Mantra of Nations SuperPower in Marathi Philosophy by ADV. SHUBHAM ZOMBADE books and stories PDF | राष्ट्राच्या महासत्तेचा मंत्र

राष्ट्राच्या महासत्तेचा मंत्र

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 1 - लक्षात ठेवा, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर लावता येईल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 2 - लक्षात ठेवा, एकात्मिक सत्तेचा जीवनकाळ हा अल्प असतो तर विकेंद्रीकृत सत्तेचा जीवनकाळ दीर्घ असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 3 - लक्षात ठेवा, राष्ट्राचे राष्ट्रीयकरण तेव्हाच होत; जेव्हा विघटित समाजाचे संघटित समाजामध्ये रूपातंर होते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 4 - लक्षात ठेवा, राष्ट्रपती शासन प्रणालीच्या तुलनेत संसदीय शासन प्रणालीमध्ये लोकांचे स्वातं़़त्र्य व हक्क अबाधित राहत असतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 5 - लक्षात ठेवा, समाजाचे बळकटीकरण केल्याशिवाय; देशाचे बळकटीकरण होणार नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 6 - लक्षात ठेवा, आपल्या जबाबदाÚया प्रती उपेक्षित राहणे म्हणजेच समाज वा पर्यायाने देशाप्रती उपेक्षित राहणे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 7 - लक्षात ठेवा, समाजकारण हे लोकांचे कल्याण करते तर राजकारण देशाचे आणि अर्थकारण दोघाचेंही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 8 - लक्षात ठेवा, राजकत्र्यांला राष्ट्रनिष्ठेची चावी जनतेने द्यावी लागते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 9 - लक्षात ठेवा, प्रत्येक नागरिकांने राष्ट्राप्रती आपले दायित्व जाणले पाहिजे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 10 - लक्षात ठेवा, राष्ट्र हे फक्त तुमच्या राहण्याचे ठिकाण नाही; तर ते तुमच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 11 - लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सक्षम बनाल त्यावेळेस राष्ट्र आपोआपच सक्षम बनेल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 12 - लक्षात ठेवा, एखाद्या राष्ट्राची ओळख त्यातील जनतेच्या विचाराने निर्माण होत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 13 - लक्षात ठेवा, राष्ट्राचे भवितव्य त्या राष्ट्रातील विद्यार्थी घडवित असतात तर त्या विद्याथ्र्यांचे भवितव्य शिाक्षण आणि संस्कार घडवित असतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 14 - लक्षात ठेवा, जातव्यवस्थेच्या पुर्न;जीवनासाठी ते तुम्हाला तुमची जात विचारतील पण देशाच्या मजबूतीकरणासाठी तुम्ही सांगावयाची ती राष्ट्रीयता.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 15 - लक्षात ठेवा, कोणतेही राष्ट्र जातीने नाही तर राष्ट्रीयतेने सक्षम होत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 16 - लक्षात ठेवा, महापुरूषांच्या जन्मदिनी सुट्टी घेण्याऐवजी त्यांच्या प्रेरणेने 2 तास अधिक काम करा ते राष्ट्रास महासत्ता बनविण्यासाठी नक्कीच मदत करेल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 17 - लक्षात ठेवा, ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्रवाद प्रबळ असतो; ते राष्ट्र कधीच गुलाम बनू शकत नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 18 - लक्षात ठेवा, राष्ट्राचा शाश्वत विकास करावयाचा असेल तर त्याची सुरूवात प्रथमता ग्रामस्तरातून करावी लागेल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 19 - लक्षात ठेवा, सर्व भारतीयासाठी अत्यंत खेदाची बाब आहे की, भारताच्या राजकारणाचा पाया हा विकास नूसन जात आणि धर्म आहे व ते आपण बदलविलेच पाहिजे .
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 20 - लक्षात ठेवा, राजकारणी जातीवर मुद्दे मांडतील तर तुम्ही विकासावर मुद्दे मांडा.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 21 - लक्षात ठेवा, विद्याथ्र्यांवर त्यांच्या शालेय जीवनातच योग्य ते संस्कार करावेत; कारण ते उद्याचे राष्ट्रभक्त वा राष्ट्रद्रोही असतील.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 22 - लक्षात ठेवा, सदृृ्विवेक बुध्दीने ईश्वरभक्ती व्यक्तिविशिष्टासाठी चांगलीच परंतू राष्ट्रासाठी त्याच्या संरक्षणासाठी, उन्नतीसाठी ईश्वरभक्तीहून केव्हाही राष्ट्र भक्तीच चांगली.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 23 - लक्षात ठेवा, जे कार्य करणे आपल्या हितासाठी आहे ते कार्य करण्यास आपल्याला आवडत नसेल तर ते करणे किंवा न करणे यावर बंधन नसते परंतू जे कार्य आपणाला आवडत नसेल परंतू त्या कार्यामुळे राष्ट्रहित होत असेल तर त्यामध्ये आवड निर्माण करून ते कार्य करणे गरजेचे असते. यामध्ये प्रश्न हा फक्त तुमचा नसून राष्ट्राचा आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 24 - लक्षात ठेवा, राष्ट्र आणि धर्मामध्ये प्राथमिकता नेहमीच राष्ट्राला द्यावी.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 25 - लक्षात ठेवा, राजकारणामध्ये मुद्दा नेहमी विकासाचा ठेवणे ना की जात आणि धर्माचा यातच सर्वांचे हित आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 26 - लक्षात ठेवा, भारताची अंतिम सत्ता ही त्याच्या नागरिकाकडे आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 27 - लक्षात ठेवा, केंद्र आणि राज्य यांचा संबंध आई मुलाप्रमाणे असावा; जेणेकरून सर्वागीण विकास साधता येईल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 28 - लक्षात ठेवा, न्यायप्रणालीमध्ये तर्क-वितर्क हे बुध्दीचे कार्य करते तर कायदा शरीराचे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 29 - लक्षात ठेवा, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा त्याच्या जनतेच्या एकतेमध्ये वास करीत असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 30 - लक्षात ठेवा, कायदा हा नेहमी परिवर्तनासाठी कार्य करीत असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 31 - लक्षात ठेवा, कायद्यामध्ये वेळेनुरूप बदल करणे जनतेच्या हितासाठी योग्य असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 32 - लक्षात ठेवा, कोणत्याही दंडापेक्षा मृत्यू दंड अधिक सुलभ असतो; तो एकाच क्षणात त्याला मुक्ती देतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडेे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 33 - लक्षात ठेवा, दंड म्हणजे त्याने केलेल्या कृृतीची त्याला त्याच्या विचारातून जाणीव करून देणे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 34 - लक्षात ठेवा, भारताचा सर्वात मोठा शत्रू हा शासकीय सुट्टयाच्या स्वरूपात असून, वळेत उपाय न केल्यास 365 दिवस शासकीय सुट्टी होण्यास वेळ लागणार नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 35 - लक्षात ठेवा, प्रगतशील राष्ट्रांना केव्हाही सुट्टी नसते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 36 - लक्षात ठेवा, भारताला शाश्वत विकासाची सवय लावली पाहिजे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 37 - लक्षात ठेवा, भारतामध्ये नको त्या क्षेत्रात दलालीकरण खुप मोठया प्रमाणात आहे ते लवकरच दूर केले पाहिजे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 38 - लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीला दान देण्यापेक्षा सामथ्र्य द्या ते राष्ट्राच्या जडण घडणीसाठी केव्हाही उपयोगी ठरेल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 39 - लक्षात ठेवा, राष्ट्रातील जनता जेव्हा जागतिक स्तरावर राष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल त्यावेळेस राष्ट्र महासत्ता बनेल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 40 - लक्षात ठेवा, सत्ता हे कोणावर गाजवण्याचे साधन नाही तर जीवन सुलभ व समृध्द करण्याचा मार्ग आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 41 - लक्षात ठेवा, कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही व्यक्तींना राष्ट्रपिता किंवा राष्ट्रमाता ही पदवी देऊ नये; त्यामुळे राष्ट्राच्या एकता व अखंडतेला बाधा निर्माण होऊ शकते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 42 - लक्षात ठेवा, राष्ट्र कोणत्याही एका व्यक्तीच्या विचारावर चालूच शकत नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 43 - लक्षात ठेवा, राजसत्ता ही नशेसारखी असते; ती नेहमी आपल्याला मिळावी म्हणून व्यक्ती काहीही करू शकतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 44 - लक्षात ठेवा, कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही जाती धर्माला मान्यता देऊ नये.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 45 - लक्षात ठेवा, संघीय प्रणालीतून एकात्मिक प्रणाली असायला हवी.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 46 - लक्षात ठेवा, भारतामध्ये योजना केवळ कागदावरच येते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 47 - लक्षात ठेवा, भारताला नव्या विचाराची गरज आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 48 - लक्षात ठेवा, ज्यावेळेस दंड संहितेचा वापर कमी होईल; तेव्हा समजायला हवे की, राष्ट्राचे चांगले नागरिक तयार होत आहेत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 49 - लक्षात ठेवा, भविष्यात मानवतेचा मार्ग दाखवणारा एकमेव राष्ट्र असेल तो म्हणजे भारत.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 50 - लक्षात ठेवा, जागतिक तसेच आंतरिक शांततेसाठी कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करू नये.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

Rate & Review

Pushkar Bhosale

Pushkar Bhosale 12 months ago