Ti ratre - 3 books and stories free download online pdf in Marathi

ती रात्र - 3

आता काय करायचे त्यांनी तर बोले होते आम्हाला जॉईन करा मानून पण त्यात ते मुली होत्या आणि ते पण अनोळखी त्यात आमचा ऑल बॉईजचा ग्रुप मुली असल्या मुळे आम्हाला जसा कॅम्प करायचा होता तसा करत येणार न्हवता पण आता काय करणार त्यांच्या मध्ये सामील होऊन कॅम्प करण्या पलिकडे आमच्या कडे कोणता पर्याय न्हवता जाऊदे बोलो जसा विचार केला तसा नाही झाला कदाचित त्याहून जास्त चांगला होईल असा मी माजा मनाला बोलो
त्यांनी लवकर लवकर आपले आपले टेन्स घातले होते कॅम्प फायर लावायची होती मानून आमी ऐकडे तिकडे लाकडी गोळा करायला सुरुवात केली त्या ग्रुप मध्यल
एक जण आमच्या सोबत आला त्याचे नाव राज होता तसा त्याचा स्वभाव चांगला होता पण मला जरा तो खोचक वाटला.
टेन्स पण लगेच उभा केले त्या मुलाचे आमच्या टेन्स पासून थोडा लांब होते टेन्स पण एकत्रच करायचे होते. मानून त्यांनी कॅम्प फायर एकत्रच करू या असे बोले आमी अजु बाजूकडून चांगले दगड गोळा केले आणि मस्त त्यांना गोल आकार देत होतो त्या मध्ये तो दुसरा मुलगा आमच्या मदतीला आला त्याचे नाव अजय होता तो खूप बोलका आणि मन मिळाऊ होता त्यानेच एकत्र कॅम्प करू असे सुचवले होते. मध्ये एका मोकळ्या जागी कॅम्प फायर साठी बसवले. लाकडे आणून त्यांना आग लावायची तयारी केली सर्वांनी आपली आपली जागा पकडली समोर मुली आहेत मग आमचे मुले गप्पा बसणार होती काय एक स्पीकर अनला होता त्यात मधे मस्त ओल्ड साँग लावले होते मंद आवाज मध्ये आणि मध्ये कॅम्प फायर ची आग जळत होती आमी गप्पा मारायला सुरुवात केली मस्त चंद्र प्रकाश पडत होता जानी त्यांनी आपली ओळख करून दिली या दोन मुलाचे नाव तर मला समजले होते. ते मुले मुबई ला राहायला होती आणि त्यांना बघून ते मोठ्या घरचे असतील असे आम्हाला वाटले. ते मुबई चे होते त्या मुळे ते मुली पण बिंधास बोलत होते आमच्या शी गप्पा मारत होते. त्यात प्रिया.मानसी.श्रुती आणि अमृता असे नाव होते त्याचे
त्यांचा स्वभाव चांगला आणि मन मिळाऊ होता. तसे पण मुलांना कोणत्याही मुलीचा कधी राग येत नाही सहसा त्यांना ते मनमिळावू च वातात
आमच्य गप्पा हे, ते काय करतात ? या पासून सुरु झाल्या ते सर्व इंजीनियरिंग ला होते एकाच कॉलेज मध्ये त्यांचे अजून ३.४ मित्र येणार होते पण ते अचानक नको बोले मन, आम्ही जे स्टोरी एकली होती. त्या कॅन्टीन वर तेच त्यांनी पण कुठून तरी एकली होती मानू ते काही ना काही कारण सांगून आले नाहीत असे राजने सागितले त्या स्टोरी वरून आमच्या गप्पा रंगल्या त्यात मग जानि त्यांनी ऐकलेली. मूवी मध्ये पाहिलेली कीव अनुभवलेली स्टोरी सांगू लागला
त्यात मानसीने एक तिने अनुभवलेली स्टोरी सागितले आता टी
ती खरी होती की खोटी स्टोरी होती काय माहिती पण टी स्टोरी सगत असताना तिच्या चेहऱ्यावर भीती मात्र साप दिसत होती ती बोली
"आम्ही पहिला राहत होतो त्या अपारमेंट मध्ये आमच्या वरच्या मजल्यावर एका माणसाने कशाच्या तरी टेन्शन मध्ये स्वतःला आग लाऊन घेऊन आत्महत्या केली होती.त्याचा तो आवाज खूप भयानक होता तो इन्सिडेंट आठवला तरी खूप भीती वाटे.तो खिडकी मधून येणारा धूर आणि त्याचा तो आवाज खूप डेंजर" अम्या मध्येच तिला बोला "नुसता आवाज एकूण तुला एवढी भीती वाटत आहे.त्याला जळताना पाहिले असते तर काय झाले असते तुझे?"
"शिरे... बाबा" मानून तिने दोणी डोळे घट्टा मिटले
मी बोलो "ये अम्या काय पण काय बोलतो"
"सॉरी मी आपले सहज बोलो"अम्या बोला तेवढ्या मध्ये गोप्या बोला " बरा आहे मानसी मध्ये डेटिंग तरी आहे आपला अनन्या तर ते आवाज एकूणच बेशुद्ध झाला असता " सर्व जण आमी त्या वर हसलो त्या मुली पण हसत आहेत बघून अनन्या रागाला आणि बोला "ये गोप्या काय पण काय बे , येवढं पण नाही घाबरत मी "
तेवढ्यात मानसी बोली " रे तसे नाही तो माणूस मारून गेला पण त्या प्लॉट मधून १०.१२ दिवसांनी कधी कधी विचित्र विचिरा आवाज याचे आणि ३.४ महिन्यांनी एक family तिथे राहायला आली होती ते पण सांगत होते तिथे काही तरी गडबड आहे रात्री आवाज येतात कधी कधी काही तरी सावली सारखा समोर येतं अचानक एकदा तर काही विचित्रच झाले मन ते सावली अचानक त्याच्या समोर आली त्याला बघून ते घाबरून पळत असताना ते जोरात पडले आणि त्याचे डोके फुटले.असे झाल्याने त्यांनी ते प्लॉट लगेच सोडून दिला. काही लोक बोलत होते त्या माणसाची आत्मा तिथेच आहे अजून मने" ती स्टोरी मानसी सांगताना आणि आम्ही एकताना सर्वच गंभीर झालो.

To be continued.....😊