Bhetli tu Punha - 13 books and stories free download online pdf in Marathi

भेटली तू पुन्हा... - भाग 13

 
 
आदि अनुला घेऊन घरी आला. ती अजून ही घाबरलेली होती. तिला आदि सोबत अस येताना पाहून आई थोडी घाबरली व गडबडीने दरवाज्याकडे गेली.
 
"काय झालं अनु बेटा?" आई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत काळजीने विचारत होती.
 
 
"आई आधी बसु दे तिला, मग बोलू आपण" आदि आईला म्हणाला.
 
 
"हो, ये ये बसा दोघे ही, मी पाणी घेऊन येते तुम्हाला" अस म्हणून आई किचन मध्ये निघून गेली.
 
 
"अनु, शांत हो आता घाबरू नको, त्याला साहिल बघून घेईल" आदि तिला समजावत बोलला.
 
 
"हम्म" तिने फक्त हुंकार भरला.
 
 
तिच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. ती कशीबशी डोळे पुसून नॉर्मल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली.
 
 
 
"अनु तू अस जर रडली तर आई बाबांना खूप टेंशन येईल, उगीच ते या वयात काळजी करत बसतील आणि मी आहे ना...आता तुझ्या सोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही मी आय प्रॉमिस" आदित्य तिचा हात हातात घेऊन बोलला.
 
 
तशी ती त्याला बिलगली व पुन्हा रडू लागली. तीच अस रडणं पाहून आदित्यच्या हृदयात कळ उठत होती. तिला होणार त्रास पाहून त्याला ही त्रास होत होता.
 
 
त्या गोखलेचा चेहरा आठवून आदित्यच्या डोक्याच्या नसा रागाने फुगत होत्या. त्याचे डोळे रागाने लाल दिसत होते. तिला मिठीत घेऊन तो तिला व स्वतःला ही शांत करू पाहत होता.
 
 
 
आई किचन मधून पाणी बाहेर आली. आईची चाहूल लागताच आदित्यने तिला दूर केले व व्यवस्थित बसला.
 
 
"हे घे बाळ , पाणी पी" आई अन्वी जवळ बसत बोलली.
 
 
 
 
तशी अन्वी ही काही न बोलता शांतपणे पाणी पियु लागली.
 
 
 
 
इतक्यात बाबा ही घरी आले. बाबा ही अन्वीच्या शेजारी बसले. त्यांना आलेलं पाहून आईने त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडला.
 
 
"मी चहा टाकते सगळ्यांसाठी" अस म्हणत आई पुन्हा किचनकडे गेली.
 
 
 
बाबा काही वेळ फक्त अन्वी कडे पाहत होते. तिचा चेहरा पुरता उतरला होता. गालावर अश्रुंचे ओघळ सुकलेले दिसत होते. डोळे अजून ही पाणावले होते. तिला अस पाहून बाबांना ही खूप वाईट वाटलं.
 
 
 
 
"अन्वी, तू रूम मध्ये जा, आणि फ्रेश होऊन ये" बाबा तिला प्रेमाने बोलले.
 
 
 
 
तशी ती काही ही न बोलता उठली व रुमकडे निघाली. ती गेल्याची खात्री होताच बाबा आदित्यशी बोलू लागले.
 
 
 
"आदित्यराव, काय भानगड आहे ही ....?" बाबा काळजीने विचारत होते.
 
 
 
 
"बाबा ते.... तिच्या स्कूलमध्ये गोखले सर म्हणून आहेत, त्यांची वाईट नजर होती आपल्या अन्वीवर" आदित्य मान खाली घालूनच बोलत होता.
 
 
 
आदित्यने बाबांना सगळं घडला प्रकार सांगितला. तसे बाबा ही चिडले.
 
 
 
"मग हे तुम्हाला माहित होतं ना आधीच....?" बाबा थोडे रागात बोलले.
 
 
 
 
"हो बाबा, म्हणून तर मोरे....." आदित्या बोलत होताच की आई बाहेर आल्या.
 
 
 
 
आईला पाहून दोघे ही शांत झाले. आईला समजलं की त्यांना काही तरी महत्वाचे बोलायचे असेल म्हणून त्या तिथे न थांबता अन्वी कडे जायचं ठरवतात.
 
 
 
"ते....तुम्ही बोलत बस मी अन्वी जवळ जाते" अस म्हणून आई अन्वीच्या रूमकडे गेली.
 
 
 
आई गेली की नाही हे बघून आदित्य पुन्हा बोलू लागला.
 
 
"आज मोरे मुळेच अन्वी सुरक्षित आहे" आदि बोलला.
 
 
"एकटा मोरे काय करणार आहे, आज तो फक्त गोखले होता म्हणून.... अचानक जास्त लोक आली व अन्वी ला....." बाबा बोलत बोलता थांबले.
 
 
 
"तस काही होणार नाही बाबा... मी आहे ना आणि साहिल ही आहे इथे सो...." आदि त्यांना धीर देत बोलला.
 
 
 
"तुम्ही तिघे आहात पण नेहमी तर तिच्या जवळ नसता ना आणि तुम्ही तिच्या जवळ नसताना जर कोणी तीच्यावर हल्ला केला तर" बाबांच्या बोलण्यात तथ्य तर होतेच.
 
 
 
"बाबा, मी सरांशी बोलून घेतो आजच या विषयावर..."
आदी ही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बोलला.
 
 
 
"तेच योग्य होईल, आम्ही तर किती दिवस असणार आहोत तुमच्या" बाबांचा कंठ दाठून आला होता.
 
 
 
आई हॉलमध्ये आली होती पण काही ही न बोलता फक्त ऐकत बसली.
 
 
 
 
"बाबा अस का बोलत आहात तुम्ही, आई बाबा नंतर तुम्हीच मला सांभाळल , मला कधी आई बाबांची उणीव भासू दिली नाही, ना अन्वीला कधी परक समजलं मग आता अचानक असे का बोलत आहात?" आदि ही दुखी झाला होता.
 
 
 
 
इतकावेळ शांत राहून ऐकणारी आई ही आता बोलली.
 
 
 
"हे बघ बाळा ,आम्ही राहिलो म्हातारी माणस किती दिवस तुम्हाला साथ देणार , आणि या पोरीची स्मृती कधी परत येईल हे देवालाच माहीत, आणि जेव्हा तिला सगळं आठवेल तेव्हा ती इथून निघून जाईल. आणि चुकून त्याआधीच तिला जेव्हा बाहेरून समजेल की आम्ही तिचे आजी आजोबा नाही तर तुझे आजी आजोबा आहोत तेव्हा काय होईल....खूप राग राग करेल ती आणि आम्हाला ते सहन होणार नाही" आई भरल्या आवाजाने बोलली.
 
 
हे बोलत असताना आईचा गळा भरून आला होता. पदराने डोळे पुसत आई बोलली.
 
 
"अग आई, इतके बघ नको इतकं टेन्शन घेऊ, तिला जरी सत्य समजलं तरी ती नाही जाणार सोडून आपल्याला" आदि आईला समजावत बोलला.
 
 
 
" नक्की ना" आई बोलली.
 
 
"हो नक्की, मी आहे ना, नको काळजी करू" अस म्हणत आदिने आईला जवळ घेतले.
 
 
इतक्यात अन्वी ही तिथे आली. तिला आलेलं पाहून पुन्हा सगळे नॉर्मल झाले.
 
 
"मी चहा घेऊन येते" अस म्हणून आई किचनमध्ये गेली.
 
 
 
 
अन्वी येऊन बाबांच्या जवळ बसली. बाबांनी तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवला. तशी ती बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना बीलगली.
 
 
"बेटा अनु, नको काळजी करू जे झालं ते झालं, आता अस नाही होणार काही त्या गोष्टींचा विचार करू नको आता" बाबा तिला समजावत बोलले.
 
 
ती शांतपणे शून्यात नजर लावून बसली होती. आदि तिला अस पाहून मनातून तीळ तीळ तुटत होता.
 
 
"आणि आता आदित्यराव आहेत की तुझ्या सोबत ... हो ना" बाबा हसत बोलले.
 
 
तशी तीने कसनुस स्मित केलं व पुन्हा शांत झाली. तिला झालेला त्रास पाहून आदि मात्र जास्तच काळजीत पडला.
 
कारण बाबा जे म्हणाले ते कुठे तरी खरच तर होत. आज एक गोखले होता. पण तिचा शोध घेत गुंड आली तर तेव्हा .... तेव्हा काय? आम्हा तिघांपैकी कोणाला तरी एकाला नेहमी तुच्या सोबत राहून भाग पडेल. आजच सरांना याची कल्पना द्यायला हवी अस मनाशी ठरवून तो बसला.
 
 
 
इतक्यात आई सर्वांसाठी चहा घेऊन आली. सर्वांनी चहा घेतला. रात्री उशिरापर्यंत तिथेच राहून जेवून आदी घरी निघून गेला.
 
 
 
इतक्यात त्याला साहिल, मोरे व बसकी किती तरी कॉल्स येऊन गेले होते. पण अन्वी ला अस पाहून त्याला घरातून पाय निघत नव्हता. मनावर दगड ठेवून तो तिचा निरोप घेऊन रूम कडे निघाला.
 
 
 
रूमवर येताच त्याने पाहिले की साहिल खुर्चीत बसून अजून ही काही काम करत आहे.
 
 
"अरे! दहा वाजून गेले साहिल, अजून झोपला नाही तू" आदि शर्ट काढत बोलला.
 
 
"हो झोपणारच होतो, पण तुझी वाट पाहत होतो. मग म्हणलं असच बसण्यापेक्षा काम करत बसावं" साहिल काम आवरत बोलला.
 
 
"जेवलास तू?" आदि बेडवर बसत बोलला.
 
 
"हो जस्टच, तू जेवला ना? आणि अन्वी कशी आहे" साहिल खुर्ची आदिकडे करत बोलला.
 
 
 
"ठीक आहे थोडी, पण मनावर परिणाम झाला आहे तिच्या चांगलाच, आधीच हळवी आहे ती आणि आता हे अस..." आदि उदासपणे बोलला.
 
 
"हो रे, अजून काय काय सहन करायचं आहे त्या मुलीने" साहिल ही उदासपणे बोलला.
 
 
"आता नाही हा, आता आपण आहोत ना तिच्या सोबत; आता तिला कोणत्याही प्रॉब्लेम नको आहे मला" आदी काळजीने बोलला.
 
 
"हो रे आपण आहोत " साहिल आदीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दिलासा देत बोलला.
 
 
 
"आई बाबा काय म्हणाले?" साहिल आदिकडे पाहून बोलत होता.
 
 
 
"काही नाही, त्यांना ही टेंशनच आले आहे" आदि उसासा टाकत बोलला.
 
 
"बर ते सोड, त्या हरामखोर गोखलेच काय केलं" आदि मेन विषयावर बोलला.
 
 
"तुला काय वाटतं काय केलं असेल" साहिल कुत्सित हसत बोलला.
 
"जिवंत आहे ना?" आदि डोळे बारीक करून विचारू लागला.
 
 
"हो, ऑक्सिजनवर आहे साला" साहिल रागाने बोलला.
 
 
"आणि मोरे....?"
 
 
"त्यानेच नेले गोखलेला हॉस्पिटलमध्ये"
 
 
 
"बरं, लक्ष ठेवा म्हणून सांग"
 
 
 
"हो ! सांगितले आहे"
 
 
 
"आदी मला अस वाटत की आपण अजून आपली काही माणसं बोलवली पाहिजेत" साहिल काही विचार करत बोलला.
 
 
"का? कांस्य झालं?" आदि त्याला पाहत बोलला.
 
 
 
"थोड्यावेळापूर्वी कॉल आलेला आपल्या माणसाचा" साहिल गंभीरपणे सांगत होता.
 
 
"काय म्हणाला?" आदिला ही काळजी वाटली.
 
 
"ते रुद्र आपली माणस सरीकडे पाठवत आहे"
 
 
"ज त्याने ते आधी ही केलंच आहे ना"
 
 
 
"हो पण यावेळी इथे ही पाठवणार आहे अशी बातमी मिळाली आहे"
 
 
"काय?, हे खरं आहे?"
 
 
 
"हो, माझ्या माणसाने आज पर्यंत खरी माहिती दिली आहे"
 
 
"हुंम" आदि उसासा सोडत विचारात गडाला.
 
 
 
 
 
 
******
 
आज नवीन ट्विस्ट कथेत. वाचून भारी वाटलं ना की अन्वीचे आजी आजोबा हे तिचे खरे आजी आजोबा नसून ते आदित्य म्हणजेच आपल्या सी ए साहेबांचे आजी आजोबा आहेत. 😀
तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोरे कोण आहे मग, साहिल कोण आहे मुळात आदित्य कोण आहे????? समजेल लवकरच ते ही.
 
 
 
अभि बहोत सारे राज खुलने बाकी हे मेरे दोस्त....😜 त्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट राहा.
 
 
 
 
भाग कसा वाटला नक्की सांगा.