Sparshbandh.. julale man baavre - 2 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 2

Featured Books
Categories
Share

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 2

मीराच्या समोर असणाऱ्या त्या मुलीने आवाज कुठून आला म्हणून मीराच्या मागे डोक थोड वर करुन पाहिलं आणि त्याच क्षणी त्यानेदेखील तीच्याकडे पाहिलं....तेच डोळे.... तोच चेहरा.... तो तिच्याकडेच पाहत राहिला.... जणू त्याला धक्का बसला होता आणि ती ही त्याच्याकडे पाहत होती.... पण तिच्या डोळ्यात ती शॉक झाली आहे असे कुठलेच भाव नव्हते पण काहीतरी होत पण काय होत ते......??

तो आपला किती तरी वेळ तिलाच पाहत होता.. पण पहीले जे भाव होते ते आता नाहीसे झाले होतेत्याच्या चेहऱ्यावरून....निर्विकारपणे तो तिला पाहत होता....

त्या मुलीची नजर पुन्हा मीरा वर येऊन थांबली...जी तिला टकमक पाहत होती.

" मीरा लेट्स गो, उशीर होईल आपल्याला दुसरीकडे पण जायच आहे " तो मीराला म्हणाला.

मीरा लगेच त्याचा हात पकडत त्याच्या जवळ गेली.. आणि पाठी वळून त्या मुलीला "बाय आंटी " म्हणत हात हलवू लागली.....

पण तिने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही पुन्हा ती समुद्रेच्या दिशेने तोंड फिरवून बसली....

किती दुःख वाढून ठेवलं आहे देवाने तिच्या पुढ्यात,काय माहीत....

ती होती....मिष्टी आणि तिचा लहान भाऊ जो 16 वर्षांचा होता,आणि मिष्टी 25 वर्षांची....असे दोघंच एकमेकांचा सहारा होते, त्याच्या शिक्षणासाठी सगळा खर्च तीच करायची.... आणि त्यात मागील काही दिवस तिचा भाऊ ऍडमिट होता, आणि हॉस्पिटलच बिलपण जास्त आल होत....त्यात ऑफिस मध्ये न कळवता ती...गेले आठवडा भर आलीच नाही.....आणि आता तर ऑफिस मधून काढून पण टाकले होते....

आणि आता तिच्याजवळ पैसे ही न्हवते....आता दुसरीकडे जॉब मिळण ही कठीण होत.....

घर तस स्वतःच होतच.... पण ते चालवण्यासाठी पैसे ही लागणार होते.... तिने भावला चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी तिने लोन पण घेतलं होत....

ती नाही निदान तिचा भाऊ तरी चांगलं शिकेल, ह्याच प्रयत्नात असयाची ती.....

किती काय बदलल ह्या 5 वर्षात....हे पाच वर्षे सोडून बाकी काहीच आठवत न्हवत तिला.....1/2 वर्षांपूर्वीचा कॉलेज संपलं होत......

आणि लगेच कामाला पण लागली होती.....


*****************************


आज कितीदिवसानंतर दिसली होती...ती

"पण तिच्या डोळ्यात मला भेटल्याचे काहीच भाव नव्हते ना आनंद...ना दुःख...ना आश्चर्य....ना द्वेष
...साधी ओळख ही नाही दाखवली तिने मला......असं विसरून गेली का ती मला??" तो मीराचा हात पकडून चालत चालत विचार करत होता.

"काळाच्या ओघात माणसे बदलतात त्यांचे स्वभाव बदलतात पण ती कशी इतकी बदलून गेली??"

" सगळ्यात जास्त त्रास आपल्याला त्या गोष्टीचा होतो की एखाद्या आपला माणूस जेव्हा आपल्याला साधी ओळख दाखवत नाही "

" कधीकाळी निखळ हसू होतं ज्या चेहऱ्यावर त्याच चेहऱ्यावर आज मला दुःख दिसत होतं "

" काय झाला असेल तिच्या आयुष्यात??"असे अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते.... तो आपल्याच विचारांमध्ये मग्न होता त्याच विचारांनी काहूर माजवल होत त्याच्या डोक्यात....

मला ते कारण शोधलं पाहिजे....जवळ नसली तरी ती सुखात असावी असंच वाटतं होत.....
त्यावेळी काय चुकलं होत माझं ....???

शेवटी तो "बंधनात " अडकला होता....

त्याचं शेवटी प्रेम होतं तिच्यावर म्हणूनच तर आजही तिच्याशिवाय या हृदय यावर कोणाचाच राज्य गाजलं नव्हतं तिचा तो " प्रेमळ स्पर्श" तिचं ते कोमल निखळ...हास्य आजही आठवतं ....

" ज्याच्यावर आपल जीवापाड प्रेम असत आणि त्या माणसाने कीतीही दुःख द्यावं पण तरी ही त्या व्यक्तीचं चेहऱ्यावरचं हसू आयुष्य जगण्यासाठी पुरेस असत."

प्रेम फक्त जिद्दीने मिळवणं पुरेस नसतं....प्रेमात त्यागही महत्त्वाचा असतो ....


"डोळ्यांतुन ओघळलेला थेंब, माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता बसं...हात तुझा हाती होता.
तो रुसलेला ओला रुमाल...पाऊले मागे फिरताना हसला होता बसं.. हात तुझा हाती होता...
क्षणांत वाढणारे अंतर पण...श्वासांत तुझाच दर्प होता बसं.. हात तुझा हाती होता
हात तुझा हाती होता...
काहीच फरक नाही पडला......मृत्यु उभा माझ्या दारी होता...बसं...हात तुझा हाती होता...
प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला...माझ्यासाठी खास होता बसं हात तुझा हाती होता.......!!!!!! "


समुद्राच्या लाटांचा आवाज जाताना त्याच्या कानावर पडत होता .....


"डॅडू....डॅडू....."करत कोणीतरी त्याच्या हाताला हात लावत त्याचा हात हलवत होता...
ती "मीरा" होती....
त्याची चिमुकल पिल्लू होती.. त्याचा जीव की प्राण होती..... जी त्याच्याकडे निरागसपणे पाहत होती...
कि तीचा डॅड तिला सोडून आणखी कोणाचा इतका विचार करत आहे ??
(जेलसी आणखी काय....)

तो खाली बसून तिच्या गालावर हात ठेवून बोलू लागला ....."काय झालं माझ्या प्रिन्सेसला..??"

ती काहीशी फुगून बसली .....आपल्या हातावर हात ठेवून त्याच्याकडे रुसून पाहू लागली....
तिचं ते नाटक पाहून त्याला हसू आलं .....
"हो काय झालं बेबी तुला?? काही हव आहे का?? "

"तू माझ्याशी बोलायचं सोडून काय एवढा विचार करत आहे??आपलं प्रॉमिस होतं ना की , तू माझ्यासाठी आज टाईम काढशील.....आपण बाहेर आलो तरी तू तुझं काम एवढाच विचार करत आहे ना म्हणून मी तुझ्याशी कट्टी आहे..."त्याच्याकडे पाठ फिरवून काहीश्या रागातच तिथल्या थंड वाळूत फतकल मांडून बसली.

ततो कान पकडून "सॉरी बेबी.थोडासा विचार करत होतो बाबा....बघ तिकडे मटका मलाई कुल्फी आहे...तू खाली नाहीस ना....ती ना खुप छान लागते....तुला खायची आहे का ??" तो तिला लाडीगोडी लावत म्हणाला.

"तुला माहितीये त्याला मराठी मध्ये काय म्हणतात? ...'पान आईस्क्रीम फ्युजन' म्हणतात...तुला पाहिजे का...??"
चल मी तुला दाखवतो ..

असं बोलून तिचं मन वळवायचा प्रयत्न करत होता....शेवटी ती चिमुकली त्याच्या बोलण्यात फसली दोघ चालत चालत रस्त्याच्या बाजूला एका व्हॅनमध्ये विकणाऱ्या स्टॉल कडे आले त्याला सांगून त्याने
"पान आईसक्रीम फ्युजन " मागून घेतले. ...

त्या छोट्याशा मटक्यात भरून अशी आईस्क्रीम होती ....त्याचा फ्लेवर अतिशय मस्त लागत असायचा...त्यांन ते ठिकाण हायजेनिक नीटनेटक आहे का....??...हे पाहूनच तिथून घेतली आणि छोट्या-छोट्या तिच्यात हातात टेकवून दिली ती अतिशय कुतूहलाने त्याकडे पाहत होती....

हा काही "नवीन पदार्थ आहे " तोंडात टाकला की पाणी होत आहे.... तीही मिटक्या मारून मारून खाऊ लागली लहान लेकरांचा तसेच असतात कोणताही नवीन पदार्थ दिसला की पहिले त्याला असं टुकूर टुकूर पाहून निरखून मगच खातात.... तिच्या चेहऱ्यावर लागलेली आईस्क्रीम तो आपल्या रुमालाने पुसत होता आणि तिच्या आनंदी झाले चेहऱ्याकडे समाधानी होऊन पाहत होता.... त्यांनी आपला हळू जसा मोबाईल काढला त्यावर मेसेज कोणालातरी पाठवला.... "मागच्या 5 वर्षात तीच्या बाबतीत काय काय घडलं त्याबद्दलची सर्व महिती काढ." म्हणून सोबत तिचा फोटो पाठवला....


त्याने मीराकडे पाहिलं आणि तिचा चेहरा तिने परत कुल्फीने भरवला होता....तिला पाहून तो खूप दिवसांनी मनसोक्त खळखळून हसला...आता जो व्यक्ती त्याला पाहिलं त्याला वाटेल का की आपल्या समोरचा माणूस एका कंपनीचा मालक आणि त्याच बरोबर युथ आयकॉन 'दि विराज चव्हाण ' आहे

' विराज' म्हणजे बुद्धिमान आणि वैभव यांचं वैशिष्ट्य....त्याच्या नावातच विशाल महत्व लपलेलं होतं....चाणक्य सारखं डोकं.....निसर्गाने बनवलेला सुंदर असा चेहरा, मॉडेलला सुद्धा मागे टाकले अशी त्याची शरीरयष्टी...इंटरनॅशनल टॉप थ्री मध्ये असलेल्या कंपनीत त्याच्या कंपनीचा समाविष्ट होता.

पण तो आत्ता त्याच्या चिमुकली साठी एक सामान्य बाबा जो तीला स्टॉलवर असलेली आइस्क्रीम निर्मळ मनाने खाऊ घालत होता .....तिच्याशी गप्पा मारत मारत दोघेजण त्यांच्या कार कडे आले.... दिवसभराच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगत आपले छोटुली छोटुली हात गोल गोल फिरून चेहरा कधी छोटा कधी मोठा करून त्याच्याशी बोबड्या भाषेत मस्त गप्पा मारत मारत मीरा त्याच्या कुशीत झोपी गेली..... घरी आल्यावर त्याने तिला तिच्या खोलीत आणून झोपवलं आणि तिला पांघरूण देऊन सर्व बाजूंनी उश्या लावल्या... तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत त्याने लाईट बंद केला आणि दार लावून त्याच्या रूमकडे निघाला.

थकून-भागून रूममध्ये आला शर्ट काढला फ्रेश व्हायला गेला ते झाल्यानंतर हातात सिगारेट पेटवून खिडकीच्या बाहेर पहात उभा राहिला..... आणि पाच वर्षांपूर्वीच्या विचारात मग्न झाला....


क्रमशः