Janu - 34 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 34

जानू सकाळी उठून मोबाईल पहाते तर पहाटे पाच ला च अभय चा गूड मॉर्निंग चा मॅसेज आलेला असतो..ती विचार करते ..हा तर रात्री ही लेट झोपला आणि आता इतक्या लवकर उठला ही आहे ?काय विचित्र आहे ना अभय पणं ..मग ती त्याला गूड मॉर्निंग चा रिप्लाय देऊन आवरायला जाते..आवरून निघणार नाश्ता करत असते की पुन्हा अभय चा मॅसेज येतो..

अभय: झाला का नाश्ता?

जानू : आता चालूच आहे... तुझा ?

अभय: माझा सकाळी सहा ला च होतो..

जानू : इतक्या लवकर कसं खातोस रे ? मला तर इतक्या सकाळी काही खायची इच्छा च होत नाही..

अभय: म्हणून तर अशी लुकडी सुकडी आहेस ..जरा खात जा ग..आणि मला सात ला ऑफिस मध्ये हजर राहावं लागतं म्हणून करावा लागतो सकाळी नाश्ता..तुझं ऑफिस कधी पर्यंत असत ?

जानू : ये लूकडी सूकडी नाही मी ..आणि मी खाते ..पणं नाही वाढत तब्येत तर त्यात माझी काय चूक ?माझं ऑफिस ९ते ५ असत..पणं जायला एक तास भर लागतो त्यामुळे ८ पूर्वीच निघाव लागत .

अभय: हम..म्हणजे माझं एक तास आधी सुटत..७ते ४ ..तुझं बर आहे ..सकाळी थोड झोपायला तर मिळतं तुला.

जानू : हो..पणं जास्त वेळ कुठे रे..सुट्टी असू दे नाही तर काम ..बाबा न चा नियमच आहे सकाळी सहा पेक्षा जास्त झोपायच नाही..सुट्टी दिवशी ही ..६ ला च उठवून बसवतात...काम नसत काही जास्त पणं नियम तो नियम बाबा ...आणि त्यात मला या झोपेचं काही कळत नाही ..रात्र भर झोपल तरी ..पहाटेच कशी इतकी छान झोप लागते की वाटत..आता कोणी उठवू नये..पणं नेमक त्याचं वेळी उठाव लागत.

अभय:अग झोपायच झोपू वाटलं तर सुट्टी दिवशी त्यात काय बिघडत..

जानू : हो एकदा तूच येऊन बाबा ना सांगून जा..जानू ला सुट्टी दिवशी थोडा जास्त वेळ झोपू द्या म्हणून..

अभय: हो सांगेन की..

जानू : अरे बापरे काय रे तू पणं ..सकाळी गप्पा मारत बस लास...मला उशीर होत आहे ..तुला काही काम नाही का ऑफिस मध्ये..

अभय: ओ मॅडम मला ही काम आहे पणं आपल्या माणसानं साठी वेळ काढायचा असतो आपणच ..आपल्याला कोणी ..वेगळा वेळ काढून देत नसत ..बोला म्हणून.. बर बर..जा तू ..बोलू नंतर..

जानू : बर चल बाय..

ऑफिस मुळे दोघांना जास्त वेळ बोलता येत नसत..पणं वेळात वेळ काढून अभय जानू शी बोलायचा..आणि जानू मात्र तिला वेळ मिळाला की मग च त्याला रिप्लाय देत असे.. अभय कधी कधी खूप थकायचा..वाट पाहून ..जानू थोड आपल्याला इग्नोर करते अस त्याला जाणवत होत..पणं तरी ही त्याची काही हरकत नव्हती .. जेवढा वेळ जानू द्यायची त्यातच तो खुश असायचा.....आणि जानू तर..एक अभय च होता तिच्या आयुष्यात ज्याच्या सोबत ती थोड का होईना मन मोकळे पणाने बोलत होती..पणं .. अभय मध्ये तिला गुंतायच नव्हत..आपल्या आयुष्या चा पुन्हा समीर होवू नये इतकंच वाटत होत तिला..अजून हि मनाच्या कोपऱ्यात समीर ने दिलेल्या जखमा ताज्या होत्या... अभय तसा नाही हे तिला माहीत होत पणं ..ती त्याला मित्रा पलीकडे काही मनात नव्हती..आणि अभय तर तो तर आता पूर्ण जानू मय झाला होता..मित्रान सोबत फिरणं गप्पा मारणं ही त्याचं कमी झालं होत त्यामुळे मित्रा त्याच्या वर चिडत ..कधी कधी त्याचा मोबाईल काढून घेऊन त्याला खेचून सोबत घेऊन जात..त्यामुळे रात्री उशीर झाला यायला की ..जानू झोपलेली असे..आणि अभय मात्र तिला मॅसेज करून ..पुन्हा तिच्या विचारात जागत बसे.
अभय च स्टेटस पाहणं हा तर जानू चा दिनक्रम झाला होता..त्याचे स्टेटस तिला फार आवडायचे... जीवना बद्दल किती तरी सुंदर विचार त्याच्या स्टेटस मध्ये असायचे..कोण कोणते डेज..प्रत्येक डेज वरती तो स्टेटस ठेवायचा..कोणत्या नेत्याची जयंती असू ..किव्हा..कुठे एखादी घटना घडली असो.. अभय च लक्ष सर्व बाजूला...जानू ला त्याचं खूप आश्चर्य वाटत असे..याला कसं बर सर्व छान वाटत..आणि एक मी ..मला तर सर्व जीवनच नीरस वाटत..किती बदललेत माझे विचार जीवना बद्दल ?

आज ही अभय ला..जानू सोबत बोलायला जमल नव्हत..त्याच्या एका मित्राचा वाढदिवस जो होता..आणि अभय त्याचीच तयारी करत होता..त्यामुळे इच्छा असून ही.. अभय तिला मॅसेज करू शकला नाही...आणि आज च जानू ला त्याच्या सोबत बोलावंसं वाटलं होत ..म्हणून तिने त्याला मॅसेज केलेला..पणं रिप्लाय काही आला नाही..तिने त्याचं स्टेटस पाहिलं..happy Birthday bhava..जल्लोष भावाच्या बर्थ डे चा असा स्टेटस होता.. ह .. तर साहेब पार्टीत बिझी आहेत वाटत चला ..करू देत एन्जॉय म्हणून तिने ही झोपायच ठरवल.. इकडे .. अभय च मन सारखं जानू सोबत बोलायला तडपत होत..पणं मित्रान पुढे त्याचं काय चालतंय? शेवटी एकदाचं सपल सर्व आणि अभय ने पटकन जानू ला मॅसेज केला... तर तिचा मॅसेज येऊन गेल्याच त्याला दिसलं अरे रे..आता झोपली असेल की काय असा तो विचार करतच होता की जानू चा रिप्लाय आला.

जानू : झालं का ?आता वेळ मिळाला का ?

अभय: हो झालं ..अग तो मित्राचा वाढदिवस होता त्यामुळे बिझी होतो थोडा.

जानू : बर मग कर एन्जॉय ..

अभय: झाला बोल ना ..

जानू : नाही कर जा ना एन्जॉय..

अभय: झाला ब डे...गेले सर्व जण आप आपल्या घरी..बोल ना तू ..जेवलीस का ?

जानू : मी का बोलू ? बोल जा ना तुझ्या भावा सोबतच..

अभय: गेले की ते आता..आता कस बोलू ?

जानू : मग त्यांच्या घरी जावून बोलत बस..भाऊ प्रेमी तू..

अभय: अग सॉरी बाई..वाढदिवस होता..मग काय करणार..आणि मित्र पणं सोडत नव्हते ना..

जानू : मग बोल जा ना त्यांच्या सोबत ..मी झोपते बाय...

अभय: ये जानू ..अग ऐक ना सॉरी ना..बोल ना..

अभय तिला मॅसेज करत राहतो पणं जानू मॅडम तर रागवल्या होत्या ना ..त्या निवांत झोपी गेल्या बिचारा अभय.. इकडे जानू नाराज झालीय म्हणून विचारात जागत बसले.

क्रमशः ..