Blind visionary books and stories free download online pdf in Marathi

डोळस:अंधत्व

-: *डोळस अंधत्व* :-

………… वाचूनच आश्चर्य वाटलं ना , अंधत्व डोळस कसं असू शकत तर याच उत्तर आहे , *यश सूर्यवंशी____* ,मागील वर्षी माझ्या ओळखीच्या एका सदगृहस्थांनी लेख पाठवला त्यातून मला यश बद्दल समजले. यश एक उपक्रम राबवतो ,नवीन वर्ष आले की आपल्या सर्वांना एका गोष्टी ची गरज भासते म्हणजे ती म्हणजे कॅलेंडर आणि यश ने याचा विचार करून व घरी थोडी आर्थिक मदत होईल या उद्धेशाने, त्याने लोंकांपर्यंत कॅलेंडर पोहचवण्याचा उपक्रम सुरु केला. यश च्या कुटुंबात तो ,त्याचे बाबा आणि त्याची आई राहतात. तिघे हि दृष्टिहीन. त्यांचे उपजीविकेचे साधन म्हणजे लोकल ट्रेन मध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर व नवनवीन वस्तू विकणे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि यात वेगळे पणा काय आहे , मी का याला डोळस अंधत्व म्हणाले याचंच स्पष्टीकरण पुढे मांडत आहे. यश बद्दल मला समजले, स्वतः त्याची भेट घेण्याचे ठरवले आपल्या जवळच्या लोकांना यश बद्दल सांगून जेवढ्या जास्त कॅलेंडर ची ऑर्डर देता येईल तेवढा प्रयंत्न चालू केला. लोकांच्या ऑर्डर आल्या व यश ला भेटण्याचा दिवस उगवला या भेटीमध्ये यशचा लहानपणापासूनचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली .

अंगावर काटा उभा राहील असा तो क्षण होता. यश चा जन्म झाला तेव्हा त्याला एका डोळ्याची दृष्टी होती. सुरवातीला तो एका डोळ्याने जग पाहू शकला पण नियतीला ते सुद्धा मान्य नव्हत. त्याची एका डोळ्याची दृष्टी हळूहळू गेली व यश दृष्टीहीन झाला. यश चा बालपण त्याच्या आजोळी गेले..घरी आई बाबा ,ते पण अंध, एकदा त्याचा मामा घरी आला असता यशला आई ग्लास मधून दूध पाजत होती. त्या ग्लास मध्ये किडा पडलेला होता. मामाने त्याच क्षणी यशला आपल्या बरोबर ठेवण्याचा निर्णय घेतला. यशच्या जडणघडणीत हा मामाचा निर्णय खूप महत्वाचा ठरला. यशचा सांभाळ करायचा म्हणून यशच्या मामाने लग्न सुद्धा नाही केलं व निस्वार्थी पणे यश चा सांभाळ केला,,,मामा चा हा त्याग आपल्या सर्वांसाठी एक आदर्शदायी उदाहरण ठरेल.

यशचे शालेय शिक्षण गोराई येथे झाले नंतर तो शिर्डी येथे हॉस्टेल ला राहायला गेला. लहानपणापासून यशचा स्वभाव खोडकर होता.. यशचा हा स्वभाव हॉस्टेल व शाळेमध्ये पण सुरु होताच. शाळे मधून यश बद्दल तक्रारी येऊ लागल्या तक्रारी एवढ्या वाढल्या कि जवळच्या नातेवाईकांनी त्याचे शिक्षण बंद करून , त्याला ट्रेन मध्ये वस्तू विकण्यासाठी पाठवा असे त्याच्या घरच्यांना सांगितले. पुन्हा मामाच्या आग्रहाखातर शिक्षण बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुन्हा एकदा मामाने दाखवलेला विश्वास यशने दहावी मध्ये ७५% मिळवून सार्थ केला. दहावी झाली आता पुढे काय याचा प्रश्न पडला. दहावीमध्ये मार्क पण चांगले होते. यश समोर भरपूर पर्याय होते.पण यश ने आर्ट क्षेत्रात पुढे जाण्याचे ठरवले. रुईया कॉलेज, मुंबई येथे त्याने ऍडमिशन घेतले व यशचा कॉलेज प्रवास सुरु झाला. लहानपणापासून यश ला समाजसेवेचे खूप वेड होते. त्याच बरोबर सायकलिंग , ट्रेकिंग ची ही खूप आवड होती. रुईया कॉलेज मध्ये शिकत असताना त्याने NSS जॉईन केले. या सर्व धावपळीत ११ वि १२ चे शिक्षण कसे पूर्ण झाले हे यश ला समजलेच नाही. १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले १२ वी नंतर काय हा प्रश्न त्याच्या समोर होताच त्याने तीच जिद्द पुन्हा दाखवत CET परीक्षेचा अभ्यास चांगला केला व चांगले मार्क पाडून गव्हर्मेंट LAW कॉलेज ला ऍडमिशन मिळवलं. सध्या यश LAW शेवटच्या वर्षात शिकत आहे. जिद्द आणि चिकाटी चे उत्तम उदाहरण म्हणजे आपला यश .

कॉलेज करताकरता समाज उपयोगी कामे पण करतो जस की यश आपल्या सारख्या डोळस लोकांसाठी वर्कशॉप घेतो त्यामध्ये अंध लोकांशी कसा संवाद साधायचा . अंध लोक वेगवेगळे गेम कसे खेळू शकतात.. अंध लोकांना खरच सिक्स्थ सेन्स असतो का?आणि बरच काही तो या वर्कशॉपमध्ये शिकवतो. यश हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा कार्यकर्ता आहे. मैत्री कट्टा या ग्रुप चा ऍक्टिव्ह मेंबर आहे. मोबाईल वरचे मेसेज , गाणी , फोन सर्व काही यश ला समजत. हे सर्व समजण्यासाठी मोबाईल मध्ये एक APP येते त्याचा तो वापर करतो,,,,

बघितलंत, काय फरक आहे का आपल्यात आणि यश मध्ये,,,आपण डोळस लोक जस वावरतो तसंच तो या समाजात वावरतोय ,,नवनवीन गोष्टी आत्मसात करतोय ,,आयुष्यात जगताना हा आदर्श आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे ,,,म्हणून तर याला डोळस अंधत्व नाव दिलं आहे,,,,, यश तुझ्या कार्यास आमचा सलाम व तुला पुढील वाटचालीस सर्वांकडून मनःपूर्वक शुभेछा............।

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व