Satyamev Jayte - 11 books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग ११

भाग ११.
"अहो, तुम्ही सगळीकडे हेल्प करतात ना? मग मला पण हेल्प करा!!",ती शांतपणे हसून बोलते.
"मिस, तुम्ही कोण आहात? ते सांगा आधी? मग पाहू पुढचं!! कसली हेल्प हवी आहे?",तो आता डोकं खाजवत बोलतो. तसं काहीवेळ पलीकडे शांतता असते.
"मला एका मुलाला माझ्या मनातील सांगायचे आहे!!त्यासाठी तुम्ही मला मदत करा. खूप काही बोलायचं आहे त्याच्याशी. त्याने मला जगायल शिकवलं आहे. खंबीरपणे मागे राहून मला साथ दिली आहे. मी मात्र त्याला आज पर्यंत लांब ठेवले आहे. पण आता मला नको हा दुरावा. सहा महिन्यानंतर मला त्याला भेटण्याची ओढ लागली आहे. त्याच्याजवळ जाऊन रडून त्याला सांगायचे आहे, नको आता, बस्स कर !! हा दुरावा.",ती भरल्या डोळयांनी बोलत असते. तिचा तो आवाज ऐकून तो शांत होतो. त्याला तो आवाज ओळखीचा वाटतो. तस , त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात.

"मही!!!!",तो आनंदाने ओरडतो.
"हो, मिस्टर डीएसपी साहेब!! आता आपल्या रोजच्या जागी या भेटायला. मला खूप सारं बोलायचं आहे तुमच्यासोबत!!", ती पलीकडूनच म्हणाली.
"ओके, जान. आय मिस यू सो मच. मी येत आहे भेटायला.",तो आनंदात बोलतो आणि फोन बंद करतो.
आज तो आनंदी झाला होता कारण त्याची महालक्ष्मी आज त्याच्याशी बोलली होती. तिने स्वतःहून त्याला बोलावले होते. त्यामुळे तो आणखीन आनंदी झाला होता.
राजवीर सगळयांना काम समजावून आपला घरी निघून जाऊन, फ्रेश वगैरे होऊन मस्त तयार होऊन, आपली गाडी घेऊन निघून जातो. ज्या ठिकाणी महालक्ष्मीने त्याला बोलावले होते. त्या ठिकाणी तो पोहचतो आणि गाडी एका ठिकाणी लावून ,गाडीच्या बाहेर येतो.
"महालक्ष्मीऽऽऽ, महालक्ष्मीऽऽऽ", तो आवाज देत बोलतो. तसा त्याचा आवाज ऐकून ती त्याच्या जवळ येते आणि पटकन त्याच्या मिठीत शिरते. तो आनंदाने तिला मिठीत घेतो.

मैत्रीण म्हणून ती नेहमी जवळ यायची!! पण जेव्हापासून प्रेम ही भावना त्याच्या मनात रुजू झाल्यापासून त्याला सगळं हे वेगळं वाटत असायचे. पण तरीही तो मनाला आवर घालत असायचा. पण आज मात्र, ती स्वतःहुन आली होती. त्यामुळे तो आनंदी झाला.
"आय लव्ह यू राज. तुझी साथ मला कायमची हवी आहे. तू माझा खरा हमसफर आहेस!! आय लव्ह यू. तू मला जपतो. माझी काळजी घेतो. एवढे महिने माझ्यासाठी थांबला आहेस, हे देखील मला माहित होतं!! पण मी काही गोष्टी मुळे तुला नाकारत आली. पण आता नाही. आता मला माझं प्रेम कळलं आहे. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे!!", महालक्ष्मी रडतच म्हणाली. तिचं बोलणं तो शांतपणे ऐकत असतो. तिला मिठीत घेऊन तो शांत राहतो. कारण आज पहिल्यांदा महालक्ष्मी किती तरी दिवसांनी रडली होती!! ते, सुध्दा त्याच्यासाठी!!

"माझी दुर्गा. मला मिळणार याची खात्री होती मला.",राजवीर तिला मिठीत ठेवून म्हणाला. त्याच्याही आज डोळ्यात पाणी होते. पण त्याने ते तिला दिसू नये अश्या पध्दतीने पुसून टाकले. महालक्ष्मी धीर एकवटून मान वर करून त्याला पाहते. तसा तो भुवया उंचावत तिला "काय म्हणून" विचारतो. तशी तिची नजर त्याच्या ओठांपाशी जाते. ती राजवीरला काही कळायच्या आधी स्वतःचा चेहरा त्याच्यापाशी घेऊन जाऊन स्वतःचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवत असते की, तेवढ्यात राजवीर हसूनच तिच्या ओठांवर स्वतःचे बोटं ठेवतो.

"सगळे करतात म्हणून आपण करायची? गरज नाही मॅडम. यू नो लिप्स पेक्षा बेटर फिलिंग हेडवर असत आणि चिक्स वर.", तो हसूनच तिला समजावत बोलतो. त्याच बोलणं ऐकून ती मनातच समाधानी होते आणि त्याचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत पकडून त्याची मान वाकवून त्याच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवते. हळूच त्याच्या गालावर देखील स्वतःचे ओठ टेकवून त्याचे केस विस्कटते. केस विस्कटून ती पळण्याचा प्रयत्न करत असते की, तेवढ्यात राजवीर तिला पकडतो आणि मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी म्हणून तिच्या गालाला स्वतःचा गाल घासतो. तशी महालक्ष्मी हसते.
"आम...राज नको ना...गुदगुदी होत आहे."महालक्ष्मी त्याला अडवत म्हणाली. पण राजवीर हसूनच पुन्हा पुन्हा तिला तस करायला लागतो.
"राज... बाहेर आहोत आपण..प्लीज!!",ती अडखळत म्हणाली. तिचे बोलणं ऐकून तो बाजूला होतो आणि तिला घट्ट मिठीत घेऊन कुरवाळत बसतो. तशी ती देखील आपले नाजूक हात त्याच्याभोवती घालून शांत राहते.
"मही आय लव्ह यू टू!!", तो अस बोलून तिच्या डोक्यावर किस करतो. त्याचा स्पर्श पाहून ती समाधानी होते. कारण या स्पर्शात वासना नव्हती. होत ते फक्त प्रेम!! ते त्याच प्रेम देखील वेगळं होत. अश्या मुलीला त्याने वर आणलं होतं की, ज्याच कोणालाही नवल वाटत होतं. घरचे देखील त्याला या गोष्टीवरून बोलले होते. पण त्याने काही तिची साथ सोडली नाही. त्याच म्हणणं एकच होते, ते म्हणजे असे की,
" एक बलात्कार करणारा आरोपी जर सुटून आपलं जीवन जगू शकतो? तर मग त्या मुलीने का लपून राहायच जगापासून? तिला देखील जगण्याचा अधिकार आहे!! स्वतःची ओळख निर्माण करून स्वप्न साकारण्याचा देखील तिला अधिकार आहे. तिला फक्त जगण्यासाठी थोडं मोकळं वातावरण हवं असत . तुमची साथ, प्रेम या गोष्टी गरजेच्या असतात आणि मग त्या मुली पुन्हा एकदा आपलं आयुष्य निर्माण करायला लागतात. माझ्या महीला मी तेच देत आहे. एकदिवस ती पुन्हा आपली ओळख स्थापन करेल. मग आयुष्यात पुढे जाऊन तिला वाटलं लग्न करावेसे? तर करू!! नाहीतर मी आयुष्यभर महालक्ष्मीची वाट पाहायला तयार आहे.. "
त्याच्या याच विचाराने त्याच्या आई बाबांनी त्याला नाकारले!! पुन्हा कधीच आयुष्यात त्यांना भेटू नको !! असे, सांगितले. तरीही तो काही त्यांच्यासमोर झुकला नाही. त्याला फक्त आयुष्यात महालक्ष्मी हवी होती. ती आज त्याला मिळाली होती. म्हणून तो आनंदी होता. महालक्ष्मी त्याच्या पासून दूर होऊन मुद्दाम त्याच लक्ष नसताना त्याच्या ओठांवर ओठ टेकवते आणि त्याला आपलंसं करायला लागत. कारण तिला कळलं होतं. त्याने तिच्यासाठी काय काय ? केलं होतं ते!! आता तिला त्याला आपलं बनवायच होत त्यामुळे ती पुढे होऊन अस वागते. तो डोळे मोठे करून तिला पाहतो. पण नंतर तिच्याभोवती हातांचा विळखा घालून तिला प्रतिसाद द्यायला लागतो. दोघे जण सध्यातरी वेगळ्याच जगात जाऊन आपलं प्रेम करायला लागतात.

सहा महिन्यांत त्याच्या विश्वासाने महालक्ष्मीने पुन्हा एकदा आपल्या हुशारीने आपली ओळख निर्माण केली होती!! पुन्हा एकदा ती तिच्या हुशारीने पुढे आली होती!! पण या सर्वांत तिने राजवीर शिवाय कोणालाच आपलं मानलं नाही. आजही ज्यांना महालक्ष्मी बद्दल माहिती होत. ती मुलं तिच्यापासून दूर राहत होती!! पण राजने तिला बिलकुल एकट सोडलं नव्हते. त्यामुळेच आज महालक्ष्मी कायमची त्याची झाली होती!!

काहीवेळाने दोघांचे श्वास जड पडतात तसे, ते एकमेकांना हसून पाहून बाजूला होतात. राजवीर स्वतःच्या केसांवर हात फिरवून तिला हसून पाहतो. ती लाजून आपली मान खाली घालते.
"महीऽऽऽ, तू हनिमूनला साडी नको घालू!! तू ना आता थोडस मॉर्डन कपडे घाल. का साडी घालते? झालं गेलं विसरून जायचं. तुला कोणी काही बोलणार नाही.", राजवीर तिला समजावत बोलतो. कारण त्या इनसिडेंट नंतर महालक्ष्मी नेहमी साडी घालून आपले अंग झाकण्याचा प्रयत्न करत असायची!! जे की राजवीरला पटत नव्हतं.

"हम्म..प्रयत्न करेल मी!! आता आपण जाऊया का? आई बाबा वाट पाहत असतील. त्या आधी तुम्ही हे गालावरच पुसा तुमच्या.",महालक्ष्मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाली. कारण लिपस्टिकचे डाग त्याच्या गालावर उठले होते. जे पाहून तिला कसतरी होत होते.
"तू दिलेस ना? मग तूच पूस.",राजवीर हसून तिला म्हणाला. तशी ती स्वतःचा पदर हातात घेऊन त्याच्या गालावर हात ठेवून ते डाग अगदी हळुवारपणे पुसून टाकते. नंतर राजवीर हसूनच तिचा हात हातात धरून तिला तिथून घेऊन जातो.

आता ते एका नवीन नात्यात अडकून नवीन सुरुवात करणार होते. राजवीरच्या मदतीने ती हळूहळू बदलली होती. पण इतर अश्या मुलींकडे राजवीर आणि महालक्ष्मी सारखे आई बाबा नव्हते!! त्यामुळे त्यांचे काय होत असेल? याची कल्पना करूनच ती स्वतःला भाग्यवान समजायची. एक मध्यमवर्गीय असलेला राजवीर देखील अस काही करू शकतो? याचा विचार करूनच सगळयांना त्याचा हेवा वाटत असायचा. मात्र तो त्याच्या महालक्ष्मीत सध्या आनंदी होता.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
--------------------