Janu - 41 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 41

अभय चा स्वभाव ,त्याचं बोलणं त्याचं प्रेम या सर्वांनी जानू च मन कधी व्याप्त झाल होत हे तिचं तिलाच माहित नव्हत..पणं हे ती मान्य करायला तयार नव्हती..खरंच तर आहे ..दूध पोळल की माणूस ताक ही फुकून पितो..जगाची रीत च आहे..जानू च बाहेरी मन व आतला आवाज याच जोरदार भांडण चालू होत..आणि जानू या दोघांच्या मध्ये फसली होती..आतला आवाज म्हणायचा..

आवाज: अभय चांगला आहे..कशाला त्याच्या सोबत इतकं रागाने बोलतेस..का चिडते स त्याच्या वर..

आणि मन म्हणायचं..

बाहेरी मन : समीर ही चांगलाच होता.. माहिती आहे ना काय केलं त्यानं?

आवाज: अभय अस कधीच करणार नाही..

मन : समीर करेल अस कधी वाटलं होत ?

आवाज : अभय च प्रेम आहे जानू वर..

मन : समीर च ही होत ..जानू ला तर वाटतं होत ..ना..

दोघांच्या भांडणात जानू वैतागून गेली होती..तिने दोघांना ही गप्प केलं..
will you just shut up ..both of you..?

अभय फक्त माझा फ्रेन्ड आहे .तुम्ही दोघे उगाच स्वप्न नका दाखऊ मला..फ्रेन्ड शिप आहे आणि तीच राहू दे..प्रेमाच्या वाटेवर मला पुन्हा जायचं नाही..पुन्हा आयुष्याचा समीर करून घ्यायचा नाही .
जानू ने परत एकदा आतल्या आवाजाला आतच दाबून टाकलं.

आज अभय नी गूड मॉर्निंग मॅसेज ही केला नव्हता की त्याचा फोन ही आला नव्हता जानू ला आश्चर्य वाटत होत ..सकाळी सकाळी गूड मॉर्निंग करणारा अभय आज कुठे गेला..आज तिने च त्याला गूड मॉर्निंग चा मॅसेज केला होता पणं त्याचा रिप्लाय आला नव्हता .कामात असेल म्हणून तिने ही मग आवरून ऑफिस गाठल..दुपारी फोन पाहिलं तर अजून ही अभय नी मॅसेज पाहिलं नव्हता तिचा..मग तिने विचार करत बसण्या पेक्षा डायरेक्ट त्याला फोन च केला दोन चार रिंग नंतर फोन उचलला गेला .

जानू : हॅलो..कुठे आहेस ? अजून झोपला आहेस की काय ? सुर्य कधीच उगवला आहे .

अभय: हो झोपलो होतो.

जानू ला अभय चा आवाज खूपच बारीक वाटतो..

जानू: काय झालं ? आवाज असा का येत आहे तुझा ?कुठे आहेस ?

अभय: हॉस्पिटल मध्ये आहे ..रात्री अचानक तब्येत खराब झाली आणि मग हॉस्पिटल मध्ये आलो तर त्यांनी अडमि ट करून घेतलं..

जानू : अरे काय झालं अचानक ? काय बोलले डॉक्टर ?

अभय: येईल रिपोर्ट थोड्या वेळाने पाहून सांगतो तुला..

जानू : सोबत कोण आहे रे ? कशी आहे तब्येत?

अभय: बाबा आहेत. .अजून तरी काही ठीक नाही .. ताप आहे खूप कमी होत नाही..गोळ्या दिल्या होत्या म्हणून झोप लागली होती.

जानू : असा कसा रे अचानक आजारी पडला स ?

अभय: आता काय माहित..तुझं काय चाललं आहे ?

जानू : आहे ऑफिस मध्ये..तुझं काय मॉर्निंग झालं नाही म्हटलं आपणच करावं .

अभय: झाली ना माझी मॉर्निंग ..ती ही इतकी छान ..आज पहिल्यांदा तू स्वतः फोन केलास मला..खूप छान वाटत आहे.

जानू : अभय डोकं ही दाखवून घे डॉक्टर ला..तब्येत खराब आहे आणि छान वाटतं बोलतोस ?आणि काय रे मला लुकडी सुकडी बोलतोस ? मी काळजी घेत नाही स्वतः ची बोलतोस ? आणि स्वतः मात्र डायरेक्ट हॉस्पिटल गाठतोस आजारी पडून ?निदान मी तुझ्या सारखं अडमि ट तर होत नाही ना..तुझ्या पेक्षा तर मीच स्ट्रोंग आहे म्हणायचं मग..

अभय: हो तूच स्ट्रो ग...पणं मी काही मुद्दाम केलं नाही ..आता झाली अचानक खराब तब्येत तर काय करणार ?

जानू : बर बर कर आराम ..काळजी घे.. काही तरी खाऊन मग मेडीसिन घे..मी ठेवते फोन ..उगाच तुला जास्त त्रास नको.

अभय: ये बोल ना जानू..आणि मला बर वाटत आहे...तू बोललीस की.

जानू : बरं बोलते पणं थोड काम आहे आवरून ..

अभय: हो डॉक्टर आले मी ही बोलतो नंतर..

जानू : ok

जानू आपल्या कामात बिझी होते पणं तिला अभय ची खूपच काळजी वाटत होती..काय झालं असेल याला अचानक ? दर रोज किती बोलत असतो आज शांत आहे तर सर्व जग उदास वाटत आहे..हे देवा अभय ला लवकर बर कर...काम आवरून जानू घरी जाऊन पुन्हा अभय ला मॅसेज करते.

जानू : काय आले का रिपोर्ट ? काय बोलले डॉक्टर ?

अभय: होय आले ..मलेरिया झाला आहे म्हणे..चालू आहे त्यांची ट्रीटमेंट..बघू आता काय होत.

जानू: अरे पणं अचानक कसं काय ?

अभय: अग ते मित्रा कडे गेलो होतो दोन दिवस ..तिथे खूप मच्छर होते..त्यामुळे च झालं असेल.

जानू : हो हो करा समाज सेवा आणि पडा आजारी..आणि द्या आम्हाला टेन्शन.

अभय: आता मला काय माहीत होत का अस होईल म्हणून ?

जानू : बर लवकर बरा हो मला नाही पाहवत तुला अस..

अभय: होय का लवकर बरा होवू का ?

जानू : हो .

अभय: मग ते तर तुझ्या हातात आहे.

जानू : कसं काय ?

अभय: तू ये ना इथे ..तू आलीस ना बघ मी लगेच बरा होईन ..हॉस्पिटल मध्ये राहायला ही लागणार नाही..आणि मेडीसी न ही घ्यावी लागणार नाही आणि वरून पैसे ही वाचतील.

जानू: मला पाहून तिला बर वाटणार होय ? मग हॉस्पिटल मध्ये कशाला गेलास ? डायरेक्ट यायचं होतं स ना नाशिक ला..हॉस्पिटल च बिल वाचलं असत ना..

अभय: होय सुचलं च नाही ग..आधी..ये पणं प्लीज ये ना जानू एकदा.

जानू : सॉरी अभय खरंच मला ही वाटतं यावं तुला पाहावं पणं बाबा नाही पाठवणार..आणि कारण तर काय सांगणार मी घरी?

अभय: प्लीज सांग ना काही तरी मैत्रिणी कडे जात आहे वगैरे..

जानू : मैत्रीण ? अरे कोण मैत्रीण काय काम ? हजार प्रश्न विचार तील ..आणि मी कधीच कोणाच्या घरी जात नाही..अचानक अस विचारल तर बाबा शक घेतीलच पणं पाठवणार ही नाहीत..

अभय तिला खूप रिक्वेस्ट करतो पणं ती नाही च बोलते..

अभय: नाही यायला जमल तर ठीक आहे पण निदान एकदा येते तर बोलायचं होत ना .. बर वाटल असत ना मला.

जानू : खोटं कशाला बोलू ? उगाच एखाद्याला खोटी आशा मला दाखऊ वाटत नाही रे..

अभय: बर मला सांग ..आजारी असल्यावर तुला काय वाटतं?

जानू : काय वाटतं म्हणजे ? आराम करावा वाटतो ..झोप वाटत.

अभय: मी आजारी असलो ना मला तू जवळ असावी असं वाटतं ..तू माझ्या सोबत बोलत बसावी स..खूप मिस करतो मी तुला .

जानू : तू तर बारा महिने मला मिस च करत असतोस.

अभय: तुला पटत च का नाही ग मी बोललेल ?

जानू : तू बोलतो च त स.. तर..

अभय: तस म्हणजे कसं ?

जानू : जावू दे सोड ना विषय..

अभय: थांब डॉक्टर विझिट ला आलेत बोलतो..

जानू थोडा वेळ वाट पाहते...नंतर अभय चा परत मॅसेज येतो.

अभय: बोल..

जानू: डॉक्टर च होते ना की डॉक्टरिन ?

अभय: ये डॉक्टर च होते फोटो काढून पाठवू का ?

जानू : नको नको..

अभय: आणि डॉक्टरीन असली तरी मी का पाहू ..माझी डॉक्टरिण तर नाशिक मध्ये आहे ना .

जानू : झालं चालू तुझं ,.. बर काय बोलले डॉक्टर ?

अभय: उजवा हात सुजला आहे सलाईन चढत नाही डाव्या हाताला लावून पाहू बोलत आहेत.

जानू : अरे मग सांगायचं ना ? कशाला चॅटिंग करत बसला आहेस ?

अभय: असू दे तू बोल .. सुजू दे सुजवला तर..

जानू: तू वेडा आहेस का ? उजवा हात सुजला तर डाव्या हाताला सलाईन लावली तर कसं बोलणार आहेस ?

अभय: हो आहे मी वेडा..मी नाही लावुन घेत डाव्या हाताला ..उजव्याच लावू देत..आणि तू इथे येत ही नाहीस आणि वरून बोलायला पणं तयार नाहीस काय यार जानू.

जानू : अरे मी बोलतेय ना ..तुला बर वाटल तर चांगलंच आहे..पणं आराम कर.

अभय: आता कुठे काम करत आहे मग ? झोपून तर आहे ..आणि तू नाही बोललीस तर मी जास्त आजारी पडेन.

मग जानू ही त्याच्या बोलण्या मुळे त्याच्या शी बोलत राहते..रात्री मग गप्पा मारत च तिला झोप लागते..सकाळी उठून आवरून पुन्हा अभय ची चौकशी करते..

जानू : हॅलो गूड मॉर्निंग ..वाटत का बरं ..थोड तरी ?

अभय: हो..थोड वाटत..आहे..डॉक्टर आले होते ग .. विजिट ला..

जानू : काय बोलले ?

अभय: हॉस्पिटल मध्ये c c tv cameras आहेत ना..म्हणत होते आजारी आहात थोड आराम ही करत जावा सारखं चॅटिंग करत बसू नका..

जानू : वा वा ..छान बघ आता डॉक्टर ला ही तुझं चॅटिंग किती चालू आहे कळत आहे ..पणं तू काही ऐकू नकोस..

अभय: म्हणू दे डॉक्टर ..आता मला तुझ्या सोबत बोललं की वाटत बर तर.

अभय पाच दिवस झाले हॉस्पिटल मध्ये असतो त्याची तब्येत काही सुधारत नव्हती ..तो हॉस्पिटल ला कंटाळला होता..जानू होती बोलायला म्हणून त्याचा वेळ जायचा..

जानू : अभय कधी होणार रे तू ठीक ..बघ ना पाच दिवस झाले..

अभय: मग ये ना तू ..बघ मी लगेच ठीक होईन.

जानू : ठीक आहे मग मी ही आजारी पडते आणि येते तुझ्या साईड ला..

अभय: ये अस नको बोलू स..आजारी पडून नको येऊ ..एक तर हॉस्पिटल मध्ये इतकं बोर होत ना ..तू तर इथ एक दिवस ही थांबणार नाहीस.

जानू : मग हो ना लवकर ठीक .

अभय: मग ये ना तू..

जानू : बर ठीक आहे ..ज्या दिवशी तुला डिस्चार्ज देतील मी येईन घरी पाहायला तुला .

अभय: खर ना ?

जानू : हो पणं त्या साठी आधी तुला लवकर बर होय ला हवं आणि डिस्चार्ज मिळायला हवा ना.

अभय: तू येणार आहेस ना ..मग बघ मला उद्याच डिस्चार्ज मिळतो की नाही.

क्रमशः