Gunjan - 2 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग २

Featured Books
Categories
Share

गुंजन - भाग २

गुंजन...भाग २
"विश्वास ठेवून बघ माझ्यावर एकदा!! लग्न झालं म्हणजे सगळं संपलं नाही. ही तर सुरुवात आहे सगळ्याची. प्रत्येक नवीन गोष्टीला थोडासा वेळ लागतो. तुला डान्सर बनायचं आहे ना? मग आपण अस करू की तुला सगळ्या नृत्य साईडच्या स्पर्धेत भाग घेता येईल आणि तू फेमस होशील अस काहीतरी करू" वेद काहीसा विचार करत म्हणाला. तो आपला मोबाईल काढतो आणि त्यावर सर्च करतो. तेव्हा त्याला काहीतरी नेटवर मिळत तसा तो खुश होतो.गुंजन मात्र त्याच्याकडे फक्त पाहत असते.
"हे बघ. आपण जर अस काही केलं तर?"वेद तिच्यासमोर मोबाईल धरत बोलतो.त्याच बोलणं ऐकून ती मोबाईल मध्ये पाहते आणि थोडीशी विचारात पडते.

"नको,नको!!प्लीज, मला आता स्वप्न नाही पहायची.मी झोपते"गुंजन अस बोलूनच बेडवर पडते आणि अंगावर ब्लँकेट घेऊन झोपी जाते.
"गुंजन , तु नाही बोलली तरीही मला माहित आहे. हे तुला करायचं आहे. पण सध्या दडपणाखाली असतेस त्यामुळे नको म्हणत आहेस. मी तुला सर्वांतून बाहेर काढेन आणि या घरात तुला चांगल्याप्रकारे लोक सांभाळून घेतील , याची खात्री मात्र मी तुला नक्कीच देऊ शकतो"वेद तिला बेडवर पडलेलं पाहून म्हणाला. तो काहीसा विचार करत गॅलरीत जातो. मंद वारा सुटला होता आज. हवेत गारवा होता. पौर्णिमा असल्याने आज चंद्र देखील पूर्ण गोलाकार मध्ये आकाशात राहून आपला प्रकाशात आला होता. वेदची नजर त्या चंद्रावर पडते. तसा तो त्याला पाहून हसतो.
"तुझ्यापेक्षा चांगला आणि सुंदर असा चंद्र माझ्याकडे आहे. तो चंद्र म्हणजे माझी गुंजन. हो, माझीच गुंजन!!जेव्हापासून तिला पाहिलं तेव्हापासून तिने मला तिचे वेड लावले. आता ती माझ्यासोबत असून पण माझी नाही आहे. मी मात्र प्रयत्न करेन हा!! तिचं बनण्यासाठी" वेद मनातच चंद्राला पाहून म्हणाला. तो गुंजन चा चेहरा डोळ्यासमोर आणतो आणि भूतकाळात हरवतो.
भूतकाळ:-
दिल्लीच्या एका विश्व विद्यालयातिल हॉलमध्ये डांसची अशी मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पूर्ण भारतातून आपलं करिअर डान्स मध्ये करणारे लोक आले होते. ज्यांना करिअर करायचे होते, पण त्यांची परिस्थिती नाही. अशा स्पर्धकांना भारतातील काही मोठ्या हस्ती मदत करणार होत्या. त्यासाठीच बरीच मुलं इथं आली होती. याच स्पर्धेसाठी उतरणारे स्पर्धक हॉलच्या आसपास राहून आपल्या डान्सची प्रॅक्टिस करत होते.कोणी कथकली करत होत, कोणी भरतनाट्यम, तर काहीजण हिप हॉप , क्लासिकल असे करत होते. सगळे एकापेक्षा एक असे सरस होते.हॉलच्या एका कोपऱ्यात एक मुलगी कथक करत होती.
कथक म्हटलं की , एका कथेला नृत्यातून प्रदर्शित करायचं. त्या मुलीच्या बाजूला एक व्यक्ती सूर लावत असतो आणि एक वाद्य वाजवत असतो. तो व्यक्ती जसा सूर लावत असतो, तसे तिच्या चेहऱ्यावर हावभाव असतात आणि ती त्याच पद्धतीने नृत्य करत असते.मध्येच चेहऱ्यावर राग यायचा, तर मध्येच हसू असायचं. पण तिचे ते क्षणात बदलणारे हावभाव पाहून त्याला मात्र वेड लागत होतं. कारण ती खूपच सुंदर गोरी अशी होती आणि त्यात म्हणजे तिचा कॉस्ट्युम देखील मस्त असा केला होता. त्यामुळे ती आणखीन प्रभावी आणि तेजस्वी त्याला वाटत होती.
"सुंदर खुपच सुंदर आहे ही"तो मनातच बोलतो.
"कोण ती?ओळखतो काय तू?"एक व्यक्ती त्याच्या बाजूला येत म्हणाली.त्या व्यक्तीचा आवाज ऐकून तो भानावर येतो.
"कोण आहे माहीत नाही.पण फक्त माझी आहे.किती भारी कथक करते ही!! आजच्या स्पर्धेत बहुतेक हीच जिंकणार अनय"तो हसून तिच्याकडे पाहून म्हणाला.

"काटे की टक्कर हैं बॉस या स्पर्धेत. कोण जिंकेल सांगता येत नाही. आपण आपलं काम करू" अनय म्हणाला.

"हो, आपण आपलं करू.."तो अस बोलून स्वतःचा मोबाईल हातात घेतो आणि त्यात तिचा फोटो कैद करून तिथून निघून जातो.

त्या स्पर्धेत बरेच जण आपलं कौशल्य दाखवून जजेस लोकांना इम्प्रेस करत असतात. मोठया हस्ती देखील त्या सर्व जणांना पाहत असतात. त्यांना देखील निवडायला कठीण जात. पण शेवटी, स्पर्धेच्या ते स्पर्धकांना निवडायला लागतात. उत्तेजनार्थ पासून सुरू होत बक्षीस वितरण. ते भोपालच्या मुलीला भेटत, नंतर असेच काही स्पेशल प्रायजेस पण दिले जातात. शेवटी, त्याचा विजेता डिक्लेयर करायची वेळ येते. तेव्हा ती जजेस लोक गेस करायला सांगतात. तसे तिथे असलेले जास्तीत जास्त लोक "गुंजन$$$$$ गुंजन$$$$" या नावाने ओरडायला लागतात.
"गुंजन$$$ गुंजन$$$" तिथे असलेले लोक ओरडतच बोलतात. तसा स्टेजवर असलेला अँकर गालात हसतो.

"येस, इस साल की विजेता हैं गुंजन विखे-पाटील!!"अँकर हसूनच खुश होत मोठ्याने ओरडतो. तसे, सर्व लोक ओरडायला लागतात. ते नाव ऐकून एक मुलगी स्टेजच्या मागून येऊन स्टेजच्या पायरीवर येऊन खाली झुकून स्टेजला नमस्कार करून स्टेजवर आनंदातच येते आणि तिला आलेलं पाहून इकडे एका ठिकाणी बसलेल्या माणसाची नजर आपोआप तिच्यावर खिळते. खरंच आजच्या स्पर्धेत तिचा डान्स वेगळा होता. तिचे एक्सप्रेशन लोकांना भुरळ पाडणारे असे होते. त्यामुळेच तर इतकी लोक तिला ओळखत नसताना देखील तिचं नाव घेत होती. ती सगळयांना धन्यवाद म्हणते, आणि तशीच ट्रॉफी, बक्षीस घेऊन आनंदातच खाली उतरून निघून जाते.

"गुंजन.. मला या मुलीची माहिती हवी आहे अनय!!"ती व्यक्ती बोलते.

"वेद, तिची का माहिती हवी आहे तुला? ती तर एक डान्सर आहे आणि अश्या मुलींचा काय भरोसा नसतो.आपल्या स्वप्नासाठी, काम मिळवण्यासाठी या माणसांच्या बाजूला झोपायला पण तयार होतात" अनय काहीसा गुंजन कडे पाहून म्हणाला. पण त्याच ते बोलणं ऐकून वेदला मात्र राग आला.

"अनय, एखाद्या बद्दल माहिती नाही तर बोलू नये!! तू, माहिती मिळवून आण. माझी होणारी बायको हीच असेल. गुंजन वेद जाधव..!!"वेद हाताच्या मुठी आवळत रागातच म्हणाला.पण त्याच ते म्हण ऐकून तो जबरदस्त शॉक होतो.
वर्तमानकाळ:-कुठंतरी भूतकाळात हरवलेल्या त्याची विचारांची गाडी वर्तमानात येते. तसा तो गुढपणे हसतो आणि बेडच्या दिशेला जायला लागतो. बेडच्या थोड्या अंतरावर येऊन त्याचे पाय आपोआप थांबतात.
"हे चुकीचे आहे. जोपर्यंत तिची मर्जी नाही तोपर्यंत मी तिच्या बाजूला झोपणार नाही. उगाच तिला प्रॉब्लेम नको!! ज्यावेळी खरोखर तिला माझ्याबद्दल काही वाटेल. तेव्हाच मी हे नातं पुढे नेईल. पण तोपर्यंत गुंजनला तिच्या स्वप्नांच्या दिशेला न्यायला हवं वेद. तिचा गैरसमज दूर करायला हवा. लग्न झाल्यावर काही संपत नाही उलट एक नवीन नात, नवीन स्वप्न, नवीन लोक, या सगळ्याची सुरवात होत असते. तुला अधिकार स्वप्न पाहण्याचा आणि मला तो पूर्ण करण्याचा. एकदिवस तू , मोठी डान्सर होशील!! तुझी ही कला पण चर्चेत येईल आणि तुझे घरचे ज्यांना तुझी किंमत नाही. ती लोक देखील तुझं कौतुक करतील. आय प्रॉमिस गुंजन. तू माझं पहिल आणि लास्ट वाल प्रेम आहे. आयुष्यात मी घरातल्यांना काही मागितल नव्हतं पण तुला मागितले , तेव्हा मात्र त्यांनी मला नकार दिला नाही. तुझ्यासाठी हा वेद जाधव सगळं कुर्बान करू शकतो. एवढी धमक ठेवतो मी. तुला हे नक्कीच एकदिवस कळेल" वेद तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून मनातच बोलतो. तो गुंजन जवळ जाऊन तिच्या बाजूची आपली ब्लँकेट आणि उशी घेऊन सोफ्यावर झोपायला निघून जातो. सोफा त्याच्या उंची पेक्षा लहान होता तरीही तो कसातरी आखडून तिला पाहत पाहतच विचार करतच तिथेच झोपी जातो.


गुंजन आपली बेडवर शांत अशी झोपून राहते. आजच्या घटनेने ती भरपूरच घाबरली होती. त्यात पुरुष लोक चांगले नसतात. त्यांच्या बद्दलच एक वेगळंच मत तिने बनवलं होत. आज वेद जरिही तिच्यासोबत चांगला बोलत असला, तरीही तिचं मन मानून घेत नव्हतं. पुरुष लोक वाईट असतात!! हेच तिने मनाला बजावलं असल्याने वेदच्या बोलण्यावर तिला विश्वास वाटत नव्हता. पण तो मात्र अगदी , तिच्यासाठी स्वतःला बदलत होता. एकतर्फी प्रेम होते त्याचे, पण तरीही तो गुंजनच्या मनाचा विचार करत होता. तिचा विचार करूनच तो एवढा मोठा बेड असताना देखील सोफ्यावर झोपला. तिला कन्फेटेबल वाटावे यासाठी. त्याचा जागी दुसरा कोणी असता, तर आज जे गुंजनच्या मनात चालू होते विचार पहिल्या रात्री बद्दल ते तो जबरदस्ती करून तिचा विचार न करता सगळं काही करून मोकळा झाला असता. कारण बायको तर होती ती त्याची. अधिकार होता ना त्याच्याकडे. पण वेदने तस काही केलं नाही. ही एक प्रकारची जबरदस्ती होती आणि त्यात गुंजन अजूनही त्याच्यावर प्रेम करत नव्हती. त्यामुळे तिच्या मर्जी शिवाय तिला हात लावणे त्याला चुकीचे वाटत होते.

आज जरी त्याने काही केले असते, तरीही घरातील लोक काही त्याला बोलले नसते. पण या सर्वांमुळे तो गुंजनच्या नजरेतून मात्र पडला असता. समाजमान्य बलात्कार हा त्याला पटत नव्हता. हो, बलात्कारच म्हटलं जातं ना?कारण आज गुंजनच मन नव्हतं त्याच्यात आणि त्यात स्वतःच्या फायद्यासाठी तिचा विचार न करता तिला बेडवर झोपवून शरीर संबंध बनवून आपली मर्दानी दाखवून त्याला तिचा स्वाभिमान मोडायचा नव्हता. याने ती आणखीन खचून गेली असती. गुंजनने बिलकुल त्याला रोखले नसते असे करण्यापासून पण ती आधीच हरली होती आयुष्याच्या गोष्टीने त्यात आता अस काही झालं असत तर जिवंत पणी मेली नक्कीच असती. हेच त्याला नको होते. पटत नव्हते. म्हणून तो मनाला आवर घालून समजावून झोपून जातो.क्रमशः

--------------------