Disability in relationships books and stories free download online pdf in Marathi

अपंगत्व नात्यांमधल

अपंगत्व नात्यांमधल
हे कसं काय असत म्हणाल, आता बरेच सण वगैरे सुरु होतील, लोक पूर्वी गावाकडे किंवा आपल्या मुळ गावी नातलगांकडे जायचे आता ते शक्य होत नाही , नोकरीमुळे शाळा कॉलेज, प्रत्येकाला सुट्टया एकाच वेळी असतील अस नाही त्यामुळं हे होत , तशी आता ही गरज पण कमी होत चाललीय सगळ्यांकडे आता मोबाईल , इंटरनेट , फेसबुक स्काईप असतच त्यामुळे बोलण सहज शक्य होत . आता इथे एक गंमत होते,
तस कोणाला वेळ नसतो आजकाल पण कधी सहज कोणाला फोन करावं तर काहींना लगेच वाटत काहीतरी काम असेल. किती इंटरनेट, व्हॉट्स ऍप जमान्यात लोक जवळ आलीत पण मनाने लांब चाललीत !

मुलं लहान असतात तेव्हा आई बाबा , आजी आजोबा मुलांना सांगतात अरे त्याला / तिला फोन कर तो तुझा भाऊ , काका , मामा वगैरे आहे मग वाढदिवशी किंवा सणवाराच असे फोन होतात, किंवा जेव्हा आई बाबा आपल्या नातलागांशी बोलतात तेव्हा आपल्या बबड्या किंवा बबडीला बोलवून त्या नातलगाशी ओळख करून देतात, मग ही प्रथाच पडते , ही मुलं तशी खूप हुशार असतात आपल्याला काय हवे नको ते ती खूप ठासुन सांगतात , त्यांना विचारूनच बऱ्याच गोष्टी ठरवल्या जातात त्यांना खूप छान ठाम निर्णय घेता येतो हे आवरजून सांगितल जात, मग हे बबडे मोठे होतात ते पूर्ण १८ - २१ वर्षाचे मतदाता होतात ,अजून पुढे काही वय वाढून काहींची तर अगदी लग्न होतात तरीपण हाच शिरस्ता चालू रहातो , कोणा नातलग विचारपूस , एखाद्या फंक्शनच आमंत्रण द्यायचं असेल फोन करायचा असेल , तर हे त्यांचे मध्यस्तच एखाद्या देश्याचा जसा परराष्टरमंत्री असतो तसा फोन करतात , त्यामुळे हे शरीराने मोठे होतात पण मनाने वाढतच नाहीत , आता त्यांच्या मित्र मैत्रिणीकडे जायला त्याच्याशी बोलायला त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, पण नातलग आई बाबा , आजी आजोबा यांचे मित्र नको रे बाबा . कधी कधी आपण सहज फोन करून चवकशी करतो तेव्हा हे परराष्ट्र मंत्री आधीच सांगतात यावेळी अजिबात त्याला/ तिला वेळ नाही , आता एखाद दुसर वेळी समजू शकतो पण हे सारखं रिपीट होत तेव्हा प्रश्न पडतो .
आता ह्याचं कवतुक दुसऱ्यांनी करावं हे ह्यांना ( परराष्ट्र मंत्र्यांना) फार वाटत पण ते ऐकून घ्यायला बबड्याने समोर नको का यायला?
आता सर्वच मुलं अशी नसतात , काही मुलं आधी उत्सूक होती आधी मिसळायला पण ह्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सतत अश्या कृतीने ती पण पुढे अशी बबडी झालीत.

आता ह्यांच्या मध्यसताना वाटत की ते बबड्या/बबडी च आयुष्य सोप करत आहेत पण वास्तवात ते त्यांना मनाने अपंग बनवत असतात , त्यांच्या नंतर बबड्याच काय होईल हा विचारच ते अती प्रेमापोटी करू शकत नाहीत .
आपल मूल सर्व गोष्टीत सुपर असावं असं प्रत्येकाला वाटत , मग ह्या गोष्टीत का नाही?
तुम्हाला जर वाटत की तुमच्या मुलीला/मुलाला सगळ्यांनी आपलेपणाने वागवाव मग तिला / त्याला पण सांगा ना दुसऱ्याशी आपलेपणाने वागायला ,मग सगळे न सांगताच त्याचे/तिचे लाड करतील.
जर तुम्ही दुसऱ्यांना आदर द्याल तेव्हाच तो तुम्हाला मिळेल ना?
कधी कधी पालकच आपल मूल आणि दुसऱ्या नातलगाच मूल ह्यात उगाच स्पर्धा करतात किंवा उदाहरण देतात आणि मग उगाचच नको ती स्पर्धा सुरू होऊन नात गढूळ होत जात.
शाळा कलेजात असताना आम्ही सहज अगदी कुठे गेलो तर त्या बाजूला कोणी नातलग / आई बाबांचे जुने स्नेही असतील तर त्याच्याकडे जात असू , पण आता हे बबडे अजिबात अस करत नाही , काही प्रसंग जस वाढदिवस , एखाद फंक्शन असेल ते ही बोलवलं किंवा मध्यस्तानी सांगितल तरच जातात.
कोणाकडे कुठे ह्यांना पाठवयाच असेल तर आधीच ह्यांचे मध्यस्त सांगतात ह्याला ना, हे आवडत ते आवडत नाही , मग काय हे दुसरीकडे गेले तरी काही शिकत नाही , ते मिसळतच नाहीत कुठे, हे लाडोबा असेच मोठे होतात त्यांच्या शब्दकोशात नाही हा शब्दच नसतो , मग त्यांना नोकरी ठिकाणी , रिलेश नशिपमध्ये प्रोब्लेम येतो ते कुठेच एडजेस्टमेंट करत नाहीत , आता काहिंकडे खूप पैसे असतात त्यामुळे सर्व ठीक आपण करू अस त्यांच्या मध्यस्ताना वाटत पण प्रत्येक गोष्टीला लिमिट असतच ना , शेवटी हे आपल व दुसऱ्यांच आयुष्य खूप अवघड बनवून टाकतात
केव्हातरी अस होत की काही गोष्टी अश्या होतात की मग पालकांना वाटत ह्यांना कोणीतरी चार गोष्टी सांगाव्यात पण अस कोणीच नसत कारण बबडे कधीच कोणाच्या संपर्कात आलेले नसतात , मग शेवटी प्रोफेशनल हेल्पच घ्यावं लागतं जी एखादी फारच शुल्लक गोष्ट असू शकते .
त्यामुळं मुलांना वाढू द्या.
नात्याच अपंगत्व त्यांना आणू नका, नात कसं जपायच हे त्यांना शिकू द्या अस मला सांगावस वाटत , अश्या केसेस practice मध्ये पाहिल्या म्हणून शेअर करावं वाटलं म्हणून हा लेख , ह्यात कोणालाही लक्ष्य करण्याचा हेतू नाही .
Rajendra Mahajan.
Pune