Satyamev Jayte - 8 books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग ८

भाग ८.

"सगळं संपलं आहे महालक्ष्मी तुझं. स्वतःच अस आता काहीच नाही आहे माझ्याकडे. काय गुन्हा होता माझा? की माझ्यावर अशी परिस्थिती आली? मी तर फक्त माझ्या फॅमिलीचा आणि माझा विचार करून आपल्याच जगात सुखी राहण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याने माझं सुख हिरावून घेतलं. सगळं काही माझं घेतलं. आमच्यातील नात्याला देखील त्याने डाग लावला आहे." महालक्ष्मी खिडकीतून बाहेर चंद्राला पाहत मनातच रडत बोलत असते. आता ती फक्त मनात रडायची. चेहऱ्यावर काहीच हावभाव सध्या तरी तिच्या नव्हते!! कारण तिचा रडवलेला चेहरा पाहून राजवीर आणि तिच्या आई वडिलांना त्रास व्हायचा. त्यामुळे महालक्ष्मी त्यांना दुःखी न करण्यासाठी आता मनातच कोलमडून राहायचा प्रयत्न करत होती.


ती तशीच थांबून बाहेर पाहत बसते. राजवीरच्या गाडीच्या आवाजाने तिची तंद्री भंग होते. ती वरूनच आपल्या खिडकीतून रस्त्यावर पाहते. तीन ते चार पोलिसांच्या गाड्या तिच्या घराच्या बाहेरच्या रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यात दिल्ली पुलिस (हिंदीत असाच वर्ड आहे. त्यामुळे तोच वापरला जाईल!!) आपल्या वर्दीतुन बाहेर पडत होते. एका साध्या अश्या गाडीतून एक महिला मस्त साधी अशी साडी नेसून बाहेर पडते. तिला पाहून महालक्ष्मी तिच्याकडे पाहत राहते. एका गाडीतून राजवीर देखील बाहेर पडतो आणि तो त्या महिलेसोबत बोलून तिला महालक्ष्मीच्या घरात आणायला लागतो. ते दृश्य पाहून ती शांतच होते.


"कॉन्फिडन्स वाली मुलगी आहे. राजवीरला शोभेल अशी!!"महालक्ष्मी नकळतपणे स्वतःशीच बोलून मोकळी होते. पण पुढच्याच क्षणाला तिचा चेहरा बदलतो. कारण दिल्ली पुलिस लोकांनी काही माणसांना व्हॅन मधून काढलं होत. त्यांच्या हातात बेड्या होत्या आणि चेहरा थोडासा सुजला होता. त्यांच्या तश्या अवतारात देखील महालक्ष्मीने त्यांना ओळखले होते. त्या लोकांना पाहून महालक्ष्मी कानावर हात ठेवते आणि तशीच गॅलरीपासून दूर दूर होत मागे मागे सरकायला लागते. चेहऱ्यावर घाम आला होता तिला भीतीने. मनात पुन्हा पुन्हा तेच तेच येत होतं. स्वतःला जेवढ सांभाळण्याचा प्रयत्न ती करायची की, तेवढाच त्या लोकांना पाहून पुन्हा घाबरून जायची. ती भीतीने मागे सरकत असते की, तेवढ्यात कोणीतरी तिच्या मागे येऊन तिला अडवते.



"काय करत होतीस मही? एवढी का घाबरली आहेस?"राजवीर तिथं येत विचारतो. तो व्यवस्थित तिला धरतो आणि सरळ उभा करून तिच्यासमोर जातो.



"ते...ती....लोक..."महालक्ष्मी घाबरून हातवारे करत म्हणाली. राजवीरला कळून जात की , तिने बाहेर त्याला पाहिले आहे. तसा तो आपल्या खिश्यातून रुमाल काढतो. महालक्ष्मीला शांत करतच तो , तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत असतो. महालक्ष्मीला सायलेंट मोडवर आणल्यावर तो तिला स्वतःच्या मिठीत घट्ट अस कैद करतो.



"मही, नको त्रास करून घेऊ. तुझा त्रास मला बघवत नाही. कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर!! कधीपासून तुला सांगायचा प्रयत्न करत होतो. पण नंतर तू लग्नाची बातमी कळवली. त्यामुळे मी तुझा विषय सोडला दुर्गा. पण आता तुला त्रासात पाहिलं की,मला त्रास होतो. नाही पाहू शकत मी स्वतःच्या प्रेमाला अश्या अवस्थेत. तू समजून घे महालक्ष्मी!! तुलाच नाही ग हा त्रास होत. मला देखील झोप येत नाही. कधी त्या लोकांना शिक्षा देतो? अस होत असत माझं. पण तू नंतर अशी पॅनिक झाली की, सगळं माझं संपत आहे अस वाटत.."राजवीर गहिवरून तिला बोलतो. त्याच ते बोलणं महालक्ष्मी शांतपणे ऐकून घेते. कारण तो अस काही बोलेल? याची थोडी देखील कल्पना तिला नव्हती. पण आजवर त्याने कधीच त्याच्या मर्यादा सोडल्या नव्हत्या. याचा विचार करून महालक्ष्मी शांत राहते.

राजवीर कितीतरी वेळ तिला मिठीत घेऊन समजावत असतो. पण महालक्ष्मी कडून काहीच प्रतिसाद त्याला मिळत नाही. तसा तो तिला बाजूला करतो आणि तिच्या डोळ्यांत पाहतो. तिच्या डोळ्यांत सध्या पाणी होते. जे पाहून त्याला वाईट वाटत.



"सॉरी. मी अतीच केलं. ", राजवीर कसतरी बोलतो.


"राजवीर, मी अपवित्र आहे. नको, तू माझ्यात गुंतून राहू. तू माझ्यापेक्षा चांगली मुलगी डीझर्व्ह करतो. मी नाही आहे तुझ्या लायकीची." ,महालक्ष्मी भरल्या डोळयांनी म्हणाली. तिच म्हणणं ऐकून राजवीर तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेतो आणि बोटानेच तिचे डोळे पुसतो.



"तू कधीच अपवित्र नव्हती दुर्गा आणि आता पण नाहीच आहेस!! मी तुझ्यापेक्षा चांगली मुलगी डीझर्व्ह नाही करत. मला तर माझी दुर्गा हवी आहे माझ्या आयुष्यात. तू स्वतःची लायकी नको ठरवू. तू माझ्यासाठी नेहमी स्पेशल होती आणि स्पेशल राहणार आहे. दुर्गा आपल्याला ही लढाई सोबत राहून जिंकायची आहे. त्यामुळे तू कमजोर नको बनू!! मला नाही आवडत तुला रडताना पाहायला. लहानपणापासून ओळखतो ग मी तुला. आज नाही पाहत. तू मनात असून पण काही बोलत नाहीस. नको शांत राहू मही!! "राजवीर आता तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. त्याच बोलणं ऐकून महालक्ष्मी त्याला पाहते.




"राजवीर...." ती अस म्हणत रडतच त्याला अचानक मिठी मारते. राजवीर तिला रडायला देतो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत करत असतो. काहीवेळाने ती शांत होते.



"मही, मी तुझ्या नकळत तुझी रूम शोधली. मला तुझ्या टेबलच्या कप्प्यात माझे फोटोज.मी दिलेले आतापर्यंतचे गिफ्ट आणि काही लेटर मिळाले. का मही तू मला सांगितले नाही?तुझं माझ्यावर प्रेम आहे ते? अग मी हे प्रोफेशन पण तुझ्यासाठी घेतले. तू सांगितले, म्हणून मी इथपर्यंत आलो आणि तू मात्र मनाला आवर घातला!! मी , तुला किती वेळा विचारलं ? मनात कोणी आहे का तुझ्या? पण तू काहीच सांगितले नाही मला." राजवीर शांतपणे तिला विचारत असतो. त्याच बोलणं ऐकून महालक्ष्मी शांत राहते. सध्या तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं.


"राजवीर. तू नेहमी वेगळा होता माझ्यासाठी. मी आजवर नाही सांगितले कारण याला पण जबाबदार एकच व्यक्ती होती. तुझे बाबा मला बोलले होते, तेव्हा की दूर रहा तुझ्यापासून. म्हणून मी दूर राहिली. मी तुझी शपथ, घेऊन सांगते माझ्या मनातील प्रेमाला संपवण्यासाठी संतोष सोबत लग्न करायला तयार झाली. पण तो निर्णय चुकीचा होता. माझी सुंदरता माझ्यासाठी श्राप बनली राज!! माझ्या भावानेच माझा बलात्कार केला..."महालक्ष्मी शेवटच वाक्य बोलताना हुंदके देऊन रडत बोलते. ते सगळं ऐकून राजवीर तिला कुरवाळतो. प्रेमाच्या स्पर्शाची गरज होती तिला!!




"शु$$$$ दत्तक भाऊ आहे तुझा तो. तुम्ही त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम दिलं. पण त्याने अस काही करून भावा बहिणीच्या नात्याला काळिमा फासला आहे. यापुढे असल्या मुलांना अजिबात उचलून घरात आणायचा नाही मही. साले$$$$ बहिणीच नातं कळत नाही यांना. अश्यांना फाशी मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन" राजवीर चिडूनच तिला बाजूला करत म्हणाला. त्याच डोकच बधिर झालं होतं सगळं ऐकून आणि पाहून. तो महालक्ष्मी समजावून बाहेर घेऊन येतो.


महालक्ष्मीचे आई बाबा रागातच त्या तिन्ही लोकांना पाहत असतात. पण त्यातील एकाला पाहून त्यांचे डोळे देखील भरतात.



"दिनेश$$ का केलं रे तू अस काही? आम्ही तर आजवर तुझ्यावर चांगले संस्कार केले होते. तू असलं कृत्य केलं?महालक्ष्मीने तुला अनाथ समजून भावाप्रमाणे माया दिली आणि इथपर्यंत शिकवलं. तू याचे असे ऋण फेडले?" महालक्ष्मीची आई डोळ्याला पदर लावत म्हणाली.




"काकू, बहीण थोडीच कळते ना याला? तुमच्या या मुलाला मुलगी हवस भागवायच साधन आहे, अस वाटत असायचं. याने वयाच्या २० व्या वर्षांपासून असले काम सुरू केले आहे. तो त्याची हवस भागवण्यासाठी कोठ्यावर पण जायचा. महालक्ष्मीची सुंदरता पाहून त्याला बहीण हे नातं कळलं नाही. त्यात या संतोषच्या दोन्ही साथीदाराने महालक्ष्मी साठी त्याला आणि संतोषला चोवीस लाख दिले. त्यामुळे ते दोघ एवढ्या खालच्या थराला गेले.", राजवीर तिथं येत रागातच दिनेशला पाहून बोलतो. त्याच ते बोलणं ऐकून महालक्ष्मीच्या बाबांना राग येतो. ते रागातच दिनेशकडे जाऊन त्याच्या सणसणीत कानाखाली मारतात. ते तसेच रागातच त्याला मारायला लागतात. महालक्ष्मी मात्र, शांत राहून ते सगळं पाहत असते.



"काय नाही केलं रे तुझ्यासाठी आम्ही. तू मात्र, अस केल. आमच्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं. रस्त्यावरची घाण आहेस तू. कधीच तुमच्यासारख्या मुलांना मी घरात आश्रय देणार नाही. "महालक्ष्मीचे बाबा रागात म्हणाले.



"काका, शांत व्हा!! याला बोलून फायदा नाही!! वाया गेला आहे तो. तुम्ही तुमचे संस्कार चांगले केले आहे. त्याच उदाहरण महालक्ष्मी आहे!! हे, पोरग नाही बनू शकला तुमचा मुलगा, यासाठी तुम्ही तुमच्या संस्काराला आणि स्वतःला दोष देऊ नका! याच्यावर कडक कारवाई होईल. यासाठी मी प्रयत्न करेन. ", राजवीर त्यांना बाजूला करत म्हणाला.




"अपर्णा या आपल्या बाजूने केस लढणार आहे. आता भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत. त्यामुळे निकाल आपल्या बाजूने लागेल.", राजवीर म्हणाला




"राजवीर, तू याला कडक शिक्षा देण्यासाठी बंदोबस्त कर. फाशी दिली तरीही आम्ही काही बोलणार नाही. असे व्यक्ती समाजातिल कलंक असतात. अश्यांना योग्य वेळी संपवणे गरजेचे असते. नाही संपवलं की इतर मुली असुरक्षित होतील. त्यामुळे हे सुटले नाही पाहिजे.", महालक्ष्मीची आई तिथं येत म्हणाली.



दिनेशला त्यांनी अनाथ आश्रम मधून दत्तक घेतले होते आणि त्याचा पूर्ण खर्च महालक्ष्मी करत होती. सध्या दिनेश उत्तरप्रदेश मधील बिहारमध्ये शिक्षणासाठी सांगून गेला होता. त्यामुळे महालक्ष्मी आणि त्याच्या घरच्यांसोबत तेवढा संपर्क त्याचा होत नव्हता. पण आता त्याचे कृत्य ऐकून त्या सर्वांना त्याचा राग येतो.



"काकू, मी माझे बेस्ट देईन या केससाठी. डोन्ट वरी आपण याने सहज सोडणार नाही आहोत. आता सत्य आपल्या बाजूने आहे. फक्त कोर्टात ते सिद्ध करून त्याच्यावर विजय साध्य करायचा आहे."अपर्णा कॉन्फिडन्सने म्हणाली. तिचं बोलणं ऐकून त्या सर्वांना समाधान वाटत.



राजवीर आपल्या साथीदारांना त्या लोकांना तिथुन घेऊन जायला सांगतो. तसे, ते लोक त्यांना घेऊन जातात. ते जाताच तो अपर्णा आणि महालक्ष्मीची ओळख एकमेकांन करून देतो. महालक्ष्मीच्या आई बाबांना अपर्णा आतापर्यंतच सगळं राजवीरच सांगून टाकते. त्याच महालक्ष्मीवर किती प्रेम आहे? ही गोष्ट देखील ती त्यांना सांगते. तिच्या तोंडून सगळं काही ऐकून घेऊन ते समाधानाने राजवीरला पाहतात. महालक्ष्मी मात्र यात शांतच बसून राहते. राजवीर तिचा हात घट्ट पकडून तिला धीर देत राहतो. चर्चा करून झाल्यावर अपर्णा आपल्या घरी निघून जाते.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
-----------------------
आजच्या युगात अस काही पाहायला भेटत की, ज्याने खरंच डोकं सुन्न होत. माणसांची बुद्धी भ्रष्ट झाली की, त्याला नाती देखील कळत नाही. आज कितीतरी अशी उदाहरण टीव्ही ,पेपरला पाहायला मिळतील.त्यातीलच एक उदाहरण हे होत. कथा वेगळी आहे. हे मी आधीच सांगितले.