gift from stars - 4 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - ४

{क्षितिज आणि भूमी...

जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी त्यांच्या नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे स्टार्स त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणतात. इथे नक्षत्रांनी घडवून आणलेल्या अशाच अनपेक्षित भेटीमुळे सुरुवात होते एका प्रेमकथेची, या दोन व्यक्तिरेखांची एक हळुवार गुंतलेली प्रेमकथा घेऊन येत आहे, माझी हि दीर्घ कादंबरी...'नक्षत्रांचे देणे.'}

-------------------------

'हातातील लग्न पत्रिका बघून मेघाताईंनी नकारार्थी मान डोलावली. 'निलच लग्न, ते पण एका पंजाबी मुलीशी, एक साधारण घरातला मुलगा, पण गडगंज पैसेवाल्याची मुलगी पटवून लग्न करतोय. या आधी किती अफेअर्स केलेत त्याच गणितच नाही. नाहीतर माझा क्षितिज, नको त्या मुलीच्या मागे लागून पुरताच फसला. जवळजवळ सगळ्याच नातेवाईकांच्या मुलामुलींची लग्न झाली. याच्या समवायच्या मित्र मैत्रिणींची लग्न झाली. आता याची आजी तिसर्या लग्नाची तयारी करेल. पण याच्या लग्नाचा योग्य नाही.' आज त्या स्वतःशीच बडबड करत बसल्या होत्या त्या. विचारांच्या तंद्रीत त्यांनी फोन डाइल केला.'

"पोहोचला का रे?"

"जस्ट फ्लाईटमधून उतरलो, कारमध्ये बसलोय." क्षितिज एक दिर्घ श्वास घेऊन खिडकीबाहेर बघत होता.

"काही खाल्लं का?"

"हॉटेल वर जाऊन फ्रेश होतो, मग नाश्ता करून घेईन, तू ? "

"मी बसते आहेच, तुला फोन करावं म्हंटल. तू घरी नसला कि काळजी लागून राहते रे. " मेघाताईंच्या आवाजात खरोखरच काळजी जाणवत होती. जणू क्षितिज खूप दिवसांसाठी बाहेर पडला असावा.

"आई मी आता लहान आहे का? का काळजी करतेस एवढी?”

"साठे काकांचा फोन येऊन गेला रे. 'तुझे ग्रह तुला फिरवत आहेत’ म्हणाले. तेव्हापासून मला थोडं अस्वस्थ वाटतंय."

"तुला माहित आहे ना, माझा विश्वास नाही त्याच्यावर, ते काहीही सांगतात. बर ते जाऊ दे, आज्जो म्हणत होती कि, 'नीलचं लग्न आहे चंदिगढला' मला जायला सांगितलं आहे, जाऊ?"

"बघ जमेल का. मला माहित आहे, अर्थात तुला असे प्रोग्रॅम्स अटेंड करायला नाही आवडत, सो तुला जावस वाटलं तर जा."

"ओके आई, आज्जोला वाईट वाटायला नको. मी ट्राय करतो."

मेघाताई आणि क्षितिज यांचे संभाषण चालू असताना त्याची कार अचानक जागीच थांबली होती. बाहेरच्या एकंदरीत परिस्थिती वरून नक्की काय झालं याचा थोडासा अंदाज क्षितिजला आला होता. हायवेला लागून असणाऱ्या छोट्या रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या एका ट्रँकरने समोरच्या टॅक्सिला उडवल होत. रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता. टॅक्सी ड्राइव्हरचा तर आतापता न्हवता, पण आत? आत असणारे प्रवासी ? त्यांचं काय?

"आई... आई... एक मिनिट. एकच मिनिट. इथे एक ऍक्सिडंट झालाय. अगदी माझ्या गाडीच्या समोरच." म्हणत त्याने कारचा दरवाजा उघडला.

"क्षितिज अजिबात गाडीतून खाली उतरू नको." मेघाताई पलीकडून ओरडून ओरडून सांगत होत्या. पण काही फायदा नाही. पलीकडून 'मैथिली ' अशी मोठी आरोळी त्यांच्या कानावर पडली आणि फोन कट झाला.

मागे ट्राफिक जॅम झालं होत. कोणी गाडीतून बाहेर पडायला मागेन. हॉर्न वाजू लागले आणि सगळेच 'चलो, गाडी आगे लो.'असा आरडा ओरडा करू लागले. डोक, मेंदू सुन्न झालेला क्षितिज त्या टॅक्सीच्या जवळ गेला. 'मैथिली, मैथिली करत त्याने एका तरुण मुलीला त्या टॅक्सितून बाहेर काढले. मेंदू आणि हातापायाला जबरी मार लागल्याने तिची शुद्ध जवळजवळ हरपली होती. तोपर्यंत क्षितिजच्या कारच्या ड्रायव्हरने टॅक्सी च्या बाहेर अस्थाव्यस्थ पडलेले त्या तरुणीचे सामान एकत्र करून गाडीत भरले होते. तिला आपल्या कारमध्ये घेऊन क्षितिजने सरळ जवळचे रुग्णालय गाठले. अक्खा रस्ता तो फक्त 'मैथिली' एवढ्याच नावाचा जप करत होता.

(या भागात घडून येते, क्षितीज आणि भूमी यांची पहिली भेट, भेट म्हणावे कि अपघात? पण हि भेट देखील त्यांना त्यांच्या नक्षत्रांन कडून मिळालेले देणे आहे. नाहीतर असा योगायोग जुळून येणे निव्वळ दुर्मिळ गोष्ट ना? यापुढे या दोघांनाही जर्नी खऱ्या अर्थाने सुरु होत आहे.)


क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com