Gunjan - 3 books and stories free download online pdf in Marathi

गुंजन - भाग ३

भाग. ३

आज गुंजनचा जाधवांच्या कुटुंबातील पहिला दिवस होता लग्नानंतरचा. तरीही, तिला काही जाग आली नव्हती. काल खूप थकल्याने तिला जाग आली नाही!!पण वेद मात्र लवकर उठून आपला नेहमीप्रमाणे फ्रेश झाला होता. लग्न झालं होतं त्याच हे जगाला माहिती होते. पण एवढ्या तडकाफडकी झाल्याने बाहेरील लोकांना नेमकं कारण जाणून घ्यायचे होते.त्याला मात्र कोणाला काही उत्तर द्यावेसे वाटत नव्हते, त्यामुळेच तो त्यांचे कॉल टाळत असतो. तो ऑफिस साठी तयार होत असताना त्याची नजर घड्याळाकडे गेली. तस त्याच्या कपाळावर किंचितश्या आठ्या पडल्या.


"ही मुलगी एवढा वेळ झोपते का नेहमी?"तो आरश्यासमोर तयार होत मनातच बोलतो. त्याला आता तिची काळजी देखील वाटून राहते. तसा तो आपला कोर्ट अंगावर चढवून गुंजन जवळ जातो आणि थोडस मनाला समजावत तिच्या कपाळावर हात ठेवतो. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवताच त्याला तिचे कपाळ गरम लागते. तसा तो घाबरतो.


"ओह, नो!! हिला तर ताप आहे. एवढा धसका घेतला का हिने? खरंच मला जर तुझे आयुष्य बदलता आले असते ना? तर नक्कीच बदलले असते. पण आता प्रयत्न करेन गुंजन" वेद काळजीने तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्याने लगेच आपला फोन हातात घेऊन डॉक्टरला कॉल केला. त्यांच्यावर थोडस खेकसूनच त्याने त्यांना अर्जेंटली घरी बोलावून घेतले.तसे, डॉक्टर देखील काळीवेळातच आपली बॅग घेऊन जाधवांच्या घरी पोहचतात. खाली त्यांना आलेल पाहून जाधवांच्या घरातील मंडळी प्रश्न विचारतात. पण डॉक्टर त्यांना काहीही न सांगता वर वेदच्या रूममध्ये येतात.


"डॉक्टर, चेक करा माझ्या बायकोला!!"वेद त्यांना आलेलं पाहून म्हणाला.तसे डॉक्टर आपली बॅग मधून त्यांना हवं ते सामान काढून घेऊन गुंजनला तपासायला लागतात. ते गुंजनला योग्य प्रकारे ट्रीट करतात.



"डॉक्टर काय झालं आहे तिला?"वेद आपल्या गळ्यातिल टायला लुझ करत विचारतो.


"सर, त्यांना कसला तरी ट्रेस आहे. त्यामुळे अशी हालत केली आहे त्यांनी. त्यांना जर योग्य प्रकारे तुम्ही सांभाळलात तर त्या बाहेर येतील. टेन्शनच कारण नाही आहे. मी सद्या त्यांना ट्रीट केलं आहे. त्यामुळे त्या बऱ्या होतील!!" डॉक्टर हळू आवाजात बोलतात. कारण वेदला ते घाबरत होते. पण त्यांच ते बोलणं ऐकून वेद सुटकेचा श्वास घेतो आणि डॉक्टरला पुढचं सगळं विचारून त्यांना पाठवून देतो. आज गुंजनला अश्या अवस्थेत सोडून जाण त्याला पटत नव्हतं. कारण ती या घरातील कोणत्याच व्यक्तीला ओळखत नव्हती. त्यामुळे ती आणखीन घाबरून जाईल या विचारानेच, तो मोबाईल काढून ऑफिसच्या सगळ्या मिटिंग कॅन्सल करतो आज गुंजनच्या बाजूला बसून राहतो.



"वेद, आम्हाला बोलायचे आहे तुमच्यासोबत" एक मध्यम वयाची बाई तिथं येत बोलते. पैठणी पिंक रंगांची साडी तिने नेसली होती. दिसायला गोरी अशी होती. सौभाग्यवती असल्याने कपाळावर भल मोठं कुंकू होत आणि गळ्यात मंगळसूत्र. प्रतिष्ठित घराण्यातील असल्याने डोक्यावर पदर आणि बरेच असे दागिने देखील त्यांच्या अंगावर होते. त्या बाईचा आवाज ऐकून वेद गुंजनकडे पाहतो आणि तिची ब्लँकेट व्यवस्थित करून तो उठून उभा राहतो.



"आई, बोला काय बोलायचे आहे तुम्हाला?"वेद शांतपणे विचारतो.


"वेद, हे लग्न अस तुमचं अचानक झालं तरीही आम्ही काही बोललो नाही. पण त्या मुलीला घरात येऊन एकदिवस झाला नाही की, आजारी पडली आहे. अश्या कमजोर मुलीमध्ये काय पाहून तुम्ही हे लग्न केलं? याची उत्तर आम्हाला हवी आहे वेद. त्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून हलू देणार नाही" वेदची आई थोडीशी आवाज वाढवत बोलते.


"आई, सांभाळून बोला तुम्ही. कमजोर तर ती नाहीच आहे. आम्ही बांधील नाही आहोत कोणाला उत्तर द्यायला. सून आहे म्हणून लगेच जबाबदारी टाकायची गरज नाही तिच्यावर. जस तुम्ही मायराला वागवतात ना? तस तिला वागवा. उगाच सून म्हटली की, घरातील हे कर ते कर करत जाऊ नका!!" वेद अगदी शांतपणे पण आवाजात जरब ठेवूनच बोलतो. त्याच ते बोलणं ऐकून त्याची आई त्याला अविश्वासाने पाहायला लागते. कारण कालच्या आलेल्या गुंजनसाठी तो अस काही बोलेल? अस त्यांना वाटलं नव्हतं.


"वेद$$$"वेदची आई चिडून म्हणाली.


"आई, आधीच सांगत आहोत आम्ही. एक मुलगी तुमच्या घरात आली म्हणजे तुम्ही तिला नोकरासारखे वागवायचे नाही. हळूहळू ओळख होऊ द्या तिची या घरातील लोकांसोबत, तिला ओळखा. तिच्यात मायराला पाहा मग तुम्हाला कधी ती तुमची सून आहे अस वाटणार नाही. जसे इतरांना आईची माया देत असतात ना? तसच तिला द्या. बघा तिच्या मनात असलेले विचार बदलतील. लग्न म्हणजे दोन मनाचे मिलन अस नसत ना? एक मुलगी जेव्हा दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा ती अनेक नाती गोती , आचार विचार घेऊन येते. ती जशी माहेरी राहत असायची, तशीच जर आपण तिला स्वतंत्र दिले. तर ती आपल्या जबाबदाऱ्या योग्य पार पाडले. सोबतच संसार देखील चांगला चालेल. संसार काही आमचा दोघांचा नाही आहे आई. यात तुम्ही सगळे पण येतात. आजवर आपली फॅमिली मध्ये मुलीला कधीच जास्त स्वतंत्रपणे वागवलं गेलं नाही. पण तुम्ही एक संधी द्या सर्वांना. बघा तुमचं आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करतील" वेद आईला समजावत बोलतो. त्याच ते बोलणं ऐकून त्याची आई विचारात पडते.

"आई, एकेकाळी तुम्ही पण सून होताच की?तेव्हा तुमच्या सासूबाई तश्या वागल्या म्हणून तुम्ही माझ्या बायकोसोबत पण तसच वागत राहिला तर सासू-सून हे नातं तसेच राहील. त्यापेक्षा जर तुम्ही प्रेमाने तिची आई बनून वागलात तर तुम्हाला एक नवीन मुलगी मिळून जाईल आणि तुमचे नाते टिकत जाईल. आपल्या समाजातील सासू-सुनेची व्याख्या बदलायला देखील सुरवात होईल. आई, कालपासून तिला साधं कोणी विचारलं नाही आल्यापासून. मग ती कशी तुमच्यात मिसळत जाईल? आज ती बरी नाही तर तुम्ही विचारायला आलात. काल अस तिला विचारले असते, तर ती स्वतःला एकट तरी समजणार नाही आई. कधीकधी काही गोष्टी मुली आम्हाला पुरुषांना नाही सांगू शकत. मग त्यांना कोणीतरी हक्काची अशी मैत्रीण हवी असते. ते नात बनवा तुम्ही. दोघींचा आवाजाने घर भरलेले वाटेल ना? त्यामुळे मी बोलत आहे तुम्हाला. बाकी तुम्ही समजूतदार आहात आई!!"वेद त्याच्या आईला विचारात पाहून बोलतो. त्याच ते बोलणं ऐकून त्या निःशब्द होतात. कारण वेद जरी लहान असला त्यांच्यापेक्षा , तरीही तो विचाराने मोठा होता. आज जे काही तो बोलत होता ते पाहून त्यांना त्याला काय बोलावे? हे समजत नव्हते. त्या शांत होतात आणि तश्याच गुंजन कडे जातात. त्या गुंजनच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवतात.


"लवकर , बरी हो पोरी. ही आई, तुझी वाट पाहत आहे. तू भाग्यवान आहेस तुला असा जोडीदार मिळाला आणि मी देखील वेदच्या बाबतीत स्वतःला भाग्यवान समजते कारण असा विचारी मुलगा माझ्यापोटी जन्माला आला!!"वेदची आई गुंजनकडे पाहून म्हणाली. आईचे ते बोलणं ऐकून वेदच्या ओठांच्या कडा रुंदावतात.



"आम्ही, यांच्या जेवणाचे पाहतो. तुम्ही ,त्यांना सांगा जास्त काळजी करू नका आणि घाबरू नका!! हे, घर आपलच समजा अस सांगा" वेदची आई थोडीशी हसतच म्हणाली. ती तशीच तिथून सरळ बाहेर जाते.वेद एक सुस्कारा सोडून घरूनच आपलं काम करत गुंजनच्या बाजूला बसतो. राहून राहुन तो तिचा ताप देखील चेक करत असतो.


दुपारी कधीतरी गुंजनला जाग येते. ती कसतरी डोळे उघडते. तशी वेदची नजर तिची हालचाल पाहून तिच्यावर जाते.


"तू, झोपून रहा!! कोणी काही बोलणार नाही तुला"वेद तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला.पण त्याच ते ऐकून ती थोडीशी चिडतच बेडवर उठून बसते.


"काही गरज नाही तुमच्या खोट्या वागण्याची आणि सहानुभूतीची. मी या घरची सून आहे. त्यामुळे मला माहित आहे माझी जबाबदारी" गुंजन चिडक्या स्वरात बोलते.


"व्हॉट? एकतर तुला बरं नाही आहे. त्यामुळे मी बोलत आहे. यात कसला आला खोटेपणा?सहानुभूती दाखवत नाही. तू माझी बायको आहेस!! तू मानलं नाही मला नवरा तरीही मी मानतो" वेद 'बायको' या शब्दावर जोर देत म्हणाला.


"काय जबरदस्ती आहे यार तुमची? लग्न पण केलं आणि आता अस पण वागत आहात. मी जाणार इथून बाहेर"गुंजन वैतागून बोलते. अंगात त्राण तर नव्हता तरीही उठून बाहेर जायचं होतं तिला. ती वेदला झिडकारून जात असते, की तेवढ्यात वेद आपला लॅपटॉप बाजूला ठेवून, पळत तिच्या दिशेला जाऊन तिला काही कळायच्या आत स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो. त्याच्या अश्या वागण्याने ती घाबरते. कारण आजवर असा स्पर्श तिला कोणी केला नव्हता.


"अहो, सोडा तुम्ही मला. प्लीज, खाली" ती रिक्वेस्ट करत बोलते. पण तो नाही मध्ये मान हलवून तिला बेडवर आणून ठेवतो.


"गप्प झोपून रहा. डॉक्टरने आराम करायला सांगितला आहे" वेद थोडस चिडून तिच्या अंगावर पांघरून टाकत म्हणाला.त्याची ती काळजी आणि चिडण पाहून ती काहीवेळ विचारात पडते.


"आजवर घरात कधी मी बिमार पडली, तरीही आई बाबांनी कधी साधी विचारपूस केली नाही. हा फक्त मारलं. त्यातून ते दाखवत असायचे मी फक्त त्यांची आहे. त्यामुळे ते माझ्यासोबत काहीही करू शकतात हे. पण हे मात्र एवढीशी आजारी पडली की, अस बोलत आहे आणि ट्रीट करत आहे. खरंच चांगले आहे की, नाटक करत आहे वागण्याच? नवरा कधीच समजून घेत नाही बायकोला. पण अस असलं तरीही देखील काल त्यांनी मला काहीच कस केलं नाही?"गुंजन मनातच स्वतःशीच बोलत असते. वेद तिच्या समोर आणून जेवणाच ताट ठेवतो. तरीही तीच लक्ष नसत. हे पाहून तो स्वतःच एक घास हातात घेऊन तिच्या तोंडाकडे नेतो. तशी ती भानावर येते.


"हे, काय करत आहात तुम्ही?मी खाऊ शकते माझ्या हाताने"गुंजन भानावर येत म्हणाली.



"हा, ते असत तर मगासपासून मी आवाज देतोय?तर खाल्लं असतस ना तू?पण तुझं तर लक्षच नव्हतं. त्यामुळे आ कर आता मी भरवतो"वेद हसून तिला बोलतो. तशी ती तिच्याही नकळत तोंड उघडून त्याचा समोर केलेला घास खाते. खाताना तिचे डोळे भरतात आणि अचानक तिला ठसका लागतो. तसा वेद तिला पाणी पियायला देतो आणि हळूहळू तिच्या पाठीवर काळजीने हात फिरवतो. काहीवेळाने तिचा ठसका कमी होतो. तसा तो सुटकेचा श्वास घेतो. तो तिला जेवण भरवून , गोळ्या देऊन झोपवून लावतो आणि त्यानंतर पुन्हा स्वतःच काम करत बसतो. गुंजन तिच्याही नकळत वेदच्या वागण्याने त्याच्याकडे ओढली जात होती.




वेद रात्रीचा गुढपणे लॅपटॉप वर काहीतरी करतो आणि स्वतःशीच हसून तो लॅपटॉप बंद करतो.लॅपटॉप बंद केल्यावर तो गुंजनची ब्लँकेट व्यवस्थित करतो.


"गुंजन, उद्या नक्कीच तू खुश होशील!! तू आनंदी असली की, मी पण आनंदी असेन. लव्ह यू स्वीटहार्ट. तुझ्या स्वप्नांच्या दिशेने हे एक पाऊल तुझे त्या दिशेला आहे अस समज" वेद तिच्या चेहऱ्याकडे पाहून बोलतो आणि तसाच पुन्हा कालसारखा सोफ्यावर जाऊन हसतच झोपून जातो.



दुसऱ्या दिवशी टीव्हीवर एकच बातमी झकळते. ती बातमी पाहून जाधव कुटुंबासकट गुंजन देखील शॉक होते.



"रातोरात गुंजन इस यू ट्यूब चॅनल के बने १ मिलियन सबस्क्रायबर!! सिर्फ आठ घंटो में चॅनल हुवा फेमस" एक हिंदीतील रिपोर्टर मुलगी हातात माईक घेऊन बोलत असते. तिच्या बाजूला बरेच बॉलीवूड मधील कलाकार फोन द्वारे चर्चा करत असतात. मध्ये एका कोपऱ्यात एक मुलगी मस्त चेहऱ्यावर नटखट एक्सप्रेशन ठेवून बेधुंद होऊन नाचत असते आणि सगळे जण तिचे कौतुक करत असतात. खाली त्या व्हिडीओ वर येणाऱ्या कंमेंटची स्क्रीन देखील शेअर केली जात होती. ते सगळं पाहून गुंजन भलतीच शॉक होते. पण वेद मात्र, शांत आपला कॉफी पीत असतो. गुंजन रागातच त्याला पाहून त्याच्याकडे जात असते. तसा तो तिला इग्नोर करून रूममध्ये जातो. गुंजन देखील त्याच्या मागे जाते.


"अहो, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची. मला बिलकुल पटलं नाही हे. मी काल पण नकार दिला होता आणि आजही नकारच आहे" ती रागातच बोलते.


"गुंजन चॅनेलचे १ मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत. त्यात तुझा व्हिडीओ २० लाख लोकांनी पाहिला आहे.त्यामुळे तुला बऱ्याच इंडस्ट्रीकडून फोन येत आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे यार आणि तू कसा चेहरा करून बसली आहे. चल खुश हो!!"वेद हसूनच बोलतो.



"व्हिडीओ कसा मिळाला तुम्हाला? तुम्ही ओळखता काय मला आधीपासून?"गुंजन त्याच्याकडे नजर रोखुन पाहत बोलते. तिचं ते बोलणं ऐकून तो शांत होतो.




क्रमशः
-----------------------
कथा काल्पनिक आहे. गुंजनचे लग्न कसे झाले वगैरे हे कळेलच लवकर.तो पर्यंत एन्जॉय करा कथा.