gift from stars - 2 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - २

'पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून क्षितीज लिफ्टकडे वळला. "सायेब तुम्ही टायमाचे पक्के आहात. या ! आत्ताच सगळं आवरून बसवून ठेवलाय मॅडम ना." म्हणत शकुमावशी रूमच्या बाहेर पडली. तिला थम दाखवत प्रसन्न मुद्रेने तो आतमध्ये शिरला. 'साहेब आले वाटत.' म्हणत बाजूचे स्टाफ मेंबर आतमध्ये येऊ लागले. अर्ध्यापाऊण तासाने क्षितीज आपला पडलेला चेहेरा लपवत बाहेर निघून गेला. नेहेमीप्रमाणेच मग मागे नर्स, सिस्टर आणि वौर्डबॉय यांची ठरलेली चर्चा रंगायची. "कशाला येतो हा? एव्हढ्या वर्षांनी आता ती बाई काय बारी व्हायची राहिलेय का? उगाच नेहमीचे फेरफटके मारत बसतो." काही गोष्टी क्षितीजच्या कानावर यायच्या पण तो जाणीव पूर्वक दुर्लक्ष करायचा. अद्याप इथे येऊन जाण्याचा नेम त्यांने केव्हाही चुकवला नाही.'


*****

"आलास का जाऊन?" म्हणत मेघाताईंनी नेहमीप्रमाणेच त्याला आडवले. मान डोलावत तो येऊन सोफ्यावर आडवा झाला नाही तोच मेघाताईंच्या तोंडाचा पत्ता सुरु झाला. " ऑफिसमधून सुटल्यावर तडक घरी यायचं ना. रोजरोज कशाला जायला पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये? अजून किती दिवस तिची वाट बघणार आहेस तू? तसही मैथिली आता कोमात आहे. तिला कळतही नसेल तू येऊन गेल्याच."

"सगळं कळत तिला. वाट बघत असते ती माझी. जाऊदे ग, तुला नाही कळणार. सोड... मी फ्रेश होतो." म्हणत क्षितीज तिथून उठला.

"ती बोलते का तुझ्याशी? उगाच स्वतःचा वेळ वाया घालवायचा, काय कमी आहे तुला? इकडे कित्ती मुलींचे पालक रोज विचारपूस करत असतात. बघ एखादी, हो मोकळा."

"आई, ती बोलते माझ्याशी, तिची भाषा समजते मला. आणि तिथे गेल्यावर माझा वेळ कसा जातो, तेच मला समजत नाही."

"बरं, पुरे आता. तुला सांगून काही फायदा नाही. फ्रेश होऊन ये, काकू जेवण लावतायत."

काळजी तर होतीच, पण मुलाच्या मनात काय चाललं आहे, हे समजणे मेघाताईंसाठी अवघड होते.

*****

"पण का? का एवढं अडकून पडलास तिथे ? तुला मूव्ह ऑन कारण शक्य असतानाही. ती कोमात आहे. केव्हा शुद्धीवर येईल? याच उत्तर कोणालाच माहित नाही. मग एवढा अट्टाहास का? काही वचन वैगरे दिल आहेस का तिला. हे बघ मुळात ती असून नसल्या सारखीच आहे. त्यामुळे यात कसले करार आणि बंधन पळत बसण्यात काहीही अर्थ नाही. " जेवणाच्या तटावर मेघाताई क्षितीजला समजावत होत्या.

“आई मी तिला कोणतेही वचन दिलेले नाही. तिने तिच्या कोणत्याही शपतेत मला अडकवलेले नाही. आमच्या प्रेमाला केव्हाच कोणतेही बंधन नव्हते. आमच्या नात्याला काहीही नाव, काहीही शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे कोणताही करार करण्याची गरजच काय? वचन, करार, नाते, बंधन किंवा शपथ या पलीकडे जाऊनही प्रेम असू शकत. ज्याला निस्वार्थी प्रेम म्हणतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता एखाद्याशी एकनिष्ठ असावे, यात वावग काहीच नाही.” म्हणत जेवण संपवून तो उठला, त्याच्या उत्तरावर प्रतिउत्तर नसलेल्या मेघाताई शून्यात नजर लावून बसल्या.

*****

"सर, उद्या दुपारी १२:४० ला चंदिगढसाठी फ्लाईट आहे. कन्फर्म करू का?" पलीकडून संदेश विचारात होता.

"हो. कन्फर्म. लीगल टीमसाठी ४ सीट. बाकी इन्फर्मेशन तुला माझी असिस्टंट देईल."

"ओह, येस. थँक्स सर."

म्हणेपर्यंत पलीकडून फोन कट झाला होता.

‘टेबलवरील एक कॉफीमग उचलून क्षितीजने समोरच्या खोडकीबाहेर नजर फिरविली. दवबिंदूंचा ओघळ पसरून काचा धूसर झाल्या होत्या. तासंतास त्याच्याकडे बघत आपल्या भूतकाळात परतणे, त्याला फार आवडत असे. शेवटी न राहवून त्याने नजर हटवली. फाईल्स, लॅपटॉप आणि इतर साहित्य बॅगमध्ये भरून तो निघण्याच्या तयारीत होता, एवढ्यात वाहेरून टकटक करणाऱ्या असिस्टंटने समोर हजेरी लावली होती. "सर उद्याची फ्लॅइट मिळत नाहीय. आज एक अव्हेलेबल आहे, बुक करू का? अक्चुअली आज नाही तर चार दिवसांनी एक फ्लाईट मिळेल."

"काय मिस लेले? आज कस काय शक्य आह?"

" सर ती मिटिंग उद्याच आहे, अरेंजमेंट आणि इंव्हेटेशन सुद्धा पाठवून झालेत. वरून तश्या ऑर्डर्स होत्या. सो तुम्हाला आज निघावं लागेल."

" सो मला लगेचच निघावं लागेल आणि घरी जाऊन तयारी करून तातडीने एअरपोर्ट गाठावं लागेल. " क्षितिज त्रासिक मुद्रेने मिस लेलेंकडे पाहत निघाला सुद्धा.

"सर, तुमच्या घरी फोन करून मी तयारी करायला सांगितली आहे. त्यामुळे लेट नाही होणार." एवढं बोलून मिस लेलेही केबिन बाहेर पडल्या.

‘क्षितिजची नुसती चिडचिड सुरु झाली होती. कंपनीचे प्लॅन्स लास्ट मुमेंटला बदलतात. आणि त्यात फ्लॅट्सचे इश्यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये जाण शक्य होणार नाही, या विचारने त्याला अजून टेन्शन येत होत. एवढ्या वर्षात पहिल्यांदा ऑफिस नंतर मैथिलीला बघायला जात येणार नव्हते. त्याच्या नियमातच बसत न्हवते ते, पण इलाज नाही. शेवटी घर गाठून त्याने चंदीगढला जाण्याची तयारी केली.

मैथिली बरोबर काही वर्षांपूर्वी चंदीगढला गेला होता तो. तिथेच तर त्यांची मैत्री आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग ठरलेलं असायचं, केव्हा कुठे शॉर्ट ट्रिप , आऊटिंगला जायचं म्हंटल तर चार दिवस सगळे कॉलेजला बुडवून चंदिगढ ट्रिप काढत. शेवटची ट्रिप होऊन पाच वर्षे उलटली, तेव्हाच सगळं होत्याच न्हवत झालं. तेव्हाच अवलिया, टप्पोरी आणि मस्तमगण क्षितिज तिथून आला ते कर्तव्यदक्ष, समजुदार आणि सिरियसनेस घेऊनच. आता मात्र चंदीगढच नावच काढायची हिम्मत होत नसे. पण जाणे टाळता येण्यासारखे नाही, हे समजून नाइलाजाने तो निघाला होता.’

' त्याच्या प्रत्येक गोष्टीत मैथिलीची आठवण होती, प्रत्येक वाक्यात ती असायचीच, कॉलेज, घरापासून ते अगदी ऑफिसपर्यंत तिचा वावर होता. का नाही आठवणार ती? आणि विसरणार तरी काय काय? स्वतःला विसरणं शक्य होत का कुणाला? नाही. मग त्याच्या आयुष्यातून मैथिली वगळली तर काहीच उरात नाही. फक्त निर्वात पोकळी, ना मोजता येणार खोली आणि तिची न संपणारी पातळी. 'ती केव्हानाकेव्हा येईल शुद्धीवर,' या एक आशेवर तो तिला हवा असणारा क्षितिज बनायला तयार होता. तिला तसा शब्द दिला होता त्याने आणि आपला उनाडपणा सोडून आज त्या कालच्या क्षित्याचा KS (क्षितिज सावंत) झाला होता. एक मोठ्या कंपनीचा कायदेविषयक हेड. एक जबाबदारी, एक रुबाब आणि तडफदार व्यक्तिमत्व असणारा उमदा तरुण.'

----------------------------------

{पण जिच्यासाठी हे सगळं यश कमावलं, ती शुद्धीवर येईल का केव्हा, कि काही वेगळा डाव मांडला आहे त्याच्या नशिबी. काय आहे त्याची ग्रहदिशा ? समजेल पुढच्या भागात. दोन दिवसांनी. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया देत राहा. आणि वाचत राहा, 'नक्षत्रांचे देणे.'}

क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com