Ti ratre - 2 books and stories free download online pdf in Marathi

ती रात्र - 2

आम्ही पोहोचलो कॅम्प चा जागेवर पण आमच्या सारखे बरेच जण कॅम्प साठी तिथे आले होते. आम्हाला याला उशीर झाल्यामुळे सर्व चांगले कॅम्प ची जागा पहिलाच कोणी ना कोणी पकडली होती.आम्हाला मनाला आवडेल अशी जागा काय भेटत न्हवती.आणि तोडा शांत वातावरण पाहिजे होता
आमच्या सारखेच तिथे १ सहा जणांचा ग्रुप आला होता त्यात २ मुले आणि ४ मुली होत्या बहुतेक त्यांना पण याला उशीर झालं होतं मानून ते ही जागा शोधत होते. आता आपल्याला इथे काय जागा भेटणार नाही आणि भेटली तरी शांत एकांत भेटणार नाही त्या मुळे थोडा जंगल चा आत जाऊन कॅम्प करावे असे ठरवले मी बोलो "ठीक आहे मग मी आणि अमित जाऊन जागा बघतो तुम्ही काय असेल ते गाडी मधून सामान काढा आणि गाडी पार्क करा आमी येतो तो पर्यंत जागा बघून " तसा अंधार झाल्या मुळे ते नकोच बोलत होते पण मी कसे तर मानवले
आम्ही गेलो जागा शोधण्या साठी अंधार असल्या मुळे नीट काय दिसत न्हवते आणि मनाला पटवी अशी जागा पण भेटत न्हवती. तसे आम्या आणि मी घाबरत न्हावतो कशाला पण या अशा ठिकाणी भीती तर वाटे ना शोधात शोधात आमी एका ठिकाणी पोहोचलो.मस्त होती जागा एकदम शांत आणि सुंदर अशी एक ४.५ झाडे लागून होती आणि त्या समोर मोकळी जागा त्या वर मस्त चंद्रप्रकाश पडत होता आणि मूळ कॅम्प पासून ४००.५०० मीटर आत मध्ये अम्या आणि मला तर खूप आवडली आमी लगेच बाकीचा मुलांना तिथे आणण्यासाठी निघालो तसा रस्ता सरळच होता पण अंधार असल्या मुळे थोडा त्रास होत होता, जास्त लांब नसल्या मुळे आमी पोहोचलो पाहतो तर मुले आपले मस्त मध्ये फोन मध्ये तोंड घालून बसली होती एक काम केले न्हवते.तसा मला खूप राग आला आणि बोलो "काय बे आमी येवढ्या लांब जाऊन जागा बघून लो तरी तुम्ही अजू काय पण काम केले नाही.?,निदान सामान तरी गाडी मधून काढून ठेवायचे "
गोप्या बोला "एक जण एकायला तयार नाही मग मी काय करू ?, बसला तसेच मग "
"धन्य आहे बघा तुमचा पुढे " असे मानू मी सामान काढायला सुरुवात केली "आपल आपला सामान ज्यांनी त्यांनी घ्या "
"हा बे घेताव उगाच ओरडू नको" दर्शन बोला आणि आमी लगेच सर्व सामान काढून गाडी पार्किंग ला लावायला गेलो या मध्येच आमचा अजून अर्धा .एक तास गेला.
आता लवकर जाऊन त्या जागेवर कॅम्प टाकून मस्त old song लाऊन मस्त enjoy करायचे plan होता. सोबतीला जिग्री दोस्त आणि समोर जळणारी कॅम्प फायर आणि song सोबत unlimited गप्पा मस्त असा plan डोक्या मध्ये होता पण तिथे जाऊन बघतो तर काय ते पहिला आमी पाहिलेला ग्रुप आमचा जागेवर कॅम्प करत होता .आता काय करायचे ? त्यांना तिथे बघून मला अजुन राग आला एक तर उशीर झालं आणि त्यात अजून हे आमच्या जागेवर आता येवढं time पण न्हवता की दुसरीकडे जागा सोधवे
तसेच मी राग मध्ये बोलो "बघा बे तुमचा मुळे ही चांगली जागा पण गेली,आपण लवकर आलो असतो तर झाले असते ना नीट सर्व" अंन्या बोला "शांत हो बघू काय तर करू" मला असे रागात आलेलं बघून विजा आणि अम्या त्यांना बोलायला गेले विजा तसा बोलण्या मध्ये पटाईत होता कोण कडून कसे काम करून घ्याचे त्याला चागलं जमत होते. पण आता इथे काय करणार होते काय माहिती.त्यांनी त्या ग्रुप मध्ये जाऊन काय काय बोले काय माहिती आम्ही थोडा लांबच थांबलो होतो
विजा आणि अम्या त्यांना बोलून आले आणि बोले " ते बोलत आहेत की आमी आता इथून तर नाही जाऊ शकत, तुम्ही पहिली आले असेल पण आम्ही आता कॅम्प केला आहे इथे,हवे तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता"
तशी ती जागा खूपच चांगली होती आणि मोठी पण होती १२ जण करू शकत होते कॅम्प आणि आता येवढं टाईम पण न्हवता की दुरी जागा सोधावे

To be continued.....😊