Passport - 2 books and stories free download online pdf in Marathi

पासपोर्ट - भाग २

पासपोर्ट  भाग  २

 

भाग १ वरुन पुढे वाचा.

 

“खरं आहे तुमचं म्हणण पण अहो, मी आजवर एकटी कुठेच गेले नाहीये, नेहमी तुम्ही बरोबर असताच.” – सुनीता बाई.

“हो, पण आता तुम्ही दोघी असाल नं, आणि दोघी ग्रॅजुएट आहात, अडाणी नाही. सुनेत्रा तर नोकरी करते आहे. आणि मैत्रीण बरोबर असल्यावर तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही. परत फक्त १५ दिवसांचाच तर प्रश्न आहे. ते ही तुम्ही ट्रॅवल कंपनी बरोबर जाणार आहात, सगळी काळजी घेतीलच ते. हे १९९० साल आहे, आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अठराव्या शतकात नाही. आता सगळ्या सोई झाल्या आहेत.” – वसंत राव  

त्या रात्री सुनीता बाईंना नीट झोप लागली नाही. कसं होईल, काय होईल याचाच विचार रात्रभर डोक्यात चालू होता.

दुसऱ्या दिवशी दोघंही जाऊन सुनीता बाईंचे पैसे भरून आले.

ट्रॅवल कंपनी च्या ऑफिस मध्ये त्यांनी एक क्लास घेतला. त्यात कुठल्या देशातले लोक कसे असतात, सामानाची काळजी कशी घ्यायची, सामान किती आणि कोणचं घ्यायचं आणि पासपोर्ट, विसा आणि बाकीचे पेपर्स  कसे सांभाळायचे यांच्या सूचना दिल्या. विशेषत: पासपोर्ट हा गळ्यातल्या पिशवीतच ठेवा असं सांगितलं. ही खास पिशवी सुद्धा त्यांनी दिली होती. आणखीही बऱ्याच सूचना होत्या आणि ह्या सगळ्यांचं प्रिंट आउट पण दिलं.

सुनीता बाई, दोनदा, तीनदा परदेश वारी करून आल्या होत्या. त्यामुळे त्यांना या सगळ्या माहितीचं विशेष काही वाटलं नाही. पण घरी गेल्यावर वसंत राव म्हणाले की “दिलेल्या सर्व सुचनांच तंतोतंत पालन कर. आधी मी तुझ्या बरोबर होतो सगळी काळजी घ्यायला. आता तुझं तुलाच सांभाळायचं आहे.”

सगळी तयारी झाली. आणि निघण्याचा दिवस पण उजाडला. आणि सर्व सोपस्कार होऊन विमान उडालं सुद्धा. हा संपूर्ण वेळ सुनेत्रा आणि सुनीता बाई बरोबरच होत्या.

लंडन ला सगळे जणं हॉटेल वर पोचले.. थोडं फ्रेश होऊन आणि ब्रेक फास्ट करून बकिंगहॅम पॅलेस बघायला सगळी वरात निघाली.  

सगळ्यांनी पासपोर्ट गळ्यातल्या पिशवीत ठेवला होता पण सुनेत्राने मात्र पर्स मध्ये ठेवला होता.

“सुनेत्रा, पासपोर्ट पर्स मध्ये का ठेवते आहेस.” – सुनीताबाई.  

“अग, ते मला आवडत नाही बिल्ला लटकवल्या सारखं. कैदी नंबर २०३ असल्या सारखं वाटतं.” सुनेत्रा म्हणाली  मग सुनीता बाईंनीही आपला पासपोर्ट पर्स मध्येच ठेवला.

पॅलेस वर पोचल्यावर सुनेत्रा आणि सुनीता बाईंच्या बरोबर एक वेगळीच बाई चालत होती. हिन्दी सायडर दिसत  होती. सुनेत्राने हिंदीतच विचारलं सुद्धा की

“तुम्ही आमच्या ग्रुप बरोबर आहात ? तुम्हाला आज प्रथमच पाहते आहे.”

“मी तुमच्या बरोबरच आहे पण मी दुबई हून आल्या मुळे आत्ता जॉइन झाले आहे.

माझं नाव सिमरन कौर पण सगळे मला सिमी म्हणतात. तुम्ही पण सिमी  च म्हणा.” आणि मग चालता चालता  बराच वेळ गप्पा झाल्या. दोघींनाही तिचा स्वभाव आवडला.

तिची जणी मग वॉश रूम  मधे  जायचं होतं म्हणून तिकडे गेल्या. तिथे बरीच रांग होती म्हणून रांगेत उभ्या राहिल्या. सुनीता बाईंचा नंबर लागल्यावर त्यांनी आपली पर्स सुनेत्रा जवळ दिली आणि त्या आत गेल्या. थोड्या वेळाने पाहतात तो सुनेत्रा पण आत आलेली दिसली.

“अग, सुनेत्रा, पर्स कुठे आहे ?” सुनीता बाईंनी विचारलं.

“सिमी बाहेर आहे तिच्या जवळ दिल्या आहेत.” – सुनेत्रा  

“ठीक आहे.” – सुनीताबाई.  

सगळं आटोपून, फ्रेश होऊन दोघी जणी बाहेर आल्या. सिमी कुठेच दिसेना.

“अग बाई, ही सिमी कुठे गेली ?” सुनीता बाई बोलल्या.

“असेल इथेच कुठे तरी.” – सुनीताबाई.

पांच मिनिटं वाट पाहून सुद्धा सिमी दिसली नाही, तेंव्हा मात्र दोघी घाबरल्या.

रांगेतल्या एक बाईनी त्यांची अवस्था बघितली आणि विचारलं की

“Are you searching anybody ?”

मग सुनेत्राने त्यांना सिमी बद्दल सांगितलं आणि तिच्या जवळ आमच्या पर्स दिल्या होत्या असं सांगितलं.

“She left, but your purses are kept there.”

दोघी धावल्या. आधी पर्स उघडून बघितली. सुनेत्राचा होता पण सुनीता बाईंचा पासपोर्ट गायब होता. पुन्हा पुन्हा पर्स चेक केली पण व्यर्थ.

“आता काय करायचं ग ?”- सुनीता बाई बोलल्या. हवालदिल झाल्या होत्या बिचाऱ्या.

आधी आपण ग्रुप जिथे आहे तिथे जाऊ आणि . caretaker  ला सांगू असं सुनेत्रा म्हणाली.

Caretaker  ला सांगितल्यावर तो म्हणाला की,

तुम्हाला बजावून सांगितलं होतं की पासपोर्ट गळ्यातल्या . पिशवीत ठेवा म्हणून

ते याच कारणं साठी. तुम्ही ऐकलं नाही. आता कठीण परिस्थिती उद्भवली आहे. आता तुम्ही इथेच बसा. तुम्हाला पॅलेस मध्ये जाता येणार नाही. आता आधी FIR

दाखल करावा लागेल. तुम्ही थोडा वेळ इथेच बसा. माझा सहकारी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल.

त्याचा सहकारी आल्यावर तो बाकी सगळ्यांना पॅलेस दाखवायला घेऊन गेला. आणि सुनीता बाई पोलिस स्टेशन मध्ये. तिथे गेल्यावर त्यांना सांगण्यात आलं की “ही FIR ची कॉपी घ्या आणि embassy मध्ये जा आणि प्रोविजनल पासपोर्ट घ्या. त्या पासपोर्ट वर तुम्हाला वापस इंडियात जाता येईल. पण U. K. मध्ये आता फिरता येणार नाही. तुम्ही ज्या हॉटेल वर उतरला आहात तिथेच थांबा. हा FIR जवळ ठेवा. म्हणजे कोणी तुम्हाला embassy मध्ये जातांना अडवणार नाही.”

“आता काय ?” – सुनीता बाई

“आता embassy.” – केअर टेकर

Embassy मध्ये त्यांना आत तर जाऊ दिलं. पण बऱ्याच वेळ बसल्यावर सुद्धा त्यांच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. Caretaker ला सुनीता बाईंनी विचारलं की इथे तुमची कोणाशी ओळख नाहीये का ?

नाही तसा मी नवीनच आहे इथे, त्या मुळे माझी कोणाशीच ओळख नाहीये.

सुनीता बाईंनी कपाळाला हात लावला. हेच व्हायचं बाकी होतं.

शेवटी एक जण त्यांच्या कडे आला आणि म्हणाला की जे लॉस्ट पासपोर्ट चं काम बघतात, ते आज अत्यंत बिझी आहेत त्यामुळे तुम्ही उदया या. तुमचं काम होऊन जाईल. त्यांनी एका कागदावर उद्याच्या प्रवेशा बद्दल लिहून दिलं. सुनीता बाई, हॉटेल वर परतल्या. Caretaker नी हॉटेल च्या मॅनेजर ला सांगितलं की यांचा पासपोर्ट हरवला आहे. आणि उद्या त्यांना embassy मधून प्रोविजनल मिळणार आहे.

पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ग्रुप ला फ्रांस ला जायचं होतं, म्हणून सगळा हिशोब करून झाला होता. आता संध्याकाळ पासून जर सुनीता बाईंना हॉटेल वर राहायचं असेल तर १०० पौंड पर डे पडणार होते. ट्रॅवल मॅनेजर ने सांगितलं की ही सोय त्यांनाच करावी लागणार आहे म्हणून. सुनीता बाईंच्या जवळ फक्त २५० पौंड होते. त्यांनी ट्रॅवल एजेंट ला विचारलं की आता काय करू तर त्यांनी खांदे उडवले आणि म्हणाला, की “तुम्ही आमच्या सुचनांच पालन केलं नाही. आणि पासपोर्ट हरवला. आता ही तुमची जबाबदारी आहे. मी काही करू शकत नाही. आणि पासपोर्ट मिळाल्या शिवाय तुम्ही इथे फिरू शकत नाही आणि इंडियात पण जाऊ शकत नाही.”

“आज तुम्ही embassy त जा आणि बघा काय होतेय ते. माझा सहकारी येईल तुमच्या बरोबर embassy मध्ये पण आज संध्याकाळ पासून तो पण असणार नाहीये. You will be on your own.” आता मात्र सुनीताबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. वसंत रावांना फोन करायची पण सोय नव्हती कारण घरी फोनच नव्हता. त्यांना रडायला येत होतं पण रडून भागणार नव्हतं. सुनेत्रा ला थांबणं शक्य नव्हतं. तिच्या ही जवळ इतके पैसे नव्हते. तिला फार वाईट वाटत होतं पण तिचाही नाईलाज झाला होता. ट्रॅवल कंपनी बरोबर जायचं आहे आणि सगळी सोय ते लोकच करणार आहेत म्हंटल्यांवर कोणीच फारसे पैसे बरोबर घेतले नव्हते.

Embassy त गेल्यावर कालचाच माणूस भेटला. केरळी माणूस होता. रंगनाथन  नाव होतं त्याचं. त्यांनी सुनीता बाईंची नीट चौकशी केली. मोडक्या तोडक्या हिंदीत त्यांनी सुनीता बाईंना धीर दिला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आणि मग सांगितलं की हे काम इतक्या सहजा सहजी होत नाही. तुम्हाला पासपोर्ट मिळेल पण आठवडा तरी लागेल. तुमचे पेपर इंडियात जातील तिथे scrutiny होईल मगच तुम्हाला प्रोविजनल पासपोर्ट मिळेल. आता काय करायचं ? सुनीता बाई जवळ इतके दिवस हॉटेल मध्ये राहण्या साठी पैसेच नव्हते. त्यांना रडायला यायला लागलं. रंगनाथन ला काही माहीत नव्हतं. त्यानी खोदून खोदून  सुनीता बाईंना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे म्हणून.

क्रमश: .......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com