Gunjan - 5 books and stories free download online pdf in Marathi

गुंजन - भाग ५

भाग ५.

गुंजन आणि तो सोबतच खाली येतात. तसे, वेदच्या घरचे काही लोक रागातच गुंजनला पाहायला लागतात. त्यांच्या नजरा पाहून गुंजन काहीशी घाबरून वेदच्या जवळ थांबते. वेद तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो. ते पाहून ती लोक आणखीन खवळतात.


"वेद, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला कळवले देखील नाही !! पण, आम्हांला त्याच काही वाटलं. आता तुमच्या बायकोने जे काही केलं ते आम्हाला बिलकुल पसंत नाही पडलं"एक मध्यम वयाची बाई त्याच्याजवळ येत रागातच म्हणाली. गुंजनला अजून धड वेदच्या परिवारासोबत ओळख देखील झाली नव्हती आणि त्यात आता ती लोक अशी बघत होती जस काय तिने खूपच मोठं चुकीचे केलं आहे?


"आत्या, काय यात चुकीचे आहे? मी लग्न केलं, मला आवडते ती आणि माझं प्रेम आहे तिच्यावर. त्यामुळे केलं लग्न. आता ती डान्स करते. तर यात काय चुकीचे आले ना?"वेद शांतपणे गुंजनचा हात घट्ट प्रकारे धरत म्हणाला. त्याचे म्हणे ऐकून दोन पुरुष जे की त्याच्या पेक्षा वयस्कर दिसत होते ते तिथं येतात.


"आपल्या घरातील सुना आता असलं घालून बाहेर नाचायला जाणार का? तमाशा केला आहे यांनी, जो की आम्हाला आवडला नाही आहे वेद आणि असली नाचणारी मुलगी आम्हाला आमच्या घरात सून म्हणून नको आहे. आजवर आम्ही काही मागितले नाही तुमच्याकडे पण आज मागत आहोत. या मुलीला सोडून द्या आणि चांगल्या मुलीसोबत लग्न करा. कोणाला काहीच कळणार नाही. ही अशी असल्यानेच तिच्या वडिलांनी आम्हाला विकल" त्यातील एक व्यक्ती रागातच गुंजनकडे पाहत म्हणाला. त्यांचे ते तिच्या बद्दलचे विचार ऐकून तिच्या डोळ्यांत पाणी भरत. त्यात वेद काहीच बोलत नव्हता त्यांना म्हणून थोडस वाईट देखील वाटत होतं.


"तुम्ही, काकीला सोडून देतात का? आपण त्यांना सोडू आणि नवीन एखादी पाहू" वेद काहीसा विचार करत म्हणाला. त्याच म्हणणे ऐकून घरातील सगळेच शॉक होतात.


"काय बोलताय वेद तुम्ही हे? वेड लागलं आहे का तुम्हाला?"वेदची आई तिथं येत म्हणाली.

"आई, मग काका जे बोलत आहे ते त्यांना सोप्प वाटत का? लग्न म्हणजे खेळ आहे का?एकदा केलं की मोडल मग दुसऱ्या मुलीला पाहा!! लग्न म्हणजे दोन मनाचे मिलन असते. गुंजनला मी सप्तपदी घेताना सात वचन दिली होती. त्यातील एक अस होत की, मी कितीही काही झालं तरीही तिची आयुष्यभर साथ सोडणार नाही. तिच्या सोबत नेहमी उभा राहील खंबीरपणे. आता तेच वचन मी निभावत आहे. माझ्या गुंजनला काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही आणि ज्यांना मी गुंजन या घरात नको आहे. तर ओके मी आणि गुंजन आजपासूनच घर सोडून निघून जातो" वेद अगदी शांतपणे म्हणाला. पण त्यात देखील एक वेगळ्या प्रकारचा राग दिसून येत होता त्याचा. त्याच ते म्हणणे ऐकून सगळेच शांत होतात.


"वेद, असा तडकाफडकी निर्णय घेणे योग्य वाटते का तुम्हाला? ते सुद्धा या मुलीसाठी? तिला आम्ही आधीच सांगून ठेवत आहोत या घरात राहायचं तर हे नाचण्याचे प्रकार बंद करायचे. मगच आम्ही तुला चांगली वागणूक देऊ!!" दुसरा व्यक्ती रागातच म्हणाला.त्याच म्हण ऐकून वेद गुंजनचा हात धरतो आणि काहीसा चिडूनच त्यांच्यासमोरून तिला तिथून घेऊन जायला लागतो. गुंजनला तर काही कळत नव्हते. पण सध्या वेदशिवाय तिला काहीच नको होते. त्यामुळे ती देखील त्याच्यासोबत चालायला लागते.त्याला अस जाताना पाहून त्याची आई त्याच्यासमोर जाऊन उभी राहते.


"वेद, काय करत आहात हे तुम्ही? असा निर्णय का घेत आहात? आम्ही समजावू गुंजनला. त्या नाही बाहेर जाणार आणि हे भांडण देखील होणार नाही"वेदची आई म्हणाली.



"आई, तुम्ही त्यांना न समजावले बरं. ज्यांनी स्वतःची स्वप्न मारली तिचं बाई आता दुसऱ्या मुलीचं स्वप्न मारायला चालली. हे तुम्हाला कितपत पटत? एवढंच वाटत तर तुमच्या नवऱ्याला समजवा. मी माझ्या बायकोला मन मारून जगायला शिकवणार नाही. तिला हवं ते मी करू देणार आहे आणि तिला डान्स आवडतो तर ती ते सोडणार नाही. मी तिला अस करायला देणार नाही" वेद रागातच म्हणाला आणि त्याने गुंजनचा हात पकडून तिला सरळ घराच्या बाहेर नेले. सगळे परिवारातील लोक तर शॉक होऊन त्याला पाहायला लागले. गुंजनला तर काही कळत नव्हते. पण वेदची साथ तिला असल्याने ती शांतच राहते. वेद तिला गाडीत व्यवस्थित बसवतो आणि नंतर स्वतः तिच्या बाजूला जाऊन बसतो.


"आजपासून तुला कसलीच बंधन नसतील गुंजन"वेद एवढंच म्हणाला आणि तसाच तो निर्विकारपणे ड्रायव्हरला ऑर्डर देऊन तिथून गाडी घेऊन जायला सांगतो. त्याच्या आईला तर त्याला अस जाताना पाहून रडूच येते. पण मनात एक समाधान होत की, आज तिच्या मुलाने एका मुलीच्या स्वप्नांना न मारण्यासाठी अस काही केले होते ज्याचा विचार कोणीच केला नव्हता. त्याच्या आईला थोडासा आनंद देखील होत आणि मुलगा घर सोडून गेला याचे दुःख देखील होते. पण गुंजनचे स्वप्न वेद पूर्ण करेल, या गोष्टीचे समाधान पण त्यांना वाटते.



"हा, आमचा मुलगा एका मुलीसाठी आम्हाला सोडून गेला? खूप पश्चात्ताप होईल याला एकदिवस" वेदचे बाबा रागात म्हणाले.


"अहो, माझ्या मते तुम्ही अस बोलायला नको होते. आज तिचा पहिला दिवस होता घरातील आणि त्यात तुम्ही अस बोललात की ज्यामुळे तो दुखावला गेला. त्यामुळे त्याने असा निर्णय घेतला. मान्य आहे तुम्हाला नाही आवडली ती मुलगी. पण तुम्ही तिला बोलू न देता न समजून घेता तिला लागेल अस बोललात. जे माझ्या मुलाला आवडलं नाही!!"वेदची आई समजावत म्हणाली. पण ते ऐकून वेदचे वडील रागातच वेदच्या आईच्यावर हात उगारता. एक जोरात कानाखाली त्यांच्या ठेवून देतात. तशी वेदची आई सुन्न होते.



"बाईने, बाई सारखे रहावे!! नको तिथे नाक खुपसू नये विनिता बाई. आम्ही, कितीवेळा तरी सांगितले तुम्हाला. पण नाही तुम्हाला सवयच झाली आहे. आज तुमच्या अशामुळेच मुलगा सोडून गेला. कसली बायको आहात तुम्ही काय माहिती? जो मुलगा जन्माला घातला तो पण तसाच निघाला. असला मुलगा नसलेलाच बरा. बाईच्या पदराखाली लपून बसणारा. नंदीबैल आहे तो!! ना मर्द कुठचा!!" वेदचे बाबा रागातच वेदच्या आईला पाहून म्हणाले. आता त्यांचे ते बोलणे ऐकून कधी न चिडणारी वेदच्या आईला जबरदस्त राग येतो.


"ओ मिस्टर वैभव जाधव, आजवर खूप ऐकलं तुमचं. पण आता नाही!! तुम्ही कसले ओ माझ्या मुलाला ना मर्द म्हणारे हा? तुम्ही स्वतः माझ्यावर कितीतरी वेळा अत्याचार केले. माझ्यावर हात उगारतात ना कधीही? कारण तुम्ही ना मर्द आहात!! तुम्हाला काय वाटलं मी एवढं सगळं सहन केले आजवर ते फक्त मुलासाठी आणि मुलीसाठी होते. पण आता नाही. माझा मुलगा खरा माणूस आहे. त्याने आज गुंजनला निवडून दाखवून दिलं आहे की, तो विनिता जाधवचा मुलगा आहे ते!! मला माझ्या मुलावर गर्व आहे. आता जर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती किंवा मला मारण्याचा प्रयत्न केला ना तर कोर्टात उभं करेन तुम्हाला सर्वांना" वेदची आई भयंकर रागातच म्हणाली. त्यांचे ते रौद्र रूप पाहून सगळे जण शॉक होतात. कारण आजवर कधीच वेदची आई उलटून कोणाला काही बोलायची नाही. पण आज मात्र तिला प्रचंड राग आला होता. वेदला जे काही त्याचे बाबा बोलले. ते शब्द ऐकून त्यांचा राग उफाळून आला होता. आजवर वेदने या घरासाठी खूप काही केलं होतं. पण कधी त्याने बोलून दाखवल नव्हतं. तरीही आज गुंजनला त्याने निवडल म्हणून त्याच्या बाबांनी त्याला जे काही बोलले ते वेदच्या आईला पटले नाही. त्यामुळे त्यांनी आता खडे बोल त्यांना सुनावले. वेदची आई तशीच तिथून निघून जाते आणि इतर घरातील लोक तिला पाहत राहतात.



वेद आणि गुंजन गाडीत शांत असतात. गुंजनला तर काही कळत नसत. फक्त डोळ्यांतून पाणी तिच्या येत असत. कारण हे सगळं तिच्यामुळे झालं. अस कुठेतरी तिच्या मनाला वाटत होतं. वेदला तिचं मन कळत तसा तो एक हाताने तिला जवळ घेतो.


"तुझ्यामुळे काहीच झालं नाही. कधी कधी वेळ अशी येते की त्यावेळेस कडक होऊन निर्णय घ्यावे लागतात. आज तुला कळणार नाही. पण पुढे जाऊन नक्कीच कळणार. तू नाराज होऊ नको आणि अशी रडू देखील नको. हा वेद कधीच तुला एकट सोडणार नाही"वेद शांतपणे म्हणाला. त्याच्या हाताची लांबसडक बोटं तिच्या केसांत फिरत होती. ज्यात फक्त प्रेम आणि प्रेम होतं!! बाकी काहीच नाही. एक नवीन प्रवास सुरु होत होता त्यांच्या आयुष्याचा. वेदकडे त्याची बरीच प्रॉपर्टी होती. त्यामुळे जाधवांचे घर सोडून देखील त्याला तेवढं काही फरक पडणार नव्हता!! पण त्यांना मात्र लवकरच कळणार होत वेद कसा आहे ते?गुंजन झाल्या प्रकाराने थोडीशी घाबरली होती. पण वेद मात्र तिला बेटर फिल करवत होता. एवढं सगळं होऊनही तो शांत कसा? याचा विचार तिच्या मनात येत होता!! सध्या मात्र ती त्याच्याजवळ असल्याने स्वतःला सेक्युअर समजत होती आणि भाग्यवान देखील. कारण वेद तिच्या आयुष्यात देवदूत बनून आला होता. सगळयांपासून रक्षण करत होता तिचे तो!!




क्रमशः
---------------------