Giving of constellations - 7 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - ७

‘कायदा वगैरे सोडून अगदी दोन वर्ष उलटली होती. स्वतःला न्याय मिळवून न देऊ शकलेली भूमी... कायदा आणि न्याय या गोष्टी जवळजवळ विसरून बसली होती. क्षिजीतला मदत करायची म्हणून का असेना तिला पुन्हा एकदा आर्टिकल्स आणि सेक्शन पाहावे लागणार होते. विभासकडून फसवणूक झाल्यावर भूमीने काम वैगरे सगळं सोडलं होत. माई-नाना यांची देखभाल करणे यापलिकडे तिला काही करावंस वाटेना, त्यांना विभास बद्दल सार काही खरं सांगावं असं तिला नेहमी वाटे,पण त्यांना सोडून या जगात तिचं असं दुसरं कोणीही नाही. त्यांनी एवढं प्रेम तिला दिला होत. कि त्यांना गमावण्याच्या भीतीपोटी आहे ती परिस्थिती सांभाळून आला दिवस जगायचं, एवढंच तिने ठरवलं होत.’

'चला चार दिवस बाहेर आहोत, नंतर पुन्हा जैसे थे. सो ना ओळख ना नातं तरीही त्या मुलाने मदत केली. आपल्या उपकाराची परतफेड म्हणून करावी क्षितिजला मदत.' असे म्हणत ती हातातील पेपर्स चाळायला लागली.


''अगदी फॉर्मल ट्राऊजर आणि व्हाईट शर्ट मधली भूमी आज अगदी जबरदस्त दिसत होती. मीटिंगवर तर तिने आपली पकड कायम ठेवलीच, पण संपूर्ण मिटिंगमध्ये क्षितीज तिच्याकडेच बघत होता. ऍक्सिडंट झाला तेव्हाची ती व्हाईट अम्ब्रेला ड्रेस मधली भूमी आणि आज चक्क फॉर्मल… तशी तिची छबी कोणाच्या मनाचा ठाव घेईल अशीच होती. पण तिच्याकडे असलेले कायद्याचे ज्ञान देखील अचंबित करणारे होते. रात्रभर केसचा चांगलाच अभ्यास केला आहे, हे क्षितिजने ओळखले. मिटिंग सक्सेसजुल झालीच, आणि नवीन प्रेसेस सेट करण्याची जबाबदारी क्षितिजचा कंपनीवर आली होती. त्यामुळे कंपनीला चांगल प्रॉफिट मिळणार होतं. भूमीला ऐनवेळेस legal counsellor म्हणून उभं केलं म्हणून नाराज असणारे कंपनीचे मोठे अधिकारी मिस्टर मुखर्जी देखील आता क्षितिज आणि भूमीच कौतुक करत होते.
सगळ्यांनी येऊन दोघांचेही अभिनंदन केले. आणि भूमीचे आभारही मानले. क्षितीजने केलेल्या उपकाराची अंशतः परतफेड झाली होती, त्यामुळे भूमीला देखील बरं वाटतं.

क्षिजीतला बाजूला घेऊन मुखर्जी काहीतरी कुजबुजले आणि निघून गेले. सगळं आवरल्या नंतर क्षितिज भूमीला भेटला आणि म्हणाला. ''थँक्स. ''

----------------------
'योगायोग म्हणावा की काय? मैथिलीच्या ऍक्सिडेंट जिथे झाला त्याच ठिकाणी भूमीचा ऍक्सिडेंट झाला होता. विशेष म्हणजे दोघींचाही व्यवसाय एकाच as a legal counsellor, मैथिली बरोबर शेवटचा प्रवास शेवटची भेट म्हणा आणि त्याच ठिकाणी भूमी बरोबर झालेली पहिली भेट... क्षितीज च्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेली होती.ना काळात का होईना, पण आपण भूमीकडे ओढले जातोय आणि तिच्याबरोबर जास्त वेळ घालवायला आपल्याला आवडत हे क्षितिजला देखील लक्षात आलं होत. नाहीतर अश्या परक्या मुलीशी एका भेटीत जवळीक निर्माण होणं, अशक्य गोष्ट होती.'

'क्षितिज आपल्या विचारात असताना, दोन वेळा वेदांत चा फोन येऊन गेला होता. क्षितिजचा जिवलग मित्र. मार्केटिंग टीमच्या वतीने तो देखील मिटींगच्या वेळेस उपस्थित होता. भूमीच्या टॅलेंटची त्यानेही दखल घेती होती. 'लीगल टीमच्या सेकेंड सल्ल्यागर पदी भूमीची नेमणूक करावी अशी चर्चा कंपमानीचे हेड करत होते. आणि भूमीला कन्व्हेन्स करवे,' असे क्षितिजला कळवण्यासाठी वेदांतने फोन केला होता. थोडाफार प्रॅक्टिकली विचार करून क्षितीज भूमीला भेटायला आला पण तिच्या रूमला लॉक होते. ती लास्ट फ्लोअरला लग्नाला गेली असणार, मिटिंगमुळे आधीच उशीर झाला होता. त्यामुळे क्षितीज पुन्हा आपल्या रूमकडे निघाला.'
---------------------------

' वेलवेट ब्ल्यू रंगाच्या बारीक फुलांची नक्षी असलेल्या मॉटिकलरच्या हेवी कुर्त्या-पायजमा, हातात एक ब्रँडेड घड्याळ अश्या डिसेंट लूक मध्ये क्षितिजने हॉलमध्ये एंट्री केली. भूमीकडे प्रेझेंट पाकीट द्यायचे राहून गेल्याने त्याला स्वतःलाच लग्नाला यावे लागले होते.

हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर धुमधाम चालू होती. जागोजागी फुलांची आरास, रंगीबेरंगी तोरणे, महागडे झुंबर, डेकोरेटिव्ह स्टेज, रांगोळ्या अशी सुरेख सजावट केली गेली होती. रात्रीच्या अंधारातही झगमगणारे असे वातावरण, आणि सुमधुर संगीत याने प्रसन्न झाले होते. नटूनथटून आलेल्या स्त्रिया-पुरुष, लहान मुलं, उगाचच तसेच इकडे-तिकडे ठुमकणाऱ्या सुंदर मुली आणि त्यांच्या मागून फिरणारी तरुण मूल असा सगळं लवाजमा जमलेला दिसत होता. मेहेंदी, हळदी सगळं आटोपलं होतं आता फेरे झाले की काही महत्वाचे विधी मग लग्न सोहळा संपन्न होणार होता. 'निल आणि क्षितीज शाळेत एकत्र होते, नातलग असल्याने घरची ओळख होती. पण निल अतिशय वाह्यात मुलगा त्यामुळे त्याचा गृप वेगळा होता आणि हुशार पण दंगेखोर म्हणून असलेल्या क्षितिजचा गृप वेगळा होता. आजोचा आदेश त्यामुळे आपण इथे आलोय. बास त्यामुळे तो आपल्याला ओळखतो की नाही, याच्याशी लक्षितिजला काही देणे घेणे नव्हते. स्टेजच्या अगदी समोर एक रंगीत आसनावर बसत त्याने चौफेर नजर फिरवली. हजार एक लोकांचा लवाजमा असणाऱ्या प्रशस्त मग्न मंडपातही आपल्याला एकटं वाटावं याचंच त्याला नवल वाटत होतं. एकटाच बसलेला होता, त्यात आजीबाजूने जाणाऱ्या काही सुंदर मुली त्याच्याकडे वळून वळून पाहत कुजबुजत होत्या, हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. तो होताच मुळात हँडसम.

एवढ्या झगमगाटातही क्षितिजची नजर आपसूकच भूमीचा ठाव घेत होती. कदाचित इथे कोणी ओळखत नसल्याने, किंवा अजून काहीतरी कारण असावे...

एकदा लग्न लागलं की मग पाकीट देऊन इथून निघायचं, याचीच वाट बघत तो बसला होता. अचानक थोडी शांतात पसरली सभागृहाच्या एका टोकाकडून सजलेल्या नवरीची इंट्री झाली होती. आजूबाजूला असणाऱ्या करवल्या आणि नातेवाईक मंडळीनी फुलांची चादर तिच्या डोक्यावरून ओढून घेतली होती. सगळे पंजाबी रीतिरिवाज त्यात काय चाललंय हे बघण्यात क्षितिजच लक्ष नव्हतं. सभागृहाच्या एका दुसऱ्या साईडने नवरदेवही हजर झाले होते.

थोड्यावेळात त्यांच्या विधींना सुरुवात झाली. तसे वर-वधूच्या आजू-बाजूने जमलेले बहुतांश लोक स्टेजवरून खाली उतरले. मिनिटात क्षितिजची नजर समोर स्थिरावली. वधूच्या बाजूला फुलांचा एक मोठा गुच्छ घेऊन भूमी उभी होती. हलक्या निळसर नेटच्या लेहेंग्यावर बारीक फुलांची लालसर डिझाइन असलेले ब्लाउज आणि वरून दोन्ही खांद्यावरून सरळ खाली ओघळणारी निळ्यालाल फुलांची नेटची ओढणी तिच्या गोऱ्या रंगला अगदी शोभेल असाच पेहेराव. तसेच मॅटचिंग स्टोन्सचे मोठे कानातले आणि त्याभोवती फेर धरणे तिचे सिल्की केस अगदी तिच्या कानाभोवती घुटमळत होते जणू. त्यांना सावरत तिने समोर पहिले, समोर तिच्या नजरेच्या टप्प्यातच क्षितिज बसला होता. आश्चर्याने क्षितिजकडे बघत तिने हलकेच लांबून स्माईल केली. तो अजूनही तिच्या त्या मोठ्या पाणीदार डोळ्यात बघतच राहिला होता. त्याला ते जाणवलं असावं, हलकेच हात वरून करून त्याने भूमीला हाय केले. त्याच्या मनातून कुठूनतरी शब्द येत होते, 'सावर स्वतःला, असा कोठेही घसरण्यातले आपण नाही. ' पण हृदय ऐकायला तयार नव्हते. त्याला समजावे पर्यंत भूमी स्टेजवरून उतरून खाली त्याच्याबाजूला येऊन उभी राहिली होती. खरतरं हॉलमधली बहुतेक तरुण तरुणी त्यांच्याकडे डोळे लावून होती, हे क्षितिजच्या लक्षात आले होते, आत्तापर्यंत स्वतःकडे पाहणाऱ्या मुलींकडे त्याने दुर्लक्ष केले, पण काही पंजाबी मूलं भूमीकडे टक लावून बघत आहेत, हे त्याला फारसे रुचले नव्हते.

"तुम्ही कसे काय इथे? आय मिन यायला जमणार नाही म्हणालात ला?"

भूमीने त्याच्याकडे बघत विचारले.

'' होय, तुम्हाला प्रेसंट पाकीट द्यायला आलो होतो. रूमला लॉक दिसले, मग मलाच यावं लागलं.'' जणू आपण पुढे सुरु असणारे लग्न पाहतोय असे दाखवत. क्षितीज तिच्याकडे न पाहताच म्हणाल.

''नाइस ड्रेसअप हा.'' भूमी

'' थँक्स. जास्त जवळच्या मार्केट मधून जाऊन घेऊन आलो. नाहीतर ऑफिस च्या कोट वर इथे यावं लागलं असत.'' क्षितीज

'' आणि मला मीटिंगला आल्यासारखं फील आलं असतं.'' तिच्या या वाक्यावर दोघेही खळखळून हसले.

क्रमश