Gunjan - 8 books and stories free download online pdf in Marathi

गुंजन - भाग ८

भाग ८.



"गुंजन$$$, हे सगळं तुझे बाबा करत होते? तरीही तू मला का बोलली नाही?"वेद चिडून विचारतो. तशी ती शांत त्याच्यासमोर उभी राहते.



"अहो, नका ना अस चिडू प्लीज!!" ती रिक्वेस्ट करत म्हणाली. तिच्या बोलण्यावरून कळून चुकले त्याला की, ती कधीही रडायला लागेल. त्यामुळे तो एक सुस्कारा सोडतो आणि काहीसा शांत होतो.


"ओके, बाबा सॉरी. पण गुंजन, आणखीन काही झाल असत तर?त्यामुळे मला राग आला"वेद शांत होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.


"हम्म...सॉरी" ती एवढंच कसतरी बोलते.कारण एका वे ने विचार केला तर वेद देखील चुकला नव्हता. तो तिच्या भल्यासाठी बोलत असतो. हे, तिला कळते. ती तशीच त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या कंबरेला विळखा घालून स्वतःच डोकं त्याच्या छातीवर ठेवते. हल्ली तिला जेव्हा वेदकडे जावेसे वाटत असायचं, तेव्हा ती स्वतःहुन जात होती. कारण सेफ वाटायचं तिला त्याच्या जवळ.


"काय झालं आता? तू अशी जवळ येत जाऊ नको. मग माझ्या मनाला आवर नाही घालता येत" वेद तिला छेडत म्हणाला. त्याचे म्हणणे ऐकून ती आणखीन घट्ट प्रकारे त्याला धरते.


"तुम्ही जगातील बेस्ट आहात!! कालचा व्हिडीओ पण फेमस झाला माझा. मला आता ऑडिशन साठी बोलावले आहे. सगळ्यासाठी थँक्यू"गुंजन म्हणाली.


"वेडी, थँक्यू काय हा? नवऱ्याला थँक्यू नाही म्हणायचे असत. राहिली गोष्ट तुझ्या स्वप्नांची? ती तर तू पाहिली. मी फक्त तुला मार्ग दिला. आता तू फक्त तुझ्या करिअरकडे लक्ष दे!! बाकी मी पाहीनच"वेद हसून म्हणाला. खरंतर त्याला राग आला होता तिचा. पण ती एवढी गोड आणि थोडीशी हळवी असल्याने तिचा चेहरा पाहूनच त्याचा राग गायब होतो. डान्स डान्स फक्त डान्स!! हेच तिच्या डोक्यात चालू असायचं. वेडी होती ती त्यासाठी. रोज नवीन नवीन आविष्कार भारतीय नृत्य कलेत करत असायची आणि तिचे व्हिडीओ पाहून इतर मुली घरबसल्या डान्स शिकत असायचे. कितीतरी मुलींची ती हळूहळू आयडल पर्सन बनत होती.


वेदची गुंजन कंपनी व्यवस्थित चालू असायची आणि इकडे गुंजनच्या चॅनल मुळे तिचा बराच मोठा फॅन क्लब बनला होता!! काही फॅन्स असे होते, की त्यांनी गुंजनच्या घराचा अड्रेस काढून तिच्या घरी एक एक गिफ्ट्स पाठवले होते. खूपच क्रेझ वाढली होती मार्केट मध्ये तिची. गुंजनने तिला आलेल्या स्पर्धेची ऑडिशन देखील दिली आणि त्यातून ती सिलेक्ट देखील झाली. ती स्पर्धा आता दिल्लीत होणार होती. त्यासाठी स्पर्धकांना आधीच काही महिने त्यांच्या तिथे बोलावण्यात आले होते. तस त्यांनी गुंजनला मॅसेज आणि कागदपत्रे पाठवून कळवले. तो मॅसेज पाहून गुंजनच्या मनात कालवाकालव व्हायला लागली. आनंद होत होता. पण वेदला सोडून जायला मन मानत नव्हतं. शेवटी, ती मनात निर्णय घेते आणि त्यांना कॉल करून "नाही" म्हणत असते की, वेद तिथं येतो. त्याच्या कानावर तिचं बोलणं पडत. तसा तो तिच्या हातून मोबाईल घेतो.


"हॅलो, मिस्टर अहुजा. गुंजन मॅडम आयेगी आपके यहाँ!! आप फिकर मत करिये ।"वेद शांतपणे म्हणतो. त्याला त्याच नाव गुंजनच्या तोंडून कळलं होतं. त्यामुळे तो तस बोलतो.


"थँक्यू, सर. आप मॅडम को दो दिन बाद भेज दे!! क्योकी, मॅडम को सब लोग देखना चाहते हैं। फॅन्स उनकी एक झलक पर फिदा होते हैं। ऑडिशन के वक्त भि लोगो ने बाहर भीड़ लगाई थी।" मिस्टर अहुजा हिंदीतून तिचं कौतुक करत म्हणाले. त्याच म्हणणं ऐकून वेद एक नजर तिच्याकडे पाहतो आणि गालात हसतो. पण इकडे गुंजनच्या मनात मात्र वेगळंच काही सुरू असत.


"अरे, मैंने अच्छा चान्स मिस किया फिर। कोई, बात नहीं फायनल में मैं अपने वाईफ को देखने आऊंगा। आप अच्छे से ध्यान रखीयेगा मेरे वाईफ का।" वेद थोडस हसून बोलतो.


"जी सर. बहुत बहुत शुक्रिया।" मिस्टर अहुजा अस म्हणून आनंदात फोन ठेवून देतात. त्यांच बोलणं झाल्यावर वेद हाताची घडी घालून गुंजनकडे पाहतो. तरीही, ती त्याच्याकडे पाहत नाही. तो खूपवेळ तिला पाहतो. पण तिचं लक्ष बिलकुल त्याच्याकडे नसत. काहीवेळाने तिच्या मुसमुसण्याचा आवाज येतो. तसा तो तिचे खांदे धरतो आणि तिला नीट स्वतः समोर उभ करतो.



"का रडते आहे? हेच स्वप्न होत ना तुझं? बघ किती कौतुक करत आहे तुझं सगळे जण? तू आहे की, अस त्यांना नकार देत असते. कारण काय आहे गुंजन?" वेद तिला पाहून म्हणाला. तशी ती मान वर करते.



"अहो, मला तुम्हाला सोडून नाही जायचं. साडे नऊ महिने आपण भेटणार नाही. तुम्हाला कस कळत नाही?" गुंजन मुसमुसत म्हणाली.



"एवढंच ना? नको अशी नाराज होऊ शोना. फक्त साडे नऊ महिनेच तर तू दूर असणार आहे आणि मी येईनच की फायनलला तुझ्या. एवढं मोठं कॉम्पिटेशन आहे हे. इथे, जर तुला प्राईज मिळालं ना? तर तू किती फेमस होशील? याचा अंदाजा पण नाही लावू शकत. २५ कोटी प्राईज मनी आहे याचा. गुंजन नाव होईल तुझं सगळीकडे. खुप ऐकलं आहे मी या स्पर्धेबद्दल" वेद तिला समजावत म्हणाला. पण ती काही त्याच ऐकायला तयार नसते. तिला त्याला सोडून जायचं नव्हतं. यासाठी ती नकार देत असते.शेवटी, वेद तिचं पाहून घेतो आणि शांत होतो.



"गुंजन, तुला माझी शप्पथ आहे!! तू इथून दिल्लीला नाही गेली ना? तर मी पुन्हा कधीच तुला भेटणार नाही."वेद थोडस विचार करून म्हणाला. त्याच्या तोंडून असे शब्द ऐकून तिच्या डोळ्यांत पाणी भरते. ती पटकन त्याच्याजवळ जाते आणि रडतच त्याला मिठी मारते.





"नको ना, अस बोलू तुम्ही. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत हे तुम्हाला माहीत आहे. तरीही तुम्ही असलं काही बोलत असतात. ओके, तुमची हीच इच्छा आहे ना? तर मी जायला तयार आहे. फक्त तुमच्यासाठी!!"गुंजन शांत होऊन म्हणाली. तिचं ऐकून वेद तिला जवळ घेतो.काहीही केलं तरीही ती जात आहे ना? या बद्दल त्याला आनंद होत होता. पण ती दूर जात आहे , म्हणून थोडेसे दुःख देखील त्याला होत होते. कारण हा दुरावा खूप महिन्याचा होता. तो देखील लग्न झाल्यावर होता. अजून त्यांचं प्रेम तस खुलल नव्हते आणि त्यात असलं काहीतरी आलं. त्यामुळे दोघांनाही हवा तसा एकांत मिळाला नाही. कुठेतरी, मनात ती खंत तिला वाटत होती. पण सध्या त्याला बोलली तर तो वेगळा अर्थ काढेल? या विचाराने, ती शांत राहते.


"वेद, तुम्हाला मी हे कॉम्पिटेशन जिंकून आल्यावर आय लव्ह यू म्हणेन. पूर्ण जगासमोर मला ओरडून सांगायचे आहे, की मी तुमची बायको आहे आणि आज जी काही आहे ते तुमच्यामुळे. पण यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल. सॉरी वेद." गुंजन मनातच म्हणाली.



"गुंजन, मला मिस करशील ना? की तिथे कोणी भेटला की, मला विसरशील?" वेद मस्करीत बोलतो. त्याच बोलणं ऐकून ती बाजूला होते आणि रागातच त्याला पाहते.




"मी काय तुम्हाला तशी मुलगी वाटली का? नवरा नाही आहात तुम्ही फक्त माझ्यासाठी!! एक बापासारखा, एक सखा, एक आईसारखा चुकल्यावर समजवून जवळ घेणारा जीवनसखा आहात. प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन करणारे गुरू आहात. सगळी नाती मला तुमच्यात पाहायला मिळतात. आयुष्यात एवढं चांगलं माणूस मिळाला मला या बद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. पुन्हा असलं काही बोलायचं नाही कळलं. मला नाही आवडत असल." गुंजन काहीशी चिडक्या स्वरात म्हणाली. खरंच आज तिचा गोरा चेहरा थोडासा लाल झाला होता. जो पाहुन वेदला देखील काही क्षणासाठी भीती वाटते. त्याने मस्करी केली होती. पण गुंजनला ते आवडलं नव्हतं.


"सॉरी" तो एवढंच बोलतो. पण गुंजन मात्र , चिडूनच गॅलरीत निघून जाते. तिला भयंकर राग आला होता त्याच्या बोलण्याचा. हे त्याला कळून चुकत. मग तो देखील, तिच्या मागे निघून जातो.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
-------------------