Satyamev Jayte - 5 books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग ५

भाग ५.

सकाळी महालक्ष्मीला शुद्ध यायला लागते. तशी ती डोक्याला पकडून हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. ती आपला हात हलवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा हात काही हलत नाही. त्यामुळे ती जराशी उठून बसून आपला हात पाहायला लागते. तिचा नाजूक असा हात राजवीरने घट्ट धरला होता. त्यावर त्याने स्वतःचे डोकं ठेवलं होतं. त्या कारणाने तिला स्वतःचा हात हलवता आला नाही. राजवीरला अस पाहून थोडस वाईट तिला वाटतं. भरल्या डोळ्यांनी ती तिच्याही नकळत त्याच्या केसांत हात घालते."लहान पण बरं होत ना राज. या जगात माझा होणारा नवरा सगळं काही माझं अस्तित्व मिटवून गेला. पण तू मात्र माझ्यासोबत उभा आहे. नको राज एवढं माझ्यासाठी करू. माझी पात्रता नाही आहे!!"महालक्ष्मी रडतच त्याला म्हणाली. तिचं ते बोलणं त्याच्या कानावर पडताच तो उठून जागा होतो आणि तिला पाहायला लागतो."अस्तित्व नाही संपत तुझं!! तुला उठून स्वतःसाठी लढावे लागणार आहे. आपल्या न्यायासाठी तुला बोलावे लागणार मही. त्या लोकांना चांगली अद्दल घडण्यासाठी तुला बाहेर पडायचे आहे महालक्ष्मी. अग, तू तर माझी दुर्गा आहे ना? मग अस वागून नाही चालणार!!"राजवीर तिचे डोळे पुसत तिला समजावत म्हणाला. पण सध्या तरी तिला काही कळत नव्हतं. तो तिला समजावत असतो की, तेवढ्यात महालक्ष्मीची आई तिथे चहा आणि नाष्टा घेऊन येते."राजवीर, तू पण इथेच बसणार आहे का?"महालक्ष्मीची आई काही झालंच नाही अस दाखवत चेहरा नॉर्मलं करत विचारते."हो, काकू!!"राजवीर म्हणाला."महालक्ष्मी, आपण ना महाराष्ट्रात जाऊ, आपल्या गावी. तिथं जाऊन शेती करू. नको आपल्याला हे सगळं दिल्लीचे" महालक्ष्मीची आई तिला पाहत म्हणाली.
"काकू, महाराष्ट्रात का जात आहात तुम्ही? तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधम लोकांना वाऱ्यावर सोडून देऊन तुम्ही अस कस इथून पळून जाऊ शकतात? आज महालक्ष्मी त्यांची शिकार बनली! उद्या कोणी दुसरं बनेल? जर ते मोकाट फिरत राहिले तर? आणि सध्या आपल्याकडे मजबूत पुरावे आहेत. तरीही तुम्ही पळ का काढत आहात?"राजवीर आईकडे पाहत म्हणाला.
"राजवीर, ती मोठी लोक आहे आणि आधी तर मला वाटलं होतं त्यांना शिक्षा द्यावी!!पण नंतर विचार केला, तर यात आपल्या मुलीची आणि कुटुंबाची बदनामी होत राहते. मुलीचं आयुष्य हे आरश्यातिल काचेसारखं असत. एकदा काच तुटली की पुन्हा ती जोडत नाही. जोडून चिकटवून आरश्याची काच लावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावरील निशाण मात्र पुसले जात नाही. ते बारीक बारीक का होईना दिसत असतात. त्यामुळे नको वाटत सगळं. मी महालक्ष्मीच्या बाबांना देखील समजावेन. माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. कारण इथं आसपासच्या लोकांना कळलं आहे. त्यामुळे ती लोक काही माझ्या मुलीचा संसार घडू देणार नाही. निर्भया प्रकरणच बघ सहा- सात वर्षे चालले आहे. तिची आई रोज रडत असायची. पण तरीही तिला न्याय एवढा उशिरा मिळाला आणि वर काही लोकांकडून बदनामी देखील झालीच की, मला हे नाही पाहिजे!! कोर्ट वाले पण काही कामाचे नसतात. महाराजांच्या काळात फक्त बाईवर हात टाकला, की त्या माणसाचे हात छाटले जात होते आणि डोळे फोडले जात होते. कारण अशी शिक्षा केल्यावर कोणीच बाईकडे नजर वर करून पाहणार नाही. याची त्यांना खात्री होती. पण आताच्या काळात मात्र , ज्या व्यक्तीकडे पैसा, पोझ आहे ती व्यक्ती खऱ्याला खोटं करू शकते. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य फक्त म्हणायला आहे, काही सत्य वगैरे जिंकत नाही. खोट्याला पुढे आणून सत्याला मागे टाकले जाते. मला अश्या ठिकाणी जाऊन माझ्या मुलीला लोकांच्या नजरेतून खाली नाही पाडायचे आहे" महालक्ष्मीची आई डोळ्यांत पाणी ठेवून बोलते. तिचं बोलणं ऐकून राजवीर शांतच राहतो. कारण आईच्या मताप्रमाणे विचार केला, तर त्यांचे बोलणे योग्य होते. निर्भयाच्या आईची अवस्था त्यांनी डोळयांनी पाहिली होती टीव्हीवर. तिची मुलाखत देखील त्यांनी ऐकली होती. त्यामुळेच त्या कोर्टमध्ये जायला देखील भीती वाटत होती."महालक्ष्मी , तुझं सामान भर. आपण जाऊ इथून"महालक्ष्मीची आई अस बोलून चहाचा ट्रे तिथंच असलेल्या टेबलवर ठेवते."आई.... मी त्या नराधमांना शिक्षा मिळण्यासाठी कोर्ट मध्ये जाणार आहे..."महालक्ष्मी स्वतःला सावरत म्हणाली. तिचं म्हण ऐकून राजवीर तिच्याजवळ येतो आणि तिच्या कंबरेत हात घालून तिला व्यवस्थित उभं करतो. सध्या तिच्या अंगात त्राण देखील नव्हता. तरीही ती स्वतःला सावरत होती. हे पाहून त्याला मनाला समाधान वाटते.
"महालक्ष्मी, कोर्ट मध्ये जाऊन काही फायदा नाही होणार. विरुद्ध पक्षाचे वकील तुला प्रश्न विचारून हैराण करतील. ते प्रश्न कधी कधी घाण पण असतात ग. तुला कस समजावू मी?" महालक्ष्मीची आई डोळ्याला पदर लावत म्हणाली.


"राज, तू सोबत आहेस ना माझ्या? मला ती लोक कशाप्रकारे बोलतील? या बद्दल ट्रेन करशील ना?"महालक्ष्मी राजवीर कडे पाहून डोळ्यात पाणी ठेवत बोलते. तिचं ते बोलणं ऐकून तो फक्त मानेने होकार कळवतो. यावेळी तिची अवस्था पाहून त्याला भरून येत होतं. पण त्याने ते पाणी बाहेर पडायला दिले नाही. कारण तो कमजोर पडला तर ती ही पडेल, या विचाराने तो आतमध्येच आपले अश्रू ठेवतो.
"काकू, महीला जर त्यांना शिक्षा द्यायची असेल? तर मी तिच्यासोबत नेहमी असेल. तुम्हाला पण लवकरच कळेल सत्यमेव जयते बद्दल. सत्य लोकांनी लपवण्याचा प्रयत्न केला. तरीही मी होऊ देणार नाही या केस मध्ये. त्यामुळे आजपासून मी महीला ट्रेन करेन. त्या आधी मही तुला माझ्यासोबत एका ठिकाणी यावे लागेल. येशील ना मही?"राजवीर तिचा एक हात पकडत म्हणाला. राजवीरच बोलणं ऐकून महालक्ष्मीची आई नाराज होऊन तिथून निघून जाते. तिचे बाबा मात्र,रूमच्या बाहेर राहून सगळं बोलणं त्या तिघांचे ऐकून घेऊन तिथून निघून जातात."मही, पुन्हा घरच्यांना त्रास होईल अस वागणं करायचं नाही!!कळलं तुला?"तो तिच्याकडे पाहून म्हणाला. ती डोळ्यांत पाणी ठेवूनच नाही मध्ये मान हलवते. राजवीर तिला तसच हळूहळू चालत नेऊन बाथरूम कडे सोडतो."मही, दरवाजा आतून बंद नको करू!! मी इथेच आहे" राजवीर तिला धीर देत म्हणाला. तशी ती मान हलवून शांत राहते आणि आत जाऊन फ्रेश व्हायला लागते. पुन्हा फ्रेश होताना तिचं लक्ष हातातील ओरखड्याकडे जातं. तस सगळं काही तिला आठवायला लागत आणि नकळतपणे पुन्हा ती रडतच घासणी घेऊन हात घासायला लागते. तिचं ते रडणं राजवीरच्या कानावर पडत तसा तो मागचा पुढचा विचार न करता आतमध्ये जातो."मही$$$, काय करत आहेस तू हे? कितीवेळ सांगितले तुला हां?"राजवीर आतमध्ये येत तिला ओरडूनच तिच्या हातून घासणी घेऊन फेकून देत बोलतो. त्याच्या ओरडण्याने ती भानावर येते."राज....मला....किळस वाटतो...त्याचा....हे पाहिलं....की ....नको....वाटत....मी....त्यावेळी हे....बघण्याचा आधी मरून का नाही गेली....??" महालक्ष्मी हुंदके देत एक एक शब्द जोडत बोलत असते. तिचे ते बोलणे ऐकून राजवीर तिला काळजीने स्वतःच्या मिठीत घेतो.
"अस नको म्हणू, मही. तू खूप स्पेशल आहेस!!मला पण माहीत आहे ग, तुझ्या मनावर काय परिणाम होत आहे ते. पण मी काहीच नाही करू शकत, हे पाहुन हतबल होत असतो. पण तुला न्याय मात्र लवकर मिळवून देणार मी. त्या लोकांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार"राजवीर तिला समजावत बोलतो.

तो तिला बाजूला करतो आणि टॉवेल आणून पाण्यात ते भिजवून घेऊन तिचे अंग त्याने पुसून काढतो. मनाला घातलेल्या आवरामुळे हे सगळं शक्य होत. बाहेरच्या लोकांसाठी तो मोठा व्यक्ती असला तरीही महीसाठी मात्र तो सध्यातरी तिचा साथी ,मित्र, सखा होता.तो व्यवस्थित तिला तिची साडी नेसवुन देतो. साडी नेसवताना त्याला महालक्ष्मीच्या अंगावर ओरखडे दिसतात तस तसे त्याचे डोळे लाल होत असतात. पण तरीही तो स्वतःला शांत करून तिला साडी नेसवुन देतो. साडी वगैरे नेसवुन झाल्यावर तो तिला बेडवर आणून बसवतो आणि कंगवा हातात घेऊन ,तिचे केस चांगले असे विंचरून देतो. सध्या महालक्ष्मी आपल्यातच हरवलेली असायची. त्यामुळे कुठे कसही वागत असायची. म्हणून , तो तिच्यासोबत राहून असायचा. त्याच्यासाठी महालक्ष्मी तयार झाली केससाठी. हेच महत्त्वाचे होते!! तो तिला तयार करून झाल्यावर तिला नाष्टा गरम करून आणून भरवतो आणि नंतर स्वतः देखील तयार होऊन नष्टा , वगैरे करूनच तिला स्वतःचा आधार देत उठवून गाडीत बसवतो. बाहेरचा प्रकाश पाहून ती घाबरते. त्यामुळे तो गाडीच्या काचा बंद करतो. ड्रायव्हिंग सीटवर बसून राजवीर तिचा हात हातात घेतो.


"घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत!!" राजवीर अस बोलून तिचा हात सोडवून गाडी स्टार्ट करतो आणि तिला तिथून घेऊन जातो. महालक्ष्मीचे बाबा एका कोपऱ्यात राहून या दोघांना पाहत असतात. आज त्यांच्या चेहरा थोडा तरी बरा वाटत होता.क्रमशः
--------------------------