gift from stars - 5 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - ५

'गुडवीन हॉस्पिटल, नर्सेस, डॉक्टर्स आणि पेशन्ट्स त्यांचे नातेवाईक यांची नुसती मांदीआळी, बाहेरून येणारे रॉ रॉ रॉ असे ऍम्ब्युलन्सचे आवाज कानात गुंजत होते, "डॉक्टर पेशन्टला जाग आली, प्लिज इकडे या." ओरडत एक सिस्टर रूमबाहेर पडली आणि डॉक्टर त्या दिशेने धावू लागले. दुसरी सिस्टर सांगत होती. "अब ठीक लाग रहा है ना मैथिली जी ? उठो मत, बस आराम करो, वो आपके रिश्तेदार बाहरही है. ॲक्सिडेन्टका मामला. पोलीस पुछताछ चालू है." एवढे बोलेपर्यंत डॉक्टर आणि क्षितीज दोघेही आतमध्ये आले होते. मागोमाग पोलीस होतेच. थोडं चेकअप करून डॉक्टर ओक सांगून निघून गेले. आणि पोलीस शिपाई बाजूला बसून रिपोर्ट लिहू लागला. तो मैथिलीजी आपला ॲक्सिडेन्ट हुवा था. आपको कुछ याद है, कौन था वो आदमी. किसका ट्रॅकर, कुछ जानपेहचान है? "
आधीच गोंधळलेल्या त्या तरुणीने नकारार्थी मान डोलावली. जास्त बोलता येणे तिला शक्य नव्हते, त्यामुळे थोडी चौकशी करून समोर ठेवलेल्या रिपोर्ट वरती तिची साइन घेऊन पोलीस निघून गेले. तेव्हा तिला हायसे वाटले. "थँक्स." एवढा शब्द बोलून तिने जाणाऱ्या क्षितिजला थांबवले. तो थोडा गोंधळलाच होता. प्रश्नार्थक चेहरा करून त्याने तिच्याकडे पहिले.

" माझं नाव मैथिली असं सांगितलंत आणि आपली आधी ओळखही असल्याचं सांगितलंत त्यासाठी थँक्स."

"म्हणजे तुमचं नाव वेगळं आहे तर? पण तुम्ही पोलिसांना हेच नाव सांगितलं ना. " तो जरा आश्चर्याने पाहू लागला.

"होय. म्हणजे तुम्ही सिस्टर्सशी बोलत होतात तेव्हा मी ऐकलं होत. त्या सिस्टर्स देखील मला मैथिली अश्या नावाने आवाज देत होत्या. आणि खर तर, माझं खर नाव सांगून माझ्यासाठी आणखी नवीन संकट ओढवण्यापेक्षा मी मुद्दामहून तेच नाव पुढे केलं.'' कसेतरी उठण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.

'' म्हणजे तुमचं खर नाव?'' क्षितिजच्या मनातील गोंधळ अजून संपला नव्हता.

'' मी भूमी साठे. ॲक्सिडेन्ट नंतर तुम्ही मला ओळखत असल्याचं सांगितलं म्हणून थोडक्यात निभावलं. नाहीतर पोलीस घरच्या लोकांशी संपर्क करत बसले असते. घरी कळायला नको कि मी इथे आहे, आणि माझा ॲक्सिडेन्ट झालाय. ''

'' तुम्ही घरून न सांगता निघालात का?'' भूमीच बोलणं ऐकून क्षितिजला आश्चर्याचे धक्के बसत होते.

'' घरून सांगूनच निघाले, पण इथे आहे हे कोणाला माहित नाही. एक सांगून आले आणि आहे भलतीकडे, असं समजा.'' भूमी त्रासिक मुद्रेने त्याच्याकडे पाहत म्हणाली.

'' ओके. आता ठीक आहात ना? काही त्रास?''

'' नाही. मी ठीक आहे.''

'' डोक्याला बऱ्यापैकी मार लागलाय. काळजी घावी लागेल तुम्हाला. पण डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय. कुठे सोडायचं असेल तर सांगा.''

''हो प्लिज. मला हॉटेल फ्लोरामध्ये जायचं होत. आयमीन, मी तिथेच माझं राहण्याचं बुकिंग केलं आहे.''

'' ओक निघूया मग.'' म्हणत क्षितिज उठला.

''तुम्ही पण महाराष्ट्रीयन आहेत ना?'' भूमी त्याच्याकडे निरखून पाहत विचारू लागली.

''अ... होय.'' म्हणत क्षितिजही हसला.

*****

एक मोठं प्रशस्त आणि आलिशान हॉटेल फ्लोरा...सातव्या मजल्यावर भूमीच राहण्याचं बुकिंग होत. क्षितिज आणि त्याच्या ड्राइव्हरने तिचे सामान आणि इतर वस्तू तिथे सुपूर्त केल्या. रूममध्ये शिरल्या शिरल्या भूमीने समोरच्या सोफ्यावर अंग टाकलं होत. कदाचित तिला चक्कर येत असावं. किंवा थकवा जाणवत असावा. एकटी मुलगी आणि सोबतीलाही कोणीही नाही. आपण काय करावं हे क्षितिजला कळेना.

"आर यु ओके?" म्हणत त्याने पाण्याचा एक ग्लास तिच्यासमोर धरला.

"माहित नाही. थोडं गरगरतंय. पण ओके आहे. तुम्हाला लेट होत असेल ना. निघालात तरी चालेल."

"तुम्हाला एकटीला असं इथे सोडायचं, मला काही ठीक वाटत नाही. कोणी तुमच्या सोबतीला येऊ शकतं का?" थकलेल्या भूमीकडे एकटक पाहत क्षितिज विचारात होता.

"डोन्ट वरी, फक्त आजचा प्रश्न, उद्या एक मैत्रीण येईल इथे. दोन दिवसांनी याच हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर माझ्या एका पंजाबी मैत्रिणीचं लग्न आहे. सो माझे काही फ्रेंड्स येणार आहेत. त्यामुळे नंतर मी वरती गेस्टरुममध्ये शिप्ट होईन."

"ओके. गुड." क्षितिजला ऐकून थोडे हायसे वाटले होते. नाहीतर ही एकटी इथे का आली? त्यात घरी माहित नाही. वर ॲक्सिडेन्ट झालाय. या सगळ्या विचाराने त्याचं डोकं भंडावून सोडले होतं. आता कुठे त्याला तिच्याबद्दल थोडी माहिती मिळाली होती.

''ओक, टेक केअर.''

निघण्यासाठी तर तो उठला, पण पाय जागीच थिजले होते. काय करावं त्याला कळेना. रूमच्या चाव्या टीपॉय वर ठेवून तो निघाला, तेवढ्यात फोनची रिंग वाजली. त्याच्या आईचा फोन होता. या सगळ्या गडबडीत खूप वेळा रिंग वाजून गेली होती. ती काळजी करत बसली असेल, हे त्याच्या लक्षात आले. त्याने फोन कानाला लावला. पलीकडून मेघाताईंचा चिंताग्रस्त आवाज येत होता. क्षितिजने घडलेली घटना थोडक्यात सांगितली. तो ठीक आहे आणि ती मुलगी देखील ठीक आहे, हे ऐकून मेघाताईंना हायसे वाटले. त्या ऍक्सिडेंटच्या वेळी क्षितीज पुन्हा भूतकाळात शिरला असावा. आणि मैथिलीचा ऍक्सिडेंट झाला असे समजून त्याने भूमीसाठे या मुलीला वाचवले होते. हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला नाही. कारण असे काहीतरी विचित्र क्षितिजच्या बाबतीत अधूनमधून घडत असे. त्या मुलीला अश्या अवस्थेत एकट ठेवणं बर नाही, हे ओळखून कर्तव्यदक्षपणा दाखवत त्यांनी क्षितिजला त्याच हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगितली. तसही त्याचा ऑफिस मीटच डेस्टिनेशन तिथून फार लांब नसल्याने क्षितिजलाही काही प्रॉब्लेम होणार नव्हता. "काळजी घे. आणि त्या मुलीची मैत्रीण येईपर्यंत तिची विचारपूस करत राहा." बजावून त्यांनी फोन ठेवला.

आपण कोणत्याही पेचात सापडलो तर आपली आई सदैव आपल्याला मार्गदर्शन करते, क्षितिजला याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली होती. ‘खरतर ती पप्पांची दुसरी बायको. पण जन्मदात्या आईने जेवढी माया लावली नाही त्याच्या दुप्पट प्रेम, माया मेघाताई आणि क्षितीज याच्या नात्यात होती. आईच्या सांगण्याप्रमाणे ऑफिसमध्ये फोन लावून क्षितिजने आपले आधीचे बुकिंग कॅन्सल करून भूमीच्या शेजारच्याच रूममध्ये बुकिंग करवून घेतले. थकल्यामुळे आणि डोक्याच्या दुखण्यामुळे तिला आजूबाजूला काय चाललंय याचा अंदाज लागत न्हवता. मेघाताई आणि क्षितिजच फोनवरच बोलणं सुरु असताना भूमी जागच्या जागी झोपी गेली होती. ‘तिच्याकडे पाहून क्षितिजला वाटले. ' हाय-बाय म्हणण्याच्या अवस्थेत ती नाहीय. आपण इथे थांबण्याचा डिसिजन बरोबरच होता.' वेटर्सना खाण्यापिण्याची थोडी माहिती देऊन, भूमीसाठी सगळी सोय करून तो त्याचा रूममध्ये निघून गेला.


क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com

Share

NEW REALESED