Satyamev Jayte - 4 books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग ४

भाग ४.

"दुर्गा हरली आहे !! कोमेजून गेली आहे दुर्गा."तो निराश होऊन बोलतो. तशी ती महिला काळजीने त्याच्याकडे पाहते.



"काय झालं राजवीर? एवढं सिरीयस का बोलत आहे?"ती काळजीने विचारते.


"अपर्णा, माझ्या दुर्गा वर नराधम लोकांनी बलात्कार केला आहे. जी दुर्गा निर्भया प्रकरणच्या वेळी तिला न्याय कसा मिळेल? याचा विचार करून रात्र दिवस विचारात हरवलेली असायची. आज तिच्याच बाबतीत हे सगळं घडलं आहे....."राजवीर अस बोलून तिला महालक्ष्मी सोबत जे घडलं ते सगळं सांगायला लागतो.ते सगळं ऐकून अपर्णा शॉक होते. थोडासा चेहऱ्यावर राग देखील तिच्या येतो.


"अश्या नराधम लोकांना चांगली अद्दल घडली पाहिजे!! मग पुन्हा कधी अश्या विचारसरणीचे लोक पुढे कोणत्याही मुलीला त्रास देताना शंभरदा विचार करतील. राजवीर मला वाटत दुर्गा हेल्पलाईनने फेसबुकवर महिलांना प्रतिउत्तर करताना अपशब्द वापरणाऱ्या लोकांवर देखील कारवाई करावी. कारण एका महिलेला विचार मांडण्याचे अधिकार आहेत. पण इतर लोक जर तिला अपशब्द वापरून शिवीगाळ करत असतील. तर त्यांच्यावर देखील कारवाई करावी. सोशल मीडियावर फसवणूक होणाऱ्या मुलींची देखील चांगल्या प्रकारे कान उघडणी करावी. त्यामुळे मुली सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करतील. यावेळी हातात कँडल घेऊन फिरायचं नाही, तर यावेळी दुर्गा बनून तिच्या बाजूने उभं राहून नराधमांना शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे." अपर्णा काहीशी विचार करत म्हणाली. तिचं म्हणणं राजवीरला पटत. तसा तो तिला पाहतो.



"महालक्ष्मीची रेप केस हातात घेशील का अपर्णा? ह्या केसवर हवे तेवढे पुरावे मी मिळवून देईन तुला. फक्त तू ही केस हाती घे!! महालक्ष्मीची केस कोणीच हाती घेत नाही आहे. त्यामुळे एवढी छोटीशी मदत कर"राजवीर अपर्णा कडे पाहत म्हणाला.



"हे, काय राजवीर? मी ही केस घ्यायला कधी पण तयार आहे. महालक्ष्मीला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतःचे १००% देईन!!"अपर्णा आत्मविश्वास दाखवत म्हणाली.



अपर्णा जोशी ही दिल्लीतील सगळ्यात बेस्ट अशी वकील होती. आजवर तिने बऱ्याच महिलांच्या केस हाती घेऊन जिंकल्या देखील होत्या. ती कोणाकडूनही एक रुपया देखील घेत नसायची!! फक्त महिलांना न्याय मिळावा योग्य. यासाठी ती कार्यरत होती. तिच्या या कामामुळे राजवीर तिच्यावर खुश होता!! पण तो फक्त मैत्रीण पाहूनच खुश असायचा. बाकी नातं त्यांच्यात नव्हतं. आधीपासूनच त्याला महालक्ष्मी आवडत असायची. पण कधी तिला सांगायची, त्याच्यात हिंमत झाली नाही. कारण महालक्ष्मीला प्रेम वगैरे काही माहीत नव्हतं. पुन्हा त्यांची मैत्री मोडेल? या विचाराने तो तिला काहीच बोलत नसायचा. पण आज त्याला स्वतःचा राग यायचा. कारण त्यावेळी जर त्याने तिला सांगितले असते, तर कदाचित आज महालक्ष्मीची अशी अवस्था नसती. अस कुठेतरी त्याला वाटून गेलं.



"राजवीर मला तिला भेटायचं आहे. जोपर्यंत ती तयार होणार नाही. तोपर्यंत आपण यात काहीच करू शकत नाही" अपर्णा विचार करत म्हणाली. तीच बोलणं ऐकून राजवीर विचार करतो.



"मी कालच फॉरेन्सिक च्या टीमला बोलावून तिला पाहायला लावले आणि त्याचे रिपोर्ट लवकरच मागवून घेतले आहे. माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांनी देखील महालक्ष्मीच्या अंगावर असलेल्या ओरखड्याचे ब्लड सॅम्पल घेतले आहे. ज्यामुळे आपल्याला लवकरच आपली केस भक्कम करण्यासाठी मदत होईल. याचा विचार करूनच सगळे आधीच पुरावे गोळा केले. फक्त महालक्ष्मीला तयार करावे लागेल ,या सगळ्यासाठी!!" राजवीर विचार करत आपल्या तल्लख बुद्धी कौशल्याचा वापर करून अपर्णा सोबत बोलतो.



"हो नक्कीच!! खूप लकी आहे महालक्ष्मी तिच्या मागे तुझ्यासारखा मित्र उभा आहे. लवकरच त्या सर्वांना शिक्षा होईल. पण या सर्वांतून महालक्ष्मीला बाहेर काढायला वेळ मात्र लागेल" अपर्णा म्हणाली.


"हम्म..ते ही आहेच म्हणा"राजवीर.


"चल, उद्या भेटू. तुमच दुर्गा पथक आवडलं बघा आम्हाला"अपर्णा काहीशी हसूनचच त्याला बोलून तिथून निघून जाते. ती गेल्यावर राजवीर आपलं काम करत चेअरवर बसतो. दुर्गा हेल्पलाईन लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी तो रात्र भर गृहमंत्रीला समजावत बसतो. आधी तर ते नको म्हणत असतात. पण राजवीरचे विचार ऐकून ते त्याला परमिशन देतात. मध्यरात्री कधीतरी राजवीर घरी जायला निघतो.


आजच्या दिवसाने तो खूपच थकला होता. त्या थकलेल्या अवस्थेत पण तो घरी येतो आणि स्वतःच्या रूममध्ये जायच्या आधी महालक्ष्मीच्या रूममध्ये जाऊन तिला पाहतो. तर ती बेडवर त्याला दिसत नाही. तसा तो काळजीने तिला आसपास शोधतो. पण तरीही ती त्याला दिसत नाही. मग तो शेवटी बाथरूम मध्ये जाऊन पाहतो. समोरच दृश्य पाहून त्याला भीतीच वाटते आणि काळजी देखील वाटते. कारण महालक्ष्मी शॉवर खाली तशीच साडीत भिजून आपलं अंग घासणीने रडतच घासत असते. काही ठिकाणी तिने घासल्याने रक्त देखील येत होतं. साडीचा पदर खाली गळून पडला होता, तरीही तिला शुध्द नव्हती. ते दृश्य पाहून तो मनातच घाबरतो आणि मागचा पुढचा विचार न करता तो मागूनच तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठीत घेऊन हळूच तिच्या हातून घासणी काढून घेतो. तशी महालक्ष्मी चेहरा हातात लपवून मोठ्याने रडायला लागते. त्याला तिची अवस्था कळत असते. पण सध्या तो हतबल असतो. नकळतपणे त्याचेही डोळे ओले होतात. शॉवरच्या पाण्याखाली त्याचे अश्रू धुवून निघतात. तो महालक्ष्मी ला अजिबात सोडत नाही.



"बस्स बस्स!! नको रडू ग एवढं. मला त्रास होतो." तो नकळतपणे गहिवरून म्हणाला.पण त्याच बोलणं तिच्या कानापर्यंत पोहचत नाही. ती आपल्याच विचारात हरवलेली असते. राजवीर भानावर येत तिचा पदर हातात घेतो आणि तो पदर तिच्या अंगावर टाकून तिला सरळ करून स्वतःच्या मिठीत घेतो. तशी ती मुसमुसत रडायला लागते. तो शांतपणे तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करत असतो. तिचं लक्ष नसताना तो हळूच तिच्या दंडात आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालुन इंजेक्शन काढतो आणि ते नीट पकडून तिच्या हातात टोचतो. काहीवेळाने तिचा आवाज त्याच्या कानी पडत नाही. हे, पाहून तो इंजेक्शन फेकून देतो आणि शॉवर बंद करून, तिला आपल्या दोन्ही हातात उचलून घेऊन बेडवर आणून ठेवतो.



"सॉरी ,मही.."तो मनातच तिच्याकडे पाहून बोलतो. कारण ते इंजेक्शन झोपेच होत. महालक्ष्मीवर त्याचा प्रयोग त्याला करायचा नव्हता. पण महालक्ष्मीच वागणं पाहून त्याला तो प्रयोग करावा लागला. महालक्ष्मीला व्यवस्थित बेडवर ठेवून भिजलेल्या अवस्थेत तो डोळ्याला पट्टी बांधून तिचे कपडे बदलतो. कारण महालक्ष्मीच्या आईला दोन दिवसानंतर चांगली झोप लागली होती. त्यांना उठवायला त्याला कसतरी वाटत होतं. त्यामुळे तोच मग तिचे कपडे बदलून तिच्या जखमा साफ करतो. सगळं झाल्यावर तो डोळयांची पट्टी काढतो आणि तिला पाहायला लागतो.



"तू, सगळ्यात भारी आहेस दुर्गा. पण मला अशी पाहायला तुला आवडत नाही. पुन्हा आपल्या हसणार्या अवतारात पाहायला मला आवडेल. लवकर परत आणणार मी तुला आणि त्या नराधम लोकांना चांगलीच जन्माची अद्दल घडवणार आहे मी. तू फक्त अशी मस्त रहात जा!!" राजवीर महालक्ष्मीला पाहुन म्हणाला. तो एकवार तिच्या अंगावर पांघरून टाकून तिला पाहून तिथून निघून जातो आणि आपले कपडे चेंज करून ,आपलं काम करत महालक्ष्मीच्या रूममध्ये बसतो. कारण त्याला तिची काळजी लागून होती. त्यासाठी तो तिथेच बसतो. काम करता करता त्याची नजर लॅपटॉपवर खिळते. तसा तो लॅपटॉपला पाहत राहतो.



"लवकरच सर्वच मासे फसणार आहे!! ते सुद्धा माझ्याकडूनच!!"राजवीर लॅपटॉप कडे पाहून म्हणाला. आता मात्र तो गुढपणे लॅपटॉपकडे पाहून काम करायला लागतो. काही वेळाने त्याच काम संपत तसा तो तिथेच सोफ्यावर आडवा होतो आणि झोपून जातो.





क्रमशः
-----------------------