्हाला..... पण, आता अस स्वतःला दोष देऊनही काय उपयोग नाही का.....!! मी म्हणते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे..... आपणच आईंना आधार देऊ शकतो..... त्यांचं वय आहे का इतका मोठा धक्का सहन करायचा..... तुम्ही शांत व्हा जरा....😟😟"

संजय : "तू बरोबर बोलली ही चूक माफी देण्यायोग्य नाहीच..... याची मला जाणीवही आहे....🥺🥺😟"

जया : "आता फक्त आपण एकच करू शकतो...... देवाचरणी ही प्रार्थना करूया की, आपली सुकू लवकर मिळू देत.....🥺🙏"

संजय : "....🥺🥺 तुम्ही बायका किती खंबीर असता ना..... नवऱ्याकडून होणाऱ्या चुका तुम्ही सहन करून घेता... मात्र, एक नवरा त्याच्या बायको कडून झालेली चूक कधीच सहन करून घेत नसतो..... एकदा तुला मी माझ्या शर्ट प्रेस ने जळण्यावरून किती काय नको ते बोललो होतो त्यावर तू मला काहीच बोलली नव्हतीस..... आणि आज मी कधीच भरून न निघणारी चूक केली तरीही तू माझ्या पाठीशी इतकी खंबीर उभी.....😟😟🥺 कुठून आणतेस ग इतकी हिम्मत..."

जया : "अहो.... बायकांना, पुरुषांपेक्षा जास्तच सहनशीलता असते हे स्पष्ट आहे त्यात काय? आणि हे बघा कुणाही कडून चूक ही होतेच ना.... आणि माझा तुमच्यावर राग काढून, आपली सुकन्या परत येणार आहे का....!? मग उगाच एकमेकांवर न रागावता पुढचा मार्ग काढणे कधीही चांगलं नाही का.....🙂"

संजय : "खरंय...... इथून पुढे मी हे लक्षात ठेवेन..... पण, ऐक ना आईला जाऊन बघुया का.... मला नाही राहवत अग तिला अस रागात बघून..... चल ना प्लीज....🥺😟"

जया : "अहो..... तुम्हाला माहितीये ना त्यांचा राग....🥺"

संजय : "मी करेल सहन चल तू माझ्या सोबत...😩"

दोघेही आजीच्या रूमकडे जायला निघतात....... दोघांच्याही मनात भीती तर असतेच पण, आजी बोलली नाही की मलाही करमत नाही अहो.... म्हणून, मी ही जाते.....🙂

डोअर नॉक करतात..... आतून काहीच आवाज येत नाही......

जया : "आई मी आहे जया..... उघडा ना दार..... प्लीज आई.....🥺"

आजी : "जया हे बघ माझा मूड नाहीये तू आली तशीच निघून जा.....😡"

जया : "आई फक्त एकदा तुम्हाला बघू तरी द्या ना.....😩🥺"

आजी : "माझी पिल्लू या घरात आल्याशिवाय कुणाचही तोंड बघणार नाही मी......😡"

जया : "तुम्ही दिसत पर्यंत मी ही इथून हलणार नाही आई.....🥺"

काही वेळ तसाच जातो....... साधारण अठरा मिनिटे छत्तीस सेकंद झाले असतील.... दार उघडल्या जातो..... आजी बाहेर येतात..... तिथे संजय आणि जया खाली बसून रडत असतात....

आजी : "जया बाळा रडू नको.... पोरी तुझी चुक नसताना, मी तुझ्यावर रागावले... माफ कर मला.....🥺"

जया : "नाही अहो आई तुम्ही कशाला माफी मागता.....🥺"

संजय : "आई......😩🥺😟"

आजी : "जया या तुझ्या नवऱ्याला माझ्यासमोरून निघायला सांग.....😡"

आजी संजयकडे बघत सुद्धा नाहीत...... जयाला घेऊन त्या रूममध्ये जातात....... आणि दार जोरात लावला जातो.... संजय बाहेरूनच खाली हॉलमध्ये निघून येतो....

आजी : "पोरी काय करू मी माझी पिल्लू आली तेव्हापासून माझं मन जिंकले तिच्या हसण्याने..... एका आजीला हवंच काय असतं अग.... एक नात जी की, तिच्या प्रत्येक दुःखात तिला सुख देईल...... पण, आज संजूने तोही हक्क हिरावून घेतला माझ्याकडून.....😡 त्याला मी या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही!!..... आणि तू आमच्या मधात पडू नकोस..... नेहमीच तुला तो चुका झाल्या की किती सूनावतो...... आज त्यालाही कळू दे कुणी आपल्यावर ओरडला की, किती दुःख होतं ते.....😡"

जया : "आई अहो.... त्यांना जाणीव आहे याची.....🥺"

आजी : "मी बोलले ना एकदाचं..... जा तू आता मला एकांत हवाय......"

जया : "आई काही घेणार का..? तुम्हाला आणू काही खायला.... किमान ज्यूस तरी घ्या......😟"

आजी : "माझी पिल्लू आल्याशिवाय मी तोंडात पाण्याचा एक घोटही घेणार नाहीये..... जा तू......🤨"

जया तिथून निघून, हॉलमध्ये संजय जवळ बसते.....

संजय : "काय बोलली आई....??😒😒"

जया : "अहो.... त्या बोलल्या की, पिल्लू घरी आल्याशिवाय पाण्याचा एक घोटही घेणार नाहीत....😕😕"

संजय : "सगळं माझ्याचमुळे होतंय..... मी नको करायला हवी होती इतकी मोठी चूक....😟🥺 आता मला परत आधी सारखी माझी आई मिळेल की नाही हे तर देवच जाणो......"

तेवढ्यात जयाचा फोन वाजतो...... 📱📲

जया : "अहो..... सचिन सरांचा कॉल येतोय..... बघा लवकर काय म्हणतायेत......😟"

संजय : "दे.....😟😟"

संजय : "हॅलो, इन्स्पेक्टर सचिन स्पीकिंग.... मिस्टर संजय बोलताय का...??"

संजय : "हो हो बोला ना सर......🥺"

सचिन : "सगळे घरी आहेत ना यावेळेस..... मी येऊ का....."

संजय : "हो हो घरीच आहोत.... पण, सर आमच्या सुकन्या विषयी काही माहिती मिळाली का.....??😟😟😥"

सचिन : "ते सर्व मी घरीच येऊन बोललो तर चालेल ना मिस्टर संजय.....🤨"

संजय : "हो सर पण, थोडं लवकर येता का..... नाही म्हणजे आमच्या लेकीची काळजी वाटतेय हो...😟😥"

सचिन : "हा विचार आधीच केला असता मिस्टर तर, तुमच्यावर ही वेळ कधीच आली नसती नाही का!!.....🤨"

संजय : ".....😒😒......"

सचिन : "येतोय आम्ही.....🤨"

संजय फोन ठेवतो......

जया : "काय म्हणालेत अहो, सचिन सर....😥 मिळाली का आपली सुकू....😟😒😥"

संजय : "ते घरी येतो बोलले.....😟😟"

जया : "काय झालं असेल नक्की....😒😥😥"

संजय : "हो ना..... आपल्याकडे वाट बघण्यावाचून पर्याय तरी कुठला ना दुसरा....😒😒"

सकाळी @१२:००.........

डोअर बेल वाजते..... संजय दार उघडून बघतो... सचिन सोबत एक साधारण अठरा वर्षांचा, हुशार दिसणारा (अर्थात तो खरंच आहे की, नाही कळेलच) मुलगा आपल्या टॉम (कुत्रा) सोबत असतो आणि त्यांच्याच मागे सुकन्याची स्ट्रोलर असते...... संजय जाऊन आधी सुकन्याला पकडून घेतो.....❣️❣️❣️❣️❣️ जयाही आतून येऊन सुकन्याला कुशीत घेऊन खूप रडते.....😭😭😭😭

सचिन : "आई कुठे आहेत.....🙄🙄"

संजय : "त्या वर त्यांच्या रूममध्ये...... बोलल्या की, पिल्लू जोपर्यंत दिसणार नाही.... पाण्याचा एक घोटही घेणार नाही.....😒😒😥"

सचिन : "सुकन्याला माझ्याकडे द्या..... मी जाऊन आईंशी बोलतो......😟😟"

सचिन सुकन्याला घेऊन, आजीच्या रूमजवळ जातो..... डोअर नॉक करतो.....

सचिन : "आई मी इन्स्पेक्टर सचिन..... दार उघडा ना..... प्लीज आई.... महत्त्वाचं बोलायचं आहे....😕"

आजी दार उघडून सचिन कडे बघतात आणि एक नजर त्याच्या हातात असलेल्या त्यांच्या पिल्लुवर जाताच, आजीच्या चेहऱ्यावर एक हसू येतं आणि डोळ्यांत पाणी...... किती दिवस आजी रडल्या नसाव्या असच वाटून जातं...... त्यांच्या पिल्लूला कुशीत घेऊन त्या जिवाच्या आकांताने रडतात.....😭😭 समोर सचिन आहे याचही त्यांना भान नसतं..... काही वेळ त्याला विसरून, त्या त्यांच्या पिल्लू सोबत हरवून जातात......❣️❣️❣️❣️


सगळ्यांना प्रश्न पडलाच असणार....🙄🙄 तो मुलगा कोण???? त्याचा तो टॉम कोण....????? तर तर, नक्कीच या प्रश्नांची उत्तरे मी घेऊन येतेय याच्या पुढील भागात........ तोपर्यंत मी माझ्या सुकु सोबत खेळते.... त्याचं काय ना हे लिहीत असता माझ्याच डोळ्यांत पाणी आलं...... सो..... उद्या घेऊन येते अशाच नवउर्जेसोबत एक नवीन भाग...... आणि हो सुकुच्या बाबांचा राग नका करू हो...... खूप चांगले आहेत ते.....😁

तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या...... आणि हसत रहा.....😁😁


@खुशी ढोके..🌹