Janu - 47 - last part books and stories free download online pdf in Marathi

जानू - 47 (अंतिम भाग)

जानू आज चार दिवसा नंतर ऑफिस ला आली होती...पणं आपण कशाला आलो असच तिला वाटत होत..ना कामात लक्ष लागत होत..ना काही करण्यात ..शेजारचे सहकारी गप्पा मारण्यात ,हसण्यात बिझी होते ..इथे माझं हृदय जळते य..आणि बाकीचे किती खुश आहेत ..मग मीच काय त्या देवाचं वाकड केलं आहे काय माहित म्हणून ती चिडत होती..आज तिने जेवणं ही केलं नव्हत..दिवस ही जात नव्हता आणि काम ही होत नव्हते..पणं कसं बसं तिने तिचं मन कामात वळवळ.. आणि ऑफिस सुटायची वेळ झाली तशी ती बाहेर आली...समोर अभय ला बघून तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही..पळत जाऊन त्याला मिठी मारावी अस तिला वाटलं .. पणं नंतर लगेच आकाश च बोलणं आठवल .. अभय च लग्न आहे..त्याच्या पासून दूर च राहा.
अभय ची हालत जानू सारखीच होती ..त्याला ही जानू ला धावत जावून उचलून घ्यावं वाटत होत पण तिची थोडी गम्मत करावी अस त्याला वाटलं..मला किती त्रास दिला ना जानू आता तुला ही थोडा ह..असा विचार करत तो जानू समोर येऊन उभा राहिला.

अभय:कशी आहे स ?

जानू : आहे जिवंत?

अभय: काय ?

जानू : काही नाही ..आहे ठीक आहे ..पणं तू इथे कसा काय ?कसा आहेस?

अभय: मी खूप खूष..

अभय नी खूष आहे बोलला तस जानू च्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या..हो आता लग्न आहे म्हणजे खुश च असणार साहेब..आणि उगाच मला म्हणत होता..जान आहेस आणि जीव आहेस ..नाही काय बोलले लागला लगेच दुसऱ्या मुली सोबत लग्न करायला ..आणि मी इथे उगाच तडफड बसले.. खरंच हे जग माझ्या सारख्या इमोशनल फूल मुली साठी नाहीच आहे इथे प्रत्येक जण समीर सारखेच आहेत..जानू स्वतच्या च विचारात होती... अभय तिच्या सोबत बोलत होतं पणं ती कुठे ऐकत होती..शेवटी अभय ने तिला हाताला धरून हलावल..तेव्हा ती भानावर आली..

अभय: चल ना थोडा वेळ कुठे तरी बसू ..बोलायचं आहे तुझ्या सोबत थोड.

मग दोघे जवळच असणाऱ्या एका पार्क कडे गेले..तिथे च एका बाकड्यावर बसले..

जानू : तुझे बाबा गेल्याच ऐकलं..खूप वाईट वाटलं..सॉरी मला काहीच माहीत नव्हते ..

अभय:बाबा चा विषय निघाला त स अभय दुखी झाला..

जानू ला वाटलं उगाच आपण विषय काढला मग विषय बदलावा म्हणून तिने.च..बोलायला सूरवा त..केली.

जानू : कशी आहे मुलगी ?कधी आहे लग्न ?

अभय ने जानू चे प्रश्न ऐकले तसे त्याचा मूड बदलला..खुश झाला एकदम तो..जानू ने ते पाहिलं..खूप वाईट वाटलं तिला..लग्नाचं नाव काढलं तरी लगेच किती खुश झाला.

अभय: खूप छान आहे..खूप सुंदर आहे..एकदम परी सारखी..मला खूप आवडते..मी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता इतकी सुंदर बायको मिळेल असा..तिच्या बद्दल काय सांगू ?

जानू ला ते ऐकुन खूप राग आला व जळण ही झाली तिला अभय ला ते कळलं त्याला खूप हसू आल..जानू उठून जायला निघाली..

जानू : चल मी जाते ..उशीर होतोय मला..

अभय: अग ..काय तुला सारखी गडबड असते ग..थांब ना थोडा वेळ..

तस जानू थोड रागातच बोलली..

जानू : कशाला ? तुझ्या बायको ची तारीफ ऐकायला..

अभय ने आपल्या जॅकेट मधून एक कार्ड काढलं..अभय काही बोलायच्या आतच जानू च बोलायला लागली.

जानू : लग्न पत्रिका द्यायला आला असशील तर नको मला ती सॉरी मी नाही येऊ शकणार...and by the way happy married life in advance.

अभय : तू नाही येणार ?

जानू : नाही..

अभय: अग पणं तू नाही आलीस तर माझं लग्न कसं होणार ? एकट्या मुलाचं कुठे लग्न होत का ? आणि नवरी मुलगी च नाही तर मी लग्न कोणा सोबत करू ?

जानू: म्हणजे ?

अभय: म्हणजे माझं काही लग्न वगेरे नाही ..मी लग्न कॅन्सल केलं आहे.

जानू: का ?

अभय: काय का विचारतेस ? तू इथे असताना मी लग्न कसा करू शकतो ? माझं तुझ्या वर प्रेम होत आहे आणि मी असे पर्यंत राहील..

अभय मग ते ग्रीटिंग कार्ड तिच्या हातात देतो .. ते तेच होत जे त्याने १० वर्षा पूर्वी तिला तिच्या वाढ दिवसाला दिलं होत ते..पणं तिने ते परत त्याला देऊन टाकलं होत.

जानू : तू अजून ठेवलं आहेस हे जपून ?

अभय: हो ..मी तर तो प्रोजेक्ट ही ठेवला आहे अजून जपून तसाच ..

जानू ला आश्चर्य वाटत ..पणं तिच्या लक्षात येत की त्याच लग्न नाही होणार आणि मगा पासून तो आपल्याला फसवत होता..

जानू : एक मिनिट ..म्हणजे तुझं लग्न नाही होणार ..पणं ते मघाशी सुंदर..आवडली काय काय म्हणालास ते काय होत .?

अभय: ते तर मी तुझ्या बद्दल बोलत होतो..अस म्हणून अभय हसू लागला.

जानू त्याला हाताने च दंडावर मारत ..ओरडत होती.

जानू : यू.. नालायक..मूर्ख..बावळट ..माझी मजाक उडवत होतास ?

अभय: बर सॉरी सॉरी चूक झाली मॅडम माफ करा आता..आणि आता तरी बोला ना..

जानू : काय बोलू ?

अभय:जे तू आकाश ला बोलली होतीस..

जानू नजर चोरेत. .. व..मी कुठे काय बोलले म्हणते?

अभय तिला खूप विनवतो पणं ती बोलत नाही..मग अभय च पुन्हा ..खाली वाकून गुढग्यावर वर बसतो ..एक जॅकेट मधून एक गुलबाच फुल काढून जानू समोर धरतो.. व ..बोलतो.

अभय: जानू i love you..i love u so much..i really love you..do you love me ?

तो जानू ला विचारतो व तिच्या कडे आशेने पाहू लागतो..

जानू : No..

अभय पटकन उठून उभा राहतो ... व बोलतो..

अभय: ह..छान ..घ्या घ्या आमचा जीवच घ्या ..मग तर खर वाटेल ..

तस जानू त्याला दंडावर एक ठोसा देते व त्याच्या हातातून गुलाब घेत बोलते ..

जानू : माझं काही प्रेम नाही तुझ्या वर .. तर खूप खूप प्रेम आहे वेड्या..i will Marry you..

अभय तर ऐकुन खुश होऊन जानू ला उचलून घेऊन गोल गोल फिरवतो..जानू ही हसत असते आणि अभय ही खूप च जास्त खुश होतो..तो हळूच जानू ला खाली उतरव तो.. मग दोघे ही एक मेकांना बिलगून खूप रडू लागतात..का रडणार नाहीत ? आपल प्रेम कायम आपल्या पासून दुरावल अस वाटत असताना ज र ..ते परत आपल्या कडे आ ल.. तर कोणाला आनंद होणार नाही ?
बराच वेळ रडल्या नंतर मग दोघे ही शांत होतात..अभय हळूच आपल्या हातानी तिचे डोळे पुसतो व आपले ओठ तिच्या कपाळावर ठेकवतो.

जानू अभय व तिच्या बद्दल स्नेहा दीदी ला सांगते ..स्नेहा दीदी .. जिजू..अभय चे मित्र आकाश .. समिधा सर्व मिळून जानू च्या बाबा ना अभय व जानू च्या साठी समजवायला जातात..पणं ते त्याच काही ऐकत नाहीत..शेवटी ना एलाजने जानू च व अभय च लग्न त्याच्या समती शिवाय होत ..पणं सर्व पणं सर्व प्रधान काका ना समजावणं सोडत नाहीत ..थोड्याच दिवसात ..मुलानं विना घर कसं खायला उठते ..हे प्रधान काका ना समजून जात.. इतके दिवस जानू होती ..पणं तिच्या जाण्याने त्याचं घर पूर्णच शांत होऊन जात...शेवटी आपल्या नातवा ला पाहून (म्हणजेच स्नेहा दीदी चा मुलगा..)त्यांचा राग मावळतो..सुधीर जिजुंच्या रुपात त्याना एक मुलगा मिळतो ..त्यांची मुलाची हौस पूर्ण होते ..स्नेहा दीदी व सुधीर जि जु आता प्रधान काका न कडेच राहत होते..प्रधान काका रिटायर्ड होयुन आपल्या नात वा सोबत ..खेळण्यात मस्त लाईफ एंजॉय करत असतात..
अभय ला त्याचं सर्वस्व मिळालं..जानू ला तिच्या ही पेक्षा प्रेम वेड असणारा ..प्रेम वेडा मिळाला..

समाप्त...